सहा ऋतू व त्यांचे मराठी महिने

ऋतू आणि मराठी महिने-

१. वसंत – चैत्र, वैशाख

२. ग्रीष्म – ज्येष्ठ, आषाढ

३. वर्षा – श्रावण, भाद्रपद

४. शरद – आश्विन, कार्तिक

५. हेमंत – मार्गशीर्ष, पौष

६. शिशिर – माघ, फाल्गुन

महिने आणि ऋतू यांची समीकरणातून विविध सण आणि व्रते भारतीय परंपरेत साजरी केली जातात.

वसंत ऋतूत गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती, बुद्ध पौर्णिमा, वसंत पंचमी इत्यादी व्रते साजरी होतात.

ग्रीष्म ऋतूत वटपौर्णिमा, आषाढी एकादशी अशी व्रते येतात.

वर्षा ऋतूत नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, हरितालिका, गणेश चतुर्थी अशी व्रते केली जातात.

शरद ऋतूत देवीचे शारदीय नवरात्र, कोजागिरी पौर्णिमा, दीपावली असे सण येतात.

हेमंत ऋतूत मार्गशीर्ष गुरुवार व्रत, दत्त जयंती, मकर संक्रांती अशी व्रते केली जातात.

शिशिर ऋतूत माघी गणेश जयंती, होळी, रंगपंचमी असे सण व व्रते केली जातात.

चैत्र महिना

चैत्र महिना म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात होय. या महिन्यामधे येणारे सण – १) गुढीपाडवा. २) चैत्रगौर. प्रथम गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तापैकी शुभ दिवस आहे. काहीवेळा चैत्रगौर बसवताना चैत्रशुद्ध तृतिया या दिवशी अशौच (सुतक इ.) आले असता अशा वेळेला चैत्रकृष्ण तृतियेला चैत्रगौर बसवावी.

वैशाख महिना

या महिन्यात अक्षय्य तृतिया हा शुभ दिवस आहे. अक्षय्य तृतियेला पितरांचे श्राद्ध, केले जाते म्हणून हा दिवस शुभ मानत नाहीत, परंतु ही समजूत पूर्ण चुकीची आहे. या दिवशी श्राद्ध, तर्पण, दान, जप इ. केल्याने अक्षय्य फल प्राप्त करून देणारा हा शुभ दिवस आहे.

ज्येष्ठ महिना

या महिन्यात वटपौर्णिमा व मंगळागौरी हे सण येतात. वटपौर्णिमेच्या पूजनासाठी सायंकाळी पौर्णिमा असलेला दिवस घ्यावा. काहीवेळेला दुपारनंतर पौर्णिमा सुरू होते म्हणून सकाळी पूजा करत नाही. पूजनाच्या वेळी पौर्णिमा पाहिजे हा समज चुकीचा आहे. नवविवाहित स्त्रियांचा सण म्हणजे मंगळागौरीची पूजा. या व्रताचे महत्त्व म्हणजे अखंड सौभाग्य मिळावे म्हणून हे व्रत केले जाते. “जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून हे व्रत केले जाते” ही समजूत चुकीची आहे. (गरोदर स्त्री प्रसूत होईपर्यंत वटसावित्री, हरितालिका, मंगळागौरी पूजन करू शकते.)

आषाढ महिना

या महिन्यापासून चातुर्मास प्रारंभ होतो. चातुर्मासात जे सण, उत्सव आहेत त्याची माहिती पुढे येईलच. चातुर्मासाचे व्रत जे लोक करतात त्यांनी आषाढ शुद्ध द्वादशी पासून किंवा पौर्णिमेपासून प्रारंभ करण्यास हरकत नाही.

श्रावण महिना

या महिन्यात रक्षाबंधन हा विधी येतो. यामधे बहीण भाउरायाचे औक्षण करून त्याला राखी बांधते. मंगळागौरीच्या दिवशी संकष्टी, एकादशी किंवा वाराचा उपवास आल्यास नैवेद्यामध्ये उपवासाला चालणारा पदार्थ करून वाढावा व उपवासकरणाऱ्या वक्तीने प्रसाद म्हणून भक्षण करावा.

