क्लिओपात्रा

प्राचीन इजिप्तची राणी

Disambig-dark.svg

क्लिओपात्रा ७ फिलोपातोर (ग्रीक: Κλεοπάτρα Φιλοπάτωρ) (इ.स. पूर्व ६९ - १२ ऑगस्ट ३०) ही प्राचीन इजिप्तची राणी होती. क्लिओपात्रा जुलियस सीझर ह्या रोमन सम्राटाची अविवाहित पत्नी होती असे मानले जाते. १२ ऑगस्ट ३० रोजी वयाच्या ३९व्या वर्षी क्लिओपात्राने स्वतःवर सर्पदंश करून घेऊन आत्महत्या केली.[ संदर्भ हवा ]

क्लिओपात्रा ७ फिलोपातोर
प्राचीन इजिप्तपधील प्टॉलेमीक साम्राज्याची राणी
Kleopatra-VII.-Altes-Museum-Berlin1.jpg
अधिकारकाळइ.स.पू. ५१ ते १२ ऑगस्ट, इ.स.पू. ३०
जन्मइ.स.पू. ६९,
अलेक्झांड्रिया, इजिप्त
मृत्यू१२ ऑगस्ट, इ.स.पू. ३०
अलेक्झांड्रिया, इजिप्त
पूर्वाधिकारीबारावा टॉलेमी
उत्तराधिकारीचौदावा टॉलेमी
वडीलटॉलेमी नेऑस डायोनिसॉस थेओस फिलोपातोर थेओस फिलाडेल्फॉस
आईज्ञात नाही पण पाचवी क्लिओपात्रा असे मानतात.

इतिहास

इ.स.पू. ६९ मध्ये जन्मलेली क्लिओपात्रा बाराव्या टॉलेमीची कन्या होती. या टॉलेमीचा पूर्वज पहिला टॉलेमी हा अलेक्झांडर द ग्रेट याच्या सैन्यात सेनानी होता. हा मॅसोडेनियन सेनानी अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर इजिप्तचा पहिला टॉलेमी राजा झाला. या राजघराण्याने भाऊ-बहिणींमधील लग्नाची पद्धत वंशशुद्धीच्या कल्पनेने उचलली होती. क्लिओपात्राच्या जन्माच्या वेळी इजिप्त हे अतिशय श्रीमंत राज्य होते. परंतु हे राज्य राजकीयदृष्ट्या अस्थिर असल्यामुळे व शेजारच्या रोमन साम्राज्यापुढे आपला टिकाव लागणार नाही म्हणून क्लिओपात्राच्या बापाने करार करून सीझर आणि पॉंपेईकडून आपला इजिप्तवर राजा म्हणून असलेला अधिकार मान्य करून घेतला होता. याबदल्यात रोमनांनी टॉलेमीकडून प्रचंड रक्कम घेतली. ही रक्कम टॉलेमीने रोमन धनकोंकडून कर्जाऊ घेऊन दिली. या प्रचंड रकमेची परतफेड करणे अवघड होते त्यामुळे त्याच्या राज्यातील नागरिकांना त्याचे हे कृत्य पसंत नसल्याने राज्यात अंतर्गत बंडाळी माजली. या परिस्थितीतच इ.स.पू. ५१ मध्ये टॉलेमीचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर त्याची १८ वर्षीय कन्या क्लिओपात्रा आणि तिचा धाकटा १० वर्षाचा भाऊ तेरावा टॉलेमी संयुक्तपणे राज्यावर आले. या राजघराण्यातील परंपरेनुसार हा तिचा धाकटा भाऊ तेरावा टॉलेमी क्लिओपात्राचा नवरा होता. तो आपल्याच हाताखालील एका सेवकाच्या आहारी जाऊन त्याच्या हातातील बाहुले बनला होता. क्लिओपात्राला दूर करून राज्य हातात घेण्याच्या त्यांच्या योजना चालू होत्या. रोममध्येही त्याचवेळी सीझर सत्तेवर आला होता. रोमची तिजोरी रिकामी होती त्यासाठी सीझरला इजिप्तकडून वसूली करणे गरजेचे होते म्हणून सीझर अलेक्झांड्रियाला आला. राज्यातील अंतर्गत बंडाळी आणि भावाची/नवऱ्याची कारस्थाने यातून मार्ग काढण्यासाठी क्लिओपात्राने सीझरची मदत घेतली. यानंतर क्लिओपात्राचे सीझरशी अत्यंत सलोख्याचे संबंध असले तरी रोमविषयी तिच्या मनात भीती होतीच. सीझरच्या खुनाच्या वेळी क्लिओपात्रा रोममध्येच होती. सीझरचे खूनी आणि त्याचे मित्रही या खुनासाठी क्लिओपात्राची मदत मागत होते. तिची सत्ता आणि राज्याचे स्वतंत्र असणे याचा विचार करून तिने त्यावेळी ॲंटोनीला मदत केली. नौका पुरविल्या. पैसा दिला. त्यामुळे साहजिकच क्लिओपात्रा आणि ॲंटोनी यांच्यातही सलोख्याचे संबंध निर्माण झाले.

