कबड्डी:

कबड्डी हा एक भारतीय सांघिक खेळ आहे, ज्याचा उगम महाराष्ट्रामध्ये झाला.

सात खेळाडूंच्या दोन संघांमध्ये हा खेळ खेळला जातो. यात एकच खेळाडू ज्याला "रेडर" म्हणून संबोधले जाते, तो विरुद्ध संघाच्या अर्ध्या कोर्टात धाव घेतो, शक्य तितक्या त्यांच्या बचावकर्त्यांना स्पर्श करतो, आणि त्यांच्या स्वतःच्या अर्ध्या कोर्टात परत जातो. हे करताना विरोधी संघाच्या सर्व बचावकर्त्यांचा त्याला स्पर्श न होता एका दमात तो परत आला पाहिजे.

कबड्डी
कबड्डी: इतर माहिती, खेळाकरता लागणारे मैदान, संदर्भ आणि नोंदी
२०१८ आशियाई स्पर्धेतील एक सामना,
सर्वोच्च संघटना आतंरराष्ट्रीय कबड्डी संघटना
उपनाव कौडी, पकाडा, हादुदू, भवतिक, सादुकुडा, हुतुतू, हिमोशिका
माहिती
संघ सदस्य ०७
वर्गीकरण मैदानी
साधन नाही
मैदान कबड्डी मैदान किंवा कबड्डी कोर्ट
ऑलिंपिक १९३६ ऑलिम्पिक

रेडरने स्पर्श केलेल्या प्रत्येक खेळाडूसाठी गुण मिळतो, तर विरोधी संघ रेडरला थांबवल्याबद्दल एक गुण मिळतो. खेळाडूंना स्पर्श केल्यास किंवा हाताळले गेल्यास खेळातून बाहेर काढले जाते, परंतु त्यांच्या संघाने टॅग किंवा टॅकलमधून मिळवलेल्या प्रत्येक गुणासाठी त्यांना परत आणले जाते.

कबड्डी: इतर माहिती, खेळाकरता लागणारे मैदान, संदर्भ आणि नोंदी
कबड्डी

हा खेळ भारतीय उपखंड आणि इतर आसपासच्या आशियाई देशांमध्ये लोकप्रिय आहे. प्राचीन भारताच्या इतिहासात कबड्डीचे वर्णन आढळत असले तरी २०व्या शतकात हा खेळ स्पर्धात्मक खेळ म्हणून लोकप्रिय झाला. हा बांगलादेशचा राष्ट्रीय खेळ आहे. भारतातील तमिळनाडू, आंध्र प्रदेश, बिहार, हरियाणा, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा खेळ आहे.

कबड्डीच्या दोन प्रमुख शाखा आहेत: "पंजाबी कबड्डी", ज्याला "वर्तुळ शैली" असेही संबोधले जाते, त्यामध्ये खेळाच्या पारंपारिक प्रकारांचा समावेश आहे जो बाहेर गोलाकार मैदानावर खेळला जातो, तर "मानक शैली", यात हा खेळ आयताकृती कोर्टवर खेळला जातो. प्रमुख व्यावसायिक लीग आणि आशियाई खेळांसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये हीच शैली वापरली जाते.

हा खेळ भारतीय उपखंडातील विविध भागात असंख्य नावांनी ओळखला जातो, जसे की: कबड्डी किंवा आंध्र प्रदेश आणि तेलंगणमध्ये चेडुगुडू; महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळमध्ये कबड्डी; पश्चिम बंगाल आणि बांगलादेशमध्ये कबडी किंवा हा-डु-डू; मालदीवमध्ये भाविक, पंजाब प्रदेशात कौड्डी किंवा कबड्डी; पश्चिम भारतात हुतूतू, पूर्व भारतात हुदूदू; दक्षिण भारतात चडकुडू; नेपाळ मध्ये कपर्डी, तर तामिळनाडूमध्ये कबडी किंवा सादुगुडू.

इतर माहिती

मूळचा भारतीय असलेला हा खेळ पाकिस्तान, भूतान, नेपाल, श्रीलंका, बांगलादेश, मलेशिया इत्यादी देशात खेळला जातो. जपान याही देशात तो प्रसारीत झाला आहे. या खेळात दोन संघ मैदानाच्या दोन बाजू राखून आळीपाळीने प्रतिस्पर्धी संघावर चढाया करायला एक खेळाडू पाठवतात. प्रत्येक संघात बारा खेळाडू असतात. प्रत्यक्ष सामन्यात सात खेळाडू खेळतात. इतर पाच खेळाडू बदली खेळाडू म्हणून खेळवले जातात. पुरुषांसाठी वीस मिनिटांचे, तर महिलांसाठी पंधरा मिनिटांचे दोन डाव खेळवले जातात. संपूर्ण सामन्यात बरोबरी झाल्यास पुन्हा पाच मिनिटांचे दोन डाव खेळवतात.

