भारतीय तंत्रज्ञान संस्था

भारतीय तंत्रज्ञान संस्था (इंग्रजी indian Institutes of Technology; संक्षेप: आय.आय.टी.) ह्या भारत देशामधील स्वायत्त शिक्षण संस्था आहेत.

भारत सरकारच्या अखत्यारीत असलेल्या आय.आय.टी. देशातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्था मानल्या जातात. आजच्या घडीला देशात एकूण २३ आय.आय.टी. कार्यरत आहेत.

भारतीय तंत्रज्ञान संस्था is located in भारत
मद्रास
मद्रास
दिल्ली
दिल्ली
गुवाहाटी
गुवाहाटी
कानपूर
कानपूर
खरगपूर
खरगपूर
मुंबई
मुंबई
रूडकी
रूडकी
वाराणसी
वाराणसी
भुवनेश्वर
भुवनेश्वर
गांधीनगर
गांधीनगर
हैदराबाद
हैदराबाद
इंदूर
इंदूर
जोधपूर
जोधपूर
मंडी
मंडी
पाटणा
पाटणा
रोपड
रोपड
पालक्काड
पालक्काड
पणजी
पणजी
भिलाई
भिलाई
तिरुपती
तिरुपती
जम्मू
जम्मू
धारवाड
धारवाड
धनबाद
धनबाद
आय.आय.टी. असलेली २३ शहरे.

आय.आय.टी.च्या पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी १२वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना जॉइंट एंट्रन्स एक्झॅमिनेशन ही परीक्षा द्यावी लागते. पदव्युत्तर कार्यक्रमात प्रवेश मिळवण्यासाठी उत्सुक विद्द्यार्थ्यांना ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनियरिंग (गेट) ही परीक्षा द्यावी लागते.

भारतात पहिल्यांदा १९५१ साली पश्चिम बंगालमध्ये खडगपूर येथे भारतीय तंत्रज्ञान संस्थेची स्थापना करण्यात आली. त्यानंतर मुंबई (१९५८), चेन्नई, कानपूर (१९५९), दिल्ली (१९६३) येथे आणि १९९४ साली गुवाहाटी येथेही आयआयटी उघडण्यात आली. २००१ मध्ये रूडकी विद्यापीठाला आयआयटीचा दर्जा देण्यात आला. २००८-०९ दरम्यान गांधीनगर, जोधपूर, हैदराबाद, इंदोर, पाटणा, भुवनेश्वर, रोपड आणि मंडी याठिकाणी आठ नवीन आयआयटी उघडण्यात आल्या. तेव्हाच बनारस हिंदू विद्यापीठाच्या तंत्रज्ञान संस्थेला भारतीय तंत्रज्ञान संस्थेचा दर्जा देण्यात आला. २०१५-१६ मध्ये तिरुपती, पालक्काड, भिलाई, गोवा, जम्मू आणि धारवाड येथे सहा नवीन आयआयटींची स्थापना करण्यात आली, तसेच आयएसएम धनबादलाही हा दर्जा देण्यात आला.

इतिहास

भारतीय तंत्रज्ञान संस्था 
हिजली प्रतिबंध शिबिराची कार्यालयच भातंसं खडगपूरची पहीली शैक्षणिक इमारत झाली

१९४६ साली व्हाइसरॉयच्या कार्यकारी परिषेदेचे सदस्य सर जोगिंदर सिंग यांनी एक समिती नेमली. युद्धानंतरच्या काळात औद्योगिक विकासासाठी "उच्च तांत्रिक संस्था" स्थापन करण्याचा विचार हे त्या समितीचे काम होते. नलीनी रंजन सरकार यांच्या अध्यक्षतेखाली त्या २२ सदस्य असलेल्या समितीने अशा प्रकारच्या संस्था भारताच्या वेगवेगळ्या भागात स्थापन कराव्यात अशी शिफारस केली.

पहीली भारतीय तंत्रज्ञान संस्था ही खडगपूरमधल्या हिजली प्रतिबंध शिबिराच्या जागेवर मे १९५० मध्ये उघडण्यात आली. १९५१ मध्ये याठिकाणी पहील्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेची स्थापना झाली. १५ सप्टेंबर १९५६ रोजी भारतीय संसदेने भारतीय तंत्रज्ञान संस्था (खडगपूर) कायद्यानुसार तिला राष्ट्रीय महत्त्वाची संस्था म्हणून जाहीर केलं. १९५६ साली आयआयटी खडगपूरच्या पहिल्या पदवीदान समारंभात भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आपल्या भाषणात म्हणाले:

हिजली प्रतिबंध शिबिराच्या ठिकाणी आज उभे असलेले हे स्मारक (ही संस्था) भारताच्या आकांक्षा आणि भारताच्या भविष्याचे प्रतिनिधित्व करत आहे. हे चित्र मला पुढील काळात भारतात होणाऱ्या बदलांचं प्रतीक वाटते.

सरकार समितीच्या शिफारशीनुसार मुंबई, चेन्नई, कानपूर आणि दिल्ली येथे चार नवीन आयआयटी उघडण्यात आल्या. नवीन आयआयटीच्या स्थापनेसाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था कायद्यात सुधारणा करण्यात आल्या. आसाम राज्यात झालेल्या विद्यार्थी चळवळीमुळे राजीव गांधी यांनी आसाममध्ये गुवाहाटी येथे नवीन आयआयटीची घोषणा केली. भारताचे सर्वात जुने अभियांत्रिकी महाविद्यालय असलेल्या रूडकी विद्यापीठाला २००१ साली आयआयटीचा दर्जा देण्यात आला.