मृत्यू

क्लिओपात्राचा मृत्यू कशामुळे झाला याचे गूढ अजूनही कायम आहे. मात्र तिने स्वतःच सर्पदंश करून घेऊन आत्महत्या केली असे मानले जाते. क्लिओपात्राचा समकालीन ग्रीक इतिहासकार स्ट्राबो याने आपल्या जिओग्राफीका या पुस्तकातही असाच उल्लेख केलेला आहे. यात तो म्हणतो एक तर क्लिओपात्राने विषारी द्रव्य सेवन केल्याने तिचा मृत्य झाला अथवा तिने स्वतःच्या वक्षावर सर्पदंश करवून घेतला. हा उपलब्ध स्रोत सर्वात जुना असून व क्लिओपात्राच्या मृत्यूसमयी स्ट्राबो अलेक्झांड्रिीयातच असल्याने हा स्रोत ग्राह्य मानला जातो. या घटनेनंतर साठ वर्षांनी मार्क्स व्हेलिअस पॅटरक्यूलस या रोमन इतिहासकाराने कॉम्पेटीशन ऑफ रोमन हिस्ट्री या ग्रंथात व या घटनेच्या १५० वर्षानंतर फ्लोरस या रोमन इतिहासकारानेच लिहिलेल्या एपिटोम ऑफ रोमन हिस्ट्री या ग्रंथातही क्लिओपात्राने सर्पदंश करवून घेऊन आत्महत्या केल्याचे उल्लेख आहेत.

क्लिओपात्राच्या मृत्यूनंतर १३० वर्षांनी ग्रीक इतिहासकार प्लुटार्क आपल्या लाईफ ऑफ ॲंटोनी मध्ये म्हणतो की, ऑक्टोव्हिअन क्लिओपात्राला शोधण्यात यशस्वी झाला होता आणि त्याने आपल्या सैनिकांना क्लिओपात्राला आत्महत्या करण्यापासून बाजूला करण्याचे आदेशही दिले होते कारण रोमला परत गेल्यावर होणाऱ्या विजयी मिरवणूकीत नेऊन त्याला क्लिओपात्राला अपमानित करायचे होते. पण ज्यावेळेस सैनिक तिच्यापर्यंत गेले त्यावेळी क्लिओपात्रा मरून पडली होती व तिच्याजवळ तिच्या दोन दासी आणि अंजीराच्या टोपलीत एक सर्प होता.

शेक्सपिअरनेही आपल्या ॲंटोनी ॲन्ड किलओपात्रा या नाटकात क्लिओपात्राच्या मृत्यूची हीच प्रतिमा कायम ठेवली आहे.

अलीकडच्या काळात इ.स. २०१० मध्ये जर्मन इतिहासकार ख्रिस्तोफर शाफर याने म्हटले आहे की, क्लिओपात्राचा मृत्यू सर्पदंशाने न होता तो विषारी द्रव्याच्या सेवनाने झालेला आहे. यासाठी त्याने अनेक ऐतिहासिक पुराव्यांची व विषतज्‍ज्ञांची मदत घेतली. तो म्हणतो ज्या सर्पाच्या दंशाने क्लिओपात्राचा मृत्यू झाला असे म्हटले जाते त्या सर्पाच्या (इजिप्शिअन कोब्रा) दंशाने झटपट आणि विनावेदना मृत्यू येऊ शकत नाही. या सर्पाच्या दंशाने मृ्त्यू येण्यापूर्वी हळूहळू शरीराचे एकक अवयव सुरुवातीला डोळ्यापासून निकामी होऊ लागतात. शाफर आणि विषतज्‍ज्ञ डायट्रीच मेब्स यांनी क्लिओपात्राचा मृत्यू हेमलॉक, वोल्फ्सबेन आणि ओपिअम या विषारी द्रव्याच्या सेवनाने झाल्याचे म्हटले आहे.[१]

