मराठी भाषा दिन

मराठी राजभाषा दिन किंवा मराठी भाषा दिन हा १ मे रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो.

१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, आणि मराठी भाषिकांचे राज्य अस्तित्वात आल्यामुळे हा १ मे रोजी 'मराठी राजभाषा दिन' म्हणून सन १९६५ पासून अधिकृतपणे साजरा केला जातो.

अनेक वेळा सर्व सामान्य माणसा कडून 'मराठी राजभाषा दिवस' आणि 'मराठी भाषा गौरव दिन' याची गफलत केली जाते. मराठी राजभाषा दिवस आणि भाषागौरव‌ दिवस हे दोन्ही दिवस भिन्न स्वरुपाचे आहे.

'महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४' नुसार "महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा मराठी असेल" असे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी घोषित केले. महाराष्ट्र स्थापनेवेळी राज्यकारभार इंग्रजी भाषेतून चालत होते. मराठीला राजभाषेचा दर्जा राज्य स्थापने वेळी नव्हता. तत्कालीन वसंंतराव नाईक सरकारने मराठी राजभाषा अधिनियम पारित करून पुढे मराठी भाषा संवर्धनासाठी भरीव उपक्रम हाती घेतले. राज्यात ठिकठिकाणी मराठी भाषा शिकविण्यासाठी प्रशिक्षण वर्ग उघडण्यात आली. मराठी भाषेचा सर्वांगाने परिचय करून देण्यासाठी “राज्यभाषा परिचय” हे पुस्तक तयार केले गेले. मराठी भाषेचा राज्यातील शासन व्यवहारात वापर करण्याचे धोरण राबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार भाषा संचालनालय स्थापन झाले. १ मे मराठी भाषा दिनाला जागतिक मराठी भाषा दिन असेही म्हणतात.

मराठी भाषा गौरव दिन

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी कवी कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण असल्याने त्यांना अभिवादन म्हणून २१ जानेवारी २०१३ रोजी महाराष्ट्र शासनाने त्यांचा जन्मदिवस "२७ फेब्रुवारी" हा "मराठी भाषा गौरव दिन" म्हणून घोषित केला. मराठी राजभाषा दिन आणि मराठी भाषा गौरव दिन हे दोन्ही दिवस वेगवेगळे असून मराठी भाषेसंदर्भातील महत्त्वाचे आहेत.

हे सुद्धा पहा

संदर्भ

Tags:

महाराष्ट्र

🔥 Trending searches on Wiki मराठी:

यंत्रमानवखिलाफत आंदोलनहोळीयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघप्राथमिक शिक्षणसंगीत नाटकअक्वायर्ड इम्यूनो डेफिशियन्सी सिंड्रोमभारताच्या पंतप्रधानांची यादीबहिणाबाई पाठक (संत)भारतातील शासकीय योजनांची यादीयूट्यूबकौटिलीय अर्थशास्त्रमहाराष्ट्राचा इतिहासत्सुनामीअकोला जिल्हागोदावरी नदीमेंदूविशेषणप्रेरणारविकांत तुपकरसंत जनाबाईविनायक दामोदर सावरकरसांगलीमुळाक्षरसांगली लोकसभा मतदारसंघनितीन गडकरीसविता आंबेडकरवेरूळ लेणीमुख्यमंत्रीविनयभंगवर्तुळअहमदनगर लोकसभा मतदारसंघसदा सर्वदा योग तुझा घडावामहात्मा फुलेजागतिक व्यापार संघटनाआंबेडकर कुटुंबप्रकाश आंबेडकरमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीवसाहतवादह्या गोजिरवाण्या घरातसाताराव्यवस्थापनजेजुरीमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीयेसूबाई भोसलेपूर्व दिशानालंदा विद्यापीठपत्रतत्त्वज्ञानग्रामपंचायतमहासागरम्हणीकेदारनाथ मंदिरदीनबंधू (वृत्तपत्र)पद्मसिंह बाजीराव पाटीलसंभोगनवनीत राणाजिंतूर विधानसभा मतदारसंघज्योतिर्लिंगरशियन राज्यक्रांतीची कारणेशेतीक्रिकेटचे नियमलोकसंख्या घनतासिंधुदुर्गहवामानाचा अंदाजसंगीततुकडोजी महाराजओवारामायणपांडुरंग सदाशिव सानेमृत्युंजय (कादंबरी)शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकनगर परिषदशेतकरीविजयसिंह मोहिते-पाटीलदिनकरराव गोविंदराव पवारभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशआंब्यांच्या जातींची यादी🡆 More