भाद्रपद महिना

लहान थोर सर्वांना आवडणारा सण म्हणजे पार्थिव गणेश स्थापना (गणपती) या महिन्यात शुद्ध चतुर्थिला पार्थिव गणेश स्थापना व पूजन केले जाते. पहाटेपासून दुपार होईपर्यंत कोणत्याहीवेळी करण्यास हरकत नाही यासाठी विशिष्ट मुहूर्त नसतो.गणेश स्थापना पहाटॆ झाली असेल तरिही भोजनाचा नैवेद्य दुपारी १२:३० नंतर दाखवावा. उजव्या सोंडेचा गणपती कडक आणि डाव्या सोंडेचा सौम्य अशी समजूत असणे चुकीचे आहे. ॥भाद्रपद शुद्ध चतुर्थी हा दिवस गणेश स्थापनेसाठी असल्याने काही कारणास्तव जमले नाही तर पुढे गणपती बसवू नये. एक वर्षी लोप झालेला चालेल. पुढच्या वर्षी गणेश स्थापना करण्यास काहिच हरकत नाही. ॥ज्या लोकांकडे १० दिवस गणपती असतात त्यांना काही कारणाने १० दिवस गणपती ठेवणे शक्य नसेल तर एक, दीड, पाच, सात दिवस गणपती ठेवून विसर्जन करता येते. ॥ ज्यांच्याकडे गौरी गणपती विसर्जन असते त्यांनी कितव्याही दिवशी गौरी विर्सजन आले तरी त्याच दिवशी गौरी गणपती विर्सजन करावे. ॥ घरी गणपती स्थापना झाल्यावर सोयर, सूतक आल्यास लगेच दुसऱ्याकडून गणपति विर्सजन करावा. ॥ उत्सवात मूर्ती भंग झाल्यास लगेच विर्सजन करावे. त्यानंतर त्या उत्सवात परत गणपति आणून पुजू नये. पुढील वर्षी आणावा. ॥ गणेशाची उत्तरपूजा झाल्यावर विर्सजन करण्याआधी पुन्हा आरती करण्याची जरूरी नाही. ॥ भाद्रपद गौरी. काहीजणांकडे खड्याच्या, सुगडावरती, उभ्या असतत. जस कुळाचार असल तशा प्रकारे गौरी पूजन कराव.

पितृपक्ष

एक वर्ष पूर्ण झाल्यावरती म्हणजे वर्षश्राद्ध झाले की येणाऱ्या पितृपक्षात महालय, भरणीश्राद्ध, अविधवा नवमी श्राद्ध करावे. पितृपक्षात पितरांसाठी श्राद्ध इ. करावे असे सांगितले आहे. म्हणून इतर कामे, नवीन व्यवहार, वाहन घेणे, शेतीची कामे इ. करू नये हे चुकीचे आहे. श्राद्धकर्म अशुभ मानणे चुकीचे आहे. आपल्या पूर्वज्यांच्या तुष्टी करिता श्राद्ध इ. करावे

आश्विन महिना

या महिन्यात नवरात्रीचा सण येतो. नवरात्र म्हणजे अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी पर्यंत केले जाणारे धार्मिक कार्ये. अशावेळी तिथीच्या क्षय किंवा वृद्धी मुळे नवरात्र ८ ते १० दिवसांचे होउ शकते.

कार्तिक महिना

या महिन्यात दिवाळी हा सण असतो. त्याच्या अंतर्गत भाउबीज असते.

मार्गशीर्ष महिना

या महिन्यात दत्तजयंती हा उत्सव असतो. दत्तजयंती काही ठिकाणी चतुर्दशी किंवा पौर्णिमेला साजरी करतात. प्रथेप्रमाणे हा उत्सव करावा. या उत्सवात दत्तजयंतीच्या आधी सहा दिवस गुरुचरित्राचे पारायण सुरू करतात. म्हणजे सातव्या दिवशी समाप्तीचा दिवस येतो. त्यादिवशी पारायण संपल्यावर नैवद्य दाखवून उपवास सोडवावा.

