इंदिरा गांधी: भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान

इंदिरा प्रियदर्शिनी गांधी (पूर्वाश्रमीच्या नेहरू ; १९ नोव्हेंबर १९१७ - ३१ऑक्टोबर १९८४) या एक भारतीय राजकारणी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रमुख नेत्या होत्या.

१९६६ मध्ये त्या भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान म्हणून निवडल्या गेल्या. इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या आणि आजपर्यंतच्या एकमेव महिला पंतप्रधान आहेत. त्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कन्या होत्या. जानेवारी १९६६ ते मार्च १९७७ पर्यंत आणि पुन्हा जानेवारी १९८० ते ऑक्टोबर १९८४ मध्ये त्यांची हत्या होईपर्यंत त्यांनी पंतप्रधान म्हणून काम केले, ज्यामुळे त्या त्यांच्या वडिलांनंतर सर्वात जास्त काळ काम करणाऱ्या दुसऱ्या भारतीय पंतप्रधान बनल्या.

इंदिरा गांधी
इंदिरा गांधी: प्रारंभिक जीवन, फिरोज गांधींसोबत विवाह, राजकारणातला प्रवास

कार्यकाळ
जानेवारी १९ इ.स. १९६६ – मार्च २४ इ.स. १९६७
राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन, झाकीर हुसेन, वराहगिरी वेंकट गिरी, मोहम्मद हिदायतुल्ला, वराहगिरी वेंकटगिरी आणि फक्रुद्दीन अली अहमद
मागील गुलझारीलाल नंदा
पुढील मोरारजी देसाई

कार्यकाळ
ऑगस्ट २१ इ.स. १९६७ – मार्च १४ इ.स. १९६९
मागील एम.सी. छागला
पुढील दिनेश सिंह

कार्यकाळ
जून २६ इ.स. १९७० – फेब्रुवारी ४ इ.स. १९७३
मागील मोरारजी देसाई
पुढील यशवंतराव चव्हाण

कार्यकाळ
जानेवारी १४ इ.स. १९८० – जानेवारी १५ इ.स. १९८२

कार्यकाळ
मार्च ९ इ.स. १९८४ – ऑक्टोबर ३१ इ.स. १९८४
राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी
झैलसिंग
मागील चौधरी चरण सिंग
पुढील राजीव गांधी

जन्म नोव्हेंबर १९, इ.स. १९१७
मोगलसराई
मृत्यू ऑक्टोबर ३१, इ.स. १९८४
नवी दिल्ली, भारत
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पती फिरोज गांधी
अपत्ये राजीव गांधी आणि संजय गांधी
निवास १ सफदरजंग रोड, नवी दिल्ली

१९४७ ते १९६४ या काळात नेहरुंच्या पंतप्रधानपदाच्या काळात इंदिरा गांधींना प्रमुख सहाय्यक मानले जात होते आणि त्यांच्या अनेक परदेश दौऱ्यांवर त्या नेहरुंसोबत असायच्या. १९५९ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. १९६४ मध्ये त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर गांधींची राज्यसभा सदस्य म्हणून नियुक्ती झाली आणि माहिती व प्रसारण मंत्री म्हणून लाल बहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळाच्या त्या सदस्या बनल्या. १९६६ च्या सुरुवातीला (शास्त्री यांच्या निधनानंतर) झालेल्या काँग्रेस पक्षाच्या संसदीय नेतृत्वाच्या निवडणुकीत त्यांनी आपले प्रतिस्पर्धी मोरारजी देसाई यांचा पराभव करून इंदिरा गांधी नेत्या बनल्या आणि शास्त्री यांच्या मृत्यूनंतर भारताचे पंतप्रधान म्हणून त्यांची जागा घेतली.

पंतप्रधान या नात्याने इंदिरा गांधी त्यांच्या राजकीय आडमुठेपणासाठी आणि सत्तेच्या अभूतपूर्व केंद्रीकरणासाठी ओळखल्या जात होत्या. पूर्व पाकिस्तानमधील स्वातंत्र्य चळवळ आणि स्वातंत्र्याच्या लढाईच्या समर्थनार्थ त्यांनी पाकिस्तानशी युद्ध केले, ज्यामुळे भारताचा विजय झाला आणि बांगलादेशची निर्मिती झाली. तसेच या विजयामुळे दक्षिण आशियामध्ये भारताचा प्रभाव वाढून भारत हा येथील एकमेव प्रादेशिक शक्ती बनला.

