महार: ाष्ट्रीय समाज

आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल.


महार हा एक भारतीय जातसमूह असून तो प्रामुख्याने महाराष्ट्रात तसेच लगतच्या राज्यांमध्ये राहतो. हा अनुसूचित जातीचा समाज आहे. महारांची महाराष्ट्र राज्यातील लोकसंख्या १ कोटीपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्राच्या लोकसंख्येत ९ ते १०% महार आहेत. महाराष्ट्रानंतर मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, पश्चिम बंगाल, गुजरात, ओरिसा, तेलंगणा तामिळनाडू या राज्यांत महार समाजाची मोठी संख्या आहे. भारतातील एकूण सुमारे ३० राज्यांत हा समाज आढळतो, यापैकी १६ राज्यांत महार समुदायाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट केले आहे. भारताव्यतिरिक्त पाकिस्तान आणि बांगलादेशातही महार हे कमी संख्येने आहेत. आज ८०% महारांनी बौद्ध धर्म स्वीकारला आहे तर २०% महार हे हिंदू धर्म मानतो.[ संदर्भ हवा ]

महार
महार: इतिहास, उपजाती, धर्म
एक महार महिला
एकूण लोकसंख्या

१ ते १.२० कोटी
प्रमाण
भारतातील लोकसंख्येत सु. १%
महाराष्ट्रातील लोकसंख्येत ९ ते १०%

लोकसंख्येचे प्रदेश
प्रमुख
महाराष्ट्र

इतर लक्षणीय लोकसंख्या
मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, पश्चिम बंगाल, गुजरात, ओडिसा, तेलंगाणा
इतरः-
पाकिस्तान व बांगलादेश

भाषा
मुख्यः- मराठीवऱ्हाडी
धर्म
बौद्ध धर्म
संबंधित वांशिक लोकसमूह
मराठी लोक मराठी बौद्ध

मुख्यतः बहुतांश समाज महाराष्ट्रात रहात असल्याने त्यांची मुख्य मातृभाषा मराठी आहे, पण उच्च शिक्षणामुळे अनेक लोक महाराष्ट्रा व देशाबाहेर गेले आहेत. मराठा-कुणबी (सुमारे ३०%) समाजानंतर महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या महार समाजाची आहे.[ संदर्भ हवा ]

इतिहास

महार हा गावाचा हरकाम्या होता. तो ओरडून दवंडी देई, प्रेताचे सरण वाही.

जागल्या म्हणजे पहारेकरी (वॉचमन )हा बहुधा महार जातीचा असे. गावराखण करणाऱ्या महाराला चारही सीमा बारकाईने माहीत म्हणून जमीन जुमला, घरदार या स्थावरांच्या वादांत त्याची साक्ष महत्त्वाची असायची. वेसकर या महाराकडे वेशीचे दरवाजे रात्री बंद करून सकाळी उघडायचे हे काम असे.

महार या जातीचे लोक महाराष्ट्रात मोठ्या संख्येने आढळतात. १९११ साली या जातीच्या लोकांची संख्या सुमारे ३३ लाख होती. राजारामशास्त्री भागवतांनी हे महार म्हणजे प्राचीन नाग होत असे मत दिले आहे. डॉ. भांडारकरांच्या मते मेलेल्या जनावरांना वाहून नेणारे (मृत + हार) ते महार होतात. महा + अरि म्हणजे मोठे शत्रू ते महार अशी काही विद्वानांनी उपपत्ती लावली आहे.

महारांची वस्ती मध्यप्रांतातच प्रामुख्येकरून आढळते. पूर्वी त्यांचे विशिष्ट देव म्हणजे विठोबा, म्हसोबा, खंडोबा, ज्ञानोबा, चोखोबा, भवानी, मरीआई, सटवाई इत्यादी होते. वऱ्हाडप्रांतामध्ये ग्रॅबिएल, अझ्रेल, मायकेल, अनांदीन या नावाच्या देवतांची महार लोक पूजा करीत असे रसेल व हिरालाल सांगतात. त्यावेळी त्यांचे धार्मिक संस्कार हिंदूंसारखेच होते. ग्रामपंचायतीत बारा बलुतेदारांपैकी महार एक होते. त्यांच्याकडे खेडेगांवचं वॉचमन बनून कामे करणे व जासुसी इत्यादी कामे असत.

उपजाती

महार जातीत १२ उपजाती होत्या. महारांच्या सोमवंशी , लाडवन, बावणे व मिराशी या मुख्य उपजाती आहेत, तर आंदवण, अक्करमाशी, बारमाशी या इतर उपजाती आहेत. त्याचप्रमाणे महारांत रायरंद, डोंब अशा पोटजातीही आहेत. एका आडनावाचे लोक एका कुळीचे समजले जात असल्याने, महारांत एका आडनावात लग्नविधी होत नाहीत. पूर्वी या उपजातींदरम्यान रोटी-बेटी क्वचितच होत असत. मात्र इ.स. १९५६ मध्ये हिंदू धर्म त्यागून हा सर्व समाज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली बौद्ध धर्मीय बनला. बौद्ध व्यक्तींमध्ये कुणीही श्रेष्ठ-कनिष्ठ नसतो या शिकवणुकीतून या समाजात रोटी-बेटी व्यवहार मोठ्या प्रमाणावर सुरू झालेत आणि उपजातींचा हा भेद समाप्त झाला आहे.

