नांदेड जिल्हा

नांदेड जिल्हा
नांदेड जिल्हा
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा
नांदेड जिल्हा चे स्थान
नांदेड जिल्हा चे स्थान
महाराष्ट्र मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य महाराष्ट्र
विभागाचे नाव छत्रपती संभाजीनगर
मुख्यालय नांदेड
तालुके अर्धापूरभोकरबिलोलीदेगलूरधर्माबादहदगावहिमायतनगरकंधारकिनवटलोहामाहूरमुदखेडमुखेडनांदेड (तालुक्याचे ठिकाण) • नायगावउमरी
क्षेत्रफळ
 - एकूण १०,४२२ चौरस किमी (४,०२४ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ३३५६५६६ (२०११)
-लोकसंख्या घनता ३२२ प्रति चौरस किमी (८३० /चौ. मैल)
-साक्षरता दर ७६.९४
-लिंग गुणोत्तर १.०६ /
प्रशासन
-जिल्हाधिकारी श्री अभिजित राजेंद्र राऊत (भाप्रसे)
-लोकसभा मतदारसंघ नांदेड (लोकसभा मतदारसंघ), हिंगोली (लोकसभा मतदारसंघ)(काही भाग)
-खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर,(२०१९ लोकसभा)
पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान ९५४ मिलीमीटर (३७.६ इंच)
संकेतस्थळ

हा लेख नांदेड जिल्ह्याविषयी आहे. नांदेड शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या

ऐतिहासिक पार्श्वभूमी

नांदेड जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील दक्षिण-पूर्वेस व तेलंगणाकर्नाटक राज्याच्या सीमेलगत आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा भागात असलेल्या नांदेड जिल्ह्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. नांदेडात शीखांचे शेवटचे गुरू गोविंदसिंहजी महाराज यांचा गुरुद्वारा आहे. नांदेड संतकवी विष्णूपंत व रघुनाथ आणि वामन पंडित यांचे जन्मस्थान आहे. नांदेड जिल्ह्यात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व श्री गुरूगोविंदसिंहजी अभियांत्रिकी व तांत्रिक महाविद्यालय या महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था आहेत.

नांदेड जिल्ह्याची सामाजिक व धार्मिक स्थिती

नांदेड जिल्ह्यात विविध जाती-धर्माचे लोक वास्तव्यास आहे. हे शहर व्यापारी पेठ म्हणूनही प्रसिद्ध आहे. हिंदू, मुस्लिम, बौद्ध, शीख या धर्मातील लोकांची संख्या अधिक असून जैन व पारशी धर्मातील लोकांची संख्या जेमतेम (नगण्य) आहे. नांदेड शहर हे गोदावरी नदीच्या नाभीस्थळी वसलेले आहे. यामुळे हे शहर धार्मिक क्षेत्रही आहे. शहरात नृसिंहाचे मंदिर आहे. शिखांचे दहावे गुरू श्रीगुरू गोविंदसिंघजी यांच्या समाधीस्थळी बांधलेला गुरुद्वारा प्रसिद्ध आहे. शिवाय जिल्ह्यातील माहूर या तालुक्याच्या ठिकाणी रेणूका मातेचे मंदिर आहे. माहूर किल्ला परिसरात लेण्या आहेत. कंधार येथे प्राचीन भूईकोट किल्ला, हजार वर्षापूर्वी बांधलेला "जगतूंग सागर" साठवण तलाव आहे. त्याठिकाणी दोन दर्गाही आहेत. दरवर्षी कंधारचा 'उरुस' या नावाने फार जत्रा भरते. लोहा तालुक्यात माळेगाव येथे मल्हारी म्हाळसाकांताचे भव्य मंदिर आहे. दरवर्षी याही ठिकाणी फार मोठी जत्रा भरते. महाराष्ट्रातील पर्यटन स्थळ म्हणून या जत्रेचे आकर्षण असते. बिलोली या तालुक्याच्या ठिकणी जुने मस्जिदीवरील कोरीव कला व दगडी पुंगराचे कोरीव काम प्रेक्षणीय आहे. देगलूर ( होट्टल ) येथील सिद्धेश्र्वराचे मंदिर, धुंडा महाराज देगलूरकराची वारकरी संप्रादायाची ध्वजा हे प्रसिद्ध आहे. नांदेड जिल्ह्यात सहस्त्रकुंड धबधबा, उनकेश्वर येथील गरम पाण्याचे झरे हे ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे आहे. अशा रितीने सामाजिक व धार्मिक गौरवशाली परंपरा नांदेड जिल्ह्यास लाभलेली आहे.

