फुटबॉल

फुटबॉल हा जगातील सर्वांत लोकप्रिय खेळ आहे.

फुटबॉलच्या संघात ११ खेळाडू असतात. हा मैदानी खेळ मुख्यतः हिरवळ असलेल्या मैदानात खेळला जातो. मैदानाच्या दोन टोकांना उभारलेल्या गोलजाळ्यात चेंडू पोहोचवणे असे या खेळातील खेळाडूंचे उद्दिष्ट असते. गोलरक्षक वगळता इतर दहा खेळाडूंनी चेंडूला हात लावणे नियमबाह्य ठरते. जो संघ अधिक वेळा गोलजाळ्यात चेंडू टाकेल (गोल करेल) तो संघ विजेता ठरतो.

फुटबॉल
फुटबॉल
फुटबॉल
फुटबॉलमध्ये चाहत्यांचा मूलभूत उद्देश सामना दरम्यान त्यांच्या संघास प्रोत्साहित करणे होय.

इतिहास

१९०४ रोजी पॅरिस येथे फ्रान्स, बेल्जियम, नेदरलॅंड(हाॅलंड), डेन्मार्क, स्पेन, स्वीडन आणि स्वित्झर्लंड या देशांनी फेडरेशन इंटरनॅशनेल डे फुटबॉल असोसिएशन (फिफा) ही संघटना स्थापन केली. इ.स. १८६३ साली फुटबॉल असोसिएशन या इंग्लंडमधील संघटनेने फुटबॉल खेळास नियमबद्ध केले. आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन फिफासंघटना करते. या खेळातील अत्यंत लोकप्रिय स्पर्धा फुटबॉल विश्वचषक ही होय.

खेळाची विशेषता

१९६२ च्या जागतिक चषक स्पर्धेत चिलीइटली यांच्यातील सामन्यात पंच म्हणून काम बघणारे इंग्लिश पंच केन ॲस्टन हे रेड व यलो कार्डाचे जनक आहेत. त्यानंतर १९७० च्या जागतिक स्पर्धेत या कार्ड्‌सची सुरुवात झाली आणि त्यानंतर संपूर्ण जगभरात याला मान्यता मिळाली. केवळ फुटबाॅलच नव्हे तर इतर अनेक खेळांमध्ये या रंगीत कार्डांचा वापर केला जातो. फुटबॉल म्हणजे पायचेंडू. पायाने खेळवला जाणारा, हवा भरलेला मोठा कातडी चेंडू. या सांघिक व मैदानी खेळाचे अनेक प्रकार आहे. त्यांपैकी दोन प्रमुख प्रकार पुढीलप्रमाणे : १ असोसिएशन फुटबॉल अथवा सॉकर आणि २ रग्बी.

सॉकर हा प्रत्येकी अकरा खेळाडू असलेल्या दोन संघांमध्ये खेळला जातो. त्यात चेंडू हाताळणे वा तो हातात घेऊन पळत सुटणे नियमबाह्य मानले जाते. रग्बी वा रग्बी युनियन ह्या प्रकारात मात्र चेडू हाताळणे वा तो हातात घेऊन धावणे ग्राह्य मानतात. त्यातूनच रग्बी लीग हा वेगळा प्रकार १८९५ साली निर्माण झाला. रग्बी युनियन या प्रकारातून निर्माण झालेल्या अमेरिकन फुटबॉलमध्ये खूपच वेगळेपणा दिसून येतो. रग्बीमध्ये चेंडू पुढे पळवता येत नाही; या खेळात तो पुढेही नेता येतो. तसेच हा खेळ अधिक उग्र व आक्रमक असल्याने त्यात आडदांडपणा व धसमुसळेपणा जास्त आढळतो. कॅनडियन फुटबॉल हा अमेरिकन फुटबॉलशी साधर्म्य असलेला पण काही महत्त्वाचे फेरफार असलेला प्रकार आहे. आयर्लंडमध्ये खेळला जाणारा गेलिक फुटबॉल हाही एक आडदांड प्रकार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये खेळला जाणारा ऑस्ट्रेलियन फुटबॉल हा जुन्या गेलिक फुटबॉलचे काही नियम आत्मसात केलेला तथापि वेगळा व वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहे. या सर्व प्रकारांची माहिती नोंदीत पुढे दिली आहे. यांपैकी सॉकर हा खेळ जास्त लोकप्रिय असून तो जगातील बहुतेक देशांतून खेळला जातो. भारतात ब्रिटिशांच्या बरोबर आलेला फुटबॉल म्हणजे सॉकरच होय.

