जिल्हाधिकारी: भारतीय प्रशासन सेवा अधिकारी

जिल्हाधिकारी (District Collector/ Collector) हा भारतीय प्रशासन सेवा अधिकारी हा व्यक्ती प्रमुख असतो.

त्यांचेकडे संपूर्ण जिल्ह्याच्या, कायदा व सुव्यवस्थेची पण जबाबदारी असते. ते जिल्हा न्यायदंडाधिकारीही असतात. जिल्हाधिकाऱ्याला इंग्रजीमध्ये Collector असे म्हणतात.हा शब्द District म्हणजे जिल्हा आणि Collector म्हणजे गोळा करणारा या दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे.

पदाचा इतिहास

१७७२मध्ये ब्रिटिश गव्हर्नर वारेन हेस्टिंग्स यांने जिल्हाधिकारी पदाची निर्मिती केली. जमीन महसूल वसुलीच्या उद्देशाने हे पद निर्माण करण्यात आले. या पदाचे महत्त्व वाढवण्यासाठी कंपनी सरकारने न्यायदान आणि नागरी प्रशासनाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्याकडे सोपवली. स्वातंत्र्योत्तर काळात जिल्हाधिकारी पदाच्या अधिकार व जबाबदारीत बदल करण्यात आला.जनकल्याणाची संबंधित अनेक कार्य त्यांच्याकडे सोपवण्यात आली.

निवड

जिल्हाधिकारी हा गट अचा अधिकारी असतो. त्याची निवड संघ लोकसेवा आयोग करत असते. जिल्हाधिकाऱ्यांची निवड दोन मार्गाने केले जाते. पहिला मार्ग म्हणजे सरळ सेवा भरती होय. संघ लोकसेवा आयोगाकडून भारतीय प्रशासकीय सेवा पदासाठी निवड केलेल्या उमेदवाराची जिल्हाधिकारी म्हणून राज्यशासन नेमणूक करते. संघ लोकसेवा आयोगाकडून निवड झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सेवाशर्ती, वेतन, बढती, सेवा-निवृत्ती बाबत केंद्र सरकारचे नियम लागू होतात. राज्य सेवेत उपजिल्हाधिकारी म्हणून कार्य करणाऱ्या व्यक्तीस बढती देऊन जिल्हाधिकारी पदावर नेमले जाते. भारत प्रशासन सेवेतून आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय ६० वर्ष तर बढती मिळून जिल्हाधिकारी बनलेल्या ५८ व्या राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे सेवानिवृत्त होतात.

कार्य आणि कर्तव्ये

केंद्र शासनाचा कर्मचारी असून देखील जिल्हाधिकारी राज्य शासनाच्या अखत्यारित काम करतो. उपजिल्हाधिकारी हे पद राज्यातील लोकसेवा आयोग यांच्याकडून घेतली जाते. उपजिल्हाधिकारी पदासाठी जर आपण पात्र ठरला तर आपल्याला पुढील ट्रेनिंग साठी पुणे येथे पाठवले जाते. जिल्हाधिकारी यांचे प्रशिक्षण लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन प्रबोधिनी, मसूरी येथे होते. अंतर्गत क्षेत्राचा विकास करणे व नवे कायदे जिल्ह्यात लागू करणे ही जिल्हाधिकाऱ्यांची मुख्य कर्तव्य होय त्याचबरोबर विविध योजनांचे प्रतिनिधित्व देखील ते करतात.

Tags:

अधिकारीजिल्हाजिल्हा न्यायदंडाधिकारीभारतीय

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघअमरावती विधानसभा मतदारसंघशिवाजी महाराजांची राजमुद्राहिंगोली जिल्हामतदानभारताचे राष्ट्रचिन्हआंबाजिल्हा परिषदसंभोगभारतातील जागतिक वारसा स्थानेरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघप्रदूषणवनस्पतीगंगा नदीबावीस प्रतिज्ञामुरूड-जंजिरादिल्ली कॅपिटल्सपंचशीलमहाराष्ट्राचा भूगोललोकमान्य टिळकशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळराष्ट्रीय स्वयंसेवक संघसेवालाल महाराजसंत जनाबाईराज्यपालमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनसोनेसमाज माध्यमेहिंदू कोड बिलदक्षिण दिशानागरी सेवामाती प्रदूषणदहशतवादटरबूजमानवी हक्कआद्य शंकराचार्यकल्याण लोकसभा मतदारसंघपेशवेअजिंठा-वेरुळची लेणीप्रणिती शिंदेभारताचा ध्वजमहाराष्ट्र पोलीसभरती व ओहोटीसमर्थ रामदास स्वामीगायत्री मंत्रभारताचा इतिहासपाणीविनयभंगसंख्याराहुल गांधीमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीखो-खोवि.वा. शिरवाडकरभारतीय राष्ट्रीय काँग्रेसवर्धा विधानसभा मतदारसंघमराठा घराणी व राज्येभारतातील शासकीय योजनांची यादीबुलढाणा लोकसभा मतदारसंघआकाशवाणीखासदारनांदेड लोकसभा मतदारसंघभारताचा स्वातंत्र्यलढाकरएकनाथ शिंदेमांजरशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीराजकारणवर्धमान महावीरअर्थशास्त्रगाडगे महाराजजगातील देशांची यादीमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदाभारत छोडो आंदोलनसंयुक्त राष्ट्रेविष्णुमूळ संख्यावाचनवर्तुळ🡆 More