राजकारण

जिल्ह्यात नांदेड लोकसभा मतदारसंघ स्वतंत्र आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघांतर्गत उत्तर नांदेड, दक्षिण नांदेड, देगलूर, भोकर, नायगाव, मुखेड, माहूर- किनवट व कंधार हे विधानसभा मतदार संघ येतात. नांदेड जिल्ह्यात एकूण ९ विधानसभा मतदार संघ आहेत. नांदेड जिल्ह्याने आजपर्यंत देशातील राजकीय नेतृत्व घडविलेले आहे. कै. शंकरराव चव्हाण यांनी केंद्रीय गृहमंत्री तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळलेला होता.त्यांचे पुत्र मा. अशोकराव चव्हाण यांनी देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला होता. सध्या ते सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. श्रीमती सूर्यकांता पाटिल यांनी केंद्रात तर कै.शामराव कदम, कै. बाजीराव शिंदे, मा. गंगाधरराव कुंटूरकर, मा.डॉ. माधवराव किन्हाळकर, कै. डि.बी.पाटिल, मा. डी. पी. सावंत यांनी राज्यमंत्री म्हणून पदे भूषविली आहेत . सात वेळा कंधारचे विधानसभेत प्रतिनिधीत्व करणारे शेकापचे केशवराव धोंडगे, अशाप्रकारे राजकीय नेतृत्व या नांदेड जिल्ह्याने तयार केलेले आहे.

नांदेड जिल्ह्याचे भौगोलिक स्थान

नांदेड जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०,४२२ चौ.कि.मी आहे. जिल्ह्याची लोकसंख्या इ.स २००१ च्या जनगणनेनुसार २८,७६,२५९ इतकी आहे. नांदेड जिल्ह्यात सरासरी पर्जन्यमान ९५३.८ मी.मी आहे. जिल्ह्यातील प्रमुख नद्या- गोदावरी, मांजरा, आसना, मन्याड व पैनगंगा. नांदेड हे नाव श्री शंकराच्या नंदी या वाहनाच्या नावावरून उगम पावले असल्याचे सांगण्यात येते.

जिल्ह्यातील तालुके

अर्धापूर, भोकर, बिलोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर, कंधार, किनवट, लोहा, माहूर, मुदखेड, मुखेड, नांदेड (तालुक्याचे ठिकाण), नायगाव, उमरी

जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

श्री गुरूगोविंदसिंह यांचा गुरुद्वारा, रामायणात नांदेडचा उल्लेख भारतमाता जिथून आला होता, त्या ठिकाणाचा उल्लेख आहे. माहूर किल्ला हा पुरातन काळातील प्रमुख किल्ला होता, माहुरची रेणुकादेवी (शक्तिपीठ), बिलोली मशिद, कंधारचा भुईकोट किल्ला, लोहा तालुक्यातील माळेगाव यात्रा, सहस्रकुंडचा धबधबा किनवट तालुका, देगलूर तालुक्यातील सिद्धेश्वर मंदीर व इतर मंदिर समुह (होट्ट्ल), नांदेडचा किल्ला व मुखेड येथील शिवमंदिर, अर्धापूर येथील केशवराज मंदिर, शंभर फूटी मजार

शैक्षणिक स्थिती

नांदेड जिल्हा हा शैक्षणिक दृष्ट्या महाराष्ट्रातील अग्रेसर जिल्हा म्हणून ओळखला जातो. १९५८ मध्ये औरंगाबाद येथे मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली. १९८४ पासून नांदेड येथे औरंगबाद विद्यापीठाचे उपकेंद्र कार्यरत होते. १७ सप्टेंबर १९९४ रोजी नांदेड येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. जनार्धन वाघमारे, दुसरे कुलगुरू डॉ. शेषेराव सुर्यवंशी, तिसरे कुलगुरू डॉ. धनंजय येडेकर, २००८ पासून मे २०१३ पर्यंत डॉ. सर्जेराव निमसे हे कुलगुरू म्हणून कार्यरत होते. या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र नांदेड, परभणी, लातूर व हिंगोली या चार जिल्ह्याचे आहे. विद्यापीठ कक्षेत सध्या १८२ महाविद्यालये कार्यरत आहेत.

