विष्णु

विष्णू (:/ˈvɪʃnuː/ संस्कृत : विष्णुः ; IAST: ''Viṣṇu') भगवान विष्णू हे हिंदू धर्मातील प्रमुख देवतांपैकी एक आहेत.

श्री विष्णू हे नारायण आणि हरी या नावांनीही ओळखले जातात. हिंदू धर्मातील प्रमुख परंपरांपैकी एक असलेल्या वैष्णव पंथाचे ते सर्वोच्च आहेत.

श्री विष्णु
विष्णु
भगवान विष्णु

विश्वाचे पालन - इत्यादींची अधिपती देवता

मराठी विष्णू
संस्कृत विष्णुः
निवासस्थान क्षीरसागर
लोक वैकुंठ
वाहन गरुड, शेष नाग
शस्त्र सुदर्शन चक्र, कौमोदकी गदा, कमळ, शंख
पत्नी लक्ष्मी
अपत्ये कामदेव
अन्य नावे/ नामांतरे केशव, नारायण, माधव,गोपाळ, गोविंद, हरि, जनार्दन, अच्युत, पुरुषोत्तम, पद्मनाभ, पुरुष, उपेंद्र
या देवतेचे अवतार मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, गौतम बुद्ध, कल्की, दत्तात्रेय, धन्वंतरी,मोहिनी,इ.
या अवताराची मुख्य देवता विष्णू
मंत्र ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः
नामोल्लेख श्रीमद भागवत, विष्णु पुराण
तीर्थक्षेत्रे तिरुपती,पंढरपूर,त्रावणकोर, अयोध्या, मथुरा,गोकुळ, व्रुदावन, कुरुक्षेत्र,द्वारका, गुरुवायूर , मुक्तीनाथ नेपाळ

ब्रह्मा, विष्णू आणि महेश शिव यांचा समावेश असलेल्या सर्वोच्च देवतेच्या त्रिमूर्तीमध्ये विष्णूला संरक्षक देवतेचे स्थान आहे. वैष्णव परंपरेत, भगवान विष्णू हे विश्वाची निर्मिती, संरक्षण आणि परिवर्तन करणारे सर्वोच्च आहेत. शक्ती परंपरेत, देवीचे वर्णन सर्वोच्चांपैकी एक म्हणून केले जाते, तरीही शिव आणि ब्रह्मा यांच्यासोबत विष्णू पूज्य आहेत. देवी ही प्रत्येकाची ऊर्जा आणि सर्जनशील शक्ती आहे तशी लक्ष्मी विष्णूची समान पूरक जोडीदार आहे असे म्हणले आहे. भगवान विष्णू हे हिंदू धर्माच्या स्मार्त परंपरेतील पंचायतन पूजेतील पाच देवतांपैकी एक आहेत.


वैष्णव पंथानुसार, ईश्वराचे सर्वोच्च स्वरूप गुणांसह (सत्गुण) आहे, आणि त्याचे विशिष्ट स्वरूप आहे परंतु अमर्याद, अतींद्रिय आणि अपरिवर्तनीय परिपूर्ण ब्रह्म आणि विश्वाचा आदिम आत्मा (स्व) आहे. विष्णूचे अनेक परोपकारी आणि भयंकर चित्रण आहेत. परोपकारी पैलूंमध्ये, त्याला लक्ष्मी सोबत क्षीरसागर नावाच्या दुधाच्या आदिम महासागरात तरंगणाऱ्या आदिशेषाच्या (वेळेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या) नागाच्या कुंडलीवर झोपलेला सर्वज्ञ म्हणून चित्रित केले आहे.

जेव्हा जेव्हा जगाला वाईट, अराजकता आणि विध्वंसक शक्तींचा धोका असतो, तेव्हा विष्णू अवतार घेऊन वैश्विक व्यवस्था पुनर्संचयित करतो आणि धर्माचे रक्षण करतो. दशावतार हे विष्णूचे दहा प्राथमिक अवतार आहेत. दहा अवतारांपैकी राम आणि कृष्ण अवतार हे सर्वात महत्त्वाचे आहेत.

लक्ष्मी

लक्ष्मी ही ऐश्वर्य, सौंदर्य, शांती, सत्य, आणि समृद्धी, संपत्ती यांची अधिष्ठात्री देवी आहे. ती भगवान विष्णूंची पत्नी आहे असे पौराणिक संदर्भ आढळतात. ऋग्वेदातील श्रीसूक्तामधे लक्ष्मीच्या चिक्लीत या पुत्राचा उल्लेख येतो. कर्दम हे नाव श्रीसूक्तामध्ये उल्लेख आढळतो.हिंदू धर्मातील पौराणिक कथांचे उगम असलेल्या श्रीमद्भागवतनुसार कामदेव हा श्रीविष्णूचा मुलगा होता.श्रीकृष्णाचा पुत्र प्रद्युम्न हा कामदेवाचा अवतार होय.; वैष्णव सिद्धान्तानुसार कामदेव हा श्रीकृष्णाचे आध्यात्मिक रूप मानतात.

गरुड वैनतेय

गरुड वैनतेय हा विष्णूचे वाहन असणारा पक्षिराज आहे.

दक्षिण-भारतीय ग्रंथांमध्ये

स्कंदपुराणानुसार पुत्री अमृतावल्ली (देवसेना) व सुंदरवल्ली, श्रीविष्णू आणि देवी लक्ष्मी यांच्या दोन कन्या आहेत. नारायणने त्रिविक्रमचा अवतारात (लक्ष्मी हृदयात होती) नारायणाचा आनंदाश्रूतून जन्म झाला, तामिळ देवता ही कार्तिकेय श्रीसुब्रह्मण्यची पत्नी आहे असे मानले जाते.

व्युत्पत्तिशास्त्र

विष्णू या शब्दाचे व्युत्पत्ती प्रामुख्याने 'विष' शब्दापासून मानले गेले आहे. ('विष' किंवा 'विश' शब्द हेलॅटिन मध्ये -vicus आणि सालविकमध्ये vas - ves  समान शब्द असू शकतात). निरुक्त (१२.१८)मध्ये, यास्काचार्य यांनी प्रामुख्याने 'विष् ' या शब्दापासून 'व्याप्ति'च्या अर्थाने 'विष्णू' या शब्दाचे व्युत्पत्ती सांगितली आहे. आदि शंकराचार्य यांनी विष्णुसहस्रनाम-मध्ये 'विष्णू' हा शब्द प्रामुख्याने व्यापक मानला आहे. पर्यायीशब्द, 'विश 'शब्दाचे अर्थ 'प्रवेश करणे' (विश्व सर्वत्र व्यापक) असे वर्णन केले आहे.विष्णुसुक्त (ऋग्वेद-१.१५४.१ आणि ३) च्या व्याख्येमध्ये आचार्य सायण 'विष्णू' या शब्दाचा अर्थ व्यापनशील (सर्व देवता) आणि सर्वव्यापी होय.