भारतीय तंत्रज्ञान संस्था 
IITG इमारत

भारतीय तंत्रज्ञान संस्थांची यादी

भारतीय तंत्रज्ञान संस्था स्थापनेच्या तारखेनुसार
क्र. नाव संक्षिप्त नाव स्थापना भातंसं म्हणून दर्जा राज्य/कें.प्र.
भारतीय तंत्रज्ञान संस्था खडगपूर IITKGP १९५१ १९५१ पश्चिम बंगाल
भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई IITB १९५८ १९५८ महाराष्ट्र
भारतीय तंत्रज्ञान संस्था कानपूर IITK १९५९ १९५९ उत्तर प्रदेश
भारतीय तंत्रज्ञान संस्था चेन्नई IITM १९५९ १९५९ तमिळनाडू
भारतीय तंत्रज्ञान संस्था दिल्ली IITD १९६१ १९६३ दिल्ली
भारतीय तंत्रज्ञान संस्था गुवाहाटी IITG १९९४ १९९४ आसाम
भारतीय तंत्रज्ञान संस्था रुडकी IITR १८४७ २००१ उत्तराखंड
भारतीय तंत्रज्ञान संस्था रोपड IITRPR २००८ २००८ पंजाब
भारतीय तंत्रज्ञान संस्था भुवनेश्वर IITBBS २००८ २००८ ओडीशा
१० भारतीय तंत्रज्ञान संस्था गांधीनगर IITGN २००८ २००८ गुजरात
११ भारतीय तंत्रज्ञान संस्था हैदराबाद IITH २००८ २००८ तेलंगणा
१२ भारतीय तंत्रज्ञान संस्था जोधपूर IITJ २००८ २००८ राजस्थान
१३ भारतीय तंत्रज्ञान संस्था पाटणा IITP २००८ २००८ बिहार
१४ भारतीय तंत्रज्ञान संस्था इंदोर IITI २००९ २००९ मध्य प्रदेश
१५ भारतीय तंत्रज्ञान संस्था मंडी IITMandi २००९ २००९ हिमाचल प्रदेश
१६ भारतीय तंत्रज्ञान संस्था (बीएचयू) वाराणसी IIT(BHU) १९१९ २०१२ उत्तर प्रदेश
१७ भारतीय तंत्रज्ञान संस्था पालक्कड IITPKD २०१५ २०१५ केरळ
१८ भारतीय तंत्रज्ञान संस्था तिरुपती IITTP २०१५ २०१५ आंध्र प्रदेश
१९ भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयएसएम) धनबाद IIT(ISM) १९२६ २०१६ झारखंड
२० भारतीय तंत्रज्ञान संस्था भिलाई IITBh २०१६ २०१६ छत्तीसगड
२१ भारतीय तंत्रज्ञान संस्था गोवा IITGoa २०१६ २०१६ गोवा
२२ भारतीय तंत्रज्ञान संस्था जम्मू IITJM २०१६ २०१६ जम्मू आणि काश्मीर
२३ भारतीय तंत्रज्ञान संस्था धारवाड IITDH २०१६ २०१६ कर्नाटक

बाह्य दुवे

Tags:

इंग्लिश भाषाभारतभारत सरकार

🔥 Trending searches on Wiki मराठी:

ऐश्वर्या नारकरअर्थमंत्रीशिखर शिंगणापूरभारताची जनगणना २०११भौगोलिक माहिती प्रणालीसुरतेची पहिली लूटकरण (ज्योतिषशास्त्र)स्त्रीवादचंद्रयान ३कोविड-१९ लसझाकिर हुसेनआर्थिक विकासमाहितीसोयाबीनकेंद्रीय वक्फ परिषदप्रणिती शिंदेजवससर्वनामराजाराम भोसलेकथासाईबाबाकोल्हापूर लोकसभा मतदारसंघतिरुपती बालाजीजहाल मतवादी चळवळसमर्थ रामदास स्वामीमिया खलिफाराज ठाकरेपु.ल. देशपांडेराणी लक्ष्मीबाईफणसबीजप्रक्रियाखेड्याकडे चलामहाराष्ट्र नवनिर्माण सेनाभारतीय आडनावेदुसरे बाजीराव पेशवेरस (सौंदर्यशास्त्र)हिंदू धर्मातील अंतिम विधीकामजीवन२००३ क्रिकेट विश्वचषक संघबिबट्यामहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीवृत्तपत्रनैराश्यथोरले बाजीराव पेशवेजवाहरलाल नेहरूसामाजिक समूहकुळीथविठ्ठलभारतातील घोटाळ्यांची यादीभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीलोकमतनांदेड लोकसभा मतदारसंघकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघग्राहकअतिसारगुरू ग्रहभारताचा स्वातंत्र्यलढाराणाजगजितसिंह पाटीलशेतीफिरोज गांधीमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९धर्मो रक्षति रक्षितःरावणपारनेर विधानसभा मतदारसंघकल्याण (शहर)सहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेमहाविकास आघाडीमुंबई उच्च न्यायालय२०१९ लोकसभा निवडणुकासदा सर्वदा योग तुझा घडावासंत तुकाराममुंजअकोला लोकसभा मतदारसंघईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघधैर्यशील मानेगौतम बुद्धलहुजी राघोजी साळवेमराठवाडाछावा (कादंबरी)🡆 More