चिरस्थान

क्लिओपात्राच्या मृत्यूनंतर तिने घेतलेल्या चिरविश्रांतीचे ठिकाण शोधण्याचे आत्तापर्यंत अनेकांनी प्रयत्‍न केले आहेत. प्रसिद्ध इजिप्शियन पुरातत्त्वज्ञ डॉ. झही हवास आणि डॉमिनीकन रिपब्लिकची पुरातत्त्वज्ञ डॉ. कॅथलिन मार्टीनेझ यांनी अलिक्झांड्रियाच्या पश्चिमेला ५० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या तापोसिरीस मॅग्ना या मंदिरातच ॲंटोनी आणि क्लिओपात्राची चिरविश्रांतीस्थाने आहेत असा दावा केला आहे.[२] प्लुटार्कने उल्लेख केल्याप्रमाणे ॲंटोनी आणि क्लिओपात्राची दफने जवळजवळच आहेत या मतांचा त्यांनी आधार घेतला. हे तापोसिरीस मॅग्ना मंदिर ओरीसिस या देवतेचे असून तिला राक्षसाने मारून तिचे चौदा तुकडे इजिप्तच्या भूमीत फेकून दिले होते. हे ओरीसिसचे चौदा तुकडे जिथे जिथे पडले त्या त्या ठिकाणी इजिप्तमध्ये ही ओरीसिसची मंदिरे आहेत. त्यापैकीच तापोसिरीस मॅग्ना हे एक आहे. या मंदिराचे उत्खनन करतेवेळी डॉ. झही आणि मार्टिनेझ यांना त्या ठिकाणी अलेक्झांडर द ग्रेट याचे एक नाणे आणि क्लिओपात्राच्या चेहऱ्याचा मुखवटा सापडला आणि त्यावरून हे मंदिर चौथ्या टॉलेमीच्या काळात २००० वर्षांपूर्वी बांधले गेले असल्याचे त्यांनी सिद्ध केले.[३] या पुरातत्त्ववेत्त्यांनी रडारचा वापर करून या मंदिरात खाली २५ ते ३० मीटर खोलीवर तीन ठिकाणे शोधली. त्यांपैकी एका ठिकाणी क्लिओपात्राचे दफन झालेले असू शकते अशी शक्यता वर्तवली आहे.

इतर

 • क्लिओपात्रा आपल्या सौंदर्य रक्षणासाठी गाढवीच्या दुधाने आंघोळ करीत असे.[४]
 • क्लिओपात्रा कारमाइन बीटल्सपासून बनवलेला लाल रंग ओठांचे सौंदर्य खुलविण्यासाठी वापरीत असे.[५]
 • आस्प जातीच्या सर्पाच्या दंशाने चटकन मृत्यू येतो याची खात्री करून घेण्यासाठी क्लिओपात्रा राणीने प्रथम तिच्या गुलामांवर प्रयोग केले.[६]

वंशावळ

 
पाचवा टॉलेमी, एपिफेन्स
 
 
 
इजिप्तची पहिली क्लिओपात्रा
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
आठवा टॉलेमी, फिस्कॉन
 
 
 
सहावा टॉलेमी फिलोपेटर
 
 
 
इजिप्तची दुसरी क्लिओपात्रा
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
इजिप्तची तिसरी क्लिओपात्रा
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
दहावा टॉलेमी
 
 
 
पहिली क्लिओपात्रा सेलेनी
 
 
 
दहावा टॉलेमी, लाथायरॉस
 
 
 
इजिप्तची चौथी क्लिओपात्रा
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
इजिप्तची तिसरी बेरेनाईस
 
 
 
 
बारावा टॉलेमी, आउलेट्स
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
इजिप्तची पाचवी क्लिओपात्रा
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
क्लिओपात्रा

