तिरुपती बालाजी

बालाजी( तेलुगू వెంకటేశ్వరుడు , वेंकटेश्वरुडु (डु हा आदरार्थी अव्यय) ) ही हिंदू देवता विष्णूचा अवतार मानली जाते.

बालाजीचे मुख्य स्थान तिरुपती येथे आहे. वराहपुराणात भगवान वेंकटेश्वर आणि देवी पद्मावती यांची कथा आहे/

तिरुपती बालाजी
बालाजी मंदिर
वेंकटचलपति, श्रीनिवासु
पर्यायी चित्र
श्रीवारी तिरुपती बालाजी
पर्यायी नकाशा
पर्यायी नकाशा
बालाजी मंदिर
आंध्रप्रदेशच्या नकाशातील स्थान
नाव
संस्कृत श्री वेंकटेशम्
भूगोल
गुणक 13°37′44.6340″N 79°25′28.0056″E / 13.629065000°N 79.424446000°E / 13.629065000; 79.424446000गुणक तळटिपा
देश भारत
राज्य आंध्रप्रदेश
जिल्हा चित्तूर
स्थानिक नाव वेंकटचलपति, श्रीनिवासु
स्थान तिरुमला डोंगर, तिरुपती, चित्तूर, आंध्रप्रदेश, भारत
उन्नतन ८५३ मी (२,७९९ फूट)उन्नतन तळटिपा
संस्कृती
मूळ आराध्यदैवत विष्णू
महत्त्वाचे उत्सव ब्रह्मोत्सवम्, वैकुण्ठ एकादशी, रथ सप्तमी, दसरा
स्थापत्य
स्थापत्यशैली द्रविड स्थापत्यशैली
मंदिरांची संख्या
प्राचीन इमारती
कोरीवकाम द्रविड आणि संस्कृत
इतिहास व प्रशासन
बांधकामाचे वर्ष अज्ञात
निर्माणकर्ता

 •  वीर नरसिंहदेव यादवराय  • वीर राक्षस यादवराय

 •  रंगनाथ यादवराय
मंदिर मंडळ तिरुमाला तिरुपति देवस्थानम
संकेतस्थळ www.tirumala.org

मूर्ती

बालाजीची मूर्ती सोने व इतर अनेक आभूषणांनी मढलेली असते. मूर्तीची उंची २ मीटर आहे. तिरुपती देवस्थान हे देशातील सर्वाधिक श्रीमंत देवस्थान मानले जाते. जागतिक पातळीवर व्हॅटिकन सिटी ह्या ख्रिश्चन धर्मस्थळानंतर या देवस्थानाचा क्रमांक लागतो. मंदिराची शैली दाक्षिणात्य गोपुर शैली आहे.

इतिहास

तिरुपती बालाजी मंदिर वा वेंकटेश्वर मंदिर, तिरुमला पर्वतरांगेत आहे. हे देऊळ असलेल्या डोंगराला तिरुमला (श्री + मलय) म्हणतात. हे देऊळ भारतातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी आहे.

मंदिराच्या स्थापनेचा अचूक काळ अज्ञात आहे. मूर्ती परंपरेने स्वयंभू मानण्यात येते. लोककथेनुसार तिरुपतीच्या डोंगरावर (तिरुमला) मोठे वारुळ होते. एका शेतकऱ्यास आकाशवाणीद्वारे वारुळातील मुंग्यांना भरविण्याची आज्ञा झाली. स्थानिक राजाने ती आकाशवाणी ऐकली व स्वतःच त्या वारुळास दूध पुरवू लागला. त्याच्या भक्तीमुळे बालाजी अवतीर्ण झाले.

