तुळजापूर

तुळजापूर हे महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातले शहर आहे.

येथे तुळजाभवानीचे प्रसिद्ध तुळजा भवानी मंदिर असून ते महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असल्याची हिंदू भाविकांची श्रद्धा आहे. महाराष्ट्रातील हिंदू भाविकांमध्ये या देवीस विशेष महत्त्व असून नवरात्रात येथे मोठा उत्सव व भक्तांची गर्दी असते. नवरात्र महोत्सवात देशभरातून भवानीमातेचे भक्त मनोभावाने देवीची ज्योत पेटवून नेतात. तुळजापूर हे धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्यातील १५५४ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात २९९ कुटुंबे व एकूण १३९२ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर तुळजापूर ११ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ७२५ पुरुष आणि ६६७ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक २०० असून अनुसूचित जमातीचे ४४ लोक आहेत. ह्या गावाचा जनगणनेतील स्थल निर्देशांक ५६१५३४ आहे.

  ?तुळजापूर

महाराष्ट्र • भारत
—  शहर  —

१८° ००′ ००″ N, ७६° ०४′ ४८″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• ६४८ मी
जिल्हा धाराशिव
आमदार राणा जगजितसिंह पाटील
कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• +२४७१
• MH-25

सोलापूर शहरापासून जवळपास ४५ किलोमीटरअंतरावर आहे. तुळजापूर कानडा भाविक मोठ्या प्रमाणात येतो. सोलापुरातून जाण्यासाठी एस टीची सोय आहे. आणि राहण्यासाठी कमी दरात लॉज उपलब्ध आहेत.

साक्षरता

  • एकूण साक्षर लोकसंख्या: ९९४ (७१.४१%)
  • साक्षर पुरुष लोकसंख्या: ५३१ (७३.२४%)
  • साक्षर स्त्री लोकसंख्या: ४६३ (६९.४२%)
तुळजापूर 
मंदिराचे प्रवेशद्वार

हवामान

येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो. ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६२० मिलीमीटर असते.

भवानी मंदिर

धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तीर्थ समुद्रसपाटीपासून २६०० फुट इंच असून येथील भवानी मातेचे मंदिर बालाघाट डोंगरच्या कडेपठारावर वसले आहे. या डोंगराचे पुराण ग्रंथातील जुने नाव यमुनागिरी असे होते. कालांतराने या स्थानी चिंचेची झाडे असल्यामुळे त्याचे नामकरण चिंचपूर झाले. नंतर तुळजाभवानीच्या नावाने लोक तुळजापूर म्हणू लागले.छत्रपती शिवाजी महाराज यांचे कुलदेवता. संपूर्ण भारतात कुलदेवता म्हणून या देवीला मान आहे. कृतयुगात -अनुभूतीसाठी, त्रेत्रायुगात -श्रीरामचंद्रासाठी, द्वापारयुगात - धर्मराजासाठी व कलियुगात-छत्रपती शिवरायांसाठी आशीर्वादरूप ठरलेली ही भवानी भक्ततारिणी, वरप्रसादिनी आहे. अनेक प्रदेशांतून विविध जाती-पंथांचे भाविक इथे येतात. एवढेच नव्हे तर मातेचे भक्त भारतातच नव्हे तर परदेशातही आहेत. हे स्थान धाराशिव जिल्ह्यात असून धाराशिव व सोलापूर ही जवळची रेल्वे स्थानके आहेत.अनेक भाविके रोज येतात.

धाराशिव - तुळजापूर अंतर 22 कि.मी. आहे. व सोलापूर येथून ४५ कि.मी. आहे. सोलापूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, मुंबई, पुणे, कोल्हापूर, नांदेड या ठिकाणांहून तुळजापूरला थेट बसची सोय आहे. रेल्वे ने सोलापूर किवा धाराशिवला येवु शकता तेथून बस चालू आहेत.