विष्णूला ऋग्वेदात सूर्याचे एक रूप मानले आहे. डॉ. रा.ना. दांडेकर ह्यांनी वि=उडणे ह्या धातूला ‘स्‍नु’ हा प्रत्यय लागून ‘विष्णू’हा शब्द सिद्ध झाला, असे मत व्यक्त केले आहे. ‘उडणारा पक्षी’ हे विष्णू ह्या देवतेचे मूळचे प्रतीक असले पाहिजे पुढे सूर्यावर पक्षिस्वरूपाचा आरोप केला, असेही त्यांचे प्रतिपादन आहे. "विशाल विश्वाच्या कल्याणासाठी तीन पदक्षेपांमध्ये त्रैलोक्य" व्यापणारा असा त्याचा निर्देश विष्णुसूक्तात आला आहे. (१.१५५). ह्या त्रैलोक्यात कोणते तीन लोक अंतर्भूत आहेत, ह्याबद्दल दोन मते आढळतात: पहिल्या मतानुसार हे तीन लोक म्हणजे सूर्याचा उदय, मध्य आणि अस्त होत. दुसऱ्या मतानुसार पृथ्वी, अंतरिक्ष आणि द्युलोक हे ते तीन लोक. त्रैलोक्य म्हणजे अग्‍नी, विद्युल्लता आणि सूर्य असे प्रकाशाचे तीन आविष्कार, असेही म्हटले जाते. विष्णूचे तीन पदक्षेप हा साऱ्या विश्वाचा आधार होय.

विष्णुपुराणात, विष्णू म्हणजे सर्व व्यापक असणे वा प्रवेश करणे .अशा प्रकारे हे स्पष्टपणे दिसून येते की 'विष्णू' हा शब्द 'विश' या शब्दापासून आला आहे त्याचा अर्थ विश्व सर्वव्यापी आहे.

विष्णो: सर्वव्यापकत्वम् :- नारायणोपनिषद्

ऋग्वेदानुसार विष्णू

वैदिक देव-परंपरेनुसार,सूक्तांच्या सांख्यिकीय दृष्टिकोनातून विष्णूचे स्थान भिन्न आहे कारण त्यांचे स्तवन केवळ ५ सूक्तांमध्येच केले जाते; परंतु जर त्यांना सांख्यिकीच्या दृष्टीकोनातून पाहिले गेले नाही आणि इतर पैलूंकडून त्यांचा विचार केला तर त्यांचे महत्त्व समोर येते.  ऋग्वेदानुसार, त्याला 'बृहच्छरीर' ( विशाल शरीर असलेला) वा विश्वरूप असे वर्णन केले आहे.

विष्णु 
श्रीविष्णू क्षीरमहासागर शेषनागावर लक्ष्मीसह

हिंदू पौराणिक कथेनुसार

विष्णुपुराणानुसार बाल विष्णू पिंपळाच्या पानातून जन्माला आले. महाविष्णूचा नाभीतून कमळ तयार होते ज्यामधून ब्रह्मदेव आणि विष्णूचे नयनातून शिव उत्पन्न झाले.

पौरणिक कथेनुसार जेव्हा शिव आपल्या मस्तकावर अमृत चोळत होते तेव्हा त्यातून एक पुरुष जन्माला आले तेच हे श्री विष्णू देव, हे एक शिवाचे प्रतीक आहे, आणि ते शिवांनी श्री विष्णू नामे उद्गारले. एकदा श्री विष्णू क्षीरसागरात शयन करत असताना श्री विष्णूंच्या नाभीतून कमळ उत्पन्न झाले आणि त्यातून श्री ब्रम्हदेव यांची उत्पत्ती झाली. म्हणून हे शिवाच्या अंशातून झाल्यामुळे त्रिदेव म्हणून संबोधले गेले. श्री विष्णूंना संपूर्ण विश्वाचे पालनकर्ता मानले जाते. तर ब्रम्हदेव हे विश्वाची निर्मिती करणारे आणि शिव हे संहार करणारे आहेत.

श्लोक आणि ग्रंथ

वैष्णव ग्रंथ: - ईश्वर संहिता, विष्णुसंहिता, शतपथ ब्राह्मण, ऐतरेय ब्राह्मण, महाभारत, रामायण, विष्णुपुराण,श्रीमद्भागवतपुराण ,श्रीजयदेव गोस्वामी विरचित श्रीगीतगोविन्दम

शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं

विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्ण शुभाङ्गम् ।

लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम्

वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ॥ - विष्णुसहस्रनाम

महामन्त्र

हरे कृष्ण हरे कृष्ण

कृष्ण कृष्ण हरे हरे

हरे राम हरे राम

राम राम हरे हरे

पञ्चाङ्ग

तिथिर्विष्णुस्तथा वारो नक्षत्रं विष्णुरेव च।

योगश्च करणं चैव सर्वं विष्णुमयं जगत्।।

गायत्री
  • श्रीविष्णू गायत्री- नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि । तन्नो विष्णू: प्रचोदयात्॥
  • श्रीलक्ष्मी गायत्री- महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि । तन्नो लक्ष्मी: प्रचोदयात्॥
  • श्रीसुदर्शन चक्र गायत्री- सुदर्शनाय विद्महे महाज्वालाय धीमहि । तन्नो चक्रः प्रचोदयात्॥
  • श्रीपाञ्चजन्य शङ्ख गायत्री- पाञ्चजन्याय विद्महे पद्मगर्भाय धीमहि । तन्नो शङ्खः प्रचोदयात्॥
  • गरुड गायत्री -तत्पुरुषाय विद्महे सुवर्णपक्षाय धीमहि । तन्नो गरुड प्रचोदयात् ॥
भगवद्‌गीता अध्याय ४ - ज्ञानसंन्यासयोग

भगवान श्रीकृष्ण (विष्णू) अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये म्हणतो की,

यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्‌ ॥ ४-७ ॥

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्‌ । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥ ४-८ ॥

अर्थात, हे अर्जुना (हे भारता), जेव्हा जेव्हा धर्माची हानी येते, आणि अधर्माची वाद होते, तेव्हा तेव्हा मी अवतार घेतो. सज्जनांच्या रक्षणासाठी व दुर्जनांच्या नाशासाठी तसेच पुन्हा धर्म संस्थापिण्यासाठी मी प्रत्येक युगात अवतार घेतो.

