होमी भाभा: भारतीय वैज्ञानिक

डॉ.

होमी जहांगीर भाभा यांचा जन्म सधन पारशी कुटुंबात झाला. त्यांचे वडील जहांगीर भाभा हे बॅरिस्टर होते. पुस्तकांची आवड असल्यामुळे घरातच खूप पुस्तके गोळा केली होती. त्यात विज्ञान विषयाचीही पुस्तके होती. होमी भाभा यांना या पुस्तकांमुळे विज्ञानात स्वाभाविकपणे आवड निर्माण झाली. या शिवाय त्यांना कवितेचा आणि चित्रकलेचा छंद होता.[ संदर्भ हवा ] अतिशय सुंदर, देखणे व्यक्तिमत्त्व लाभलेले होमी भाभा उत्तम व्यक्ती होते.

होमी जहांगीर भाभा
होमी भाभा: भारतीय वैज्ञानिक
पूर्ण नावहोमी जहांगीर भाभा
जन्म ऑक्टोबर ३०, इ.स. १९०९
मुंबई, महाराष्ट्र, भारत
मृत्यू जानेवारी २४, इ.स. १९६६
माँत ब्यांको, इटली
निवासस्थान भारत होमी भाभा: भारतीय वैज्ञानिक
नागरिकत्व भारतीय
राष्ट्रीयत्व भारतीय होमी भाभा: भारतीय वैज्ञानिक
धर्म पारशी
कार्यक्षेत्र भौतिकशास्त्रज्ञ
कार्यसंस्था कॅव्हेंडिश लॅबोरेटरी,
टाटा मूलभूत संशोधन संस्था,
भारतीय अणुऊर्जा आयोग
प्रशिक्षण केंब्रिज विद्यापीठ
डॉक्टरेटचे मार्गदर्शक पॉल डिरॅक होमी भाभा: भारतीय वैज्ञानिक
ख्याती भारतीय अणू संशोधन
पुरस्कार पद्मभूषण(इ.स. १९५४)
वडील जहांगीर होरमजी भाभा
आई मेहेरबाई

त्यांचे प्राथमिक ते पदवी पर्यंतचे शिक्षण मुंबई येथे झाले. होमी यांनी पुढे इंजिनियर व्हावे असे त्यांच्या वडिलांना वाटत होते. पण होमी यांनी वडिलांना आपल्याला गणित आणि भौतिकशास्त्र हे विषय विशेष आवडतात असे ठामपणे सांगितले. वडिलांनी हो-ना करत गणिताचा सखोल अभ्यास करण्यास परवानगी दिली पण आधी प्रथम श्रेणीत इंजिनियरिंगची पदवी प्राप्‍त करण्याची अट घालून दिली. वडिलांनी परवानगी दिल्यावर होमी भाभा केंब्रिज विद्यापीठातून इ.स. १९३० साली प्रथम श्रेणीत इंजिनियर झाले. तसेच पॉल डिरॅक यांच्या मार्गदर्शनाखाली गणिताचा अभ्यासही करीत राहिले. कॅव्हेंडिश लॅबोरेटरीत न्यूक्लिअर फिजिक्सचा अभ्यास करून इ.स. १९३३ साली त्यांनी डॉक्टरेट मिळवली. त्या काळात त्यांना शिष्यवृत्ती आणि अनेक बक्षीसेही मिळाली. त्यांनी अन्वीकक्षास्त्र निर्माण केले.[ संदर्भ हवा ]

इ.स. १९४० साली भारतात परत आल्यावर काही काळ डॉ. भाभा यांनी भारतीय विज्ञान संस्था, बंगलोर येथे प्रोफेसर म्हणून काम केले. इ.स. १९४५ साली टाटा मूलभूत संशोधन संस्थेची स्थापना करण्यात मदत केली आणि आपले संशोधन कार्य संभाळून डॉ. भाभा हे टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे संचालक झाले.[ संदर्भ हवा ] भारताच्या स्वातंत्र्यानंतर इ.स. १९४८ साली त्यांच्या पुढाकाराने अणु उर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली. याही संस्थेचे ते संचालक म्हणून काम पाहू लागले. त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच भारत देशात अणु भट्टीची स्थापना होऊ शकली. अणुचा वापर शांततेच्या मार्गानेच व्हावा असे ठाम मत संयुक्त राष्ट्राच्या सभेत मांडणारे भाभा हे पहिले वैज्ञानिक.[ संदर्भ हवा ] डॉ. होमी भाभा यांनी पाया रचला म्हणूनच भारताने अनेक ठिकाणी अणु भट्या सुरू करून त्यांचा विज निर्मितीसाठी उपयोग केला. तसेच १८ मे, इ.स. १९७४ या दिवशी भारताने पोखरण येथे पहिला अणुस्फोट घडवून आणला.[ संदर्भ हवा ]

भाभांवरील पुस्तके

  • भारताची अणुगाथा - आल्हाद आपटे. भारतातील अणुसंशोधन आणि.......[ संदर्भ हवा ]

संदर्भ आणि नोंदी


Tags:

विकिपीडिया:संदर्भ द्या

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कोरेगावची लढाईफुलपाखरूसर्वनामकोल्हापूरबहुराष्ट्रीय कंपनीआर्य समाजभारतीय आडनावेबडनेरा विधानसभा मतदारसंघगणपतीमातीचक्रधरस्वामीभारतीय पंचवार्षिक योजनाभारतातील राजकीय पक्षरक्तगटशिवनेरीलोणार सरोवर१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धपंकजा मुंडेपुणेडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारआयुर्वेदपानिपतची तिसरी लढाईअन्नप्राशनसंख्यासंगीतातील घराणीनाशिक लोकसभा मतदारसंघभारताच्या पंतप्रधानांची यादीप्रसूतीमाहिती अधिकारभारतातील शेती पद्धतीमानवी शरीरगुकेश डीआणीबाणी (भारत)भद्र मारुतीमुंबई–नागपूर द्रुतगतीमार्गप्रणिती शिंदेव्यावसायिक अर्थशास्त्रसंवादिनीमराठी संतशिखर शिंगणापूरवर्तुळमुंबई उच्च न्यायालयभारतीय रेल्वेहिंदू कोड बिलमहादेव जानकरअभिव्यक्तीमानवी हक्कपुरंदर किल्लाउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघकाळभैरवविराट कोहलीटरबूजविठ्ठलरामटेक लोकसभा मतदारसंघएकनाथन्यूझ१८ लोकमतदशरथशहाजीराजे भोसलेरक्षा खडसेए.पी.जे. अब्दुल कलामनगर परिषदछगन भुजबळविहीरभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्याईशान्य दिशामहाराष्ट्र केसरीपाणीमीठयकृतअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमहाराष्ट्रातील नद्यांची यादीहिंगोली लोकसभा मतदारसंघभारताचा ध्वजजी.ए. कुलकर्णीमुंजा (भूत)जवसबाळसावता माळी🡆 More