कृतयुगात कर्दभ नावाचे तपोनिष्ठ ऋषी होऊन गेले. त्यांची पत्नी अनूभुती रुपसंपन्न असून पतिव्रता होती. सुदैवाने तिला पुत्ररत्न प्राप्त झाले. परंतु त्यांचा सुखी संसार फार काळ टिकला नाही. कारण कर्दभ ऋषींनी लवकरच इह्लोकीची यात्रा संपविल्यामुळे अनुभुतिने सती जाण्याचा निर्णय घेतला; परंतु अल्पवयीन पुत्राला मागे सोडून पतिसोबत सहगमन करू नये असे ऋषींनी शास्त्राचा आधार घेऊन सांगितले असता अनुभूतीने आपल्या पुत्राला गुरुगृही सोडून ती मेरू पर्वतानजिक असलेल्या मंदाकिनी नदीच्या परिसरात गेली. आणि तिथे आश्रम बांधून तिने तपश्चर्या सुरू केली. तिची तपश्चर्या सुरू असताना कुकर नावाचा दैत्य तिच्या अप्रतिम सौंदर्यावर लूब्ध झाला.त्याच्या मनात पापवासना निर्माण होऊन त्याने तिला स्पर्श केला त्यामुळे तिची समाधी भंग पावली. दैत्याने काही अनुचित प्रकार करु नये म्हणून तिने आदिशक्तिचा धावा केला. यासाठी की शक्तीने या दैत्याच्या तावडीतून आपली सुट्का करावी आणि खरोखरच देवी भवानी मातेच्या रूपाने त्वरित धावून आली. तिने दैत्याशी युद्ध केले. दैत्यही महिषाचे रूप घेऊन आला. तेव्हा देवीने त्रिशुळाने त्याचे शीर वेगळे केले.ही भवानी देवी वेळीच अनुभूतीच्या रक्षणासाठी त्वरित धावून आल्यामुळे तिला त्वरिता असे नाव पडले. कालांतराने त्वरिताचे-तुरजा व त्याचे पुढे तुळजा झाले. निजामशाही असो किंवा आदीलशाही असो कोणीही धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करीत नसत. 1920 पर्यंत या गावात एकही धर्मशाळा नव्हती. या साली गावची लोकसंख्या सूमारे ५००० इतकी होती.

भवानी मातेच्या मंदिरात जाण्यासाठी काही पायऱ्या उतरल्यानंतर महाद्वार लागते. त्यावरील काही शिल्प हेमाडपंथी असून तिथे नारद मुनींचे दर्शन घडते. पुढे गेल्यावर कल्लोळ तीर्थ लागते. देवी इथे आल्यानंतर जेव्हा या तीर्थाची निर्मिती केली. तेव्हा पृथ्वीवरील सर्व उदकतीर्थे या तीर्थास धावून आल्यामुळे त्यांचा एकच कल्लोळ झाला. यास्तव या तीर्थास ’कल्लोळ तीर्थ’ म्हणतात.

या तीर्थापसून समोरच गोमुख तीर्थ लागते. त्यातून अहोरात्र पाण्याचा प्रवाह वाहतो.त्याचप्रमाणे श्रीदत्ताचे हस्तप्रक्षालनाचे ठिकाण आहे. पूढे गेल्यावर अमृतकुंड लागते. त्याच्या अलीकडे श्री गणेश मंदिर आहे. येथे सिद्धीविनायक आहे. नंतर निंबाळकर दरवाजा लागतो. दरवाजा ओलांडून आत गेले असता मातेचा कळस नजरेस पडतो. हा कळस पंचधातूपासून बनविला आहे.मंदिराच्या दर्शनी बाजुस होमकुंड आसून त्यावर शिखर बांधले आहे. मंदिराचा सभामंडप सोळाखांबी असून पश्चिम दिशेला मातेचा गाभारा आहे. इतिहास व पुरातत्त्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकुट अथवा यादवकालीन मानले जाते. होमाच्या डाव्या बाजूला दर्शन मंडप उभारण्यात आले आहे. हे पाच मजली इमारत असून धर्म दर्शन व मुख दर्शन असे भाग केले आहेत.

गाभाऱ्याच्या मधोमध चांदीच्या सिंहासनावर आरूढ झालेली भवानी मातेची मूर्ती गंडकी शिळेची असून तिने विविध शस्त्रे धारण केलेली आहेत. देवीने एका हातात महिषासुराची शेंडी धरली आहे. तर दुसऱ्या हाताने त्याच्या बरगडीत त्रिशूळ खुपसला आहे. तिच्या उजव्या पायाखाली महिषासुर व डाव्या बाजूला सिंह आणि पुराण सांगणारी मार्कंडेय ऋषीची मूर्ती दिसते. देवीच्या उजव्या खांद्याजवळ चंद्र व डाव्या खांद्याजवळ सूर्य कोरलेला दिसतो. देवीला कोणीही स्पर्श करू शकत नाही. देवीची पूर्वी तीन वेळा पूजा केली जात असे. आता मात्र सकाळ-संध्याकाळ अशी पूजा केली जाते.‍ गाभा-याच्या उत्तरेस शयनगृह असून त्यात मातेसाठी एक चांदीचा पलंग ठेवला आहे. तसेच दक्षिण दिशेला देवीचे न्हाणीघर आहे. आश्विन शुद्ध प्रतिपदा ते अष्ट्मी, पौष शुद्ध प्रतिपदा ते अष्ट्मी व भाद्रपद वद्य अष्ट्मी ते अमावस्या अशी देवीची तीन शयन वर्षे ठरली असून इतर वेळी ती अष्टौप्रहर जागृत असते.(असे इतरत्र आढ्ळत नाही)