Whenever there is decay of righteousness, O Bharata,

And there is exaltation of unrighteousness, then I Myself come forth ;

For the protection of the good, for the destruction of evil-doers,

For the sake of firmly establishing righteousness, I am born from age to age.

भक्ति

श्रीवैष्णवसंप्रदाय लक्ष्मी नारायणाला आराध्यदैवत मानणारे संप्रदाय आहे .

वारकरी संप्रदाय पंढरपूर येथील विठ्ठलाच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय

विष्णु 
कृष्ण व्हॅली येथील कृष्ण मंदिर मेलबर्न
विष्णु 
वैदिक पद्धतीने बांधलेले इको हाऊस यात कमीत कमी ताण निसर्गावर येतो - कृष्ण व्हॅली मेलबर्न जवळ

इस्कॉन

आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन)[International Society for Krishna Consciousness ISKCON] किंवा हरे कृष्ण चळवळ ही एक वैष्णव संप्रदायाची धार्मिक संघटना आहे. भक्तिमार्ग हा सर्वात महत्त्वाचा असे ही संघटना मानते. ही संघटना १९६६ साली, संस्थापकाचार्य ए.सी.भक्तिवेदान्तस्वामी प्रभुपाद ह्यांनी अमेरिकेतील न्यू यॉर्क ह्या महानगरात स्थापली. तिची तत्त्वे ही हिंदु संस्कृतीतील धार्मिक ग्रंथ श्रीमद भागवतम्भगवदगीता ह्यावर आधारित असून ती हिंदु मान्यतेनुसार सुमारे ५००० वराहे जुनी आहेत. तिचे भारतातील मुख्यालय पश्चिम बंगाल मधील एक गाव मायापूर येथे आहे. कृष्ण हेच परम ईश्वर आहेत किंवा स्वयम भगवान आहेत व तेच सर्व सृष्टीचे उगम स्थान आहेत अशी आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघाची मान्यता आहे. भारतीय संस्कृती व वैदिक विचारांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी हा पंथ काम करतो.

इस्कॉन चा मूलमंत्र:

हरे कृष्ण हरे कृष्ण

कृष्ण कृष्ण हरे हरे

हरे राम हरे राम

राम राम हरे हरे

विष्णु 
मायापूर येथील राधाकृष्ण मंदिर

नियम

हेच व्यावहारिक पालन करण्यासाठी ISKCON चे काही मूलभूत नियम आहेत.

  • कोणत्याही प्रकारची नशा नाही. (चहा, कॉफी नाही)
  • अवैध स्त्री / पुरुष गमन नाही
  • मांसाहार / बायोगिक भक्षण नाही. (कांदा, लसुन नाही)
  • जुगार नाही (शेर बाजारही नाही)
  • त्यांना तामसिक अन्न सोडून द्या (तामसिक अन्न म्हणून त्यांना ,कांदा लसुन, मांस, मदिरा इत्यापासून दूर राहा)
  • अनैतिक वर्तणुकीपासून दूर राहा (जुगार, पब, वेश्यालय अशा स्थानांवर बंदी घातलेली आहे)
  • एक तास शास्त्रीययन (यात गीता आणि भारतीय धर्म-इतिहास संबंधित शास्त्रांचा अभ्यास करणे)
  • 'हरे कृष्णा-हरे कृष्णा' नावाची १६ वेळा माळा जपा.
  • शुद्ध शाकाहार

वैष्णव तीर्थे व मंदिरे

चार धाम
  1. उत्तर बद्रीनाथ,
  2. पश्चिम द्वारका,
  3. पूर्व जगन्नाथ पुरी
  4. दक्षिण रामेश्वरम्

वैष्णव तीर्थ:- बद्रीधाम (बद्रीनाथ), मथुरा, अयोध्या, तिरुपती बालाजी, श्रीनाथ, द्वारिकाधीश.

सण-उत्सव

वैष्णव उत्सव आणि व्रत: - एकादशी, चातुर्मास व्रते, रामनवमी, कृष्ण जन्माष्टमी, होळी, दीपावली इ.

धार्मिकनियम:- कांदा लसुण व मांसाहार वर्ज्य,जुगार वर्ज्य,सर्व प्रकारची नशा वर्ज्य,व्याभीचार वर्ज्य

कृष्ण जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी, कृष्ण जन्माचा दिवस. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. हा उत्सव भारतात सर्वत्र होतो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर होतो.

दिवाळी लक्ष्मीपूजन

हिंदु धर्मात दिवाळी मध्ये आश्विन अमावास्येत लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो.या दिवशी घरांत  प्रदोषकाळी (संध्याकाळी) कुबेर, गणेश व लक्ष्मीचे पूजन श्रीसूक्तपठणही केले जाते .घरामध्ये व बाहेर अनेक दीप (दिवा) लावला जाते .काही वैष्णव भक्त श्रीलक्ष्मीनारायणाची आराधना  करतात.लक्ष्मीपूजनाच्या द‌िवशी रात्रीच्या वेळी लक्ष्मी सर्वत्र संचार करते. ज्या स्वच्छता, सौंदर्य, आनंद, उत्साह अशा सकारात्मक उर्जा असतात तेथे लक्ष्मी प्रसन्न होऊन आशिर्वाद देते. या दिवशी सायंकाळी लक्ष्मीचे पूजन केले जाते. या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात.या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात.

श्री लक्ष्मीपूजनाच्या वेळी अक्षतांनी बनवलेले अष्टदल कमल किंवा स्वस्तिक यांवरच श्री लक्ष्मीची स्थापना केली जाते. त्यानंतर लक्ष्म्यादी देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्तेष्टांना वाटतात.

कोजागरी पौर्णिमा

कोजागरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा , ही आश्विन पौर्णिमा म्हणून सण साजरी केली जाते. ही शरद ऋतूतील आश्विन महिन्यात येते. इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे कोजागरी पौर्णिमा बहुधा सप्टेंबर ते ऑक्टोबर मध्ये असते. कोजागरी पौर्णिमेला ,शरद ऋतूतील आश्‍विन महिन्यामध्ये 'आश्‍विनी पौर्णिमा' असे म्हणतात. या दिवशी साक्षात लक्ष्मीदेवी येऊन चंद्रमंडळातून पृथ्वीवर उतरते आणि मध्यरात्री (संस्कृतमध्ये) 'को जागर्ति' (म्हणजे 'कोण जागत आहे') असे म्हणत मनुष्याचे प्रयत्न पहात पृथ्वीतलावर संचार करीत असते. उपवास,पूजन व जागरण या व्रतात महत्त्व आहे.कोजागरीच्या रात्री मंदिरे,घरे,रस्ते,उद्याने इ. ठिकाणी दिवे लावतात.म्हणून या दिवसाला ‘कोजागरी पौर्णिमा’ म्हणतात.