अलिप्ततावादी प्रवृत्तींचा हवाला देत आणि क्रांतीच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून इंदिरा गांधींनी १९७५ ते १९७७ पर्यंत आणीबाणीची घोषणा केली. आणीबाणीच्या काळात मूलभूत नागरी हक्क निलंबित केले गेले आणि प्रसारमाध्यमांवर निर्बंध लावले गेले. या काळात मोठ्या प्रमाणावर अत्याचार केले गेले. १९८० मध्ये मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांनंतर इंदिरा गांधी या पुन्हा सत्तेवर आल्या. ऑपरेशन ब्लू स्टारमध्ये त्यांनी सुवर्ण मंदिरात लष्करी कारवाईचे आदेश दिल्यानंतर त्यांच्याच अंगरक्षकांनी आणि शीख राष्ट्रवाद्यांनी ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी त्यांची हत्या केली.

बांग्लादेशच्या उभारणीवेळी त्यांची भूमिका आणि देशाला अणुशक्ती संपन्न बनविण्याचा त्यांचा निर्णय भारताला प्रगतीपथावर नेणारा होता. १९९९ मध्ये बीबीसीने आयोजित केलेल्या ऑनलाइन सर्वेक्षणामध्ये इंदिरा गांधींना "वुमन ऑफ द मिलेनियम" असा किताब देण्यात आला. २०२० मध्ये गेल्या शतकाची व्याख्या करणाऱ्या जगातील १०० शक्तिशाली महिलांमध्ये टाइम मासिकाने इंदिरा गांधींचा समावेश केला.

प्रारंभिक जीवन

इंदिरा गांधी यांचा जन्म इंदिरा नेहरू म्हणून १९ नोव्हेंबर १९१७ रोजी एका काश्मिरी पंडित कुटुंबात अलाहाबाद येथे झाला . त्यांचे वडील, जवाहरलाल नेहरू हे ब्रिटीश राजवटीविरोधातील भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक प्रमुख नेते होते आणि पुढे ते भारताच्या अधिराज्याचे (आणि नंतर प्रजासत्ताक ) पहिले पंतप्रधान बनले. त्या नेहरू दाम्पत्याच्या एकुलत्या एक कन्या होत्या. (त्यांना एक लहान भाऊ होता जो लहानपणीच मरण पावला होता.) आई कमला नेहरू यांच्यासोबत अलाहाबादमधील आनंद भवन येथे इंदिरा मोठ्या झाल्या. त्यांचे बालपण एकाकी आणि दुःखी होते. वडील जवाहरलाल नेहरू हे अनेकदा दूर असायचे. ते राजकीय चळवळींमध्ये दिग्दर्शन तर करत होते किंवा तुरुंगात तर असायचे. तर त्यांची आई नेहमी आजाराने अंथरुणाला खिळलेली होती; पुढे त्यांचा क्षयरोगामुळे लवकर मृत्यू झाला. इंदिरा यांचा नेहरुंशी मर्यादित संपर्क होता, तोही बहुतेक वेळा पत्रांद्वारे असायचा.

इंदिरा गांधी: प्रारंभिक जीवन, फिरोज गांधींसोबत विवाह, राजकारणातला प्रवास 
इंदिरा गांधी ६ वर्षांच्या असतांना त्यांनी दिल्ली येथे केलेले उपोषण

इंदिराजींना मुख्यतः घरीच शिक्षक शिकवायला येत होते आणि १९३४ मध्ये मॅट्रिक होईपर्यंत त्या अधूनमधून शाळेत जात होत्या. इंदिरा गांधी या दिल्लीतील मॉडर्न स्कूल, अलाहाबादमधील सेंट सेसिलिया आणि सेंट मेरी ख्रिश्चन कॉन्व्हेंट स्कूल, जिनेव्हा येथील इंटरनॅशनल स्कूल, बेक्स येथील इकोले नूव्हेल आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या पूना आणि बॉम्बे येथील प्युपिल्स ओन स्कूल या शाळांमधील विद्यार्थिनी होत्या. त्या आणि आई कमला या दोघी रामकृष्ण मिशनच्या बेलूर मठ मुख्यालयात राहायला गेल्या, जिथे स्वामी रंगनाथनंद हे इंदिरा यांचे पालक होते. त्या शांतिनिकेतन येथील विश्व भारती येथे शिकण्यासाठी गेल्या, जे पुढे १९५१ मध्ये विश्वभारती विद्यापीठ बनले. रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांच्या मुलाखतीदरम्यान इंदिरा यांचे नाव प्रियदर्शनी ठेवले. संस्कृतमध्ये याचा अर्थ "सर्वकाही दयाळूपणे पाहणारी" असा होतो, आणि पुढे त्या इंदिरा प्रियदर्शिनी नेहरू म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.

