जीवनसत्त्व

जीवनसत्त्वे (Vitamins) हे शरीराच्या आरोग्यासाठी थोड्या प्रमाणात लागणारे पण महत्त्वाचे पोषक घटक आहेत.

ज्याची सगळ्या जीवांना अल्प प्रमाणात आवश्यकता असते, अशी ही जीवनसत्त्वे ही आहाराचे अंश आहेत. जीवनसत्त्वे ही कार्बनची संयुगे असतात. ही व्हिटॅमिन्स शरीरामध्ये निर्माण होऊ शकत नाहीत, . याचे २ प्रकार आहेत

  1. जलविद्राव्य (पाण्यात विरघळणारी)
  2. स्निग्ध विद्राव्य (स्निग्ध पदार्थात विरघळणारी ) - अ, ड, ई, आणि के ही जीवनसत्त्वे स्निग्ध विद्राव्य आहेत.

जलविद्राव्य जीवनसत्त्वांची कमतरता लगेच लक्षात येते आणि ती शरीरात घेतल्यास कमतरतेची लक्षणेसुद्धा लगेच निघून जातात. उलटपक्षी स्निग्धविद्राव्य जीवनसत्त्वांची कमतरता लगेच लक्षात येत नाही आणि उपचार दिल्यावरही त्यांची कमतरता भरून येण्यास काही वर्षे इतका कालावधी लागतो. जलविद्राव्य जीवनसत्त्वे शरीरात साठून राहत नाहीत. ती अधिक मात्रेत दिली गेल्यास मूत्रावाटे त्यांचे उत्सर्जन होते.

मानवी शरीराला आवश्यक असलेली जीवनसत्त्वे

  1. अ-जीवनसत्त्व
  2. ब-जीवनसत्त्व
  3. क-जीवनसत्त्व
  4. ड-जीवनसत्त्व
  5. इ-जीवनसत्त्व
  6. के-जीवनसत्त्व

शोधयात्रा

जीवनसत्त्वांचा शोध फंक या शास्त्रज्ञाने इ.स १९१२ मध्ये लावला.त्याने त्यांना vitamine असे नाव दिले.

अन्नघटकांची शरीरांतर्गत निर्मिती

वनस्पती आपल्या शरीरात सर्व जीवनसत्त्वे तयार करू शकतात पण प्राण्यांना त्याच्या आहारातून जीवनसत्त्व प्राप्त होतात त्याची निर्मिती शरीरात नाही होत अपवाद 'ड'जीवनसत्त्व वगळता.फळभाज्या, दूध,मांस,यकृत,अंडी,सोयाबीन तृणधान्य,इ.मुख्य सोस्र आहेत.

जीवनसत्त्वांच्या कमतरतेचे दुष्परिणाम

अ-जीवनसत्त्व - या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा येतो. रातांधळी झालेली व्यक्ती रात्रीच्यावेळी पाहू शकत नाही. हे संक्रामक रोगांपासुन संरक्षण करते.हे विटामिन शरीरात अनेक अंगाना सामान्य रूपात ठेवण्यात मदत करते जसे की त्वचा, केस, नख, ग्रंथि, दात, मसूड़े आणि हाडे.

ब-जीवनसत्त्व - या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे बेरीबेरी नावाचा आजार होतो.  

क-जीवनसत्त्व - या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे स्कर्व्ही नावाचा आजार होतो. हिरड्यांच्या रक्त पुरवठ्यात व वाढीत अडथळा येतो. जखमा भरून न येता त्यांत पू होतो.

ड-जीवनसत्त्व - या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे हाडातील कॅल्शियम कमी होऊन हाडांची मजबुती कमी होते. त्यामुळे लहान मुलांमध्ये मुडदूस,  हाडे कमकुवत होणे तर मोठ्यांमध्ये हाडे ठिसूळ होणे असे विकार होऊ शकतात.

ई-जीवनसत्त्व - या जीवनसत्त्वाच्या वांझपणा, वारंवार गर्भपात, स्नायूंचा अशक्तपणा, लाल रक्तपेशींचे विघटन असे विकार होऊ शकतात.

के-जीवनसत्त्व - या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे रक्त गोठण्याची प्रक्रिया सुरळीत होत नाही. जखम झाल्यास तिच्यातून होणारा रक्तस्राव चालूच राहतो.

जीवनसत्त्व या विषयावरील मराठी पुस्तके

  • जीवनसत्त्वे व आरोग्य (जयश्री पेंढारकर)
  • व्हिटॅमिन्स : व्हिटॅमिन्सच्या शोधांची रंजक सफर, लक्षवेधी इतिहास आणि विज्ञान (अच्युत गोडबोले, डाॅ. वैदेही लिमये)
  • शतक शोधाचे : मागोवा विसाव्या शतकातील निवडक शोधांचा (मोहन आपटे)

Tags:

जीवनसत्त्व मानवी शरीराला आवश्यक असलेली ेजीवनसत्त्व शोधयात्राजीवनसत्त्व अन्नघटकांची शरीरांतर्गत निर्मितीजीवनसत्त्व ांच्या कमतरतेचे दुष्परिणामजीवनसत्त्व या विषयावरील मराठी पुस्तकेजीवनसत्त्व

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सात बाराचा उताराकंबोडिया राष्ट्रीय क्रिकेट संघतणावजालना लोकसभा मतदारसंघभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीकुटुंबभारतातील राजकीय पक्षजिल्हाधिकारीकालभैरवाष्टकपाताळगंगा नदीशेतकरी कामगार पक्षओमराजे निंबाळकरस्त्रीवादी साहित्यशब्द सिद्धीआयत्या घरात घरोबाऑलिंपिकजिजाबाई शहाजी भोसलेभारतीय संविधानाचे कलम ३७०हार्दिक पंड्यापुणे करारगुप्त साम्राज्यगुडघाहिंदू धर्मातील अंतिम विधीसत्यशोधक समाजपोक्सो कायदामराठी व्याकरणमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीलक्ष्मीब्रह्मपुत्रा नदीवृत्तपत्रकिंमतपाकिस्तान ऑर पार्टिशन ऑफ इंडियाराज ठाकरेअष्टांगिक मार्गजागतिक दिवसध्रुपदमहाराष्ट्र केसरीराजरत्न आंबेडकरकेरळसांगोला विधानसभा मतदारसंघगाडगे महाराजभारताची अर्थव्यवस्थावि.वा. शिरवाडकरज्वारीदेवनागरीवाय.एस. जगनमोहन रेड्डीहंबीरराव मोहितेवस्तू व सेवा कर (भारत)रमाबाई आंबेडकरहिंगोली लोकसभा मतदारसंघसामाजिक कार्यइस्रायलछत्रपती संभाजीनगरजास्वंदमहाराष्ट्र नवनिर्माण सेनामहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमराठाबहिष्कृत भारतहिंदू विवाह कायदामहाड सत्याग्रहत्र्यंबकेश्वरकोल्हापूर लोकसभा मतदारसंघबहावावातावरणभीमराव रामजी आंबेडकरशुभं करोतिपरभणी लोकसभा मतदारसंघबुलढाणा जिल्हाप्रल्हाद शिंदेउच्च रक्तदाबकावळामानवी हक्कप्रथमोपचारविशेषणरामटेक लोकसभा मतदारसंघगायबलुतेदार🡆 More