नांदेड जिल्ह्यांच्या संलग्न जिल्हा सीमा

नांदेड जिल्हा हा गोदावरीच्या खोऱ्यात आग्नेय महाराष्ट्रात वसला आहे. आदिलाबाद,कामारेड्डी, निर्मल व निझामाबाद (तेलंगाणा), बिदर (कर्नाटक), यवतमाळ, लातूर, परभणी व हिंगोली हे जिल्हे नांदेड जिल्ह्याच्या सीमेस लागून आहेत. नांदेड जिल्हा महाराष्ट्राला (आग्नेय दिशेच्या बाजूने) कर्नाटक व तेलंगाणा या राज्यांशी जोडतो.

नांदेड जिल्ह्यातील प्रमुख नद्या व उपनद्या

जिल्ह्याचा उत्तर व ईशान्य भाग सातमाळाचे डोंगर व मुदखेडच्या टेकड्यांनी व्यापलेला असून जिल्ह्याच्या दक्षिण- नैऋत्य सीमेवर बालाघाटचे डोंगर आहेत. जिल्ह्याच्या मध्य भागातून गोदावरी नदी वाहते, हा प्रदेश सपाट व सुपीक आहे. पूर्णा, मांजरा, मन्याड, लेंडी ह्या तीच्या ऊपनद्या आहेत. किनवट तालुक्यातील डोंगराळ भागात प्रामख्याने सागाची व बांबूची वने आढळतात.

बाह्य दुवे

संदर्भ

Tags:

नांदेड जिल्हा ऐतिहासिक पार्श्वभूमीनांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्याची सामाजिक व धार्मिक स्थितीनांदेड जिल्हा राजकारणनांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्याचे भौगोलिक स्थाननांदेड जिल्हा जिल्ह्यातील तालुकेनांदेड जिल्हा जिल्ह्यातील पर्यटनस्थळेनांदेड जिल्हा शैक्षणिक स्थितीनांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यांच्या संलग्न जिल्हा सीमानांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यातील प्रमुख नद्या व उपनद्यानांदेड जिल्हा बाह्य दुवेनांदेड जिल्हा संदर्भनांदेड जिल्हा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

संवादचांदिवली विधानसभा मतदारसंघअश्वत्थामाकर्ण (महाभारत)बडनेरा विधानसभा मतदारसंघभाऊराव पाटीलजाहिरातधुळे लोकसभा मतदारसंघसिंधुताई सपकाळजीवनसत्त्वकेंद्रशासित प्रदेशभगवानबाबाविधान परिषदबहिणाबाई चौधरीसोळा संस्कारपानिपतची दुसरी लढाईसम्राट हर्षवर्धनजगातील देशांच्या राजधान्यांची यादीपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हानिबंधस्वादुपिंडराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (हैदराबाद)जॉन स्टुअर्ट मिलहिंगोली जिल्हाधर्मो रक्षति रक्षितःशनिवार वाडावसाहतवादगोंडहरितक्रांतीक्रियापदमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसौंदर्याआर्य समाजभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळनगर परिषदपश्चिम दिशाऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघनोटा (मतदान)अमेरिकेची संयुक्त संस्थानेरावेर लोकसभा मतदारसंघविशेषणजपानशिवाजी महाराजांचा जीवनक्रमवायू प्रदूषणव्हॉट्सॲपमहाराष्ट्र भूषण पुरस्कारज्योतिर्लिंगविनायक दामोदर सावरकरदशावतारमधुमेहचलनवाढरविकिरण मंडळशुद्धलेखनाचे नियमभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेदौंड विधानसभा मतदारसंघबंगालची फाळणी (१९०५)भूकंपएकनाथ खडसेसमीक्षाछत्रपती संभाजीनगर जिल्हासूर्यमालालावणीसुशीलकुमार शिंदेप्रकाश आंबेडकरदिशाराज्य निवडणूक आयोगज्ञानेश्वरीजालियनवाला बाग हत्याकांडमहाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेअर्थसंकल्पकावीळरायगड लोकसभा मतदारसंघअमोल कोल्हेस्त्री नसबंदी शस्त्रक्रियासांगली विधानसभा मतदारसंघपुणे लोकसभा मतदारसंघअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची🡆 More