एका वर्षानंतर, त्यांना युरोपमध्ये त्यांच्या आजारी आईकडे जाण्यासाठी विद्यापीठ सोडावे लागले. तेथे असे ठरले की इंदिरा या ऑक्सफर्ड विद्यापीठात त्यांचे शिक्षण सुरू ठेवतील. त्यांची आई मरण पावल्यानंतर, इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी १९३७ मध्ये सोमरविले कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी त्यांनी थोड्या काळासाठी बॅडमिंटन शाळेत प्रवेश घेतला. इंदिरा यांना दोनदा प्रवेश परीक्षा द्यावी लागली, पहिल्याच प्रयत्नात त्यांना लॅटिन भाषेतील खराब कामगिरीमुळे अपयश आले. ऑक्सफर्डमध्ये, त्यांनी इतिहास, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयात चांगली कामगिरी केली, परंतु एक अनिवार्य विषय असलेल्या लॅटिनमधील त्यांचे गुण कमीच राहिले. तथापि इंदिरा गांधी यांनी विद्यापीठाच्या विद्यार्थी जीवनात सक्रिय भाग घेतला. त्या ऑक्सफर्ड मजलिस एशियन सोसायटीच्या सदस्य होत्या.

युरोपमध्ये असताना इंदिरा गांधी आजाराने त्रस्त होत्या आणि त्यांना सतत डॉक्टरांची भेट घ्यावी लागत असे. त्यांना बरे होण्यासाठी वारंवार स्वित्झर्लंडला जावे लागले, त्यामुळे त्यांच्या अभ्यासात व्यत्यय आला. 1940 मध्ये जेव्हा जर्मनीने वेगाने युरोप जिंकत होता तेव्हा त्यांच्यावर उपचार सुरू होते. इंदिरा यांनी पोर्तुगालमार्गे इंग्लंडला परतण्याचा प्रयत्न केला पण जवळपास दोन महिने त्या अडकल्या होत्या. १९४१ च्या सुरुवातीस त्या इंग्लंडमध्ये दाखल झाल्या आणि तिथून ऑक्सफर्डमध्ये शिक्षण पूर्ण न करता त्या भारतात परतल्या. नंतर विद्यापीठाने त्यांना मानद पदवी दिली. २०१० मध्ये, ऑक्सफर्ड विद्यापीठातील दहा नामांकित आशियाई पदवीधरांपैकी एक असलेल्या ऑक्सशियन म्हणून त्यांची निवड करून गौरव केला.

ब्रिटनमधील त्यांच्या वास्तव्यादरम्यान, इंदिरा गांधी वारंवार त्यांचे भावी पती फिरोज गांधी ( यांचा महात्मा गांधींशी काही संबंध नाही) यांना अनेकदा भेटत असत. त्यांना त्या अलाहाबादमधून ओळखत होत्या आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये ते शिकत होते. त्यांचा विवाह अलाहाबाद येथे आदि धर्म रितीरिवाजांनुसार पार पडला, जरी फिरोज हे गुजरातच्या पारशी कुटुंबातील होते. या जोडप्याला राजीव गांधी (जन्म १९४४) आणि संजय गांधी (जन्म १९४६) ही दोन मुले होती.

इंदिरांचे आजोबा मोतीलाल नेहरू व्यवसायाने वकील आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आघाडीचे नेते होते. भारताच्या राजकारणात त्यांना मानाचे स्थान होते. ते स्वरूप राणी यांसोबत विवाह करून अलाहाबाद येथे स्थायिक झाले. जवाहरलाल नेहरू यांचे शिक्षण इंग्लंडमध्ये झाले, पुढे ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातले अतिशय लोकप्रिय, महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले. तसेच स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधानही बनले. इंदिरा गांधींचे बालपण आपल्या घराच्या स्वातंत्र्यलढ्याच्या संस्कारांतच झाले. पुढे त्यांनी लहान मुलामुलींची वानरसेना चळवळ सुरू केली. निदर्शने, मोर्चे काढणे, बंदी घातलेल्या गोष्टींची वाहतूक करणे वगैरे गोष्टी ही सेना करीत असे.