ऐतिहासिक पुराव्यानुसार मंदिर किमान २००० वर्षे जुणे आहे. पल्लव राणी समवाईने इस. ६१४ मध्ये येथील पहिली वेदी बांधली. [तमिळ] संगम साहित्यात (काळ: इसपूर्व ५०० - इस २००) या स्थानाचा उल्लेख आहे. चोळ व पल्लव साम्राज्यांनी मंदिराला दिलेल्या योगदानाचे कित्येक पट सापडले आहेत. चोळा राज्यकालात मंदिराच्या वैभवात वाढ झाली. १५१७ मध्ये कृष्णदेवराय राजाने दिलेल्या दानाने गर्भगृहाच्या शिखराला सोन्याचा थर देण्यात आला. मराठा सेनापती रघुजी भोसले यांनी मंदिराच्या कायमस्वरुपी देखभालीची व्यवस्था केली. त्यानंतर म्हैसूर व गदवल संस्थानांद्वारे ही मंदिराला मोठ्या देणग्या मिळाल्या. ब्रिटिश काळात मंदिराचे प्रशासन येथिल हाथिरामजी मठाला सोपवण्यात आले. ही व्यवस्था १९३३ पर्यंत सुरू होती. प्रशासकास विचरणकर्ता असे म्हणतात. १९३३ साली मद्रास विधानसभेच्या विशेष कायद्याअन्वये तिरुमला तिरुपती देवस्थानम समितीची स्थापना करण्यात आली. या समितीवर मद्रास सरकारतर्फे एक आयुक्त नेमलेला असे. सध्या देखील मंदिराची व्यवस्था तिरुमला तिरुपती देवस्थानमचे विश्वस्त पाहतात.

तिरुमला रांगा मध्ये एकूण ७ डोंगर आहेत. मंदिर मुख्य शहरापासून सडकरस्त्याने २० किंमी अंतरावर आहे. बरेचसे यात्रेकरु ११ किमीची चढाई करणे देखील पसंत करतात. येथे रोज जवळपास ५०,००० दर्शनार्थी असतात.

तिरुपतीमधील मंदिरे

श्री पद्मावती अम्मावरी मंदिर, तिरुचानूर (अलमेलुमंगपुरम) तिरुपतिशहरापासून सुमारे पाच किलोमीटर दूर अंतरावर आहे.असे म्हणतात की या मंदिराला दर्शनाशिवाय तिरुमलात् संपूर्ण मंदिराचे करावा लागतो.हे मंदिर भगवान वेंकटेश्वराच्या पत्नी पद्मावतीचे आहे. भगवान वेंकटेश्वर, विष्णूचा अवतार आणि पद्मावती स्वतः लक्ष्मीचे अंशअवतार मानला जातो .पद्मावती देवीचे मंदिर सर्वात महत्त्वाचे मानले जाते. मंदिरात विराजमान असलेल्या देवीच्या मूर्तीमध्ये पद्मावती देवी कमळांच्या आसनावर बसल्या आहेत, ज्यामध्ये तिचे दोन्ही हात कमळांच्या फुलांनी सजलेले आहेत.

वकुला देवी मंदिर, मातृप्रेमाचे प्रतीक म्हणून, तिच्या नावाचे एक मंदिर सुमारे ३०० वर्षांपूर्वी पेरूरुबांडा टेकडीवर बांधले गेले आहे, पेरूर हे गाव तिरुमला टेकड्यांपासून २७ किलोमीटर आणि तिरुपतीपासून १० किमी अंतरावर वकुला देवीचे मंदिर आहे,वकुला देवी भगवान वेंकटेश्वराची पालक आई आहेत. तिरुमला पौराणिकनुसार द्वापर युगात्, भगवान श्रीकृष्णाची (भगवान विष्णूचे अवतार) पालक यशोदा आई होती,श्रीकृष्णाचा विवाहात यशोदेला बोलवलं नव्हत .श्रीकृष्णानीं वचन दिले कि, "कलियुगात मी श्रीनिवास म्हणून अवतार घेईन. मी तुला शेषाद्री येथे भेटणार आहे. तुला वकुलादेवी म्हणून ओळखले जाईल आणि तेथे श्री वराहस्वामींची पूजा करावी लागेल. त्या अवतारात तुमची इच्छा पूर्ण होईल. मग तू माझा आणि पद्मावती कल्याण विवाहामध्ये उपस्थिता आहे .

वरदराज मंदिर,वरदराज स्वामी विष्णूचा अवतार, तिरुमाला वेंकटेश्वर मंदिरातील वरदराजा मंदिर आहे. मंदिर प्रवेश करताना मंदिर वेंदिवाकिलीच्या (चांदीच्या प्रवेशद्वाराच्या) डावीकडे, विमानप्रदक्षिणाममध्ये आहे. पश्चिमेला तोंड देऊन बसलेले आहेत.

योग नरसिंह मंदिर, हे एक उप-मंदिर आहे, सिंह विष्णूचा चौथा अवतार आहे. असे म्हटले जाते की हे मंदिर ईसवी १३३० - १३६० दरम्यान बांधले गेले आहे आणि मंदिरात प्रवेश करताना वेंदिवाकिली (चांदीच्या प्रवेशद्वारा)च्या उजवीकडे, विमानप्रदक्षिणम येथे आहे. देवता पश्चिम दिशेने बसून-ध्यान ध्यानात आहे.