  • ओडिशामध्ये, शरद पौर्णिमेला 'कुमार पौर्णिमा' असे म्हणतात.या दिवशी गजलक्ष्मी देवीची पुजा करतात.
  • रात्री चंद्राला आटीव दूधाचा नैवेद्य दाखवायचा असतो दूध आटवून त्यात केशर,पिस्ते, बदाम, चारोळ्या, वेलचीपुड, जायफळ वगैरे गोष्टी घालून तसेच साखर घालून, नैवेद्य दाखविला जातो. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते.
विष्णु 
बंगाली हिंदु स्वस्तिक
  • कोजागरी पौर्णिमेला बंगाली लोक याला 'लोख्खी पुजो' असे म्हणतात .दिवाळी आणि कोजागरी पौर्णिमामध्ये लक्ष्मी पुजामध्ये बंगाली समाजातील लोक लोख्खी पूजामध्ये शहाळी वा ताजे नारळ वापरतात. तांबेचा कलश किंवा मातिचा कुंभावर आणि शहाळीनारळावर सिंदूराने बंगाली हिंदु स्वस्तिक चिन्ह जे मध्यमा बोटाने आणि लाल सिंदूरा लेपाचा वापर करून काढतात या दिवशी भक्तीने शंख कमळाचे फुलाबरोबर श्रीलक्ष्मीनारायणाची पूजा करतात.

तुळशी विवाह

तुळशी वनस्पतींचे लक्ष्मी स्वरूप मानले जाते.

तुळशी विवाह म्हणजे तुळशी (पवित्र तुळस) वनस्पतींचे शालिग्राम किंवा विष्णू किंवा त्यांचे अवतार श्री कृष्ण यांच्याशी विवाह प्रबोधिनी एकादशीमध्ये करण्याची पूजोत्सव प्रथा आहे.भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देवउठनी एकादशीला संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर उठतात, तेव्हा त्यांना तुळशीशी लग्न लावतात. भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहेत.

दिवा लावण्याच्या प्रथेमागील वेगवेगळी कारणे किंवा कथा आहेत.

पौराणिक कथेनुसार, दिवाळीच्या दिवशी अयोध्याचा राजा राम , लंकेच्या राजा रावणाची वध करून राम सीता आणि लक्ष्मण सह अयोध्येत परतले. कृष्ण या दिवशी भगवान श्रीकृष्णाने अत्याचारी नरकासुराचा केला.आणि . विष्णूने हिरण्यकशिपुचा नरसिंहच्या रूपात वध केला होता आणि या दिवशी धन्वंतरि समुद्रमंथन नंतर आले.लोक आनंदाने दिवे लावतात.

नावे

भगवान विष्णूच्या एक हजार नावांचे स्तोत्र म्हणजे विष्णुसहस्रनाम होय. याचा उल्लेख महाभारतात आढळतो. पितामह भीष्मांनी युधिष्ठिराला हे स्तोत्र सांगितल्याचा संदर्भ येतो.

दशावतार

विष्णु 
राजा रवी वर्मा यांनी काढलेले विष्णू दशावतार चित्र

दशावतारांच्या कथा विष्णू पुराणात सांगितल्या आहेत आणि कथेतून उत्क्रांतिवादाचे सिद्धांत दर्शवितात.

  • हिंदू परंपरेच्या वेगवेगळ्या शाखा विष्णूचा ९वा अवतार म्हणून दोन भिन्न व्यक्तींना स्वीकारतात:
दशावतार श्लोक

मत्स्यः कूर्मो वराहश्च नरसिंहोऽथ वामनः ।

रामो रामश्च कृष्णश्च बुद्धः कल्की च ते दश ।। ४.२ ।।

भगवान विष्णूचे एकूण दहा अवतार असल्याचे मानले जाते. ते दहा अवतार पुढीलप्रमाणे आहेत.

१. मत्स्य:- विष्णू पुराणनुसार मस्त्यावतारात विष्णूने हयग्रीव नावाच्या एका राक्षसाला मारले होते. या हयग्रीव राक्षसाने ब्रह्माकडून वेद चोरून समुद्रात लपविले होते. या पातकासाठी त्याचा वध करण्यात आला.

२. कूर्म:-देव व दानवांनी अमृतप्राप्तीसाठी क्षीरसागर या समुद्रात समुद्रमंथन केले होते. देव आणि दानवांनी मंदार पर्वताची रवी व वासुकी नागाची दोरी करून समुद्रमंथन केले. त्यावेळी भगवान विष्णूनी कूर्मावतार घेतला. कुर्मावताराच्या (कासवाच्या) रूपाने मंदार पर्वताला सागराच्या तळाशी आधार दिला

३. वराह:- दैत्य हिरण्याक्ष याचा तीक्ष्ण दाताने वध केला आणि भूदेवीची म्हणजेच पृथ्वीची त्याच्या तावडीतून सुटका केली.

४. नरसिंह वा नृसिंह:- श्रीविष्णूने नृसिंहरूप घेऊन हिरण्यकश्यपूचा तीक्ष्ण नखाने वध केला आणि भक्त प्रल्हादाचे रक्षण केले.

५. वामन:- भागवत कथेनुसार, देवलोकामध्ये इंद्राचा अधिकार परत मिळवण्यासाठी विष्णूने हा अवतार घेतला. देवलोकाला असुर राजा बलीने ताब्यात घेतले. बली विरोचनचा मुलगा आणि प्रल्हादाचा नातू होता आणि तो दयाळू राक्षस राजा म्हणून ओळखला जात असे. वामन (विष्णू) यांनी राजा बलीला पाताल देण्याचा निर्णय घेतला आणि बलीच्या डोक्यावर तिसरे पाउल ठेवले, परिणामी राजा बली पातालपर्यंत पोहोचले. दक्षिण भारतात वामनला उपेंद्र म्हणूनही ओळखले जातात. वामनावतार हा कश्यप आणि त्यांची पत्नी अदिती यांचा मुलगा होता.

६. परशुराम:‌-परशुराम हे भृगुवंशीय जमदग्नी ऋषी आणि रेणुका यांचे पुत्र आणि त्रेता युगा(रामायण कालखंड)चे महर्षी होते. त्यांनी सहस्त्रार्जुनाच्या वध केला. ते सप्त चिरंजीवींपैकी एक आहेत.