खेळाचे स्वरूप

हा खेळ एका गोल चेंडूने खेळला जातो. यात ११ जणांचे दोन संघ असतात. ९० मिनिटांचा एक सामना असतो. सामान्यतः ४५ मिनिटे खेळानंतर १५ मिनिटांचा ब्रेक व परत ४५ मिनिटे खेळ असतो.

महत्त्वाच्या संघटना

  • फिफा : फेदेरात्सिओन इंटरनात्सिओनाल दे फुटबॉल आसोसिआत्सिओन
  • युएफा : युनिअन युरोपिअन दे फूटबॉल असोसिएशन
  • ए.एफ.सी : असिअन फुटबॉल कॉन्फेडरेशन
  • सी. ए. एफ : कॉन्फेडरेशन आफ्रिकान डे फुटबॉल
  • कोन्काकाफ : द कॉन्फेडरेशन ऑफ नॉर्थ ,सेंट्रल अमेरिका आणि कॅरिबिअन फुटबॉल

मुख्य आंतरराष्ट्रीय स्पर्धा

राष्ट्रांतर्गत/आंतरराष्ट्रीय क्लब स्पर्धा

बाह्य दुवे

फुटबॉल 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

फ्रेंच, स्पॅनिश, जर्मन, पोर्तुगीज व अरबी मजकूर)

खेळाचे वर्तमान नियम] (इंग्लिश मजकूर)


Tags:

फुटबॉल इतिहासफुटबॉल खेळाची विशेषताफुटबॉल खेळाचे स्वरूपफुटबॉल महत्त्वाच्या संघटनाफुटबॉल मुख्य आंतरराष्ट्रीय स्पर्धाफुटबॉल राष्ट्रांतर्गतआंतरराष्ट्रीय क्लब स्पर्धाफुटबॉल बाह्य दुवेफुटबॉल

🔥 Trending searches on Wiki मराठी:

शिवाजी महाराजांची राजमुद्राराष्ट्रवादी काँग्रेस पक्षझाडभगवद्‌गीताप्रल्हाद केशव अत्रेमहाराष्ट्रातील लोककलानामदेवतुतारीमहाराष्ट्र विधान परिषदपोलीस पाटीलमहाराष्ट्र पोलीसबहावादुष्काळगोपाळ कृष्ण गोखलेराजरत्न आंबेडकरआगरीबखरभारताची अर्थव्यवस्थातिवसा विधानसभा मतदारसंघपारनेर विधानसभा मतदारसंघमुक्ताबाईचार आर्यसत्यदीनानाथ मंगेशकरमराठी साहित्यगर्भाशयभारताच्या राष्ट्रपतींची यादीभारतीय पंचवार्षिक योजनाविजयसिंह मोहिते-पाटीलमुरूड-जंजिरामोबाईल फोनसंधी (व्याकरण)आयुर्वेदपथनाट्यजगातील देशांची यादीसह्याद्रीसर्वनामपेशवेपरभणी लोकसभा मतदारसंघव्यवस्थापनभारतीय प्रजासत्ताक दिनआचारसंहिताविल्यम शेक्सपिअरलोकशाहीश्रीगोंदा विधानसभा मतदारसंघनारळमहाराष्ट्रातील खासदारांची यादी२०१९ पुलवामा हल्लासूर्यनमस्कारटोपणनावानुसार मराठी लेखकमहाबळेश्वरउत्पादन (अर्थशास्त्र)ताराबाई शिंदेराजगृहवृषभ रासअमेरिकेची संयुक्त संस्थानेरावेर लोकसभा मतदारसंघसातव्या मुलीची सातवी मुलगीचोखामेळावर्तुळनिबंध२०२४ लोकसभा निवडणुकारामजी सकपाळभारतीय संस्कृतीयकृतसात आसराअजिंक्य रहाणेकोरेगावची लढाईपरभणी जिल्हाजागतिकीकरणमहाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगेपुरंदरचा तहशिवनेरीताराबाईविष्णुजागतिक दिवसअमरावती जिल्हाज्योतिबा मंदिर🡆 More