पौष महिना

पौष महिन्यात मंगलकार्ये करू नयेत असा समज आहे तो चुकीचा आहे. फ़क्त विवाहासाठी मकरसंक्राती नंतरचा महिना घ्यावा असं म्हणतात. परंतु वास्तुशांती, बारसे, डोहाळेजेवण, साखरपुडा इ. सर्व मंगलकार्यासाठी पौष महिना शुभ आहे.

माघ महिना

माघीगणेश उत्सव या महिन्यात होतो.

फ़ाल्गुन महिना

फ़ाल्गुन महिन्यात मंगलकार्ये न करण्याची प्रथा आहे परंतु याला शास्त्राधार नाही.वर्षभराची शुभकामना करूया.

संकल्पना

ऋतू या शब्दाची व्याख्या-सौरं मासद्वयं राम ऋतुरित्यभिधीयते | हे रामा, सौर मासद्वयाला ऋतू असे म्हणतात असे पुरुषार्थ चिन्तामणि ग्रंथात सांगिले आहे. ऋतू हे सूर्याच्या गतीवर अवलंबून असतात. सध्या आपण चैत्र-वैशाख=वसंत ऋतू अशी गणना करीत असलो तरी ऋतू हे चंद्रमासावर अवलंबून नसून ते सौरमासावर म्हणजे सूर्य संक्रांतीवर अवलंबून असतात.

प्राचीन साहित्यात

मुखं वा एतत् ऋतूनां यद् वसन्त:-वसंत हे ऋतूंचे मुख होय असे तैत्तिरीय ब्राह्मण या ग्रंथात सांगितले आहे. गीतेमध्ये ऋत्तूनां कुसुमाकर: (ऋतूंमध्ये मी वसंत आहे) असे श्रीकृष्ण म्हणतात.

तैत्तिरीय ब्राह्मण या ग्रंथात सांगितले आहे की तस्य ते वसन्त: शिर:| ग्रीष्मो दक्षिण: पक्ष:| वर्षा: पुच्छम्|शरद उत्तर: पक्ष:| हेमन्तो मध्यम्| म्हणजे वसंत हे संवत्सररूपी पक्ष्याचे मस्तक, ग्रीष्म उजवा पंख, वर्षा हे शेपूट, शरद डावा पंख, व हेमंत मध्य होय.

वर्षातल्या तीन ऋतूंच्या प्रारंभी तीन यज्ञ करण्याची बुद्धपूर्व भारतीयांची चाल होती. पुढे बुद्धाने थोडासा फरक करून तीच कल्पना स्वीकारली. वर्षाचे विविध हंगाम अशा अर्थी ऋतू हा शब्द ऋग्वेदात आला आहे पण तिथे तीनच ऋतूंचा उल्लेख आढळतो. चार महिन्यांचा एक ऋतू अशी त्यांची योजना आहे. वसंत, ग्रीष्म, शरद हे ते तीन ऋतू होत. महाकवी कालिदासाचे ऋतुसंहार हे संस्कृत काव्य प्रसिद्ध आहे.

सहा ऋतू व त्यांचे प्रचलित मान्यता असलेले चांद्र महिने

सहा ऋतूचीं माहिती :-

- वसंत : चैत्र, वैशाख.उन्हाळा

- ग्रीष्म : ज्येष्ठ, आषाढ.उन्हाळा

- वर्षा: श्रावण, भाद्रपद.पावसाळा

- शरद : आश्विन, कार्तिक.पावसाळा

- हेमंत : मार्गशीर्ष, पौष.हिवाळा

- शिशिर : माघ, फाल्गुन.हिवाळा

महिने आणि ऋतू यांच्या समीकरणातून विविध सण आणि व्रते भारतीय परंपरेत साजरी केली जातात.

वसंत ऋतूत गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती, बुद्ध पौर्णिमा ,वसंत पंचमी ही व्रते साजरी होतात.

