चंद्रयान ३

चंद्रयान-३ ही भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (ISRO) तिसरी चंद्र शोध मोहीम आहे.

यात चांद्रयान-२ प्रमाणेच लँडर आणि रोव्हर आहे, परंतु ऑर्बिटर नाही. ह्याचे प्रोपल्शन मॉड्यूल हे कम्युनिकेशन रिले उपग्रहासारखे वागेल. अंतराळयान हे १०० किमी चंद्राच्या कक्षेत येईपर्यंत प्रोपल्शन मॉड्यूल हे लँडर आणि रोव्हर घेऊन गेले.

चंद्रयान ३
चंद्रयान ३ चे इंटिग्रेशन मोड्यल
साधारण माहिती
संस्थाभारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)
मुख्य कंत्राटदार भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)
सोडण्याची तारीख २३ ऑगस्ट २०२३
कुठुन सोडली सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा
सोडण्याचे वाहन LVM3 M4
प्रकल्प कालावधी विक्रम लँडर : ≤ १४ दिवस (नियोजित)
प्रज्ञान लँडर: ≤ १४ दिवस (नियोजित)
वस्तुमान३९०० किलो
ठिकाणसतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा
चंद्रयान ३
चंद्रयान ३ (लोगो)

२२ जुलै २०१९ रोजी प्रक्षेपित केलेली चंद्रयान-२ मोहीम ६ सप्टेंबरच्या पहाटे चंद्रावर लँडर आणि रोव्हर क्रॅश झाल्यानंतर अंशतः अयशस्वी झाली होती. मात्र त्यानंतर इस्रोने नियोजित चंद्रयान-३ मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चे प्रक्षेपण १४ जुलै २०२३ रोजी दुपारी २:३५ वाजता झाले. पहिल्या टप्प्याचा भाग म्हणून १०० किमी गोलाकार ध्रुवीय कक्षाचे इंजेक्शन यशस्वीरित्या पूर्ण झाले.

लँडर आणि रोव्हर २३ ऑगस्ट २०२३ रोजी संध्याकाळी ६:०४ वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशाजवळ उतरले. या मोहिमेमुळे भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ अंतराळ यान यशस्वीपणे उतरवणारा पहिला देश आणि चंद्रावर सॉफ्ट लॅंडिंग करणारा चौथा देश बनला.

उद्दिष्टे

इस्रोने चंद्रयान-३ मोहिमेसाठी तीन मुख्य उद्दिष्टे निश्चित केली आहेत, ज्यात पुढील गोष्टींचा समावेश आहे:

  • चंद्राच्या पृष्ठभागावर लँडर सुरक्षितपणे उतरवणे.
  • चंद्रावर रोव्हरच्या फिरण्याच्या क्षमतेचे निरीक्षण आणि प्रात्यक्षिक.
  • चंद्राची रचना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि सराव करण्यासाठी चंद्राच्या पृष्ठभागावर उपलब्ध असलेल्या रासायनिक आणि नैसर्गिक घटक, माती, पाणी इत्यादींवर वैज्ञानिक प्रयोग करणारे इन-साइट वैज्ञानिक निरीक्षण. इंटरप्लॅनेटरी म्हणजे दोन ग्रहांमधील मोहिमांसाठी आवश्यक असलेल्या नवीन तंत्रज्ञानाचा विकास आणि प्रात्यक्षिक.
चंद्रयान-३ चे ॲनिमेशन
पृथ्वीभोवती
चंद्राभोवती
       चंद्रयान-३ ·        पृथ्वी ·        चंद्र

पार्श्वभूमी

चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचे प्रात्यक्षिक करण्यासाठी चंद्रयान कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात, इस्रोने चांद्रयान-२ लाँच व्हेईकल मार्क-3 (LVM 3) प्रक्षेपित केले. या वाहनात ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर होते. प्रज्ञान रोव्हर तैनात करण्यासाठी लँडर सप्टेंबर २०१९ मध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार होते.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या मोहिमेसाठी जपानसोबत भागीदारी करण्याबाबत अहवाल समोर आले होते. या अहवालांनुसार भारत लँडर प्रदान करणार होता तर जपान लाँचर आणि रोव्हर असे दोन्ही प्रदान करणार होता.

नंतर विक्रम लँडरच्या अपयशामुळे २०२५ मधील जपानच्या भागीदारीत प्रस्तावित केलेल्या "चंद्र ध्रुवीय शोध मोहिमे"साठी आवश्यक लँडिंग क्षमता प्रदर्शित करण्यासाठी दुसऱ्या मोहिमेचा पाठपुरावा करण्यात आला. मिशन क्रिटिकल फ्लाइट ऑपरेशन्स दरम्यान, युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) द्वारे संचालित युरोपियन स्पेस ट्रॅकिंग (ESTRACK ) करारानुसार या मोहिमेला समर्थन देईल.

