वि.स. खांडेकर

विष्णू सखाराम खांडेकर (जानेवारी ११, १८९८ - सप्टेंबर २, १९७६) हे मराठी कादंबरीकार, लेखक होते.

विष्णू सखाराम खांडेकर
वि.स. खांडेकर
विष्णू सखाराम खांडेकर
जन्म नाव गणेश आत्माराम खांडेकर
जन्म ११ जानेवारी १८९८
सांगली
मृत्यू ०२ सप्टेंबर १९७६
मिरज
कार्यक्षेत्र कादंबरीकार
भाषा मराठी
साहित्य प्रकार कादंबरी
प्रसिद्ध साहित्यकृती ययाति
वडील आत्माराम रामचंद्र खांडेकर
अपत्ये मंदाकिनी
पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार (ययाति १९७४ )
वि.स. खांडेकर
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

पूर्वायुष्य

वि.स. खांडेकर यांचा जन्म महाराष्ट्रातील सांगलीत झाला. त्यांच्या पूर्वायुष्यात, त्यांची नाटकांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शन करण्याची आवड होती. वि.स.खांडेकरांचे लेखन ध्येयवादी आहे. अंतःकरणात समाजकल्याणाची व प्रगतीची तळमळ आहे. लालित्यपूर्ण भाषा, रम्य कल्पना, कोटीबाजपणा व समाजहिताचा प्रचार ही त्यांच्या लघुकथेची वैशिष्ट्ये आहेत. कल्पनाशक्ती अतिशय तल्लख असल्याने, तेजस्वी लेखनातून मनोरंजन करण्याबरोबर समाजजीवनावर भाष्य करणे हे त्यांच्या लेखनाचे स्वरूप होते. खांडेकरांच्या लेखनातून माणुसकीचा गहिवर दिसून येतो. त्यंच्या लेखनातून माणसावरील अपार श्रद्धा व्यक्त होते. रूपक कथा हा नवा प्रकार त्यांनी रुढ केला. त्यांनी कादंबरीसह कथा, कविता, लघुनिबंध, समीक्षा, चित्रपट-कथा, नाटक, व्यक्तिचित्रे, अनुवाद अशा विविध साहित्यप्रकारांत अगदी विपुल असे लेखन केले. वृत्तपत्रीय लेखन व ग्रंथ-संपादन या क्षेत्रांतही त्यांनी ठसा उमटवला. [ संदर्भ हवा ]

खांडेकरांच्या कथेत रचनाकौशल्य व तंत्रनिपुणता आढळून येत नाही, पण कथालेखनातून व्यक्त होणारे जीवनदर्शन आणि धेयनिष्ठा वाचकांना प्रभावित करतात, म्हणूनच तर वि.स.खांडेकर हे जीवनवादी लेखक म्हणून ओळखले जातात. जीवनासाठी कला हे त्यांच्या समग्र लेखनाचे सूत्र होते.

त्यांच्या कथा-कादंबऱ्यांवर अनेक भाषांमध्ये चित्रपट, दूरदर्शन मालिकाही निर्माण झाल्या. त्यांच्या साहित्याचे अन्य भारतीय व विदेशी भाषांत अनुवाद झाले. त्यांच्या उल्का या कादंबरीवर मराठी चित्रपट निघाला.

व्यावसायिक आणि साहित्यिक आयुष्य

  • इ.स. १९२० साली खांडेकरांनी महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडे या गावी शिक्षकी पेशास सुरुवात केली.
  • तेथे त्यांनी इ.स. १९३८पर्यंत काम केले. ह्या काळात त्यांनी मराठी साहित्याच्या निरनिराळ्या प्रकारांमध्ये लेखन केले.
  • आपल्या आयुष्यात त्यांनी १६ कादंबऱ्या, ६ नाटके, जवळपास २५० ललितलेख, १०० निबंध आणि कित्येक टीकाटिपण्या लिहिल्या.[ संदर्भ हवा ]

