स्मार्ट सिटी मिशन

स्मार्ट सिटीज मिशन हा भारत सरकारचा नागरी पुनर्नवीकरण आणि सुधारणा कार्यक्रम असून यात संपूर्ण देशात नागरिकस्नेही, स्थायी स्वरूपात  १०० शहरे विकसित करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले.

त्या त्या शहरांच्या राज्य सरकारांच्या सहकार्याने केंद्रीय नागरी विकास मंत्रालयाने हे मिशन राबवायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने देशात शंभर शहरे ही मोठ्या शहरांची उपशहरे म्हणून विकसित करण्याचे किंवा मध्यम आकारांच्या शहरांचे आधुनिकीकरण करण्याचे ध्येय ठेवले आहे. 

यात पहिल्या टप्प्याचा निकष म्हणून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी १०० संभाव्य शहरांची नामांकने केली. स्मार्ट सिटी म्हणून त्यांच्या विकासाच्या नियोजनाचे मूल्यांकन नागरी विकास मंत्रालयाच्या सर्वोच्च समितीने स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात केले आणि गुणांवर आधारित पहिल्या २० शहरांची निवड २०१५-१६ या आर्थिक वर्षात वित्तपुरवठ्यासाठी केली. इतर शहरांना नियोजनात आढळलेल्या त्रुटी दूर करून पुढच्या दोन टप्प्यांत स्पर्धेत सहभागी होण्यास सांगण्यात आले. पुढच्या दोन्ही टप्प्यात प्रत्येकी ४० शहरे वित्तपुरवठा करण्यासाठी निवडली जातील.

इतिहास

जून २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मार्ट सिटीज मिशनचा प्रारंभ केला..

वैशिष्ट्ये

स्मार्ट शहरे पायाभूत सुविधानी युक्त असतील असे ठरविण्यात आले असून स्मार्ट उपायांद्वारे चांगल्या प्रतीचे जीवनमान ती देऊ शकतील. निश्चित पाणी आणि वीजपुरवठा, निःसारण आणि घनकचरा व्यवस्थापन, कार्यक्षम नागरी वाहतूक, आय़टी कनेक्टिव्हिटी, इ-प्रशासन आणि नागरिकांचा सहभाग त्याप्रमाणे नागरिकांची सुरक्षिततात ही स्मार्ट शहरांची काही वैशिष्ट्ये असतील

राज्यांनुसार स्मार्ट शहरांची यादी

राज्यांधली स्मार्टसिटीसाठी निवडलेली ९८ शहरे .

अ.क्र. राज्य/केंद्रशासित प्रदेशाचे नाव
निवडलेल्या शहरांची नावे
महाराष्ट्र बृहन्मुंबई, ठाणे , कल्याण-डोंबिवली,नवी मुंबई,नाशिक, अमरावती, सोलापूर, नागपूर, पुणे, औरंगाबाद
पश्चिम बंगाल न्यू टाऊन कोलकाता, बिधाननगर, दुर्गापूर,  हल्दिया
 गुजरात गांधीनगर, अहमदाबाद , सूरत, वडोदरा, राजकोट, दाहोद,
मध्य प्रदेश भोपाळ, इंदूर, ग्वाल्हेर, जबलपूर, सतना, उज्जैन, सागर
तमिळनाडू कोइंबतूर, चेन्नै, मदुरै, तिरुचिरापल्ली, वेल्लूर, सेलम, इरोड, तिरूपुर, तंजावूर , तिरूनरवली, दिंडुक्कल, तूतुकूडी,
कर्नाटक मंगळूर, बेळगाव, शिमोगा, हुबळी- धारवाड , तुमकूर,दावणगेरे
केरळ कोची
तेलंगण वारंगळ, करीमनगर
आंध्रप्रदेश विशाखापट्टणम, तिरूपती, काकीनाडा
१० उत्तर प्रदेश मोरादाबाद, अलीगढ, सहारनपूर, बरैली, झांसी, कानपूर, अलाहाबाद,लखनौ, वाराणसी, गाझियाबाद, आग्रा, रामपूर
११ राजस्थान जयपूर , उदयपूर , कोटा , अजमेर
१२ पंजाब लुधियाना , जलंधर , अमृतसर
१३ बिहार मुझफ्फरपूर , भागलपूर , बिहार शरीफ
१४ हरियाणा करनाल , फरीदाबाद
१५ आसाम गुवाहाटी
१६ ओडिशा भुवनेश्वर, रूरकेला
१७ हिमाचल प्रदेश धरमशाला
१८ उत्तराखंड देहरादून
१९ झारखंड रांची
२० सिक्किम नामची
२१ मणिपूर इम्फाल
२२ अंदमान आणि निकोबार पोर्ट ब्लेअर
२३ अरुणाचल प्रदेश पासीघाट
२४ चंदिगढ चंदिगढ
२५ छत्तीसगढ रायपूर ,बिलासपूर
२६ दादरा आणि नगर- हवेली सिल्वासा
२७ दमण आणि दीव दीव
२८ दिल्ली दिल्ली
२९ गोवा पणजी
३० लक्षद्वीप कवरती
३१ मेघालय शिलाँग
३२ मिझोराम ऐझॉल
३३ नागालँड कोहिमा
३४ पुदुच्चेरी औल्गरेत
३५ त्रिपुरा अगरतला
  • जम्मू आणि काश्मीरने संभाव्य स्मार्ट सिटीचा निर्णय करण्यासाठी अधिक वेळ मागितला आहे.
  • उत्तर प्रदेशला १३ शहरांची जागा दिली होती, त्यापैकी त्यांनी १२ शहरांची संक्षिप्तयादी दिली आहे.

