भरतनाट्यम्

भरतनाट्यम् ही एक अभिजात दक्षिण भारतीय नृत्यशैली आहे.

भरतनाट्यम्
भरतनाट्यम करतांना एक कलाकार

नाव

भरतनाट्यम् 
नृत्यातील भाव दर्शन

भाव, राग आणि ताल ही भरतनाट्यमची तीन मुख्य अंग असतात. या अंगांच्या आद्याक्षरावरून भरत-नाट्य असे नाव पडले असा एक प्रवाद आहे. दुसऱ्या मतानुसार भरतमुनी जनक असल्याने भरताचे नाट्य म्हणून यास भरतनाट्यम म्हटले जाते . या नृत्यास दासीअट्ट्मसदिर (Sadir) या नावानेही ओळखले जाई.

स्वरूप

या शैलीचा उगम दक्षिण भारतातील मंदिरांमध्ये झाला. ही एकल नृत्यशैली असून भरतमुनींच्या नाट्यशास्त्रावर आधारित आहे. भरतनाट्यमचे सादरीकरण कर्नाटकी संगीताच्या साथीने होते. या नृत्य पद्धतीवर द्रविड संस्कृतीचा प्रभाव आहे. यात मृदंगम,तालम,वीणा,बासरी ,घटम आदि वाद्यांची साथसंगत असते. चेन्नय्या पोन्नय्या शिवानंद आणि वडिवेल या तंजावूर बंधू म्हणून मान्यता पावलेल्या संगीतकारांनी या नृत्याचा मार्गम रचला आणि त्याच क्रमाने आजही नृत्य प्रस्तुती करण्याची पद्धत आहे. सुरुवातीला मंदिरात केली जाणारी ही कला नंतर राजदरबारात आणि रंगमंचावर सादर केली जाऊ लागली. पूर्वी देवपूजेचा भाग म्हणून देवदासी देवळात नृत्य करत. देवालयांना आणि देवदासींना राजाश्रय असे. तंजावूरच्या चोल, नायक आणि मराठी राजांनी या नृत्य कलेला भरपूर प्रोत्साहन दिले.

शिक्षणपद्धती

भरतनाट्यम विद्यार्थी सुरुवातीस घुंगरूंशिवाय नाचणे शिकतात. ज्यावेळी गुरूस वाटते की विद्यार्थ्याची पुरेशी तयारी झालेली आहे तेव्हा गुरू विद्यार्थ्याकडून सलंगाई पूजा करवून घेतात व त्यावेळी घुंगरू प्रदान केले जातात. अधिक खडतर शिक्षणानंतर विद्यार्थ्याने एकट्याने किंवा एकटीने संपूर्ण कार्यक्रम करणे अपेक्षित असते. याला अरंगेत्रम असे नाव आहे. अरंगेत्रम नंतर गुरू आपल्या शिष्यास इतर कार्यक्रमांतून नृत्य करण्यास परवानगी देतात. भरतनाट्यम ही नृत्य शैली परंपरेनुसार केवळ स्त्रीने सादर करण्याची एकल नृत्य शैली आहे पण रंगमंचावर नटवूणार, मृदंग वादक, गायिका, व्हायोलीन आणि बासरी वादक असे साथीदार असतात.

श्रेष्ठ कलाकार

भरतनाट्यम पूर्वी मंदिरातील देवदासींद्वारे केला जाई. या नृत्याचे स्वरूप पुढे पन्ननलूर,वल्डवूर ,तंजावर येथे विकसित झाले आणि ह्या भरातनाट्यमच्या प्रमुख बाणी मानल्या जातात. टी बाल सरस्वती, मोना पिल्ले, रूक्मिणी अरुंदले, मीनाक्षी सुंदरम पिल्लै, चिट्टप्पा पिल्लै, रामय्या पिल्लै, लीला सॅमसन, सुचेता चापेकर आदी भरतनाट्यमच्या श्रेष्ठ कलाकारांपैकी काही नावे आहेत. आज अनेक भरतनाट्यम नर्तकानी त्यांच्या कर्तृत्वाने ह्या कलेला जगभरात सन्मान आणि प्रसिद्धी मिळवून दिलीये. त्यातील काही पुढीलप्रमाणे- एस. कनक,सुधा राणी रघुपध्याय, प्रा. सी.वी. चंद्रशेखर, चित्रा विश्वेश्वरन, अलरमेल वल्ली, डॉ.पद्मा सुब्रमण्यम, पार्श्वनाथ उपाध्याय, मालविका सारुकाई, कमला लक्ष्मण, जयश्री नायर, प्रतिभा प्रल्हाद, अनिता रत्नम, रमा वैद्यनाथ, प्रियदर्शनी गोविंद, इंदिरा कादंबी, मीनाक्षी श्रीनिवासन, इत्यादी.

भरतनाट्यमच्या विविध मुद्रा

संदर्भ

Tags:

भरतनाट्यम् नावभरतनाट्यम् स्वरूपभरतनाट्यम् शिक्षणपद्धतीभरतनाट्यम् श्रेष्ठ कलाकारभरतनाट्यम् भरतनाट्यमच्या विविध मुद्राभरतनाट्यम् संदर्भभरतनाट्यम्

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मलेरियाइराकमोबाईल फोनअहमदनगर लोकसभा मतदारसंघजागतिक पुस्तक दिवसमराठी भाषा दिनसांगली जिल्हाभरती व ओहोटीपोक्सो कायदाजगातील देशांच्या राजधान्यांची यादीहरभरासाम्यवादभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीभाषा विकासदिशानरेंद्र मोदीपुणेप्रीमियर लीगभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेतमाशाडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनरावेर लोकसभा मतदारसंघसंग्रहालयकोल्हापूर लोकसभा मतदारसंघभगतसिंगहनुमानव्यंजनआनंद शिंदेउद्योजकए.पी.जे. अब्दुल कलामसंधी (व्याकरण)भारताचे संविधानचीनराजा राममोहन रॉयसकाळ (वृत्तपत्र)अजिंठा-वेरुळची लेणीइस्लामयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघबाजरीखंडोबाजालना लोकसभा मतदारसंघइंदुरीकर महाराजहिंगोली जिल्हापु.ल. देशपांडेभारतातील शासकीय योजनांची यादीजालियनवाला बाग हत्याकांडशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकवंजारीहस्तमैथुनगर्भाशयसातारातुणतुणे२०१९ लोकसभा निवडणुकाकलाअपारंपरिक ऊर्जास्रोतक्रिप्स मिशनप्राण्यांचे आवाजशाळाफुटबॉलपहिले महायुद्धफुफ्फुसजहाल मतवादी चळवळस्वामी समर्थनंदुरबार लोकसभा मतदारसंघजुने भारतीय चलनभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेपरशुरामदिवाळीबीड विधानसभा मतदारसंघमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनराजकारणवस्तू व सेवा कर (भारत)महाराष्ट्र भूषण पुरस्कारहडप्पाखडकांचे प्रकारमहाराष्ट्र लोकसेवा आयोगहिंदू कोड बिलॲडॉल्फ हिटलररत्‍नागिरी जिल्हा🡆 More