खांडेकरलिखित पुस्तके

  • अजून येतो वास फुलांना
  • अमृत (पटकथा)
  • अमृतवेल
  • अविनाश
  • अश्रू
  • अश्रू आणि हास्य
  • आगरकर : व्यकी आणि विचार
  • उल्का (१९३४) (कादंबरी व पटकथा)
  • उःशाप
  • कल्पलता
  • कांचनमृग (१९३१)
  • कालची स्वप्ने
  • कालिका
  • क्रौंचवध (१९४२)
  • घरटे
  • घरट्याबाहेर
  • चंदेरी स्वप्ने
  • चांदण्यात
  • छाया (पटकथा)
  • जळलेला मोहर (१९४७ )
  • जीवनशिल्पी
  • ज्वाला (पटकथा)
  • झिमझिम
  • तिसरा प्रहर
  • तुरुंगातील पत्रे भाग १, २, ३
  • ते दिवस, ती माणसे
  • दंवबिंदू
  • देवता (पटकथा)
  • दोन ध्रुव (१९३४)
  • दोन मने (१९३८)
  • धर्मपत्नी (पटकथा)
  • धुके
  • नवा प्रातःकाल
  • परदेशी (पटकथा)
  • पहिली लाट
  • पहिले पान
  • पहिले प्रेम (१९४०)
  • पाकळ्या
  • पांढरे ढग (१९४९)
  • पारिजात भाग १, २
  • पाषाणपूजा
  • पूजन
  • फुले आणि काटे
  • फुले आणि दगड
  • मंजिऱ्या
  • मंझधार
  • मंदाकिनी
  • मध्यरात्र
  • मृगजळातील कळ्या
  • ययाति
  • रंग आणि गंध
  • रिकामा देव्हारा (१९३९)
  • रेखा आणि रंग
  • लग्न पहावे करून (पटकथा व संवाद)
  • वामन मल्हार जोशी : व्यक्ति-विचार
  • वायुलहरी
  • वासंतिका
  • विद्युत्‌ प्रकाश
  • वेचलेली फुले ( कथासंग्रह, १९४८)
  • समाजशिल्पी (लेख, संपादन सुनीलकुमार लवटे)
  • समाधीवरील फुले
  • सहा भाषणे
  • सांजवात
  • साहित्यशिल्पी (लेख, संपादन सुनीलकुमार लवटे)
  • सुखाचा शोध
  • सुवर्णकण
  • सूर्यकमळे
  • सोनेरी सावली (पटकथा)
  • सोनेरी स्वप्ने भंगलेली
  • स्त्री आणि पुरुष
  • हिरवळ
  • हिरवा चाफा (१९३८)
  • हृदयाची हाक (१९३०)
  • क्षितिजस्पर्श

पटकथा

'अंतरिचा दिवा' हा खांडेकरांच्या पटकथांचा पुस्तकरूपातील संग्रह आहे.

खांडेकरांचे चरित्र

पुरस्कार आणि सन्मान

बाह्यदुवे

संदर्भ

Tags:

वि.स. खांडेकर पूर्वायुष्यवि.स. खांडेकर व्यावसायिक आणि साहित्यिक आयुष्यवि.स. खांडेकर खांडेकरलिखित पुस्तकेवि.स. खांडेकर पटकथावि.स. खांडेकर खांडेकरांचे चरित्रवि.स. खांडेकर पुरस्कार आणि सन्मानवि.स. खांडेकर बाह्यदुवेवि.स. खांडेकर संदर्भवि.स. खांडेकर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कल्याण लोकसभा मतदारसंघगोपाळ हरी देशमुखनंदुरबार लोकसभा मतदारसंघगणपतीइंदिरा गांधीमहिलांचा मताधिकारराणी लक्ष्मीबाईऔरंगजेबआंबेडकर जयंतीदक्षिण दिशाकौटिलीय अर्थशास्त्रदौलताबाद किल्लाविरामचिन्हेओमराजे निंबाळकररस (सौंदर्यशास्त्र)सचिन तेंडुलकरकामसूत्रवायू प्रदूषणदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारवृद्धावस्थासमाज माध्यमेप्रकाश आंबेडकरमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनतमाशाशिक्षकआंबेडकर कुटुंबभारतातील जागतिक वारसा स्थानेरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघज्यां-जाक रूसोभारताचे संविधानकबड्डीहोळीझाडमुंबई उच्च न्यायालयठाणे लोकसभा मतदारसंघमहिलांसाठीचे कायदेजगातील देशांच्या राजधान्यांची यादीहिंगोली लोकसभा मतदारसंघकोल्हापूरखो-खोसह्याद्रीपानिपतची तिसरी लढाईयशवंतराव चव्हाणजागतिक तापमानवाढजलप्रदूषणमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीभारताच्या पंतप्रधानांची यादीनियोजनमहेंद्र सिंह धोनीराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)गुरुत्वाकर्षणनेतृत्वभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेपुणे करारइस्लामस्वस्तिकआर्थिक विकाससॅम पित्रोदासूर्यनमस्कारमहाराष्ट्र पोलीसहोमी भाभाफुफ्फुसभारताची संविधान सभामराठी भाषाभारताचा इतिहासलाल किल्लाअभंगराज ठाकरेप्राण्यांचे आवाजधुळे लोकसभा मतदारसंघपर्यावरणशास्त्रधर्मनिरपेक्षतासंयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदभारतीय संस्कृतीसिंधुदुर्गभगवद्‌गीता🡆 More