संदर्भ


बाह्य दुवे

Tags:

स्मार्ट सिटी मिशन इतिहासस्मार्ट सिटी मिशन वैशिष्ट्येस्मार्ट सिटी मिशन राज्यांनुसार स्मार्ट शहरांची यादीस्मार्ट सिटी मिशन संदर्भस्मार्ट सिटी मिशन बाह्य दुवेस्मार्ट सिटी मिशन

🔥 Trending searches on Wiki मराठी:

बुलढाणा लोकसभा मतदारसंघबखरभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तछत्रपती संभाजीनगर जिल्हाफिरोज गांधीआद्य शंकराचार्यतरसजागतिक कामगार दिनअकोला जिल्हारक्षा खडसेविराट कोहलीतुळजाभवानी मंदिरभारताचा स्वातंत्र्यलढाभूतहिंगोली विधानसभा मतदारसंघराज्य मराठी विकास संस्थाहिंदू धर्मातील अंतिम विधीकर्ण (महाभारत)महाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीआनंद शिंदेयोगरावेर लोकसभा मतदारसंघकराड उत्तर विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्र भूषण पुरस्कारवि.स. खांडेकरप्रतापगडनरेंद्र मोदीप्रेममतदानसात आसरामहाराष्ट्रचाफामिरज विधानसभा मतदारसंघपानिपतची तिसरी लढाईगोंदवलेकर महाराजवडवाशिम जिल्हासरपंचजालना लोकसभा मतदारसंघस्वादुपिंडकाळूबाईदुसरे महायुद्धहोमी भाभावाघश्रीगोंदा विधानसभा मतदारसंघबारामती लोकसभा मतदारसंघराम सातपुतेबडनेरा विधानसभा मतदारसंघडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनठाणे लोकसभा मतदारसंघविद्या माळवदेरामायणभरड धान्यदौंड विधानसभा मतदारसंघजगातील देशांच्या राजधान्यांची यादीनांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघत्र्यंबकेश्वरमहाराष्ट्र पोलीसकडुलिंबतणावमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थासकाळ (वृत्तपत्र)बीड विधानसभा मतदारसंघ३३ कोटी देवमहाराष्ट्र लोकसेवा आयोगपुणे करारउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघपांढर्‍या रक्त पेशीअमर्त्य सेनभारताचे सर्वोच्च न्यायालयभारतीय संविधानाची ४४वी घटनादुरुस्तीआर्थिक विकासत्रिरत्न वंदनामहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीवृषभ रासभारतातील शेती पद्धतीभोवळलीळाचरित्रलिंग गुणोत्तर🡆 More