घोणस

घोणस (शास्त्रीय नाव : Daboia, उच्चार: डाबोया; इंग्लिश: Russell's viper) हा आशिया खंडातील भारतीय उपखंड, आग्नेय आशिया, दक्षिण चीन, तैवान या भूप्रदेशांमध्ये आढळणारा विषारी साप आहे.

हा महाराष्ट्रामधील चार प्रमुख विषारी सापांपैकी एक साप आहे.

घोणसउदयोन्मुख लेख
हा लेख २० मार्च, २०१० रोजी मराठी विकिपीडियावरील उदयोन्मुख सदर होता. २०१०चे इतर उदयोन्मुख लेख
घोणस
घोणस
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: सरिसृप
कुळ: वायपरीडे
(Viperidae)

उपकुळ: वायपरीने
(Viperinae)

जातकुळी: डाबोया (Daboia)
जीव: डाबोया रसेली
(Daboia russelii)

शास्त्रीय नाव
डाबोया रसेली

वास्तव्य

घोणस मुख्यत्वे जंगले तसेच ग्रामीण भाग पसंत करतो.

रचना

घोणसाला ओळखण्याची मुख्य खूण म्हणजे त्याच्या अंगावरील साखळीसारख्या दिसणाऱ्या तीन समांतर रेषा असतात. घोणस हिरवा, पिवळा, हलका, करडा रंग व इतर अनेक रंगछटांमध्ये आढळतात. या सापाचे वैशिष्ट्य म्हणजे याचे विषाचे दात तोंडात दुमडू शकतो. सावजाला एकदा विषाने मारल्यानंतर बहुतेक सापांना शिकार खाताना विषाचे दात अडचण बनतात. परंतु उत्क्रांतीमध्ये या सापाने आपले विषाचे दात दुमडून घेण्याची कला अवगत केली आहे. त्यामुळे कधीकधी हा साप चावताना विषारी दातांचा उपयोग करीत नाही. याला कोरडा चावा असे म्हणतात.

घोणसाचे फुत्कार एखाद्या कुकराच्या शिट्टीप्रमाणे असतात.

प्रजनन

घोणसाचे वैशिष्ट्य म्हणजे तो पोटामध्ये अंडी उबवतो व पिल्ले अंड्यांतून बाहेर आल्यानंतर बाहेर काढतो. त्यामुळे कित्येकांचा असा अपसमज आहे, की घोणस सस्तन प्राण्यांप्रमाणे पिल्लांना जन्माला घालतात.

विषाचे परिणाम

घोणस 
घोणस

घोणसाचे विष अतिशय जहाल असते.त्याचे विष Vasculotoxic प्रकारचे आहे. हे विष मुख्यत्वे रक्ताभिसरण संस्थेवर हल्ला चढवते. विषाच्या या गुणधर्मामुळे चाव्यानंतर रक्तातील गुठळ्या करू शकणा‍ऱ्या प्रथिनांचा नाश होऊ लागतो. त्यामुळे चाव्यानंतर जखमेतून भळाभळा वाहणारे रक्त लवकर थांबत नाही. थोड्या वेळाने नाकपुड्या, कानांतून व गुदद्वारातून रक्त स्रवू लागते. विषावरती प्रतिविषाचे औषध न मिळाल्यास एका दिवसात मृत्यू ओढवू शकतो.

उपचार

घोणस चावल्यानंतर जखमेभोवती कोणत्याही प्रकारची पट्टी लावू नये; असे केल्यास रक्त साखळून चावलेला भाग कायमचा निकामी होण्याची शक्यता असते. घोणस चावल्यानंतर लवकरात लवकर व्यक्तीला प्रतिविषाचे औषध देणे, हाच सर्वोत्तम उपाय आहे.रुग्णास धीर द्यावा. अनेक वेळेस साप विषारी आहे की नाही हे माहीत नसते. अनेक वेळा घाबरून रुग्णाचा मृत्यू होतो. म्हणून रुग्णास मानसिक धीर देणे गरजेच आहे. त्या व्यक्तीस पाणी प्यायला देऊ नये.

संदर्भ

Tags:

घोणस वास्तव्यघोणस रचनाघोणस प्रजननघोणस विषाचे परिणामघोणस उपचारघोणस संदर्भघोणसआग्नेय आशियाआशियाइंग्लिश भाषाचीनतैवानभारतीय उपखंडमहाराष्ट्रसाप

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मच्छिंद्रनाथनगर परिषदमहाड सत्याग्रहनरसोबाची वाडीप्रणिती शिंदेइंदिरा गांधीसविता आंबेडकरजिल्हाधिकारीरायगड लोकसभा मतदारसंघमुळाक्षरभारतीय स्टेट बँकवर्णअहवालपेरु (फळ)लातूर जिल्हाग्रीसअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीनर्मदा नदीज्योतिबा मंदिरमहाराष्ट्रातील लोककलामहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीकाळाराम मंदिर सत्याग्रहगुणसूत्रकुटुंबनियोजनमेरी आँत्वानेतमानवी हक्कभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हजागतिकीकरणविराट कोहलीपंचशीललक्ष्मीराष्ट्रीय स्वयंसेवक संघकुटुंबकीर्तनमहाराष्ट्र पोलीसकुणबीफुटबॉलभारतातील राजकीय पक्षआम्ही जातो अमुच्या गावाभारताचे उपराष्ट्रपतीमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)दिवाळीसर्वेपल्ली राधाकृष्णनपंढरपूरवर्धमान महावीररशियापुष्यमित्र शुंगमहाराष्ट्रातील घाट रस्तेबाबासाहेब आंबेडकरकोकणभारतीय अंतराळ संशोधन संस्थाभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीजगदीश खेबुडकरभारताच्या राष्ट्रपतींची यादीविशेषणमाढा विधानसभा मतदारसंघशनिवार वाडाप्रीमियर लीगमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीसमीक्षाप्राकृतिक भूगोलमराठी लिपीतील वर्णमालापृथ्वीचे वातावरणराजगडउदयनराजे भोसलेध्वनिप्रदूषणअर्जुन वृक्षगोंदवलेकर महाराजशिवनेरीमहाराष्ट्र शासनयवतमाळ जिल्हाजया किशोरीम्हणीराखीव मतदारसंघ🡆 More