बावीस प्रतिज्ञा

१४ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे डॉ.

१९५६">१९५६ रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माचा सपत्निक स्वीकार केल्यावर आपल्या अनुयायांना नवयान बौद्ध धम्माची दीक्षा देताना बावीस प्रतिज्ञा दिल्या आहेत. असे मानले जाते की, या प्रतिज्ञा मानवी प्रवृत्तीला सत्प्रवृत्त करणाऱ्या सामाजिक क्रांतीच्या दीशा दिग्दर्शक आहेत. भारतामध्ये बौद्ध धर्म स्वीकारताना व्यक्ती किंवा व्यक्ती-समूहांकडून या प्रतिज्ञा शपता म्हणून वदवल्या जातात. बावीस प्रतिज्ञांना 'धम्म प्रतिज्ञा', 'डॉ. आंबेडकरांच्या प्रतिज्ञा', 'बौद्ध प्रतिज्ञा', 'नवबौद्ध प्रतिज्ञा' किंवा 'नवयानी प्रतिज्ञा' असेही म्हटले जाते.

बावीस प्रतिज्ञा
दीक्षा ग्रहण करताना बाबासाहेब व माईसाहेब आंबेडकर

२२ प्रतिज्ञा

बावीस प्रतिज्ञा 
हिंदू धर्माच्या त्याग करतांना दीक्षाभूमी, नागपूर येथे २२ प्रतिज्ञा देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर, १४ ऑक्टो. १९५६

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्धांना दिलेल्या २२ प्रतिज्ञा खालीलप्रमाणे आहेत.

  1. मी ब्रह्मा, विष्णू, महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
  2. मी रामकृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
  3. मी गौरी-गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देव-देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
  4. देवाने अवतार घेतले, यावर माझा विश्वास नाही.
  5. गौतम बुद्ध हा विष्णूचा अवतार होय, हा खोटा आणि खोडसळ प्रचार होय असे मी मानतो.
  6. मी श्राद्धपक्ष करणार नाही; पिंडदान करणार नाही.
  7. मी बौद्धधम्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही.
  8. मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाचे हातून करवून घेणार नाही.
  9. सर्व मनुष्यमात्र समान आहेत असे मी मानतो.
  10. मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन.
  11. मी तथागत बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन.
  12. तथागताने सांगितलेल्या दहा पारमिता मी पाळीन.
  13. मी सर्व प्राणिमात्रावर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन.
  14. मी चोरी करणार नाही.
  15. मी व्याभिचार करणार नाही.
  16. मी खोटे बोलणार नाही.
  17. मी दारू पिणार नाही.
  18. ज्ञान (प्रज्ञा), शील, करुणा या बौद्धधम्माच्या तीन तत्त्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करीन.
  19. माझ्या जुन्या, मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व मनुष्यमात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बौद्धधम्माचा स्वीकार करतो.
  20. तोच सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे.
  21. आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो.
  22. इतःपर मी बुद्धाच्या शिकवणुकीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो.


या २२ प्रतिज्ञा मानवता व बौद्ध धर्मात महत्त्वाच्या आहेत. सामान्यतः सर्व नवयानी बौद्ध या २२ प्रतिज्ञा पाळतात. या प्रतिज्ञा बौद्ध धम्माचे सार असून पंचशील, अष्टांगिक मार्गदहा पारमिता अनुसरण्यासाठी आहेत.

स्तंभ

बावीस प्रतिज्ञा 
२२ प्रतिज्ञांचा दीक्षाभूमीवरील स्तंभ

या बावीस प्रतिज्ञांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी'चे तत्कालीन अध्यक्ष आणि बिहारकेरळचे माजी राज्यपाल रा.सु. गवई तसेच संस्थेचे सचिव सदानंद फुलझेले यांनी दीक्षाभूमीवर या बावीस प्रतिज्ञा प्रशस्त संगमरवरी दगडावर कोरून तो स्तंभ स्तूपाच्या प्रथमदर्शनी ठेवला आहे. वर्धा येथील बुद्ध विहारातही डॉ. म.ल. कासारे यांच्या नेतृत्वाखाली अशाच स्वरूपाचा भव्य स्तंभ उभारण्यात आला आहे.

उच्चारण पद्धती

बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना दीक्षा देतांना या बावीस प्रतिज्ञांचे आयोजन केलेले असावे. या प्रतिज्ञा करताना अनुया सश्रद्ध भावनेने हात जोडून त्रिशरणपंचशीलांचा त्या पाठोपाठ उच्चारण करताना डोळे मिटून होते. बौद्धजन डोळे मिटून श्रद्धने त्या बावीस प्रतिज्ञांचे ग्रहण करून पुन्हा उच्चारतात, तेव्हा त्या वचनांना प्रार्थनेचे स्वरूप आपोआप प्राप्त होते.

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे

Tags:

बावीस प्रतिज्ञा २२ प्रतिज्ञाबावीस प्रतिज्ञा स्तंभबावीस प्रतिज्ञा उच्चारण पद्धतीबावीस प्रतिज्ञा हे सुद्धा पहाबावीस प्रतिज्ञा संदर्भबावीस प्रतिज्ञा बाह्य दुवेबावीस प्रतिज्ञाइ.स. १९५६डॉ. बाबासाहेब आंबेडकरदीक्षाभूमीनवयाननागपूरबौद्ध धम्म१४ ऑक्टोबर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

म्हणीगजानन दिगंबर माडगूळकरशाश्वत विकासएकांकिकामहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीवसंतराव नाईकबाळशास्त्री जांभेकरविवाहभैरी भवानीकल्की अवतारअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीफुलपाखरूयशस्वी जयस्वालभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशम्युच्युअल फंडमुलाखतकथादक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघज्वालामुखीभारताची संविधान सभामहाराष्ट्रभारताच्या राष्ट्रपतींची यादीभगवद्‌गीताअर्थशास्त्रगुकेश डीपु.ल. देशपांडेअभिव्यक्तीमण्यारअहिल्याबाई होळकरकोरफडत्रिरत्न वंदनाआणीबाणी (भारत)अमृता शेरगिलपरभणी जिल्हाबाजी प्रभू देशपांडेभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीमुघल साम्राज्यकल्याण लोकसभा मतदारसंघमहानुभाव पंथभीमराव यशवंत आंबेडकरकृत्रिम पाऊसकोंडाजी फर्जंदरवींद्रनाथ टागोरभाऊराव पाटीलचक्रधरस्वामीरावेर लोकसभा मतदारसंघताम्हणजागतिक कामगार दिनपुन्हा कर्तव्य आहेरायगड (किल्ला)भारतरत्‍नमराठवाडाराजकारणभारताचे राष्ट्रपतीचार वाणीअजिंठा-वेरुळची लेणीवार्षिक दरडोई उत्पन्नउमरखेड तालुकाविल्यम शेक्सपिअरधर्मो रक्षति रक्षितःज्ञानपीठ पुरस्कारगहूकोरेगावची लढाईशिखर शिंगणापूरप्राथमिक आरोग्य केंद्रस्वस्तिकॲरिस्टॉटलवणवाविशेषणबाबासाहेब आंबेडकरदौलताबादसह्याद्रीकेंद्रशासित प्रदेशशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीयशवंतराव चव्हाणव्यंजन🡆 More