वृत्तपत्र

घडलेली घटना व इतर मजकूर वाचकांपर्यंत पोचवणारे (बहुधा) छापील प्रकाशन.

वृत्तपत्र

वृत्तपत्र

वृत्तपत्र या लेखात मुख्य शब्द वृत्त असा असला तरी केवळ वृत्त देणे एवढाच वृत्तपत्राचा आवाका नाही. वृत्तपत्रे ही वाचकांच्या जीवनाशी,विचारांशी,ध्येयवादाशी त्यांच्या सामान्य गरजा,त्यांचे प्रश्न त्यांवरील अन्याय,त्यांचे अभिमान,त्यांचे आनंद आणि दुःख ही अशा वेगवेगळ्या प्रसंगाशी समरस झालेली असते. इ.स. १८३२ मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी काढलेले दर्पण हे मराठी पत्रकारितेची गंगोत्री समजली जाते. वृत्तपत्रे ही अनेक पानांमध्ये प्रकाशित होत असतात. काही वृत्तपत्रे ही दररोज प्रकशित असतात, त्यांना दैनिके म्हणतात. काही वृत्तपत्रे ही आठवड्याला प्रकाशित होत असतात, त्यांना साप्ताहिक असे म्हणतात. काही वृत्तपत्रे ही पंधरा दिवसांनी प्रकाशित होत असतात त्यांना पाक्षिक असे म्हणतात. तर काही वृत्तपत्रे ही दर महिन्याला प्रकाशित होत असतात, त्यांना मासिक असे म्हणतात. काही वृत्तपत्रे दर तीन महिन्याला प्रकाशित होतात त्यांना त्रिमासिक असे म्हणतात. तर काही वृत्तपत्र ही दर सहा महिन्याला प्रकाशित होत असतात, त्याला सहामाही असे म्हणतात. तर दर वर्षी प्रकाशित होत असलेल्या वृत्तपत्राला वार्षिक असे म्हणतात. वृत्तपत्रांमधून आपल्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी,राजकारण,साहित्य,कला,क्रीडा,आणि सांस्कृतिक घडामोडी समजतात.वृत्तपत्रांद्वारे आपल्याला जगात कुठे काय घडले ते समजते.

वृत्तपत्रीय लेखन

वर्तमानपत्राचे घटक व महत्त्व

मुद्रित माध्यमांमध्ये वृतपत्रे हे सर्वात प्रभावी मध्यम आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी वर्तमानपत्राची परंपरा अत्यंत प्रभावी व प्रेरक अशी आहे. स्वातंत्र्यापूर्वी दर्पण, प्रभाकर, इंदुप्रकश, केसरी, मराठा, ज्ञानप्रकाश, बहिष्कृत भारत अशी कितीतरी वर्तमानपत्रे निघाली. स्वातंत्र्यापूर्वी व त्यानंतर अनेक वृत्तपत्रे निघाली जसे की सकाळ, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, काळ, लोकमत, , ई.

मुख्य अंग

अग्रलेख

अग्रलेख हे लेख संपादक लिहितात. वृत्तपत्राचे संपादक हे आपल्या रोजच्या प्रकाशनातून एक माहिती पूर्ण असलेला अग्रलेख रोज प्रकाशित करत असतात.संपादक हा दूरदृष्टीचा असतो त्याला विविध भाषांचे ज्ञान अवगत असतात. त्याचा जण संपर्क हा खूप मोठा असतो. अग्रलेखातून प्रकाशित होणारी माहिती विविध पैलूंवर भर टाकणारा किंवा एख्याद्या विषयाची परीपूर्ण माहिती देणारा असतो. उदा- GST वरील लेख, नोट बंदी काळातील आलेले लेख.... अग्रलेख हे एक जबरदस्त हत्यार म्हणून लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य लढ्यासाठी वापरले.

स्तंभ लेखन

हवामान

भारतीय शेती ही निसर्गावरील जुगार म्हणून ओळखले जाते. हवामानाचा अंदाज म्हणूनच शेतीसाठी आवश्यक मानला जातो.