७. राम:- राम अवतारात श्री विष्णूंनी दैत्यराज रावणाचा वध केला. ते राजा दशरथ आणि कौसल्या यांचे पुत्र असून त्यांची पत्नी सीता आहे.

८. श्रीकृष्ण:- कृष्ण हा वसुदेव आणि देवकी यांचे ८वे पुत्र होते. त्यांचा जन्म मथुरेमध्ये झाला होता आणि गोकुळात यशोदा आणि नंदाने त्यांचे पालनपोषण केले होते. त्यांचे बालपण गोकुळात झाले. कुमार वयात त्यांनी मथुरा येथे आपल्या मामा कंसाचा वध केला.

.बलराम - हा वसुदेव व रोहिणी या दांपत्याचा मुलगा आणि श्रीकृष्णाचा सावत्र भाऊ होता. त्यांची सुभद्रा ही सख्खी बहीण होती. बलरामाला बलभद्र, हलधर, हलायुध, संकर्षण इत्यादी अनेक नावे असून, ते अनंतशेषाचा अवतार आहेत. पांचरात्र शास्त्रानुसार बलराम (बलभद्र) वासुदेवाचे स्वरूप आहे तर ‘नारायणीयोपाख्यात’ मध्ये वर्णन केलेल्या तत्वज्ञानानुसार, विष्णुंच्या चार रूपांतील 'चतुर्व्यूह' दुसरे रूप म्हणजे ‘संकर्षण ’.

श्रीविष्णू यांनी योगमायेपासून देवकीचा सातवा गर्भ रोहिणीच्या गर्भाशयात ठेवला. त्यातून बलरामाचा जन्म झाला.

त्यांची रेवती ही पत्नी होती असे मानले जाते. सत्ययुगातील महाराज रैवतक राजा पृथ्वी सम्राट होते ह्यांची मुलगी, राजकुमारी रेवती होती.

  • गौतम बुद्ध:- हे भारतीय तत्त्वज्ञ व बौद्ध धर्माचे संस्थापक होते. शाक्य गणराज्याचा राजा शुद्धोधन व त्यांची पत्‍नी महाराणी महामाया (मायादेवी) यांच्या लुंबिनी येथे राजकुमाराचा जन्म झाला. या राजकुमाराचे नाव ‘सिद्धार्थ’ असे ठेवण्यात आले. सिद्धार्थाच्या जन्मानंतर अवघ्या सातव्या दिवशीच त्यांची आई महामायाचे निधन झाले. आईचे छत्र हरवलेल्या सिद्धार्थाचा सांभाळ त्यांची मावशी व सावत्र आई महाप्रजापती गौतमीने केला. त्यामुळे राजकुमार सिद्धार्थाला ‘गौतम’ या नावानेही ओळखले जाते. राजकुमार सिद्धार्थ गौतमास आवश्यक असे सर्व शिक्षण देण्यात आले. यशोधरा या सुंदर राजकुमारीशी सिद्धार्थ गौतमाचा विवाह झाला.

१०.कल्की अवतार  :-(संस्कृत: कल्कि अवतार;IAST: Kalkī Āvatār ) हा भविष्यात येणारा श्रीविष्णूचा दशावतारातील १० वा अवतार आहे. हा अवतार ६४ कलांनी युक्त असा असेल.

विष्णूचा दहावा अंतिम अवताराला' कल्की अवतार' असे म्हणतात .श्रीमद् भागवतनुसार(भागवत पुराण) कलियुगात पाप वाढल्यावार आणि पापाने परिसीमा गाठल्यावर दुष्टांचा संहार करण्याकारिता विष्णू हा अवतार घेईल. कल्की हा अवतार कलियुग व सत्ययुगाच्या संधिकालामध्ये होईल; सर्वप्रथम महाप्रलय येऊन कलियुगाच्या अंतानंतर सत्ययुग (सतयुग) सुरू होईल.

कलियुगामध्ये अंधार व अधर्म नष्ट करण्यासाठी अशांत जगाला शांती देण्यासाठी हा अवतार विष्णू घेतील. कल्की अवतार तेजस्वी नंदक तलवारीसह एक देवदत्त नावाच्या शुभ्र घोड्यावर स्वार होऊन कलियुगात सर्व पापी अधर्म दुष्ट लोक व राजांचा विनाश करतील आणि पुन्हा सतयुगाची स्थापना करतील.  कलियुगात ते .कलि राक्षसाचा विनाश करतील.

वैष्णव सिद्धांतानुसार आणि हिंदू धर्मातील कालगणनेनुसार म्हणजेच अंतहीन चक्रात चार युगापैकी एक युग म्हणजे कलियुग आहे.

कलियुगाचा कालावधी ४,३२,००० वर्षे आहे, विद्वानांच्या संशोधनानुसार, इसवी सन पू्र्व ३,१०२ या वर्षी कलियुग सुरू झाले.

कल्की पुराण २.७ अनुसार बृहद्रथ राजा आणि त्यांची पत्नी कौमुडी यांची कन्या पद्मावती (लक्ष्मी) आहे.

विष्णु 
कल्कि अवतार

कल्की अवतार या जगात लोकांचा उद्धार करण्यासाठी आणि उपद्रव्यांचा नाश करण्यासाठी तसेच धार्मिकतेची तत्त्वे पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी अवतार घेईल.

भागवत पुराणात,स्कन्ध :१२ अध्याय:२ ,श्लोक १६-१७ मध्ये असे वर्णन केले आहे

इत्थं कलौ गतप्राये जनेतु खरधर्मिणि । धर्मत्राणाय सत्त्वेन भगवान् अवतरिष्यति ॥ १६ ॥

मराठीत अर्थ:- अशा रीतीने कलियुगाच्या शेवटी माणसे गाढवासारखी होतील, तेव्हा धर्माचे रक्षण करण्यासाठी भगवान स्वतः सत्त्वगुणाचा स्वीकार करून अवतार धारण करतील.

चराचर गुरोर्विष्णोः ईश्वरस्याखिलात्मनः । धर्मत्राणाय साधूनां जन्म कर्मापनुत्तये ॥ १७ ॥

मराठीत अर्थ:-"सर्वशक्तिमान भगवान विष्णू सर्वव्यापी . सर्वस्वरूप, चराचराचे गुरू भगवान विष्णू धर्माचे रक्षण करण्यासाठी व साधूंना कर्मबंधनातून सोडविण्यासाठी अवतार घेतात.

अन्य अवतार

  • जगन्नाथ :- इन्द्रद्युम्न या राजाने अवंती प्रांतावर राज्य केले आणि पुरीमध्ये भगवान जगन्नाथची मूर्ती स्थापन केली.