फिरोज गांधींसोबत विवाह

इंदिरा गांधी: प्रारंभिक जीवन, फिरोज गांधींसोबत विवाह, राजकारणातला प्रवास 
इंदिरा गांधी व फिरोज गांधी

इंदिरा गांधींनी इतक्यातच लग्न करू नये म्हणत जवाहरलाल नेहरू यांनी त्यास विरोध केला. पण इंदिरा ठाम होत्या व त्यांनी मार्च १९४२ मध्ये विवाह केला. फिरोज गांधीसुद्धा राजकारणात सक्रिय होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे फिरोज व इंदिरा दोघे सदस्य होते. १९४२ च्या लढ्यात भाग घेतला म्हणून दोघांना अटक झाली होती. फिरोज गांधी हे भारताला स्वतंत्र्य मिळाल्यानंतर उत्तर प्रदेशातून संसदेवर निवडून गेले होते. या दांपत्याला राजीव व संजय अशी दोन मुले झाली. पण त्यानंतर दोघांत दुरावा वाढत गेला. दरम्यानच्या काळात फिरोज गांधींना हृदयविकाराचा झटका आला. अखेर १९६० मध्ये फिरोज गांधींचा मृत्यू झाला.

राजकारणातला प्रवास

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष पद :

१९५९ मध्ये इंदिरा गांधींनी निवडणुकीत भाग घेतला आणि त्या अध्यक्ष म्हणून निवडून आल्या.

माहिती व नभोवाणी मंत्री : जवाहरलाल नेहरूंच्या मृत्यनंतरर लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. यात त्यांनी माहिती व नभोवाणीमंत्री हे पद सांभाळले. याचदरम्यान त्यावेळच्या मद्रास राज्यात हिंदीला राष्ट्रीय भाषा घोषित करण्याविरोधात दंगे उसळले होते, तेव्हा त्यांनी मद्रासला भेट दिली. शासकीय अधिकारी, सामाजिक नेते यांची भेट घेउन राग शांत करण्याचा प्रयत्‍न केला. १९६५ चे भारत-पाक युद्ध या दरम्यान त्या श्रीनगरच्या आसपास सुट्या व्यतीत करत होत्या. पाकिस्तानी सैन्य फार जवळ पोहोचले आहे असे संदेश भारतीय सैन्याकडून मिळूनही त्यांनी जम्मू अथवा दिल्ली येथे जाण्यास नकार दिला. अशा प्रकारच्या धाडसी कामांमुळे त्यांची लोकप्रिय छबी निर्माण करण्यात त्या यशस्वी झाल्या.

पाकचे आक्रमण परतून लावण्यात भारताला यश आले. १९६६ च्या जानेवारी महिन्यात तत्कालीन सोव्हियत संघात ताश्कंद येथे पाकिस्तानचे अयूबखान आणि लालबहादुर शास्त्री यात शांतिसमझोता झाला. पण त्यानंतर काही तासातच त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये पंतप्रधान पदासाठी स्पर्धाच सुरू झाली. मोरारजी देसाई यांनी आपला अर्ज भरला. पण तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष कामराज यांनी अंतर्गत राजकारणातून इंदिरा गांधींना पाठिंबा दिला. ३५५ विरुद्ध १६९ मतांनी विजय मिळवला. त्या भारताच्या पाचव्या पंतप्रधान आणि पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या.

पंतप्रधान म्हणून कारकीर्द

इंदिरा गांधी: प्रारंभिक जीवन, फिरोज गांधींसोबत विवाह, राजकारणातला प्रवास 
इंदिरा गांधी

इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यानंतर लगेच काँग्रेसमध्ये फूट पडली. राममनोहर लोहिया हे त्यांना गुंगी गुडिया म्हणून संबोधायचे. अखेर १९६७ च्या निवडणुकात काँग्रेसचे ६० जागांचे नुकसान झाले. ५४५ पैकी २९७ जागांवर विजय मिळवून सत्ता मिळाली. मोरारजी देसाई यांना उपपंतप्रधानपद आणि अर्थमंत्रिपद द्यावे लागले. तरी अखेर १९६९ मध्ये मोरारजी सोबतच्या वादांनी काँग्रेसची दोन शकले झाली. इतर पक्षांचा पाठिंबा मिळवून त्यांनी शासन वाचवले.

जुलै १९६९ मध्येच त्यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले.

१९७१ चे भारत-पाक युद्ध

१९७१ च्या सुमारास पाकिस्तानी सैन्याने तत्कालीन पूर्व पाकिस्तानात जनतेवर अत्याचाराचे सत्र आरंभले. शेख मुजीबुर रेहमान हे पूर्व पाकिस्तानातून असल्यामुळेच बहुमत असूनही त्यांना पंतप्रधान होण्यापासून थांबवले गेले. पूर्व पाकिस्तानातून सुमारे १ कोटी निर्वासित भारतात आले. त्यांचा भार भारतावर पडत होता तरी पाकिस्तान भारतालाच दूषणे देत होता. दरम्यान अतिरेक्यांनी भारताच्या प्रवासी विमानाचे अपहरण करून ते पाकिस्तानात नेऊन जाळले. अखेर १९७१ च्या डिसेेेेंबर मध्ये भारताने युद्धाची घोषणा केली. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी पाकिस्तानला पाठिंबा देत इंदिरा गांधींना संयुक्त राष्ट्राच्या कारवाईची धमकी देऊन पाहिली, पण इंदिरा गांधी बधल्या नाहीत.