कबड्डी: इतर माहिती, खेळाकरता लागणारे मैदान, संदर्भ आणि नोंदी 
२०१६ मधील पिंड येथील सामना

महाराष्ट्र व मध्य प्रदेश या राज्यांत हुतुतू, कर्नाटक व तामिळनाडूमध्ये चाडू-गुडू, केरळमध्ये वंदिकली, पंजाबमध्ये झबर गगने, तर बंगालमध्ये दो-दो या नावाने हा खेळ खेळला जातो इ.स. १९३४ मध्ये या खेळाचे नियम तयार झाले. इ.स. १९३६ मध्ये हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती यांनी या खेळाच्या प्रसारासाठी बर्लिन ऑलिंपिकमध्ये प्रदर्शनीय सामना खेळून दाखवला. इ.स. १९३८ पासुन हा खेळ भारतात राष्ट्रीय खेळ म्हणून ओळखला जाऊ लागला. १९५० मध्ये अखिल भारतीय कबड्डी संघ स्थापन झाला.

महाराष्ट्राने जे नियम या खेळाकरिता निश्चित केले होते त्या नियमानुसार संपूर्ण भारतात कबड्डी हा खेळ खेळाला जाऊ लागला. पुढे कबड्डीच्या प्रचार आणि प्रसार करीता अपार कष्ट आणि मेहनत घेतल्या गेलेल्या या खेळाने देशाच्या सीमा ओलांडल्या.

कबड्डीला कानाकोपऱ्यात पोहचण्यात अनेकाने मेहनत घेतली. या खेळाला आंतरराष्टीय स्थरात पोहचवण्यात महाराष्ट्राचा खूप मोठा हात आहे. विशेष म्हणजे कबड्डी हा असा खेळ आहे ज्या मध्ये पुरुष व महिला या दोघांनी देखील विश्वकप जिंकला आहे. गेल्या काही वर्षा मध्ये प्रो कबड्डी सामाण्यामुळे या खेळणं रससंजीवनी मिळाली आहे. मोठमोठ्या कलाकार आपापल्या विकत घेत आहे.

खेळाकरता लागणारे मैदान

पुरुष, महिलांसाठी वेगवेगळ्या आकाराची मैदाने असतात. पुरुषांसाठी १२.५० मी. बाय १० मी. तर महिलांसाठी ११ मी. बाय ८ मी. असे आयताकृती क्रीडांगण बनवतात. ते बनवताना बारीक चाळलेली माती व शेणखत यांचा वापर करून एकसारखे सपाट मैदान बनवले जाते. पूर्वी फक्त खुल्या मैदानावर होणारा हा खेळ आता बंदिस्त जागेत व मॅटवरही खेळवला जायला लागला आहे. हा खेळ माती मध्ये जास्त प्रमाणात खेळला जातो. पवन सेहरावत,अनुप कुमार,परदिप नरवाल,राहुल चौधरी आणि महिलांमधे अभिलाषा म्हात्रे,दिपाली जोसेफ हे प्रसिद्ध कब्बडी खेळाडू आहेत. चढाया करताना 'कब्बडी' हा शब्द खेळाडूस सलग उच्चारावा लागतो.जर असे आपण केले नाही तर आपल्याला फाउल करतात.

संदर्भ आणि नोंदी

इतिहास

बाह्य दुवे

कबड्डी: इतर माहिती, खेळाकरता लागणारे मैदान, संदर्भ आणि नोंदी 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

Tags:

कबड्डी इतर माहितीकबड्डी खेळाकरता लागणारे मैदानकबड्डी संदर्भ आणि नोंदीकबड्डी बाह्य दुवेकबड्डीभारतीयमहाराष्ट्र

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कुत्राफुटबॉलशिवाजी महाराजमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४संस्कृतीमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीफणसगोपाळ गणेश आगरकरभारताच्या पंतप्रधानांची यादीकिरवंतलोकसभाउदयनराजे भोसलेहिंदू लग्नॐ नमः शिवायभारतीय संविधानाचे कलम ३७०भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्मपोलीस पाटीलचैत्र पौर्णिमासुषमा अंधारेमहाराष्ट्र पोलीसआनंद शिंदेरवींद्रनाथ टागोरताराबाईपूर्व दिशातिरुपती बालाजीशिक्षणनंदुरबार लोकसभा मतदारसंघमराठी भाषा गौरव दिनऔद्योगिक क्रांतीसात बाराचा उतारावडअन्नप्राशनपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरनितीन गडकरीद्रौपदी मुर्मूशबरीशिर्डी लोकसभा मतदारसंघभारताच्या राष्ट्रपतींची यादीलिंगायत धर्मसचिन तेंडुलकरडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांबाबतचा लढाअमित शाहमराठा साम्राज्यलेस्बियनअजित पवारतरसभारताचे राष्ट्रपतीवेदयोनीमिया खलिफाकोल्हापूर जिल्हासर्वनामलोणार सरोवरसोनेमहाराष्ट्राचा इतिहासजवभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशअग्रलेखनामन्यायालयीन सक्रियताराष्ट्रवादसंगीतभारतीय पंचवार्षिक योजनाभरड धान्यहिंदू धर्मकांशीरामलातूर लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीमहानुभाव पंथविमापु.ल. देशपांडेतापमानकीर्तनआचारसंहितापंचायत समितीमहिलांसाठीचे कायदेसामाजिक कार्य🡆 More