रथयात्रा

ओडिशातील पुरी येथे जगातील रथयात्रेचा सण साजरा केला जातो. याला गुंडीचा उत्सव असेही म्हणतात. जगभरातील लाखो भाविक आज पुरी धाम येथे पोचत आहेत. दरवर्षी आषाढ शुक्ल द्वितीयाच्या दिवशी रथयात्रा सुरू होते. जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांची मूर्ति नीमवृक्षाचा लकडापासून बनवले जाते.विविध रंग,फुलाने,रत्न दगिनाने सजवले जाते

पुरी येथे असलेल्या जगन्नाथ मंदिराचं खूप महत्त्व आहे. मंदिर भारतातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. दरवर्षी मोठ्या संख्येनं भाविक येथे भगवान जगन्नाथाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. पुराणांमध्ये भगवान विष्णूचे २४ अवतार सांगितले गेले आहेत. त्यातीलच एक अवतार म्हणजे भगवान जगन्नाथ असल्याचं सांगितलं जातं. दरवर्षी ओडिशाच्या पुरी इथं असलेल्या जगन्नाथ मंदिरातून जगन्नाथ, भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांची रथयात्रा काढली जाते. हा खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा उत्सव असतो. प्रत्येक वर्षाच्या आषाढ महिन्यातील शुक्ल पक्ष द्वितियेला ही रथयात्रा सुरू होते.जगन्नाथ मंदिर भारतदेशातील चार धाम पैकी एक आहे. भगवान जगन्नाथची रथ यात्रा जगन्नाथपुरी येथे आषाढ शुक्ल द्वितीयापासून सुरू होते आणि दशमी तिथीला संपते.

विष्णु 
नर नारायण , अहमदाबाद

रथयात्रा फक्त भारताताच नाही तर संपूर्ण जगात एक उत्सव म्हणून साजरी केली जाते. या रथयात्रेत सहभागी होण्यासाठी पुरी येथे जगभरातून भाविक येतात. ओडिशातील पुरी इथल्या रस्त्यावरून भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांची भव्य रथयात्रा काढली जाते. या पवित्र यात्रेत भगवान बालभद्रचा रथ सर्वात पुढे असतो, याला तालध्वज म्हटलं जातं. मध्यभागी सुभद्रेचा रथ असतो याला दर्पदलन किंवा पद्मा रथ असं संबोधलं जातं. सर्वात शेवटी भगवान जगन्नाथाचा रथ असतो, ज्याला नंदी गरुड ध्वज म्हटलं जातं. खरं पाहिलं तर ही रथयात्रा भगवान विष्णूचे अवतार जगन्नाथ देवालाच समर्पित असते.

  • नर- नारायण:-हिंदू-धर्मात भगवान विष्णूंचा अवतार म्हणजे नार-नारायण . बद्रीवन येथे तपश्चर्या केली होती. बद्रीनाथ येथे निवास करतात .स्वामीनारायण संप्रदाय गुजरातमधील श्री स्वामीनारायण मंदिर, अहमदाबाद येथे आहे , नर-नारायणाच्या पूजा मोठ्या प्रमाणात केली जाते. महाभारत पौराणिकनुसार , कृष्णा हे नारायणाचे रुप, अर्जुन हे नराचे रूप होते.  
  • मोहिनी:- पौराणिककथेनुसार,मोहिनी ही विष्णू हिंदू देवतांचे एकमेव स्त्री रूप आहे. तिने भस्मासूराच्या वध केला, श्रीविष्णूने मोहिनीरूप घेऊन याला सुदर्शनचक्राने दैत्यासुर स्वरभानु (राहू/केतु) शिरच्छेद केला. असुर स्वरभानु (राहू/केतु) हा असुर विप्रचिती आणि सिंहिका यांचा मुलगा आहे

समुद्रमंथनात , मोहिनी देवांना आणि दैत्यांना अमृत वाटप करताना; असुर स्वरभानुने,देवांचा रुपामध्ये अन्य देवांचा बाजुला बसला होता.थोडं अमृत प्रासन करताना सूर्य आणि चंद्राने विष्णूला(मोहिनी) या कृत्याची माहिती दिली ते ओळखले कि तो स्वरभानु (राहू/केतु) आहे ;मोहिनीने त्याचं सुदर्शनचक्राने शिरच्छेद केलं , स्वरभानुचे (राहू/केतु) डोके - शरीर वेगळे झाले.मग ब्रह्मादेवाने राहूला सर्पाचे शरीर दिले आणि केतूला सर्पाचे डोके दिले. मन्यतानुसार अवकाशात सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण होते

विष्णु 
वैद्यराज धन्वंतरी
  • धन्वंतरी :- धन्वंतरी हा वैद्यराज आहे ; देव आणि दैत्य समुद्रमंथन करत होते तेव्हा चौदा रत्न निघाले. त्यांपैकी एक म्हणजे विष्णू अवतार देव धन्व॔तरी होय. धन्वंतरी अमृतकुम्भ घेऊन आले होते. भारतात धनत्रयोदशीला धन्वंतरी जयंती साजरी करतात
    चौदा रत्नाचे श्लोक

लक्ष्मीः कौस्तुभपारिजातकसुरा धन्वन्तरिश्चन्द्रमा ।

गावः कामदुधाः सुरेश्वरगजो रम्भादिदेवाङ्गनाः ॥

अश्वः सप्तमुखो विषं हरिधनुः शङ्खोऽमृतं चाम्बुधे ।

रत्‍नानीह चतुर्दशं प्रतिदिनं कुर्यात्‌ सदा मङ्गलम् ॥

विष्णु 
सनत्कुमार (सनकादि मुनी)
  • सनत्कुमार (सनकादि मुनी) :-हिंदू धर्मातील कल्पनेनुसार सनत्कुमार हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत. श्रीविष्णूचा २४ अवतारांपैकी एक आहे
विष्णु 
यांच्यासह मूर्ती वेंकटेश्वर श्रीदेवी , भु देवी
  • बालाजी (वेंकटेश्वर)

तिरुपती शब्दाचा अर्थ तिरु म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मीचा पती म्हणजे तिरुपती(विष्णू).शहरापासून जवळच असलेल्या डोंगरावर बालाजीचे मंदिर आहे. या डोंगरास तिरुमला असे म्हणतात.

पद्मावती देवी वेंकटेश्वर बालाजीची पत्नी आहे

तेलुगु: వెంకటేశ్వరుడు,

तमिल: வெங்கடேஸ்வரர்,

कन्नड़: ವೆಂಕಟೇಶ್ವರ,

संस्कृत: वेंकटेश्वरः

गोविंदा, श्रीनिवास.