ग्रीष्म ऋतूत वटपौर्णिमा, आषाढी एकादशी अशी व्रते येतात.

वर्षा ऋतूत नारळी पौर्णमा, रक्षाबंधन, हरितालिका, गणेश चतुर्थी अशी व्रते केली जातात.

शरद ऋतूत देवीचे शारदीय नवरात्र, कोजागिरी पौर्णिमा, दीपावली असे सण येतात.

हेमंत ऋतूत मार्गशीर्ष गुरुवार व्रत, दत्त जयंती ,मकर संक्रांती अशी व्रते केली जातात.

शिशिर ऋतूत माघी गणेश जयंती, होळी, रंगपंचमी असे सण व व्रते केली जातात.

चित्रदालन

Tags:

सहा ऋतू व त्यांचे मराठी महिने चैत्र महिनासहा ऋतू व त्यांचे मराठी महिने वैशाख महिनासहा ऋतू व त्यांचे मराठी महिने ज्येष्ठ महिनासहा ऋतू व त्यांचे मराठी महिने आषाढ महिनासहा ऋतू व त्यांचे मराठी महिने श्रावण महिनासहा ऋतू व त्यांचे मराठी महिने भाद्रपद महिनासहा ऋतू व त्यांचे मराठी महिने पितृपक्षसहा ऋतू व त्यांचे मराठी महिने आश्विन महिनासहा ऋतू व त्यांचे मराठी महिने कार्तिक महिनासहा ऋतू व त्यांचे मराठी महिने मार्गशीर्ष महिनासहा ऋतू व त्यांचे मराठी महिने पौष महिनासहा ऋतू व त्यांचे मराठी महिने माघ महिनासहा ऋतू व त्यांचे मराठी महिने फ़ाल्गुन महिनासहा ऋतू व त्यांचे मराठी महिने संकल्पनासहा ऋतू व त्यांचे मराठी महिने प्राचीन साहित्यातसहा ऋतू व त्यांचे मराठी महिने सहा ऋतू व त्यांचे प्रचलित मान्यता असलेले चांद्र महिनेसहा ऋतू व त्यांचे मराठी महिने चित्रदालनसहा ऋतू व त्यांचे मराठी महिने

🔥 Trending searches on Wiki मराठी:

साखरमदर तेरेसाससासंभाजी भोसलेगरुडवडसंदेशवहनसिंहगडभारताची संविधान सभावीर सावरकर (चित्रपट)हिंदू धर्मातील अंतिम विधीताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पविठ्ठल रामजी शिंदेमराठी भाषेमधील साहित्यिकांची यादीगहूलावणीइतर मागास वर्गमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगवर्धमान महावीरजलप्रदूषणयेशू ख्रिस्तअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादीस्थानिक स्वराज्य संस्थामहाराष्ट्र नवनिर्माण सेनायोगासनमहाराष्ट्रातील खासदारांची यादीबदकमणिपूरसौर ऊर्जामावळ लोकसभा मतदारसंघदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघलोहगडमासिक पाळीकबीरभीमाशंकरहनुमान चालीसाचित्ताकल्याण (शहर)भारताचे सर्वोच्च न्यायालयव्यायामजैन धर्मक्लिओपात्राविज्ञानएम.ए. चिदंबरम स्टेडियम (चेन्नई)आईतुळजाभवानी मंदिरआलेमाझी जन्मठेपबाराखडीमहाबळेश्वरअंशकालीन कर्मचारीबुद्धिबळपाऊसकुलाबा किल्लालोकसभा सदस्यकोरफडनृत्यमाढा लोकसभा मतदारसंघसर्वेपल्ली राधाकृष्णनधर्मनिरपेक्षताजास्वंदबालविवाहदिवाळीदहशतवादराजगडतलाठीदौलताबादपी.टी. उषापवन ऊर्जातानाजी मालुसरेएकांकिकापक्षीयशवंत आंबेडकरब्राझीलचा इतिहासमूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्याचा हक्क (कलम ३२)सूर्यनमस्कारकोयना धरणभारताचा ध्वजकेंद्रशासित प्रदेश🡆 More