मण्यार

मण्यार किंवा मणेर ही भारतात आढळणाऱ्या चार प्रमुख विषारी सापांपैकी एक जात आहे.

(इतर विषारी साप- नाग, फुरसे आणि घोणस.) मण्यारच्या काही उपजातीही आहेत. साधा मण्यार अथवा मण्यार, पट्टेरी मण्यार, व काळा मण्यार या तीन जाती भारतात आढळतात. मण्यारच्या आणखी १० उपजाती आहेत व त्यांचा अन्य आग्नेय आशियायी देशांमध्ये वावर आहे. भारतात आढळणारा साधा मण्यार सर्वत्र आढळतो व राहण्यासाठी जंगले जास्त पसंत करतो. ह्याचा रंग पोलादी निळा असून अंगावर पांढरे खवले असतात. हे खवले शेपटीकडे अधिक व डोक्याकडे कमी कमी होत जातात. मण्यारची लांबी दीड मीटरपर्यंत असते. मण्यार मुख्यत्वे निशाचर आहे. अन्नाच्या व गारव्याच्या शोधार्थ आल्यामुळे हा साप माणसांच्या घरांत सापडण्याच्या घटना घडतात.

मण्यार
मण्यार
मण्यार
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: सरपटणारे प्राणी
वर्ग: स्कामाटा
कुळ: बंगारस
योहान गोटलिब श्नायडर, १८०१

अन्न - मण्यारचे मुख्य खाद्य उंदीर व तत्सम कुरतडणारे प्राणी, पालीसरडे, इतर छोटे सापबेडूक इत्यादी आहे

विष

मण्यारचे विष हे नागाप्रमाणेच असते इंग्रजीत त्याला Neurotoxic म्हणतात व त्याचा प्रभाव शरीराच्या संवेदन प्रणालीवर (Neural system) होतो. मण्यारचे विष नागाच्या विषाच्या १५ पटीने जहाल असते. . मण्यारवर पाय पडल्याने मण्यार चावण्याच्या घटना घडतात. चावल्यावर लवकरात लवकर वैद्यकीय मदत मिळणे गरजेचे आहे. मण्यार चावल्यानंतर कधी कधी हा साप चावल्याचेही लक्षात येत नाही. प्रचंड तहान लागते, पोटदुखी सुरू होते व श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. काही काळाने एरवी मेंदूद्वारे नियंत्रित होत असलेली श्वसनप्रणाली बंद पडून मृत्यू ओढवतो.

देशातील काही भागात उपचाराअभावी मृत्यू झाल्याची घटना घडतात. मुख्यतः साप या प्राण्याला घाबरून माणसाचा रक्तदाब वाढतो. त्यामुळे थोडा जरी सर्पदंश झाला आणि रक्तदाब वाढला तरी भीतीपोटी काही वेळा मृत्यू होतो. मोकळ्या जागेत मण्यार जास्त काळ थांबत नाही. अपवाद सोडून बहुतेक वेळा हा साप अडचणीच्या ठिकाणी आढळतो. हा साप खूप चपळ आहे. त्याचे विष खूप जहाल असते. जिभेद्वारे विष भक्षाच्या डोळ्यात टाकून सुद्धा आपली शिकार सहजतेने करतो. डोंगराळ भागात हा साप ठिकठिकाणी आढळतो. जास्तीत जास्त हा साप रात्रीच्या वेळी बाहेर पडतो. म्हणून माणसाला हा साप चावण्याचे प्रकार रात्रीच्या वेळेस जास्त घडतात.

मण्यार चावल्यास लवकरात लवकर दवाखान्यात जाऊन लवकर उपचार कसे करता येतील याची काळजी घ्यावी. सरकारी दवाखान्यात यावर उपचार माफक दरात आहेत.

संदर्भ

Tags:

पट्टेरी मण्यारसाप

🔥 Trending searches on Wiki मराठी:

गजानन महाराजवर्णमालाजिल्हाधिकारीकपिल देव निखंजकृत्रिम बुद्धिमत्तादुधी भोपळाऋतूआकाशवाणीभारतीय संविधानाची उद्देशिकाचेन्नई सुपर किंग्सउजनी धरणविठ्ठल रामजी शिंदेभरतनाट्यम्कोलकाताशेळी पालनमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीथॉमस अल्वा एडिसनचंद्रकांत भाऊराव खैरेअल्बर्ट आइन्स्टाइनश्रीनिवास रामानुजनकांजिण्यादूधवाचनराजस्थानराम मंदिर (अयोध्या)कोयना धरणबच्चू कडूनरहरी सोनारलोहगडपश्चिम दिशायोगकुपोषणमोबाईल फोनआचारसंहिताएकनाथमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीकानिफनाथ समाधी स्थळ मढीभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळचंद्रशेखर आझादईमेलताराबाईमासिक पाळीटोमॅटोमहात्मा फुलेनागपुरी संत्रीपन्हाळाशिवबलुतेदारभारतीय लष्करभारताचा स्वातंत्र्यलढापुरंदर किल्लाकावळात्सुनामी१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धजैन धर्ममल्लखांबपाराना नदीसमाजशास्त्रमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीसर्वनामभारतातील राजकीय पक्षभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीगोवावनस्पतीव्हॉलीबॉलवेरूळ लेणीभौगोलिक माहिती प्रणालीयकृतसांडपाणीसुधीर मुनगंटीवारव्यंजनमराठा आरक्षणफणसविहीरअंदमान आणि निकोबार बेटेपृथ्वीसंवादबाबा आमटे🡆 More