मराठी: बालाजी

श्री पद्मावती अम्मावरी मंदिर, तिरुचानूर (अलमेलुमंगपुरम) तिरुपतिशहरापासून सुमारे पाच किलोमीटर दूर अंतरावर आहे.असे म्हणतात की या मंदिराला दर्शनाशिवाय तिरुमलात् संपूर्ण मंदिराचे करावा लागतो.हे मंदिर भगवान वेंकटेश्वराच्या पत्नी पद्मावतीचे आहे. भगवान वेंकटेश्वर, विष्णूचा अवतार आणि पद्मावती स्वतः लक्ष्मीचे अंशअवतार मानला जातो .पद्मावती देवीचे मंदिर सर्वात महत्वाचे मानले जाते. मंदिरात विराजमान असलेल्या देवीच्या मूर्तीमध्ये पद्मावती देवी कमळांच्या आसनावर बसल्या आहेत, ज्यामध्ये तिचे दोन्ही हात कमळांच्या फुलांनी सजलेले आहेत.

एकादशी तिथी

हिंदू महिना (इंग्रजी) पालक देव शुक्लपक्षातली एकादशी कृष्णपक्षातली एकादशी
चैत्र (मार्च–एप्रिल) विष्णू कामदा एकादशी वरूथिनी एकादशी
वैशाख (एप्रिल–मे) मधुसूदन मोहिनी एकादशी अपरा एकादशी
ज्येष्ठ (मे–जून) त्रिविक्रम निर्जला एकादशी योगिनी एकादशी
आषाढ (जून–जुलै) वामन शयनी एकादशी कामिका एकादशी
श्रावण (जुलै-ऑगस्ट) श्रीधर पुत्रदा एकादशी अजा एकादशी
भाद्रपद (ऑगस्ट–सप्टेंबर) हृषीकेश की वामन? परिवर्तिनी एकादशी/पद्मा एकादशी इंदिरा एकादशी
आश्विन (सप्टेंबर–ऑक्टोबर) पद्मनाभ पाशांकुशा एकादशी रमा एकादशी
कार्तिक (ऑक्टोबर–नोव्हेंबर) दामोदर प्रबोधिनी एकादशी उत्पत्ती एकादशी
मार्गशीर्ष (नोव्हेंबर–डिसेंबर) केशव मोक्षदा एकादशी सफला एकादशी
पौष (डिसेंबर–जानेवारी) नारायण पुत्रदा एकादशी षट्‌तिला एकादशी
माघ (जानेवारी–फेब्रुवारी) माधव जया एकादशी विजया एकादशी
फाल्गुन (फेब्रुवारी–मार्च) गोविंद आमलकी एकादशी पापमोचिनी एकादशी
अधिक मास (३ वर्षांतून एकदा) पुरुषोत्तम कमला एकादशी कमला एकादशी

चोवीस विशेष विष्णू रूपांचे प्रतीकशास्त्र

चोवीस विशेष विष्णू रूपांचे प्रतीकशास्त्र .
क्र.अ विष्णूचे विशेष नाव अग्निपुराणानुसार खालचा उजवा हात वरचा उजवा हात वरचा डावा हात खालचा डावा हात
केशव पद्म शंख चक्र गदा
त्रिविक्रम पद्म गदा चक्र शंख
श्रीधर पद्म चक्र गदा शंख
दामोदर पद्म शंख गदा चक्र
अधोक्षज पद्म गदा शंख चक्र
जनार्दन पद्म चक्र शंख गदा
नारायण शंख पद्म गदा चक्र
विष्णू गदा पद्म शंख चक्र
पद्मनाभ शंख पद्म चक्र गदा
१० पुरुषोत्तम चक्र पद्म शंख गदा
११ नारसिंह चक्र पद्म गदा शंख
१२ अच्युत गदा पद्म चक्र शंख
१३ हरि शंख पद्म चक्र गदा
१४ गोविंद चक्र गदा पद्म शंख
१५ मधुसूदन शंख चक्र पद्म गदा
१६ हृषीकेश गदा चक्र पद्म शंख
१७ संकर्षण गदा शंख पद्म चक्र
१८ श्रीकृष्ण शंख गदा पद्म चक्र
१९ माधव गदा चक्र शंख पद्म
२० वामन शंख चक्र गदा पद्म
२१ वासुदेव गदा शंख चक्र पद्म
२२ प्रद्युम्न गदा चक्र शंख पद्म
२३ अनिरुद्ध चक्र गदा शंख पद्म
२४ उपेन्द्र शंख गदा चक्र पद्म
टिप्पणी: वरील प्रतीकात्मकता अग्नि पुराणातील अनेक हस्तलिखितांपैकी एक आहे..हे पद्म पुराणातील प्रतीकात्मकता विसंगत आहे. वरील यादीमध्ये काही विचित्र त्रुटी दर्शविल्या आहेत, जसे की विष्णूचे नाव हरि आणि पद्मनाभ रूप दोघेह समान् प्रतिरूप आहेत.

स्वरूप

सगुण

निर्गुण

भक्त

चैतन्य महाप्रभु

चैतन्य महाप्रभु(गौरांग) गौडिया वैष्णव संत होते. जगन्नाथ राधाकृष्ण उपासक आहे. चैतन्य महाप्रभुंचा जन्म पश्चिम बंगालमधील नवद्वीप धाम (नदिया) आता मायापुर म्हणतात या गावी शक संवत १७०७ च्या फाल्गुन शुक्ल पौर्णिमेला संध्याकाळी सिंहराशी लग्नातील चंद्रग्रहणाच्या वेळी झाला. त्यांनी वृंदावनमध्ये सात वैष्णव मंदिरांची स्थापना केली. ते आहेत: - गोविंददेव मंदिर, गोपीनाथ मंदिर, मदन मोहन मंदिर, राधा रमण मंदिर, राधा दामोदर मंदिर, राधा श्यामसुंदर मंदिर आणि गोकुलानंद मंदिर. त्यांना सप्तदेवालय म्हणतात.

नारद मुनी

हिंदू धर्मातील कल्पनेनुसार नारद मुनी हे ब्रह्मदेवाच्या सात मानसपुत्रांपैकी एक आहेत. त्यांनी तपःसामर्थ्याने ब्रह्मर्षी पद प्राप्त केलेले आहे. नारद मुनी हे भगवान विष्णू यांच्या परमप्रिय भक्तांपैकी एक मानले जातात. तसेच त्यांना देवर्षी असेही म्हणतात.