तुळजाभवानी दसरा महोत्सव मध्ये देवीच्या आकर्षक अलंकार पूजा मांडण्यात येतात. भारतात एक मात्र मुर्ती जी स्थलांतरित आहे. देवी वर्षातून तीन वेळा नीद्रा घेते. दोन वेळा चांदीच्या पलंगावर व एक वेळा नगर वरुण पलंग येतो.

सभामंडप ओलांडून गेल्यावर पूर्वेला भवानी शंकराची वरदमूर्ती, शंकराची स्वयंभू पिंड, पाठीमागे नंदी, नंदीवर भवानीशंकराचा मुखवटा व त्यावर पंचनागाचा उभारलेला फणा आणि सतत तेवत असणारा नंदादीप दृष्टीला पडतो. मंदिराचे परिसरात श्रीनृसिंह, खंडोबा, चिंतामणी या देवतांच्या मूर्ती दृष्टीस पडतात.

येथील प्रेक्षणीय स्थळे

  1. काळभैरव:-- हे स्थान श्रीक्षेत्र काशी प्रमाणेच येथे डोंगराच्या कड्यावर आहे. भोवताली रम्य झाडी असून पावसाळ्यात उंचावरून पाणी पडते. हे स्थान दर्शनीय व रमणीय आहे.
  2. आदिमाया व आदिशक्ति:-- देवळाच्या मुख्य द्वाराजवळ उजव्या हाताकडे आदिमाया व आदिशक्ति ह्या देवता आहेत.
  3. घाटशीळ:-- डोंगराच्या उतरणीवर किल्लेवजा,मजबूत,सुंदर देवस्थान आहे. आत देवीच्या पादुका आहेत. घाट्शीळवर उभारून देवीने श्रीरामाला सीतेचे रूप घेऊन श्रीलंकेचा मार्ग दाखविला. तेव्हा रामाने देवीला ओळखले व तो म्हणाला 'तू का आई?’ येथे असलेल्या कमानी पूर्वी रजाकारांवर देखरेख करण्यासाठी वापरत. जवळच मंदिर संस्थानने बांधलेली बाग आहे.
  4. पापनाश तीर्थ:-- हे एक तीर्थ असून पापनाशिनी असे याचे प्राचीन नाव आहे. येथे स्नान केल्याने लोकांचे पापातून सुटका होते. अशी लोकांची धारणा आहे. देऊळ जुने पण मजबूत आहे.
  5. रामवरदायिनी -येथे रामवरदायिनी नावाची देवी असून जेव्हा श्री रामचंद्र वनवासात गेले होते. तेव्हा सीतेला शोधण्यासाठी रामचंद्र येथे आले असताना या देवीने त्यांना वर दिला व योग्य मार्ग दाखवला.

देवीच्या मुर्ती वर सुंदर नक्षी असुन डाव्या हाताच्या करंगळी ने रमला मार्ग धावले हे मुर्ती वर दिसुन येते. याच्या मागच्या बाजूस चंद्रकुंड व सूर्यकुंड नावाची पाण्याची ठिकाणे आहेत.

  1. भारतीबूवाचा मठ:-- देवळाच्या मागील बाजूस म्हणजे शिवाजी दरवाजा उतरून खाली गेल्यावर हा मठ लागतो. याचे मूळ पुरूष रणछोड भारती. यांच्यासोबत श्रीदेवी सारीपाट खेळत असे. मठ जुना, मजबूत व प्रेक्षणीय आहे.
  2. गरीबनाथाचा मठ:--हया मठात गोरगरीबांना सदावर्त दिले जात होते. हा मठ सध्या खड्काळ गल्लीत आहे.
  3. नारायणगिरीचा मठ:-- हा मठ दशनामगिरी गोसाव्याचा होत. सध्या हा येथील क्रांती चौकात आहे.
  4. मंकावती तीर्थ:--मंकावती कुंड हे तुळजापूरातील एक मोठे पवित्र कुंड आहे. असे म्हणतात की या कुंडात स्नान केल्याने अंग पवित्र होते. याला विष्णू कुंड असेही म्हणतात. यावर महादेवाची पिंड आहे. तसेच मोठे मारुती मंदिर आहे.
  5. धाकटे तुळजापूर:--येथून जवळच धाकटे तुळजापूर हे गाव आहे. या ठिकाणी तुळजा मातेची बहीण वास्तव्य करते.