वाचकांचे पत्रव्यवहार

वाचकांचा पत्रव्यवहार'हे सदर २०व्या शतकापासून आजही दैनिके, मासिके, साप्ताहिके, नियतकालिके इत्यांदीमध्ये आपले अस्तित्व टिकवून आहे. वूत्तपत्रसृष्टीच्या प्रारंभापासूनच पत्रव्यवहाराचे सामाजिकदृष्टीने असणारे महत्त्व ओळखून संपादकांनी पत्रव्यवहारास खास जागा दिली. वाचकांना आपली मते, विचार, अपेक्षा, तक्रारी, क्रिया-प्रतिक्रिया व्यक्त करण्याची जणू हक्काची जागाच एका व्यासपीठाप्रमाणे पत्रव्यवहाराच्या सदरात उपलब्ध होते. वाचकांच्या पत्रातून समाजमनाची स्पंदने, समाजाच्या जाणिवाच व्यक्त होतात. जागतिक घडामोडी,सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय विषयांना स्पर्श करणारी ही मनोगतपर परखड पत्रे असतात. समाजात घडणाऱ्या चांगल्या आणि वाईट घटनांबाबत तात्काळ मतनोंदणी करणारे,ग्रामीण आणि नागरी सुविधेबाबत विकासातील त्रुटी सांगणारे, नाराजी, निषेध करणारे, चांगल्या बातमींचे स्वागत तसेच अभिनंदन करणारे असे लेख वाचकांचे पत्रव्यवहारमध्ये असतात. वाचकांना लिहिते करणाऱ्या, अभिव्यक्तीस जागा देणाऱ्या अशा पत्रव्यवहारातून विचारमंथनास चालना मिळते.वाचकांच्या पत्रातून समाजमनाचे प्रतिबिंब उमटत असते. अशा पत्रव्यवहारातून शिक्षण, सामाजिक सुधारणा, विचारक्षमता,संवेदनशीलता विकसित होऊन जागृत आणि प्रगल्भ समाजनिर्मितीस पोषक वातावरण निर्माण होते.

वार्षिक सुट्ट्या

इ.स. १९७५पूर्वी १५ ऑगस्ट (स्वातंत्र्यदिन), २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन) व दिवाळी या दिवशीही भारतातील वृत्तपत्रे बंद नसतात. कारण सगळी वृत्तपत्रे एकदम सुट्टी घेत नाहीत. त्यामुळे विक्रेत्याला मात्र कधीच सुट्टी मिळत नसे. १५ ऑगस्टला टाइम्स ग्रुपची वृत्तपत्रे प्रसिद्ध होतात. त्या बदल्यात ते २६ जानेवारीला सुट्टी घेत. तर त्याउलट एक्सप्रेस ग्रुप १५ ऑगस्टला (स्वातंत्र्यदिन) सुट्टी घेत असे व २६ जानेवारीला व दिवाळीला त्यांची वृत्तपत्रे प्रसिद्ध होत असत.

महाराष्ट्रामधील वृत्तपत्र विक्रेत्याला सुट्टी मिळावी म्हणून दादरमधील एक जुने वृत्तपत्र विक्रेते जयराम रघुनाथ सहस्रबुद्धे (जन्म : २१ डिसेंबर, इ.स. १९१६) यांनी दादरमधील दोन-चार वृत्तपत्रविक्रेत्यांना बरोबर घेऊन दोन्ही ग्रुप तसेच इतर वृत्तपत्रांच्या व्यवस्थापकांची भेट घेऊन काही मार्ग निघतो का? म्हणून चाचपणी केली. परंतु काहीही उपयोग झाला नाही. हा सुट्टीचा प्रश्न सोडवायचा असेल तर विक्रेत्यांनी संघटित झाले पाहिजे, असा निर्णय घेण्यात आला. त्यादृष्टीने जयराम रघुनाथ सहस्रबुद्धे त्यांनी हालचालींना सुरुवात केली. वेगवेगळ्या भागांतील विक्रेत्यांना भेटायला व संपर्क साधायला सुरुवात केली. त्यांच्या प्रयत्‍नांना यश येऊन त्यांना थेट कुलाब्यापासून कल्याणपर्यंत व इकडे विरारपर्यंत सर्व वृत्तपत्रविक्रेत्यांचा पाठिंबा मिळाला. त्यानंतर मुंबईतील सर्व वृत्तपत्रांनी एकाच दिवशी सुट्टी घेण्याचा निर्णय घेतला व सुट्टीचे दिवस ठरवून घेतले. अशा प्रकारे सर्व पेपर बंद असतील तेव्हा विक्रेत्यांना सुट्टी मिळू लागली.

वृत्तपत्र विक्रेता दिन

महाराष्ट्रात वृत्तपत्र विक्रेता दिनाची सुरुवात दिनांक 15 ऑक्टोबर 2018ला नांदेड येथे खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते झाली. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेने वृत्तपत्र विक्रेता दिवस देशाचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनी करण्याचे ठरवले. वृत्तपत्र विक्रेता दिवस हळूहळू देशभर साजरा होत आहे.