हत्या

"I am alive today, I may not be there tomorrow ... I shall continue to serve until my last breath and when I die, I can say, that every drop of my blood will invigorate India and strengthen it  ... Even if I died in the service of the nation, I would be proud of it. Every drop of my blood ... will contribute to the growth of this nation and to make it strong and dynamic."

—Gandhi’s remarks on her last speech a day before her death (30 October 1984) at the then Parade Ground, Odisha.

३१ ऑक्टोबर १९८४ रोजी, इंदिरा गांधींचे दोन शीख अंगरक्षक, सतवंत सिंग आणि बेअंत सिंग यांनी सफदरजंग रोड, नवी दिल्ली येथील पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या बागेत कथितपणे ऑपरेशन ब्लू स्टारचा बदला म्हणून त्यांच्या सेवा शस्त्रांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. दोन पुरुषांनी पहारा देत असलेल्या विकेट गेटमधून ती जात असताना गोळीबार झाला. ब्रिटीश चित्रपट निर्माते पीटर उस्टिनोव्ह यांची मुलाखत घेण्यात येणार होती, जो आयरिश टेलिव्हिजनसाठी माहितीपट चित्रित करत होता. बिअंटने त्याच्या बाजूच्या हाताने तिच्यावर तीन वेळा गोळी झाडली; सतवंतने 30 राउंड फायर केले. पुरुषांनी शस्त्रे टाकली आणि आत्मसमर्पण केले. त्यानंतर, त्यांना इतर रक्षकांनी एका बंद खोलीत नेले जेथे बेअंटची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. केहर सिंगला नंतर हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. सतवंत आणि केहर या दोघांनाही दिल्लीच्या तिहार तुरुंगात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.

इंदिरा गांधी यांचे चरित्रलेखक

  • इंदर मल्होत्रा
  • उषा भगत (इंदिराजी थ्रू माय आईज)
  • कॅथेरीन फ्रॅंक (मराठी अनुवाद - लीना सोहोनी)
  • डॉम मोराईस (मिसेस गांधी)
  • पी.सी. ॲलेक्झॅण्डर (My years with Indira Gandhi; इंदिरा गांधी अंतिम पर्व)
  • पुपुल जयकर (Indira Gandhi - Biography, मराठी अनुवाद अशोक जैन)
  • प्रणय गुप्ते (मूळ इंग्रजीत, मदर इंडिया. मराठी अनुवाद : पंढरीनाथ सावंत, रमेश दिघे)
  • सागरिका घोष (इंग्रजीत, India's Most Powerful Prime Minister)

इंदिरा गांधी यांच्यावरील अन्य पुस्तके

  • अनोखे मैत्र (अनुवादित, अनुवादक - सुजाता गोडबोले; मूळ इंदिरा गांधीलिखित Letters to an American Friend)
  • इंदिरा गांधी : एक वादळी पर्व (माधव गोडबोले)
  • दृष्टिआडच्या इंदिरा गांधी (अनुवादित; अनुवादक - सुजाता गोडबोले; मूळ इंग्रजी The Unseen Indira Gandhi; लेखक - डॉ. के.पी. माथुर)

इंदिरा गांधी यांच्या नावाच्या संस्था

सन्मान

टपालाचे तिकीट

इंदिरा गांधी: प्रारंभिक जीवन, फिरोज गांधींसोबत विवाह, राजकारणातला प्रवास 
रशियाने सन १९८४ मध्ये काढलेले इंदिरा गांधी याचे पोस्टाचे तिकिट

इंदिरा गांधी यांची छबी असलेले पाच रुपये किमतीचे टपालाचे तिकीट होते. सप्टेंबर २०१५पासून त्याची छपाई बंद करण्यात आली.

सर्वात महान भारतीय

२०१२ मध्ये झालेल्या आऊटलुक इंडियाच्या ‘द ग्रेटेस्ट इंडियन’ या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये इंदिरा गांधी सातव्या क्रमांकावर होत्या.

