सूत्रसंचालन

कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार निवेदन करून कार्यक्रम पुढे नेण्याला सूत्रसंचालन असे म्हणतात.

सूत्रसंचालकाला कार्यक्रमात व्यासपीठावरील इतर मान्यवर मंडळींप्रमाणेच महत्त्व असते.

स्वरूप

सूत्रसंचालन ही जशी एक कला आहे तसेच ते एक शास्त्रसुद्धा आहे. सूत्रसंचालन हे केवळ दोन वक्त्यांमधील, दोन गाण्यांमधील दुवा नसतो. तो व्यासपीठ आणि श्रोते- प्रेक्षक यांच्यातील संवाद साधणारा सेतू असला पाहिजे. संवादामध्ये रंजकता आणून समर्पक शब्दांनी त्याने पुन्हा-पुन्हा श्रोत्यांना गुंतवून ठेवणे सूत्रसंचालन करतांना महत्त्वाचे असते. या काळात श्रोत्यांच्या भावनेत वाहत न जाता अलिप्त राहत सातत्याने भानावर असणे गरजेचे असते. केवळ निवेदन वाचणे अथवा भाषण करणे इतकेच याचे स्वरूप नसून कार्यक्रम खुलवण्याचे काम सूत्रसंचालकामार्फत केले जाते. सूत्रसंचालन करताना -

  • कार्यक्रम भरकटतोय का?
  • प्रत्येक टप्पा नियोजितरित्या वेळेवर सादर होतोय का?

हे पाहिले जाते.

  • समोर श्रोते कोण आहेत हे लक्षात घेऊन त्यानुसार निवेदन सादर केले जाते

सूत्रसंचालनात भाषा व शैलीचे महत्त्व

कार्यक्रमानुसार सूत्रसंचालनाची शैली बदलते. गाण्याच्या मैफिलीचे सूत्रसंचालन करतांना भाव प्रकट करणारी शैली वापरली जाते. व्याख्यानाचे आणि वैचारिक भाषणे यात संचालन असेल तर संदर्भासहीत नेमक्या शब्द आणि मांडणी ह्यांनी सूत्रसंचालन केले जाते. समारंभानुसार आवेशयुक्त, उत्साहवर्धक शैलीने सूत्रसंचालन केले जाते.

सूत्रसंचालन करताना समोरचा प्रेक्षकवर्ग कोणता आहे, हे लक्षात घ्यावे आणि मगच बोलायला सुरुवात करावी.

सूत्रसंचालनातील विविध टप्पे

  • श्रवण व निरीक्षण
  • वाचन
  • आवाजाची जोपासना
  • ध्वनिवर्धकाचा वापराचा सराव
  • प्रसिद्धी

सूत्रसंचालन करण्यापूर्वी :

  1. कार्यक्रमाचा वेळ, विषय, स्थळ, तारीख, अतिथी, वक्ते, कलावंत, श्रोतावर्ग इत्यादींबाबत माहिती असावी.
  2. कार्यक्रम पत्रिका समजून घ्यावी.
  3. कार्यक्रमाचे स्थळ अपरिचित असल्यास तेथे प्रत्यक्ष जाऊन ते नजरेखालून घालावे.
  4. अपेक्षित प्रेक्षक यांचा वयोगट, स्थर, अभिरुची, इत्यादी बाबी विचारात घ्याव्या.
  5. निवेदनाची संहिता तयार करावी. त्यामध्ये आवश्यक संदर्भ, सुवचने, अवतरणे, काव्यपंक्ती यांची नोंद करावी, परंतु त्यांचा अतिरेक नसावा.
  6. कार्यक्रमातील संभाव्य अडचणीचा अगोदरच अंदाज घ्यावा .

सूत्रसंचालनांचे प्रकार

निरनिराळ्या कार्यक्रमांसाठी सूत्रसंचालन करताना संहिता लिखाणाची पद्धत वेगळी असते. कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार निवेदन व सादरीकरण बदलते.

शासकीय कार्यक्रमात सूत्रसंचालन

शासकीय समारंभात ‘प्रोटोकॉल’ महत्त्वाचा असतो. अधिकारपदानुसार नामावली तयार करावी. उपस्थितांची नावे सांगताना कुणानंतर कोणाचा क्रम यालाही महत्त्व दिले जावे. यासाठी आधीच रास्त विचार केला जावा. सत्कार असल्यास कुणाच्या हस्ते कुणाचा सत्कार याचे विचार पूर्वनियोजन महत्त्वाचे असते. शासकीय समारंभात क्रमवारी ही महत्त्वाची असते या सूत्रसंचालनात शाब्दिक कोट्या शक्यतो करू नयेत. यातून ध्यानीमनी नसताना कुणाच्या तरी भावना दुखावल्या जाऊ शकतात. त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधींची नावे घेतांना करताना त्यांची पदे आणि कार्य याविषयी सतर्कता बाळगली पाहिजे.

दूरदर्शन वरील सूत्रसंचालन

रेडियो वरील सूत्रसंचालन

हे सुद्धा पहा

मुलाखत

अधिक माहिती

बाह्य दुवे


संदर्भ

Tags:

सूत्रसंचालन स्वरूपसूत्रसंचालन ात भाषा व शैलीचे महत्त्वसूत्रसंचालन ातील विविध टप्पेसूत्रसंचालन ांचे प्रकारसूत्रसंचालन हे सुद्धा पहासूत्रसंचालन अधिक माहितीसूत्रसंचालन बाह्य दुवेसूत्रसंचालन संदर्भसूत्रसंचालन

🔥 Trending searches on Wiki मराठी:

जैन धर्मशुद्धलेखनाचे नियमभारतामधील भाषाकरगजानन दिगंबर माडगूळकरभारतीय तंत्रज्ञान संस्थाकरवंदचंद्रशेखर वेंकट रामनरवी राणासिंधुदुर्गज्योतिर्लिंगहार्दिक पंड्याअल्लाउद्दीन खिलजीमहाबळेश्वरताराबाई शिंदेमाळीउद्धव ठाकरेगौतमीपुत्र सातकर्णीनितीन गडकरीविठ्ठल रामजी शिंदेसाईबाबाअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघएकनाथजलप्रदूषणए.पी.जे. अब्दुल कलामरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघव्यवस्थापनअहिल्याबाई होळकरप्रदूषणमहाराष्ट्रफुटबॉल२०२४ लोकसभा निवडणुकातुतारीभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशमहानुभाव पंथभिवंडी लोकसभा मतदारसंघअध्यक्षपांडुरंग सदाशिव सानेराणी लक्ष्मीबाईरावणराजा राममोहन रॉयमांगखडकवृद्धावस्थाज्ञानपीठ पुरस्कारमहाराष्ट्रामधील जिल्हेस्वादुपिंडगहूमहिलांचा मताधिकारअर्जुन पुरस्कारपृथ्वीच्या अंतरंगाची रचनाकेंद्रीय लोकसेवा आयोगदारिद्र्यअण्णा भाऊ साठेरामदास स्वामी स्थापित अकरा मारुतीतुळजापूरहवामान२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाकोरेगावची लढाईपारिजातककोल्हापूर जिल्हादेवेंद्र फडणवीसदारिद्र्यरेषासमाज माध्यमेभरतनाट्यम्गौतम बुद्धलता मंगेशकरशिवविरामचिन्हेप्राणायाममहाराष्ट्र शासनकार्ल मार्क्सभारतातील सण व उत्सवअकोला लोकसभा मतदारसंघदहशतवादनामदेव ढसाळमहाराष्ट्रातील आरक्षणनर्मदा परिक्रमा🡆 More