अन्न पदार्थ विषयक

छोट्या जाहिराती

छोट्या समर्पक असतात.

संपादकीय लेखन

इतिहास

वृत्तपत्र 
साम्राज्यातील सरकारी वृत्तपत्र

रोमन साम्राज्यात सरकारी वृत्तपत्र प्रकाशित होत असे. तसेच चीन मध्येही दुसरे ते तिसरे शतक या दरम्यान असलेल्या साम्राज्याच्या काळात सरकारी वृत्तपत्र प्रकाशित होत असे.

आधुनिक प्रवास

ठशांचा वापर

औद्योगिक क्रांती

आंतरजालाचा परिणाम

आंतरजालावरील वृत्तपत्रे

वृत्तपत्राचे प्रकार

  • दैनिक
  • साप्ताहिक
  • पाक्षिक/अर्धमाही
  • मासिक
  • तिमाही
  • अर्ध वार्षिक किंवा सहामाही
  • वार्षिक

वृत्तपत्र या विषयावरील पुस्तके

  • 'सकाळ' वृत्तपत्र आणि वृत्तसमूह (डॉ. स्वाती कर्वे)
  • वृत्तपत्र मीमांसा (न.चिं. केळकर)
  • वृत्तपत्रलेखन (रमेश सांगळे, रवींद्र मालुसरे)
  • वृत्तपत्रसृष्टीतील माझी वाटचाल (एस.के. कुलकर्णी)
  • वृत्तपत्राचा इतिहास (रामचंद्र केशव लेले, विनायक जोशी)
  • वृत्तपत्रांचा इतिहास (लेखक - वि.कृ. जोशी).
  • स्त्रीमुक्ती चळवळ आणि वृत्तपत्रांचा सहभाग (मंगल खिंवसरा)
  • चौथा स्तंभ -शिरीष कुलकर्णी (लोकव्रत प्रकाशन -महाराष्ट्र पत्रकार संघ)

बाह्य दुवे

Tags:

वृत्तपत्र वृत्तपत्र ीय लेखनवृत्तपत्र मुख्य अंगवृत्तपत्र वार्षिक सुट्ट्यावृत्तपत्र विक्रेता दिनवृत्तपत्र इतिहासवृत्तपत्र आधुनिक प्रवासवृत्तपत्र आंतरजालाचा परिणामवृत्तपत्र ाचे प्रकारवृत्तपत्र या विषयावरील पुस्तकेवृत्तपत्र बाह्य दुवेवृत्तपत्र

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सोनेसातवाहन साम्राज्यमलेरियानितंबऔंढा नागनाथ मंदिरअहमदनगर लोकसभा मतदारसंघपिंपळमुंजवंचित बहुजन आघाडीकथकतैनाती फौजमहाराष्ट्रातील स्थानिक शासनभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळतुळजापूरसोनारआंतरराष्ट्रीय न्यायालयकुणबीराजाराम भोसलेतत्त्वज्ञानअतिसारवि.स. खांडेकरकाळभैरवनवनीत राणाधाराशिव जिल्हालहुजी राघोजी साळवेकार्ल मार्क्सभारतीय पंचवार्षिक योजनाबारामती विधानसभा मतदारसंघजागतिक लोकसंख्याहिंगोली विधानसभा मतदारसंघभारताचे पंतप्रधानअभिव्यक्तीमहाविकास आघाडीपसायदानजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)शहाजीराजे भोसलेभारतातील जागतिक वारसा स्थानेटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीमहात्मा फुलेशिर्डी लोकसभा मतदारसंघकल्याण लोकसभा मतदारसंघनफास्वामी विवेकानंदखो-खोभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीकोल्हापूर जिल्हाभारतीय संसदसुप्रिया सुळेसोव्हिएत संघरमाबाई आंबेडकरभारतातील मूलभूत हक्कपवनदीप राजनमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीस्वरजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)इतिहासाच्या अभ्यासाची साधनेशिवनेरीघोणसमानसशास्त्ररत्‍नागिरी जिल्हाकावीळतणाववर्णमालामहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळनृत्यताराबाई शिंदेपोक्सो कायदागुरुत्वाकर्षणउत्तर दिशानगर परिषदबुलढाणा विधानसभा मतदारसंघछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससम्राट अशोकप्रीमियर लीगज्यां-जाक रूसोपानिपतची पहिली लढाईजहाल मतवादी चळवळप्रज्ञा विवर्धन स्तोत्र🡆 More