क्लिओपात्रावरील पुस्तके

 • क्लिओपात्रा (कादंवरी, सन २०२०पर्यंत ७ आवृत्त्या, लेखक संजय सोनवणी)
 • क्लिओपात्रा (व्यक्तिचित्रण, लेखिका - अलका रोडे)

क्लियोपेट्रावर आधारित चित्रपट आणि टीव्ही मालिकांची यादी

 • अँटोनी आणि क्लियोपात्रा (१९०८ चित्रपट)
 • अँटोनी आणि क्लियोपात्रा (१९१३ चित्रपट)
 • अँटोनी आणि क्लियोपात्रा (१९५९ चित्रपट)
 • अँटोनी आणि क्लियोपात्रा (१९७२ चित्रपट)
 • अँटोनी आणि क्लियोपात्रा (1974 टीव्ही नाटक)
 • अँटनी आणि क्लियोपात्रा (२०१५ चित्रपट)
 • बीबीसी टेलिव्हिजन शेक्सपियर
 • क्लियोपेट्रा (१९१७ चित्रपट)
 • क्लियोपेट्रा (1934 चित्रपट)
 • क्लियोपात्रा (१९६३ चित्रपट)
 • क्लियोपेट्रा (1970 चित्रपट)
 • क्लियोपेट्राचा दुसरा पती
 • कन्नकी (चित्रपट)
 • रेड नोटीस
 • झुल्फिकार (चित्रपट)

संदर्भ आणि नोंदी

 1. ^ "पॉइझन, नॉट स्नेक किल्ड क्लिओपात्रा" (इंग्रजी भाषेत).
 2. ^ "क्लिओपात्राज टॉम्ब साईट डिस्कव्हर्ड" (इंग्रजी भाषेत). १३ एप्रिल, २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 3. ^ "डिग मे रिव्हील क्लिओपात्राज टॉम्ब" (इंग्रजी भाषेत). १३ एप्रिल, २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 4. ^ "रूपवतींच्या सौंदर्याचे हे आहे रहस्य". १३ एप्रिल, २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[मृत दुवा]
 5. ^ "अर्थवेध:लिपस्टिक". १३ एप्रिल, २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[मृत दुवा]
 6. ^ "आमापन, जैव (मराठी विश्वकोश, खंड २)". १३ एप्रिल, २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्यदुवे

🔥 Top trends keywords मराठी Wiki:

क्लिओपात्राधर्मविशेष:शोधाआनंद दिघेमहाराष्ट्र विधानसभाएकनाथ शिंदेमुखपृष्ठव्यसनशिवाजी महाराजसंत तुकाराममहाराष्ट्र शासनमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीमहाराष्ट्र विधान परिषदज्ञानेश्वरकादंबरीदूरचित्रवाणीउद्धव शेळकेबनगरवाडीप्रदूषणबाबासाहेब आंबेडकरआषाढी वारी (पंढरपूर)देवी (रोग)महाराष्ट्रातील जिल्ह्यांची यादीए.पी.जे. अब्दुल कलाममहाराष्ट्रनामदेवमहात्मा फुलेमहाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांची यादीभारताचे संविधानसौरभ गांगुलीसह्याद्रीग्राहकभीमसेन जोशीशाहू महाराजगणपतीपाणीविधान परिषदपृथ्वीराज चौहानभारतभांडवलउद्धव ठाकरेशिवसेनाआरोग्यकान्होजी आंग्रेधर्मवीर (चित्रपट)विधानसभापक्षांतरबंदी कायदा (भारत)शरद पवारएकाधिकारमहात्मा गांधीवसंतराव नाईकविधानसभा आणि विधान परिषदअशोक सराफविठ्ठलआषाढी एकादशीखलनायकभारताचा इतिहासक्रिकेटदेवेंद्र फडणवीसरोखे बाजारस्वामी विवेकानंदबाळ ठाकरेयमुनापर्यटन (पुस्तक)व्यवस्थापनमहाराष्ट्रातील किल्ले१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धशिवाजी महाराजांची राजमुद्रामहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीसमीक्षाभारताच्या पंतप्रधानांची यादीसमर्थ रामदास स्वामीगौतम बुद्धसंभाजी भोसलेरायगड (किल्ला)नवग्रह स्तोत्रमराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांची यादीसहकारी संस्थामराठी भाषागौरी देशपांडे🡆 More