धाराशिव जिल्ह्यात असलेले हे देवालय सोलापूरपासून प्रवासाच्या दृष्टीने जवळ आहे. देवीचे मंदिर बालाघाटातील एका डोंगरमाथ्यावर असल्याने अगदी जवळ गेल्याखेरीज या मंदिराचा कळस दिसत नाही. मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंती आहे. एक आकर्षण करून घेणार देवस्थान महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून तुळजाभवानी देवीस अग्रमान आहे. स्वराज्य संस्थापना करणारे शिवाजीराजे भोसले यांच्या भोसले घराण्याची ही कुलदेवता होय. या देवीच्या आशीर्वादाने शिवाजीराजांना राज्यस्थापनेची प्रेरणा मिळाली. आख्यायिकेनुसार देवीने महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील दुष्टचक्राचे निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली होती. रामदास स्वामी हे देखील उपासक होते.महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे.

बाह्य दुवे

  • "श्री तुळजाभवानी मंदिर, तुळजापूरची माहिती". Archived from the original on 2019-06-10.

जमिनीचा वापर

तुळजापूर ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ):

  • वन: ९४.८८
  • बिगरशेती वापरात असलेली जमीन: ७०.५७
  • लागवडीयोग्य पडीक जमीन: १६७.७८
  • पिकांखालची जमीन: १२२०.७७
  • एकूण कोरडवाहू जमीन: २२.४९
  • एकूण बागायती जमीन: ११९८.२८

सिंचन सुविधा

सिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ):

  • विहिरी / कूप नलिका: २२.४९

संदर्भ

Tags:

तुळजापूर साक्षरतातुळजापूर हवामानतुळजापूर भवानी मंदिरतुळजापूर बाह्य दुवेतुळजापूर जमिनीचा वापरतुळजापूर सिंचन सुविधातुळजापूर संदर्भतुळजापूरउत्सवतुळजा भवानी मंदिरतुळजाभवानीधाराशिव जिल्हामहाराष्ट्रसाडेतीन शक्तीपीठेहिंदू

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मांगपांडुरंग सदाशिव सानेहृदयपृथ्वीसर्वनामशांता शेळकेमोबाईल फोनहरितगृह परिणामपुणे करारमुंबई उच्च न्यायालयमांजरबुलढाणा जिल्हापुरस्कारनातीझाडनीती आयोगविधान परिषद१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धगोरा कुंभारमहाराष्ट्र केसरीशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळखडकवासला विधानसभा मतदारसंघनक्षलवादनिबंधकेंद्रीय लोकसेवा आयोगओमराजे निंबाळकरअजित पवारशिवसरपंचभारतातील जातिव्यवस्थामूलद्रव्यम्हणीज्वारीउद्धव ठाकरेकुपोषणअमृता शेरगिलहिंगोली लोकसभा मतदारसंघएकनाथ शिंदेशरीफजीराजे भोसलेभोर विधानसभा मतदारसंघएकनाथनागपूर लोकसभा मतदारसंघपळसमहादेव गोविंद रानडेजगातील देशांची यादीमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीलता मंगेशकरस्वामी समर्थमराठा आरक्षणमहाराष्ट्रातील आरक्षणहनुमान चालीसाप्राजक्ता माळीउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघपोवाडामहाबळेश्वरगोंधळमाढा विधानसभा मतदारसंघसुजय विखे पाटीलकर्नाटकउन्हाळाजागतिक पुस्तक दिवसबलवंत बसवंत वानखेडेश्रीनिवास रामानुजनराहुरी विधानसभा मतदारसंघव्यायामकळसूबाई शिखरशिवाजी गोविंदराव सावंतनारळजागतिक व्यापार संघटनागणपतीराशीमराठामहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीपंचशीलभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेहुप्पा हुय्या (मराठी चित्रपट)रक्तकल्याण (शहर)🡆 More