वर्तुळ: युक्लिडियन भूमितीचा साधा वक्र

वर्तुळ( इंग्लिश: Circle;) भूमितीनुसार एका बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या व एकाच प्रतलावर असणाऱ्या सर्व बिंदूंच्या संचाला वर्तुळ असे म्हणतात.

वर्तुळ म्हणजे प्रतलातील एक वक्र असून तो शांकव कुलातील आहे. त्याच्यावरील प्रत्येक बिंदू एका विशिष्ट बिंदूपासून ठराविक अंतरावर असतो. या विशिष्ट बिंदूस 'वर्तुळमध्य किंवा वर्तुळकेंद्र' म्हणतात व ठराविक अंतरास 'त्रिज्या' म्हणतात.

वर्तुळ: क्षेत्रफळ व परीघ, वर्तुळ रचना, वर्तुळाचे गुणधर्म
वर्तुळाची आकृती



क्षेत्रफळ व परीघ

वर्तुळाची त्रिज्या अथवा व्यास माहीत असल्यास त्याचा परीघक्षेत्रफळ यांची माहिती मिळते.

समजा :
r = त्रिज्या, c = परिघ, A = क्षेत्रफळ असेल, तर
वर्तुळ: क्षेत्रफळ व परीघ, वर्तुळ रचना, वर्तुळाचे गुणधर्म 
वर्तुळ: क्षेत्रफळ व परीघ, वर्तुळ रचना, वर्तुळाचे गुणधर्म 

वर्तुळ रचना

भूमितीय रचनांमध्ये वर्तुळाला फार महत्त्व आहे, कारण परंपरेने भूमितीमधील प्रश्नांची उकल करताना रचना फक्त सरळपट्टी व कंपास यांनीच करावयाच्या असतात. त्यामुळे दिलेल्या अटी पूर्ण करणारी वर्तुळे काढण्याचा अभ्यास आवश्यक आहे.

त्रिज्या

वर्तुळाचा मध्य बिंदु आणि परिघावरील कोणताही बिंदु याना जोडणाऱ्या सरळ रेषेस किंवा तिच्या लांबीस त्रिज्या म्हणतात. वर्तुळात असंख्या त्रिज्या काढता येतात, पण त्या सर्वांची लांबी सारखीच असते. त्रिज्या व्यासाच्या निम्मी असते. त्रिज्या माहीत असल्यास, वर्तुळाचे क्षेत्रफळ व परिघाची लांबी काढणे शक्य आहे

व्यास

वर्तुळाच्या मध्य बिंदूमधून जाणाऱ्या व त्याच्या परिघावरील कोणत्याही दोन बिंदुना जोडणाऱ्या सरळ रेषेस वर्तुळाचा व्यास असे म्हणतात. अशी ही रेषा वर्तुळास दोन समान भागात दुभागते. अशा रेषेच्या लांबीस सुद्धा व्यासच म्हटले जाते. वर्तुळाच्या व्यासाची लांबी त्याच्या त्रिज्येच्या दुप्पट असते. व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी ज्या आहे. एखाद्या वर्तुळात अगणित व्यास काढता येतात व सर्व व्यासांची लांबी सारखीच असते. त्रिज्येप्रमाणेच, वर्तुळाचा व्यास माहीत असल्यास परीघ व क्षेत्रफळ यांची माहिती मिळते.

जीवा

वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषेस 'जीवा' म्हणतात. जीवा वर्तुळमध्यातून जात असल्यास तिला वर्तुळाचा 'व्यास' म्हणतात. वर्तुळास दोन बिंदूंत छेदणाऱ्या रेषेस 'छेदिका' म्हणतात.

कंस

वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंमधील वर्तुळाच्या भागास 'कंस' म्हणतात. हे दोन बिंदू व्यासाची टोके असल्यास त्या कंसाला 'अर्धवर्तुळ' म्हणतात. वर्तुळाची लांबी म्हणजे वर्तुळाचा 'परिघ' होय.

वर्तुळाचे गुणधर्म

  • वर्तुळात अनंत त्रिज्याव्यास काढता येतात. तसेच समान किंवा असमान लांबीच्या अगणित ज्या सुद्धा काढता येतात.
  • मध्यबिंदूतून ‘ज्या’वर काढलेल्या लंब, ‘ज्या’स दुभागतो.
  • वर्तुळाच्या परीघावर एका बिंदूतून फक्त एकच स्पर्शिका काढता येते.
  • स्पर्शबिंदूतून काढलेली त्रिज्यास्पर्शिका एकमेकाला काटकोनात असतात.
  • वर्तुळाबाहेरिल बि॑दुतुन वर्तुळावर काडढलेल दोनि स्पर्शिका समान् ला॑बिच्या असतात.

बाह्य दुवे

संदर्भ

http://www.school4all.org/mathematics/geometry/varatulle-lambvaratulle

http://mr.vikaspedia.in/education/childrens-corner/91792393f924/93593094d924941933


.

Tags:

वर्तुळ क्षेत्रफळ व परीघवर्तुळ रचनावर्तुळ ाचे गुणधर्मवर्तुळ बाह्य दुवेवर्तुळ संदर्भवर्तुळइंग्लिश भाषात्रिज्याबिंदूभूमिती

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सोळा संस्कारमराठा घराणी व राज्येतेजस ठाकरेआर्थिक विकासउत्तर दिशाकुणबी२०१४ लोकसभा निवडणुकाकुत्रापक्षीगंगा नदीभारताचे उपराष्ट्रपतीमराठी संतमहाराष्ट्र पोलीसपोहणेसंवादमानवी विकास निर्देशांकअभंगनक्षलवादइतिहासाच्या अभ्यासाची साधनेस्थानिक स्वराज्य संस्थाऔंढा नागनाथ मंदिरकार्ल मार्क्सक्रिकेटचे नियमराज्य निवडणूक आयोगसातवाहन साम्राज्यमावळ लोकसभा मतदारसंघशनिवार वाडामाळशिरस विधानसभा मतदारसंघसदा सर्वदा योग तुझा घडावाघोणसशिखर शिंगणापूरमहात्मा गांधीप्रेरणारत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघवि.वा. शिरवाडकरज्योतिबा मंदिरऔद्योगिक क्रांतीप्रल्हाद केशव अत्रे३३ कोटी देवकुष्ठरोगसुप्रिया सुळेराष्ट्रीय स्वयंसेवक संघसाईबाबासूत्रसंचालनसचिन तेंडुलकरदिंडोरी लोकसभा मतदारसंघपरभणी लोकसभा मतदारसंघनैसर्गिक पर्यावरणभाषाकुळीथमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघघनसावंगी विधानसभा मतदारसंघचैत्रगौरीविधानसभा आणि विधान परिषदविष्णुसहस्रनामलोकमतजळगाव लोकसभा मतदारसंघमहाभारतफुटबॉलकोरफडतिथीमाळीरामगोलमेज परिषदमहात्मा फुलेमोबाईल फोनआईसम्राट अशोक जयंतीजंगली महाराजडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारक्रांतिकारकमलेरियाकोरेगावची लढाईबाळूमामाच्या नावानं चांगभलंदीपक सखाराम कुलकर्णी🡆 More