धर्म

२००१ च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रीय महार हे ५६.२% बौद्ध, ४३.७% हिंदू आणि ०.१% शीख होते.

१९५१ मध्ये म्हणजेच डॉ. आंबेडकरांच्या धर्मांतरापूर्वी महाराष्ट्रातील अनुसूचित जातीत महारांचे प्रमाण ७०% होते. धर्मांतरांनंतर महारांनी बौद्ध धर्म स्वीकारला व आज सुमारे ९८% महार हे बौद्ध धर्मीय आहेत. मात्र काही महार हे 'महार' ही 'हिंदू ओळख' नाकारत बौद्ध झाले तर काही महार लोक जातीने 'महार' व धर्माने बौद्ध ही ओळख सांगत बौद्ध बनले. २०११ मध्ये महाराष्ट्रातील अनुसूचित जातींमधील महारांचे प्रमाण ६०% होते, व महारांपैकी ६२% महारांनी आपला धर्म बौद्ध नोंदविला होता.

सुरुवातीला हिंदू धर्मातील अस्पृश्य वर्गात गणला जाणारा हा समाज १४ ऑक्टोबर १९५६ नंतर बौद्ध धर्मीय झाला. त्यानंतर ह्या समाजातील बहुतेक लोक बौद्ध धर्माच्या प्रभावाखाली आले तर अनेकांनी अधिकृतपणे बौद्ध धर्म स्वीकारला.

लोकसंख्या

२०१७ पर्यंत, महार समुदायाला १६ भारतीय राज्यांमध्ये 'अनुसूचित जाती' म्हणून घोषित केले गेले होते : आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, छत्तीसगढ, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव, गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मेघालय, मिझोरम, राजस्थान, तेलंगणा आणि पश्चिम बंगाल.

राज्यानुसार भारतातील महार लोकसंख्या, २००१
राज्य लोकसंख्या टीप
आंध्र प्रदेश २८,३१७
अरुणाचल प्रदेश ६४
आसाम १,७२५
छत्तीसगढ २,१२,०९९ ८.७७% राज्यातील अनु. जातीची लोकसंख्या
दादरा आणि नगर हवेली २७१ ६.६०% राज्याची अनु. जातीची लोकसंख्या
दमण आणि दीव
गोवा १३,५७० ५७% राज्याची अनु. जातीची लोकसंख्या
गुजरात २६,६४३
कर्नाटक ६४,५७८
मध्य प्रदेश ६,७३,६५६
महाराष्ट्र ५६,७८,९१२ ५७.५% राज्यातील अनुसूचित जातीपैकी लोकसंख्या
मेघालय ५३
मिझोरम
राजस्थान ७,२४१
पश्चिम बंगाल २८,४१९

याशिवाय इतर राज्यातील महारांची लोकसंख्या (२०११): (तेलंगाणा वगळता इतर राज्यात महरांचा समावेश अनु. जातीत केलेला नाही.)

हे सुद्धा पहा

महार या विषयावरील पुस्तके

  • खानदेशातील महार संस्कृती (रा.शे. साळुंके)
  • भारतीय जातिसंस्थेत मातंगाचे स्थान आणि महार-मांग संबंध (प्रा. बी.सी. सोमवंशी)
  • महार कोण होते? उद्गम : संक्रमण : झेप (संजय सोनवणी)

संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे


Tags:

महार इतिहासमहार उपजातीमहार धर्ममहार लोकसंख्यामहार हे सुद्धा पहामहार या विषयावरील पुस्तकेमहार संदर्भ आणि नोंदीमहार बाह्य दुवेमहारs:इतिहासाच्या अभ्यासाची साधने

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सायबर गुन्हासेवालाल महाराजवर्णमालालोकसभा सदस्यलक्ष्मणटोपणनावानुसार मराठी लेखकअकलूजगजानन दिगंबर माडगूळकरअजिंठा लेणीव्यंजनमोबाईल फोननवनीत राणाभारतरत्‍नभारतातील धबधब्यांची यादीभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागप्राकृतिक भूगोलरवींद्रनाथ टागोरभारतातील जिल्ह्यांची यादीराशीएप्रिल ४विरामचिन्हेजायकवाडी धरणचीननाटकाचे घटकचिमणीविनायक दामोदर सावरकरकुषाण साम्राज्यपुणे लोकसभा मतदारसंघबायो डीझेलभारतातील राजकीय पक्षभारतातील राष्ट्रीय उद्यानांची यादीउन्हाळारामआंबेडकर कुटुंबक्षय रोगलॉरेन्स बिश्नोईब्राझीलची राज्येकृष्णराहुल गांधीपंचशीलऋतुराज गायकवाडविमाक्लिओपात्रामराठी भाषेमधील वृत्तपत्रेसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेपु.ल. देशपांडेसामाजिक समूहअध्यक्षमहाभियोगजास्वंदगूगलभारताची अर्थव्यवस्थामहाबळेश्वरपैठणहॉकीरशियापानिपतची तिसरी लढाईसमुद्रगुप्तकोलकाता नाइट रायडर्स २०२२ संघमहाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेखासदारसोनारस्वस्तिकराज ठाकरेमूळ संख्याआनंद शिंदेतबलामहारगोवरमहानुभाव पंथगाडगे महाराजसमासकृषी विपणनरणजित नाईक-निंबाळकरहडप्पा संस्कृतीबाबासाहेब आंबेडकरबेकारीसोलापूर लोकसभा मतदारसंघ🡆 More