शहराच्या प्रशासनासाठी महानगरपालिकांची निर्मिती केली जोते.
शहरामध्ये महानगरपालिका स्थापन करण्याचा किंवा नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर करण्याचा अधिकार हा राज्य शासनास आहे. १८८८ साली स्थापन झालेली बृहन्मुंबई महानगरपालिका ही महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका होय. स्वातंत्र्योत्तर काळात १९४७ साली केवळ मद्रास, कलकत्ता आणि मुंबई ह्या शहरांसाठीच महानगरपालिका होत्या. नागरी लोकसंख्येच्या आधारे महानगरपालिकांची चार गटांत विभागणी केली जाते. एक कोटी लोकसंख्येची शहरे 'अ+ (A+)' श्रेणीत त्यानंतर अ (A) ते ड (D) श्रेणीपर्यंत वर्गीकृत करण्यात येते. या यादीत 'अ+' ग्रेड असलेली एकमेव बृहन्मुंबई महानगरपालिका आहे. सध्या महाराष्ट्रात एकूण २९ महानगरपालिका आहेत.
This article uses material from the Wikipedia मराठी article महाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादी, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.