प्रक्षेपण

चंद्रयान ३ 
LVM3 M4, Chandrayaan-3 - Launch vehicle lifting off from the Second Launch Pad (SLP) of SDSC-SHAR, Sriharikota

चांद्रयान-३ चे प्रक्षेपण १४ जुलै २०२३ रोजी, भारतीय वेळेनुसार दुपारी २:३५ वाजता श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून करण्यात आले. जवळपास ३,९०० किलोचे प्रक्षेपण पार पडले. चंद्रावर पोहोचण्यासाठी लागणाऱ्या मार्गात हे यान प्रभावीपणे ठेवण्यात आले आहे. पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील अंतर अंदाजे ३,८४,४०० किलोमीटर आहे. चांद्रयान-३ मिशन २३ किंवा २४ ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशावर सॉफ्ट लँडिंग करेल असे अपेक्षित होते. जर काही तांत्रिक अडचण आली तर ही लँडिंग २७ ऑगस्ट रोजी परत पाडली जाऊ शकते असे तांत्रिक नियोजन यात ठरले होते. तथापि भारतीय शास्त्रज्ञांच्या अचूक प्रक्रियेमुळे चंद्रयान-३ हे २३ ऑगस्ट २०२३ रोजी संध्याकाळी ६:०४ मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरले.

इस्रोने पृथ्वी आणि चंद्राच्या जवळ येण्याबाबत केलेल्या गणनेमुळे चंद्रयान-३ च्या प्रक्षेपणासाठी जुलै महिन्याची निवड करणे ही एक विशेष हालचाल होती. चांद्रयान-२ आणि चांद्रयान-३, हे दोन्ही जुलै महिन्यात झाले. या कालावधीत चंद्र आणि पृथ्वी एकमेकांच्या जवळ येतात म्हणून इस्रोने हा महिना विशेषतः निवडला आहे. पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील कमी अंतरामुळे इस्रोला त्याचे ध्येय कमी प्रयत्नांमध्ये पूर्ण करण्यात मदत होते. वेळेची बचत करण्याव्यतिरिक्त, हा विशिष्ट महिना देशाच्या अंतराळ केंद्राला चंद्राच्या पृष्ठभागावर लँडर आणि रोव्हर ढकलण्यासाठी आवश्यक असलेल्या इंधनाची बचत करण्यास देखील मदत करतो.

खर्च

डिसेंबर २०१९ मध्ये, इस्रोने या प्रकल्पासाठी चंद्रयान ३ ७५ कोटी (US$१६.६५ दशलक्ष) इतक्या प्रारंभिक निधीची विनंती करण्यात आली होती. त्यापैकी ₹६० कोटीची तरतूद यंत्रसामग्री, उपकरणे आणि इतर भांडवली खर्चाच्या पूर्ततेसाठी होती, तर उर्वरित ₹१५ कोटी हे महसुली खर्च ह्या शीर्षकाखाली होते.

चंद्रयान-३ प्रकल्पाची किंमत सुमारे ₹६१५ कोटी पर्यंत आहे. याउलट यानाच्या यशस्वी लँडिंग नंतर शेअर बाजारात तेजी आली असून अवघ्या चारच दिवसात या मोहिमेच्या संबंधित १३ कंपन्यांच्या शेअरमध्ये देखील वाढ झाली असून या कंपन्यांचे मूल्यांकन हे ३०,७०० कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. याचसोबत सौदी अरेबिया, सिंगापूर आणि दक्षिण कोरियासह बऱ्याच देशांनी अंतराळ क्षेत्रातील भागीदारीसाठी भारताशी संपर्क साधला आहे.

संदर्भ

Tags:

चंद्रयान ३ उद्दिष्टेचंद्रयान ३ पार्श्वभूमीचंद्रयान ३ प्रक्षेपणचंद्रयान ३ खर्चचंद्रयान ३ संदर्भचंद्रयान ३अंतराळयानचंद्रचंद्रयान २भारतीय अंतराळ संशोधन संस्था

🔥 Trending searches on Wiki मराठी:

शिवनेरीनागरी सेवाभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीदीपक सखाराम कुलकर्णीदारिद्र्यरेषासाम्राज्यवादपोक्सो कायदामहादेव गोविंद रानडेभारतीय पंचवार्षिक योजनाएकविरामहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीअजिंठा लेणीमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनमहाराष्ट्र भूषण पुरस्कारजॉन स्टुअर्ट मिलत्र्यंबकेश्वरशिवछत्रपती पुरस्कारजागतिक दिवसशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीउत्तर दिशासांगली जिल्हापत्रऔरंगजेबमतदानजिंतूर विधानसभा मतदारसंघगुकेश डीकल्की अवतारनर्मदा परिक्रमाशेतीमहिलांसाठीचे कायदेनाणेतुणतुणेनरसोबाची वाडीमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागभारत सरकार कायदा १९३५जळगाव लोकसभा मतदारसंघए.पी.जे. अब्दुल कलामजास्वंदपद्मसिंह बाजीराव पाटीलमहिलांचा मताधिकारइतिहासाच्या अभ्यासाची साधनेजालना लोकसभा मतदारसंघभारतीय स्थापत्यकलायेसूबाई भोसलेएकनाथसोळा संस्कारचलनघटवि.वा. शिरवाडकरपंढरपूरशेतकरीपुन्हा कर्तव्य आहेबैलगाडा शर्यतराखीव मतदारसंघभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेमुंबईहिंगोली लोकसभा मतदारसंघभारताचे संविधानकलाभरती व ओहोटीओशोबहिष्कृत भारतचैत्र पौर्णिमाब्राझीलभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हखंडझाडजहाल मतवादी चळवळमहारमहाविकास आघाडीभारताची अर्थव्यवस्थाअभिनयनितंबसह्याद्रीनिबंधसाखरपश्चिम दिशा🡆 More