वारसा

१९७१ मध्ये, बांगलादेश मुक्ती युद्धात भारताला पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवून दिल्यानंतर, राष्ट्रपती व्ही.व्ही.गिरी यांनी इंदिरा गांधींना भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन त्यांचा गौरव केला.

२०११ मध्ये, इंदिरा गांधींना बांगलादेशच्या मुक्तिसंग्रामातील त्यांच्या "उत्कृष्ट योगदानासाठी" बांग्लादेश स्वाधीनता सन्मान हा बांगलादेशचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मरणोत्तर बहाल करण्यात आला.

इंदिरा गांधी: प्रारंभिक जीवन, फिरोज गांधींसोबत विवाह, राजकारणातला प्रवास 
लंडनमधील मादाम तुसाद येथे इंदिरा गांधींचा मेणाचा पुतळा

अमेरिकन दबाव असताना देखील पाकिस्तानला पराभूत करून पूर्व पाकिस्तानचे स्वतंत्र बांगलादेशात रूपांतर करणे हा इंदिरा गांधींचा मुख्य वारसा खंबीरपणे उभा आहे. इंदिरा गांधी यांच्यामुळेच भारत हा अण्वस्त्रधारी देशांच्या गटात सामील होऊ शकला.

भारत हा अधिकृतपणे अलिप्ततावादी चळवळीचा भाग असूनही, त्यांनी भारतीय परराष्ट्र धोरणाला सोव्हिएत गटाकडे झुकवले. १९९९ मध्ये बीबीसीने आयोजित केलेल्या ऑनलाइन सर्वेक्षणात "वुमन ऑफ द मिलेनियम" असा इंदिरा गांधींचा गौरव केला गेला. २०१२ मध्ये, आउटलुक इंडियाच्या महान भारतीयांच्या सर्वेक्षणात त्या सातव्या क्रमांकावर होत्या.

अनेक दशकांपासून भारतीय राजकारणात आघाडीवर राहून, गांधींनी भारतीय राजकारणावर एक शक्तिशाली परंतु वादग्रस्त वारसा ठेवला. त्यांच्या राजवटीचा मुख्य वारसा काँग्रेस पक्षातील अंतर्गत पक्षीय लोकशाही नष्ट करत होता. त्यांचे विरोधक त्यांच्यावर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना कमकुवत करून त्याद्वारे संघराज्य संरचना कमकुवत केल्याचा, न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य कमकुवत केल्याचा आणि सचिवालयात स्वतःला आणि त्यांच्या मुलांना अधिकार देऊन त्यांचे मंत्रिमंडळ कमकुवत केल्याचा आरोप करतात. गांधी भारतीय राजकारणात आणि भारताच्या संस्थांमध्ये घराणेशाहीची संस्कृती वाढवण्याशी संबंधित असल्याचे मानले जाते. आणीबाणीच्या काळात आणि परिणामतः भारतीय लोकशाहीतील अंधकारमय कालखंडाशी देखील त्यांचा जवळजवळ एकच संबंध आहे.

भारतीय स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेस पक्ष ही ‘ब्रॉड चर्च’ मानली जात होती; तथापि, आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींच्या कुटुंबाने नियंत्रित केलेल्या कौटुंबिक फर्ममध्ये काँग्रेसचे रूपांतर होऊ लागले. ही कुटुंबाप्रती निष्ठा नंतर गांधी कुटुंबातील सदस्यांच्या वंशपरंपरागत सत्तेत बदलत गेली.

इंदिरा गांधी यांच्या असुरक्षिततेच्या भावनेमुळे कार्यकारिणीपासून न्यायव्यवस्थेपर्यंत भारताच्या सरकारच्या सर्व भागांमध्ये पद्धतशीर भ्रष्टाचार हा देखील त्यांचा वारसा असल्याचे काही लोक टीका करतात. आणीबाणीच्या काळात स्वीकारण्यात आलेली भारतीय राज्यघटनेची ४२वी घटनादुरुस्ती देखील इंदिरा गांधी यांच्या वारशाचा भाग मानली जाऊ शकते. न्यायालयीन आव्हाने आणि बिगरकाँग्रेस सरकारने या दुरुस्तीवर पाणी टाकण्याचा प्रयत्न केला असला तरी ही दुरुस्ती अजूनही कायम आहे.

मारुती उद्योग कंपनीची स्थापना इंदिरा यांचे पुत्र संजय गांधी यांनी प्रथम केली असली, तरी इंदिरांच्या काळात ही राष्ट्रीयीकृत कंपनी प्रसिद्ध झाली.

