धर्मनिरपेक्षता

धर्मनिरपेक्षता म्हणजे राजकीय, नागरी किंवा सामाजिक व्यवहारांत धर्म, धर्मविचार, किंवा धार्मिक कल्पना यांना दूर ठेवणे.मात्र धर्मनिरपेक्षता म्हणजे अधर्म, निधर्मीपणा, नास्तिकता, किंवा धर्मविरोध नाही.

धर्मनिरपेक्ष म्हणजे एवढेच की, ऐहिक जीवनाची व्यवस्था लावताना धर्मकल्पना अप्रस्तुत होत त्यांच्याऐवजी शास्त्रीय ज्ञान, मानवी मूल्ये आणि विवेकनिष्ठा यांचे साहाय्य घेणे.

धर्माने आपले स्वातंत्र्य अबाधित राखून उरलेली जी काही कक्षा आहे ती राजसत्तेची. धर्मनिरपेक्षतेची ही कल्पना जनतेला स्वातंत्र्य देत नाही, तर जनतेचे स्वातंत्र्य नियंत्रित करण्याचे स्वातंत्र्य धर्माला देते. धर्मनिरपेक्षतेची ही कल्पना प्रतिगामी कल्पना आहे. धर्मनिरपेक्षतेची दुसरी कल्पना अशी आहे की, राजसत्तेला धर्माबाबत उदासीन राहायला लावते. सगळ्याच धर्माबाबत समान आदर, समान प्रतिष्ठा आणि कोणत्याच धर्मकार्यात हस्तक्षेप न करण्याचे धोरण हे या धर्मनिरपेक्षतेचे स्वरूप आहे. ज्या राज्यात एकाच धर्माची प्रजा तिथे वरील धर्मनिरपेक्षतेचे स्वरूप आणि ज्या राज्यात भिन्नधर्मीय लोक राहतात तिथे हे दुसऱ्या प्रकारचे स्वरूप. म्हणजे पहिल्याचीच थोडीशी सुधारित आवृत्ती. धर्मनिरपेक्षतेची तिसरी कल्पना या दोहोंहून निराळी असते. राजसत्ता ही धर्म व्यवस्थेची शत्रूच असते. धर्म ही मागास संस्था असल्याने तिचा पाडाव करणे, हेच यात अपेक्षित असते. धर्माचा नाश करणे हे या कल्पनेत अंतर्भूत आहे. ही कल्पना व्यक्ती आणि विचारस्वातंत्र्याच्या विरोधी जाणारीही कल्पना आहे आणि आता धर्मनिरपेक्षतेची चौथी कल्पना. भारतीय संविधानाने स्वीकारलेली कल्पना आहे.

भारतीय घटनेच्या २५व्या कलमाने धर्मनिरपेक्षतेचा अर्थ स्पष्ट केला आहे.

  • भारतातील कोणत्याही व्यक्तीला त्याला योग्य वाटणाऱ्या उपासनेचा, धर्मपालनाचा, पारलौकिक कल्याणाचा, आध्यात्मिक उन्नतीचा पूर्ण अधिकार आहे[ संदर्भ हवा ].
  • वरील अधिकारात धर्माच्या नावावर सरकार हस्तक्षेप करणार नाही तसेच मदत व विरोधही करणार नाही. [ संदर्भ हवा ]
  • सामाजिक व राजकीय जीवनात व्यक्ती-व्यक्तीमध्ये धर्माच्या नावाने भेदभाव केला जाणार नाही. [ संदर्भ हवा ]

संदर्भ

Tags:

नास्तिकतानिधर्मी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सूर्यअकोला लोकसभा मतदारसंघबखरकुटुंबनियोजनहार्दिक पंड्याबाबा आमटेमुळाक्षरराणी लक्ष्मीबाईसायबर गुन्हाजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)भौगोलिक माहिती प्रणालीवसुंधरा दिनभारतातील जातिव्यवस्थापहिले महायुद्धचोखामेळाराजाराम भोसलेजागरण गोंधळअंजनेरीजाहिरातजैवविविधताकाळभैरवइंदिरा गांधीसप्त चिरंजीवकोरफडसातव्या मुलीची सातवी मुलगीजगातील देशांची यादीयेसूबाई भोसलेआंबेडकर जयंतीमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९कळंब वृक्षसंयुक्त महाराष्ट्र चळवळभारतीय निवडणूक आयोगजन गण मनकासारजहांगीरभारूडदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघताराबाईमराठी भाषेमधील साहित्यिकांची यादीज्वारीहिरडापुरंदरचा तहएकांकिकाशिक्षणलेस्बियनपानिपतची तिसरी लढाईआंबेडकर कुटुंबपी.एच. मूल्यमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीमासिक पाळीआत्मविश्वास (चित्रपट)मौद्रिक अर्थशास्त्रसंयुक्त राष्ट्रेमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीरशियाहनुमान चालीसाएकविरासाम्राज्यवादभूकंपविनयभंगरतन टाटानर्मदा परिक्रमाश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीआमदारभारताची जनगणना २०११प्रदूषणन्यूझ१८ लोकमतमराठी भाषाबुद्ध पौर्णिमाताराबाई शिंदेशिवाजी महाराजांची राजमुद्रानवग्रह स्तोत्रझांजसावित्रीबाई फुलेकामसूत्रहनुमान जयंतीभारताची अर्थव्यवस्था🡆 More