महाराजा ध्रुव

हिंदू शास्त्रानुसार, महाराज ध्रुव भगवान विष्णूंचे एक महान तपस्वी भक्त होते. राजकुमार ध्रुव पाच वर्षाचा लहान बालक होता. त्यांची कथा विष्णू पुराण आणि भागवत पुराणात आहे. तो उत्तानपाद (जो स्वयंभू मनुचा मुलगा होता)आणि सुनीति यांचा मुलगा होता. राजकुमार ध्रुवाने लहानपणापासूनच राजवाडा सोडून तपस्या करण्यासाठी मधुवन[१] नावाच्या वनात गेला. श्रीविष्णूच्या वरदान प्राप्त झाल्यामुळे, सप्तऋषी देखील नक्षत्रांसोबत दिसते त्याला ध्रुवलोक वा ध्रुवतारा असे म्हणतात. आज आकाशात ध्रुवतारा आहे, चारी बाजूला नक्षत्र भ्रमण करत आहे.

सर्वाधिक चमकणारा तारांचे नाव ध्रुवतारा वा ध्रुवीय तारा दिले.आजही ध्रुवीय तारा आकाशात दिसत आहे.

ध्रुवीय ताराला इंग्रजीत pole star वा polar star [२]म्हणतात.


प्रल्हाद

प्रल्हाद हा दैत्यराज हिरण्यकश्यपू आणि पत्नी कयाधु यांचा पुत्र आहे. विष्णुभक्ती केल्याने प्रल्हादावर आलेल्या संकटांतून विष्णूने नृसिंह अवतार धारण करून त्याची सुटका केली.

श्लोक

बलिर्बिभीषणो भीष्मः | प्रल्हादो नारदो ध्रुवः |

षडेते वैष्णवाः प्रोक्ताः | स्मरणं पापनाशनाम् ||

या श्लोकामध्ये बली, बिभीषण, भीष्म, प्रल्हाद, नारद, ध्रुव हे सहा वैष्णव असल्याचे सांगितले आहे.

विष्णूची २४ नावे

कोणत्याही हिंदू धार्मिक विधीच्या आधी विष्णूची २४ नावे पुढील क्रमाने उच्चारून श्रीविष्णूला नमः (नमस्कार) करतात. पहिली चार नावे उच्चारल्यानंतर तबकात चमचाभर पाणी सोडतात.

ॐ केशवाय नम: । ॐ नारायणाय नम: । ॐ माधवाय नम: । ॐ गोविंदाय नम: ।(उदक सोडावे) ॐ विष्णवे नम: । ॐ मधुसूदनाय नम: । ॐ त्रिविक्रमाय नम: । ॐ वामनाय नम: । ॐ श्रीधराय नम: । ॐ हृषीकेशाय नम: । (१०) ॐ पद्मनाभाय नम: । ॐ दामोदराय नम: । ॐ संकर्षणाय नम:। ॐ वासुदेवाय नम: । ॐ प्रद्युम्नाय नम: । ॐ अनिरुद्धाय नम: । ॐ पुरुषोत्तमाय नम: । ॐ अधोक्षजाय नम: । ॐ नारसिंहाय नम: । ॐ अच्युताय नम: । (२०) ॐ जनार्दनाय नम: । ॐ उपेन्द्राय नम: । ॐ हरये नम: । ॐ श्रीकृष्णाय नम: । (२४)

अवतार

मत्स्य, कुर्म/कच्छप, वराह, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध, कल्की मोहिनी, धन्वंतरी, वामन, नारदमुनि बलराम, लक्ष्मण, हनुमान, कश्यप, ऋषभदेव, नरनारायण/नर, यज्ञनारायण/यज्ञ, (४), वेदव्यास, दत्तात्रय/दत्त, कपिल, पृथू, हयग्रीव, आदि शंकराचार्य

संदर्भ यादी

हे पण पहा

Tags:

विष्णु लक्ष्मीविष्णु गरुड वैनतेयविष्णु दक्षिण-भारतीय ग्रंथांमध्येविष्णु व्युत्पत्तिशास्त्रविष्णु हिंदू पौराणिक कथेनुसारविष्णु श्लोक आणि ग्रंथविष्णु भक्तिविष्णु इस्कॉन[१९]विष्णु वैष्णव तीर्थे व मंदिरेविष्णु सण-उत्सवविष्णु नावेविष्णु दशावतारविष्णु अन्य अवतारविष्णु एकादशी तिथीविष्णु चोवीस विशेष विष्णू रूपांचे प्रतीकशास्त्र[३९]विष्णु स्वरूपविष्णु भक्तविष्णु अवतारविष्णु संदर्भ यादीविष्णु हे पण पहाविष्णुआंतरराष्ट्रीय संस्कृत वर्णमाला लिप्यंतरणवैष्णव पंथसंस्‍कृत भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

बलुतेदारसिकलसेलशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीविमापोलीस पाटीलशिरूर लोकसभा मतदारसंघशब्द सिद्धीनागपूरभारतीय आडनावेमांगी–तुंगीफ्रेंच राज्यक्रांतीभोपाळ वायुदुर्घटनाजागतिकीकरणहस्तमैथुनराजरत्न आंबेडकरनगर परिषदसमीक्षामराठी संतसईबाई भोसलेगौतम बुद्धगांडूळ खतभारताचे राष्ट्रपतीनंदुरबार लोकसभा मतदारसंघरामदास स्वामींनी रचलेल्या आरत्याबुद्धिबळभीमराव यशवंत आंबेडकरस्वामी विवेकानंदशेतकरी कामगार पक्षजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)महात्मा फुलेमानवी शरीरसंत जनाबाईन्यूझ१८ लोकमतभारतीय संविधानाची उद्देशिकाअण्णा भाऊ साठेमराठी लिपीतील वर्णमालाचंद्रपूर लोकसभा मतदारसंघहृदयहनुमान जयंतीश्रीकांत शिंदेसापसामाजिक समूहनागपूर लोकसभा मतदारसंघजागतिक दिवसभरड धान्यकर्ण (महाभारत)वाघपुराणेलावणीशिक्षण२०२४ मधील भारतातील निवडणुकारावेर लोकसभा मतदारसंघमहारआंबेडकर जयंतीमहाराष्ट्रातील किल्लेस्वामी समर्थडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारपुन्हा कर्तव्य आहेरामनवमीभारतातील जागतिक वारसा स्थानेआळंदीआंबायूट्यूबरामायणजवउंटशाळाभारतीय अंतराळ संशोधन संस्थाजीवनसत्त्वशेतकरीकोरेगावची लढाईभारताची जनगणना २०११सुधा मूर्तीवि.स. खांडेकरमहाराष्ट्र पोलीसमहाराष्ट्रातील लोककलाअमेरिकेची संयुक्त संस्थाने🡆 More