जवस

जवस (शास्त्रीय नाव: Linum usitatissimum; लिनम युसिटेटिसियम ) हे एक गळिताचे धान्य आहे.

यालाच मराठीत अळशी, गुजराथीत अलसी, हिंदीत अलसी किंवा तिसी, कानडीत अल्सी आणि आलसी आणि संस्कृतमध्ये अलसी, अतसी, अतसिका, हैमवती, मदगंधा, मलीना, तैलोत्तमा, नीलपुष्पी, उमा किंवा क्षुमा म्हणतात. जवसाचा उगम इजिप्त देशातील आहे. महाराष्ट्रात व भारतात जवस हे हिवाळ्यातले (रब्बीचे) पीक आहे. याच्या एका फळात दहा टोकदार चकचकीत चपट्या बिया असतात. त्या बियांपासून तेल निघते. विदर्भात जवसाचे तेल खाद्यपदार्थांमध्ये वापरतात. याच्या वापराने दृष्टी मंदावते आणि नपुंसकत्व येते असा समज आहे. जवसाच्या बियांची भुकटी करून चविष्ट चटणी करतात.[ संदर्भ हवा ] खोडाच्या अंतर्सालीपासून धागा निघतो.जवस हे समशीतोष्ण प्रदेशातील रोप आहे. रेशेदार पिकात याचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. याच्या रेशेपासुन कापड, दोरी, रस्सी आणि टाट बनवले जाते याच्या बियांपासून तेल निघते या तेलाचे वापर वार्निश, रंग, साबुन, रोगन, पेन्ट तयार करण्यासाठी केला जातो. चीन सनचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे रेशे साठी सनला उत्पादित करणारे देशात रूस, पोलैण्ड, नीदरलैण्ड, फ्रांस, चीन आणि बेल्जियम प्रमुख आहे व बी काढण्यातील देशात भारत, संयुक्त राज्य अमरीका आणि अर्जेण्टाइनाचे नाव उल्लेखनीय आहे. सनचे प्रमुख निर्यातक रूस, बेल्जियम तथा अर्जेण्टाइना आहे. आयुर्वेदात जवसाला मंदगंधयुक्त, मधुर, बलकारक, किंचित कफवात-कारक, पित्तनाशक, स्निग्ध, पचनास भारी, गरम, पौष्टिक, कामोद्दीपक, पाठीच्या दुखणे कमी करणारे व सूजेला नष्ट करणारे म्हणले अाहे. गरम पाण्यात टाकून बीज किंवा याच्या बरोबर एक तृतीयांश भाग ज्येष् मधाचे चूर्ण मिसळून क्वाथ (काढा) बनवला जातो, जो रक्तातिसार आणि मूत्र संबंधी आजारात उपयुक्त मानला जातो..[ संदर्भ हवा ]

जवस
जवसाचे शेत
जवस
जवसबियांच्या कोषिका
जवस
जवसाच्या बिया

तेलाचे उपयोग

हे तेल वापरून तैलरंग, व्हॉर्निश, सौम्य साबण, छपाईची शाई वगैरे बनते. वंगणे, मलमे आणि चामड्याचे पॉलिशसाठीही अळशीच्या तेलाचा उपयोग होतो. तेल काढून उरलेली पेंड, गुरांच्या सकस खाद्यासाठी अणि खत म्हणून वापरतात. पशुवैद्य या तेलाचा उपयोग दुभती जनावरे आणि घोडे यांच्याकरिता रेचक म्हणून करतात.[ संदर्भ हवा ]

औषधी गुणधर्म

बियांच्या वापराने पित्तभावना, पाठदुखी आणि दाह-क्षोभ आदी कमी होते. व्रण आणि लघवीच्या त्रासावर गुणकारी. खोकल्यावर आणि मूत्रपिंडाच्या विकारांवर आराम पडण्यासाठी जवसाच्या बिया चांगल्या असतात. साल आणि पाने परम्यासाठी उपयोगी, तर जाळलेली साल भळभळ वाहणारे रक्त थांबवते आणि जखमा भरण्यास उपयोगी पडते. फुले मेंदू आणि हृदयासाठी पौष्टिक. युनानी वैद्य अंतर्गत जखमांसाठी बियांचे सेवन करण्यास सांगतात तर त्याच बियांचा गजकर्णादी वापर त्वचारोगांवर बाह्योपचाराने करतात. चुन्याच्या निवळीत मिसळलेले तेल हा कातडीच्या भाजण्यावरचा फायदेशीर उपाय आहे.

जवसामध्ये 'ओमेगा-३' या मेदाम्लाचे प्रमाण सुमारे ५८% राहते त्यामुळे,हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्या अवरुद्ध होत नाहीत.जवस हे रक्तातील कॉलेस्टेरॉलचे प्रमाण ९ ते १८ टक्क्याने कमी करते.हे सांधेदुखी कमी करते तसेच यामुळे 'ग्लिसराईड'चे प्रमाण कमी होते.याचे सेवनाने आतड्याचा कर्करोग होत नाही.अकाली वृद्ध्त्व टळते.

संदर्भ

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

Tags:

जवस तेलाचे उपयोगजवस औषधी गुणधर्मजवस संदर्भजवस हे सुद्धा पहाजवस बाह्य दुवेजवसइजिप्तज्येष्ठमधतेलधान्यमहाराष्ट्रविकिपीडिया:संदर्भ द्या

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सांगली जिल्हाअश्वत्थामायशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठलोकसभाबलुतं (पुस्तक)जाहिरातकोलकाता नाइट रायडर्स २०२२ संघखासदारसकाळ (वृत्तपत्र)दिशापांडुरंग सदाशिव सानेकेळहापूस आंबारवींद्रनाथ टागोरसिंधुदुर्गपरभणी विधानसभा मतदारसंघहनुमान जयंतीभारूडनिलेश साबळेपृथ्वीचा इतिहासबुलढाणा लोकसभा मतदारसंघमण्यारटरबूजजगदीश खेबुडकरसातवाहन साम्राज्यदूरदर्शनपवनदीप राजनताज महालवर्णनात्मक भाषाशास्त्रराष्ट्रवादी काँग्रेस पक्षगुरुत्वाकर्षणमानवी विकास निर्देशांकरमाबाई आंबेडकरमहात्मा गांधीमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीनैसर्गिक पर्यावरणढोलकीभूगोलजुने भारतीय चलनरायगड जिल्हाभारतरत्‍नभारतीय रिझर्व बँकचिन्मय मांडलेकरगुकेश डीमहाराष्ट्र पोलीसनाटकइतिहासाच्या अभ्यासाची साधनेनर्मदा परिक्रमाभारताचे पंतप्रधानउच्च रक्तदाबपु.ल. देशपांडेदीनबंधू (वृत्तपत्र)वसाहतवादकावीळशुद्धलेखनाचे नियमकाळभैरवकाळूबाईहृदयजिल्हाधिकारीशरद पवारपंजाबराव देशमुखमुघल साम्राज्यहवामानाचा अंदाजसंग्रहालयसोव्हिएत संघपृथ्वीच्या अंतरंगाची रचनाचाफासॅम पित्रोदाविधानसभानगर परिषदभारतामधील भाषामहाभारतमाढा लोकसभा मतदारसंघपुणेसामाजिक कार्यसुभाषचंद्र बोसशिक्षकपन्हाळा🡆 More