भारताच्या पंतप्रधानपदावर विराजमान झालेल्या त्या एकमेव महिला आहेत. २०२० मध्ये, गेल्या शतकाची व्याख्या करणाऱ्या जगातील १०० शक्तिशाली महिलांमध्ये टाइम मासिकाने इंदिरा गांधींचा समावेश केला. दिल्ली येथील शक्तीस्थळ ज्याचे नाव शब्दशः ताकदीच्या ठिकाणी अनुवादित केले जाते, हे त्यांचे स्मारक आहे.

लोकप्रिय संस्कृतीत

भारतीय चित्रपटसृष्टीतील कलाकारांद्वारे इंदिरा गांधींचे चित्रण सामान्यतः टाळले जात असताना, चित्रपट निर्माते इंदिरा गांधी यांच्या पात्राची छाप देण्यासाठी बॅक-शॉट्स, सिल्हूट आणि व्हॉईसओव्हर वापरत असायचे. या पद्धतीने त्यांचा कार्यकाळ, धोरणे किंवा हत्येभोवती अनेक चित्रपट बनवले गेले आहेत.

अशा चित्रपटांत गुलजारचा आंधी (१९७५), अमृत नाहटाचा किस्सा कुर्सी का (१९७५), आय.एस. जोहरचा नसबंदी (१९७८), गुलजारचाच माचीस (१९९६), सुधीर मिश्राचा हजारों ख्वाइशें ऐसी (२००३), अमोतजी मन यांचा हवाएं (२००३), मनोज पुंज यांचा देस होया परदेस (२००४), शशी कुमारचा काया तरण (२००४), शोनाली बोस द्वारेअमू (२००५), रविंदर रवीद्वारे कौम दे हीरे (२०१४), राजीव शर्माद्वारे ४७ ते ८४ (२०१४), अनुराग सिंगचा पंजाब १९८४ (२०१४), गुरविंदर सिंग द्वारे फोर्थ डिरेक्शन (२०१५), नरेश एस. गर्गचा धर्मयुद्ध मोर्चा (२०१६), शिवाजी लोटन पाटील यांचा ३१ऑक्टोबर (२०१६), मिलन लुथरिया यांचा बादशाहो (२०१७), बगल सिंग यांचा टू (२०१७), अभिषेक चौबेकडून सोनचिरिया (२०१९), बिष्णू देव हलदर द्वारे शुक्रानू (२०२०) इत्यादी चित्रपटांचा समावेश होतो. आंधी, किस्सा कुर्सी का आणि नसबंदी हे इंदिराजींच्या हयातीत प्रदर्शित झाल्यामुळे प्रसिद्ध आहेत. हे चित्रपट आणीबाणीच्या काळात प्रदर्शनावर सेन्सॉरशिपच्या अधीन होते.

इंडस व्हॅली टू इंदिरा गांधी हा एस. कृष्णस्वामी यांचा १९७० चा दोन भागांचा डॉक्युमेंटरी चित्रपट आहे जो सिंधू संस्कृतीच्या सुरुवातीच्या काळापासून इंदिरा गांधींच्या पंतप्रधानपदापर्यंतच्या भारताच्या इतिहासाचा मागोवा घेतो. फिल्म्स डिव्हिजन ऑफ इंडियाने अवर इंदिरा ची निर्मिती केली. १९७३ मध्ये एसएनएस शास्त्री यांनी दिग्दर्शित केलेला हा लघु डॉक्युमेंटरी चित्रपट पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांच्या पहिल्या कार्यकाळाची सुरुवात आणि स्टॉकहोम परिषदेतील त्यांची भाषणे दर्शवतो.