भू-वराह स्वामी मंदिर, वराह हा विष्णूचा ३रा अवतार आहे. हे मंदिर श्री वेंकटेश्वर मंदिरापेक्षा जुने आहे. हे मंदिर पुष्करणी ह्या पवित्र जलकुंडाच्या उत्तरेकडील किनाऱ्यावर वसलेले आहे. परंपरेनुसार, मुख्य मंदिरात भगवान वेंकटेश्वरला नैवेद्य अर्पण करण्यापूर्वी तो भू-वराह स्वामींना अर्पण करतात. तसेच परंपरेनुसार, भक्तांना पहिले भू-वराह स्वामींचे दर्शन घेतले पाहिजे, मग वेंकटेश्वराचे.

गरुडमंथा मंदिर,विष्णूचे वाहन गरुडराज गरुड वैनतेय, भगवान वेंकटेश्वराचे वाहन गरुड, छोटे मंदिर, जया-विजयाच्या बंगारुवाकिली (सुवर्ण प्रवेशद्वार)च्या अगदी अगदी समोर आहे. हे उप-स्थळ गरुडमंडपमचा एक भाग आहे. गरुडमंथा देवता सहा फूट उंच आहे आणि पश्चिमेकडे गर्भगृहात भगवान वेंकटेश्वराकडे पहात आहे.

तिरुपती बालाजी 
तिरुमलाच्या पायथ्याशी भगवान वेंकटेश्वराचे गरुड वाहन.

उत्सव

ब्राह्मोत्सवम हा येथील मुख्य उत्सव आहे.

चित्रदालन

संदर्भ

Tags:

तिरुपती बालाजी मूर्तीतिरुपती बालाजी इतिहासतिरुपती बालाजी तिरुपतीमधील मंदिरेतिरुपती बालाजी उत्सवतिरुपती बालाजी चित्रदालनतिरुपती बालाजी संदर्भतिरुपती बालाजीतिरुपतीतेलुगूविष्णू

🔥 Trending searches on Wiki मराठी:

शिवनेरीमुख्य उपनिषदेकुष्ठरोगमानसशास्त्रभारतीय संविधानाची उद्देशिकामुख्यमंत्रीयोनीउन्हाळानागपूर लोकसभा मतदारसंघक्लिओपात्रामाहितीक्रिकेटचा इतिहासख्रिश्चन धर्मस्त्री नसबंदी शस्त्रक्रियाकल्याण (शहर)२०१९ लोकसभा निवडणुकामहाराष्ट्राची अर्थव्यवस्थाइस्रायलनिबंधश्यामची आईजीवनसत्त्वहिंदू लग्नतरसक्रियापदलॉरेन्स बिश्नोईभारत छोडो आंदोलनविनयभंगअश्वत्थामाठाणे जिल्हाभारताचा इतिहासपसायदानअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९ययाति (कादंबरी)पोहरादेवीठाणे लोकसभा मतदारसंघदक्षिण दिशानर्मदा बचाओ आंदोलनमहेंद्र सिंह धोनीअमरावतीजत विधानसभा मतदारसंघसंगणक विज्ञानपर्यावरणशास्त्रभारतातील जिल्ह्यांची यादीमहाविकास आघाडीगोरा कुंभारपहिले महायुद्धछत्रपती संभाजीनगरमराठी लिपीतील वर्णमालामहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगविहीरपरभणी लोकसभा मतदारसंघबैलगाडा शर्यततूरथोरले बाजीराव पेशवेआळंदीहातकणंगले लोकसभा मतदारसंघभारतरत्‍नजैवविविधतामहात्मा गांधीसुभाषचंद्र बोसरामटेक लोकसभा मतदारसंघभौगोलिक माहिती प्रणालीगजानन महाराजविष्णुसहस्रनामचंद्रराम मंदिर (अयोध्या)पुन्हा कर्तव्य आहेमहाराष्ट्र लोकसेवा आयोगविजयसिंह मोहिते-पाटीलतैनाती फौजराजपत्रित अधिकारीखरबूजअप्पासाहेब पवारटोपणनावानुसार मराठी लेखकलोकमान्य टिळकसोनारअयोध्यानाटकाचे घटकव्यवस्थापन🡆 More