प्रधानमंत्री ही ०१३ ची भारतीय माहितीपट टेलिव्हिजन मालिका एबीपी न्यूजवर प्रसारित झाली. यामध्ये भारतीय पंतप्रधानांची विविध धोरणे आणि राजकीय कार्यकाळ चित्रित केला गेला आहे. प्रधानमंत्री मालिकेत "इंदिरा गांधी पंतप्रधान बनल्या", "काँग्रेस पक्षात फूट", "१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धापूर्वीची गोष्ट", "१९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध आणि बांगलादेशचा जन्म", "१९७५-७७ मधील भारतात आणीबाणीची स्थिती", आणि "इंदिरा गांधी पंतप्रधान म्हणून परत आल्या आणि ऑपरेशन ब्लू स्टार" या भागांमध्ये इंदिरा गांधींच्या कार्यकाळाचा समावेश आहे. नवनी परिहार यांनी या मालिकेत गांधींची भूमिका साकारली आहे. परिहार यांनी २०२१ चा भारतीय चित्रपट भुज: द प्राइड ऑफ इंडियामध्ये देखील इंदिराजींची भूमिका केली आहे जो, १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीतील इंदिराजींच्या चित्रणाच्या सभोवतालची निषिद्धता अलिकडच्या वर्षांत चित्रपटांमध्ये अभिनेत्यांद्वारे नष्ट होऊ लागली आहे. उल्लेखनीय चित्रणांचा समावेश आहे: मिडनाइट्स चिल्ड्रन (२०१२) मधील सरिता चौधरी; जय जवान जय किसान (२०१५) मधील मनदीप कोहली; इंदू सरकार (२०१७), NTR: कथानायकुडू / NTR: महानायकुडू (२०१९) आणि यशवंतराव चव्हाण – बखर एका वादाची (२०१४) मध्ये सुप्रिया विनोद; रेड (२०१८), थलायवी (२०२१) आणि राधे श्याम (२०२२) मध्ये फ्लोरा जेकब, पीएम नरेंद्र मोदी (२०१९) मध्ये किशोरी शहाणे, ठाकरे (२०१९) आणि ८३ (२०२१) मध्ये अवंतिका आकेरकर, मैं मुलायम सिंह यादव ( २०२१) मध्ये सुप्रिया कर्णिक, बेल बॉटममध्ये लारा दत्ता (२०२१).

मरणोत्तर सन्मान

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे

मागील:
चरणसिंग चौधरी
भारतीय पंतप्रधान
जानेवारी १४, इ.स. १९८०ऑक्टोबर ३१, इ.स. १९८४
पुढील:
राजीव गांधी

Tags:

इंदिरा गांधी प्रारंभिक जीवनइंदिरा गांधी फिरोज गांधींसोबत विवाहइंदिरा गांधी राजकारणातला प्रवासइंदिरा गांधी पंतप्रधान म्हणून कारकीर्दइंदिरा गांधी १९७१ चे भारत-पाक युद्धइंदिरा गांधी हत्याइंदिरा गांधी यांचे चरित्रलेखकइंदिरा गांधी यांच्यावरील अन्य पुस्तकेइंदिरा गांधी यांच्या नावाच्या संस्थाइंदिरा गांधी सन्मानइंदिरा गांधी वारसाइंदिरा गांधी लोकप्रिय संस्कृतीतइंदिरा गांधी मरणोत्तर सन्मानइंदिरा गांधी हे सुद्धा पहाइंदिरा गांधी संदर्भइंदिरा गांधी बाह्य दुवेइंदिरा गांधीजवाहरलाल नेहरूपंतप्रधानभारताचे पंतप्रधानभारतीय राष्ट्रीय काँग्रेस

🔥 Trending searches on Wiki मराठी:

म्हणीवि.वा. शिरवाडकरपुरंदर किल्लाप्रणिती शिंदेमहिलांसाठीचे कायदेग्रीसयोग२०२४ लोकसभा निवडणुकास्वामी विवेकानंदविधानसभाकादंबरीगिटारधोंडो केशव कर्वेप्राजक्ता माळीमाळशिरस विधानसभा मतदारसंघगोकर्णीहातकणंगले लोकसभा मतदारसंघप्रेमानंद गज्वीभारताच्या सरन्यायाधीशांची यादीमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगमहाराष्ट्रातील राजकारणपृथ्वीच्या अंतरंगाची रचनाबौद्ध धर्मशिर्डी लोकसभा मतदारसंघसंगम साहित्यभारताचा स्वातंत्र्यलढाशिरूर लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीविनयभंगभारताचा ध्वजवंजारीसईबाई भोसलेक्रिकबझश्रीकांत शिंदेगोत्रभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीफणसनरसोबाची वाडीसामाजिक कार्यमानवी विकास निर्देशांकमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीसांगली जिल्हानाशिक लोकसभा मतदारसंघटोपणनावानुसार मराठी लेखकविशेषणचोखामेळाभूकंपकाळाराम मंदिरजवाहरलाल नेहरूडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांबाबतचा लढाभारतातील जिल्ह्यांची यादीस्वरसिकलसेललिंग गुणोत्तरनाणेभाषालंकारराकेश बापटचंद्रयान ३माहिती अधिकारवातावरणमेष रासखंडोबाग्राहक संरक्षण कायदामहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीठाणे लोकसभा मतदारसंघपरभणी लोकसभा मतदारसंघमराठी भाषा गौरव दिनजन गण मनरामअकोला लोकसभा मतदारसंघभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीमटकामाढा लोकसभा मतदारसंघखाजगीकरणप्रार्थनास्थळवाचन🡆 More