उद्धव ठाकरे

उद्धव बाळासाहेब ठाकरे (२७ जुलै १९६०) हे महाराष्ट्रातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत.

इ.स. २००३ साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व तत्कालीन शिवसेना नेते राज ठाकरे यांच्याकडून शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची सूत्रे उद्धव ठाकरे यांच्या कडे देण्यात आली. ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्र राज्याचे १९वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. १४ मे २०२० उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली. २९ जून २०२२ रोजी आघाडी सरकार अल्पमतात गेल्याने त्यांनी मुख्यमंत्री पदाचा तसेच आमदारकीचा राजीनामा दिला.

उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे

कार्यकाळ
२८ नोव्हेंबर २०१९ – २९ जून २०२२
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी
मागील देवेंद्र फडणवीस
पुढील एकनाथ शिंदे

जन्म २७ जुलै, १९६० (1960-07-27) (वय: ६३)
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
आई मीना ठाकरे
वडील बाळासाहेब ठाकरे
नाते ठाकरे कुटुंब
अपत्ये आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे
धर्म हिंदू धर्म
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ

शिवसेनेची हिंसक संघटना अशी प्रतिमा बदलून सुसंघटित पक्ष अशी नवीन ओळख देण्यात उद्धव ठाकरे यशस्वी झाले. एक उत्तम संघटित आणि सुसज्ज राजकीय पक्ष निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.

उद्धव ठाकरे हे निपुण छायाचित्रकार देखील आहेत. त्यांच्याकडे महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांची यशस्वी छायाचित्र प्रदर्शने आहेत. त्यांनी "महाराष्ट्र देशा" (२०१०) आणि "पहावा विठ्ठल" (२०११) नावाची दोन छायाचित्रांची पुस्तके देखील प्रकाशित केली आहेत.

जन्म आणि सुरुवातीचे जीवन

उद्धव यांचा जन्म 27 जुलै 1960 रोजी चांद्रसेनीय कायस्थ प्रभू कुटुंबात झाला होता. ते बाळ ठाकरे आणि त्यांची पत्नी मीना ठाकरे यांचे पुत्र आहेत. उद्वव ठाकरे यांनी आपले शिक्षण बालमोहन विद्यामंदिर मधून केले. पुढे मुंबईतील सर जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट मधून पदवी मिळवली

राजकीय कारकीर्द

आरंभीच्या काळात उद्धव ठाकरे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्राच्या कामकाजात सक्रिय होते. निवडणुकांच्या काळात शिवसेनेच्या प्रचारयंत्रणेतही त्यांचा सहभाग असे. इ.स. २००२ साली बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांत शिवसेनेला विजयश्री व त्यासह सत्ताही लाभली. पुढील वर्षी इ.स. २००३ साली त्यांच्याकडे शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची सूत्रे सोपवण्यात आली. मात्र या काळात तत्कालीन शिवसेनेतील प्रमुख नेते नारायण राणे व उद्धव ठाकरे यांच्यादरम्यान मतभेद वाढत राहिले आणि अखेरीस नारायण राणे यांची पक्षातून हकालपट्टी झाली[ संदर्भ हवा ]. उद्धव ठाकरे व त्यांचे चुलतभाऊ राज ठाकरे यांच्यातील दरीही रुंदावत गेली; परिणामी इ.स. २००६ साली राज ठाकरे यांनी शिवसेना नेते पदाचा राजीनामा दिला व महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नव्या पक्षाची स्थापना केली [ संदर्भ हवा ]. २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाशी युती न करता उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे ६३ आमदार निवडून आणले.२०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा भाजप बरोबर युती करून निवडणूक लढवली व ५६: आमदार निवडून आणले! पण सत्ता वाटप करण्यात वाद निर्माण झाल्यामुळे युती तुटली व उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आय सोबत महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन केले व राज्याच्या १९ व्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली. २१ जून २०२२ रोजी शिवसेनेतील एकनाथ शिंदे सह 40 आमदारांनी केलेल्या बंडाची परिणीती म्हणून २९ जून २०२२ रोजी त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.

कौटुंबिक

उद्धव ठाकरे यांच्या पत्नीचे नाव रश्मी आणि पुत्रांची नावे आदित्य व तेजस आहेत.

छायाचित्रण

उद्धव ठाकरे हे निपुण छायाचित्रकार देखील आहेत. त्यांच्याकडे महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांची यशस्वी छायाचित्र प्रदर्शने आहेत. त्यांनी "महाराष्ट्र देशा" (2010) आणि "पहावा विठ्ठल" (2011) नावाची दोन छायाचित्रांची पुस्तके देखील प्रकाशित केली आहेत. या पुस्तकांमध्ये महाराष्ट्राचे पैलू आणि पंढरपूर यात्रेतील वारकऱ्यांचे चित्रण आहे.

पुस्तके

ठाकरेंवरील पुस्तके

  • ठाकरे विरुद्ध ठाकरे : उद्धव, राज आणि त्यांच्या सेनांच्या सावल्या (मूळ इंग्रजी लेखक - धवल कुलकर्णी, मराठी भाषांतर - डॉ. सदानंद बोरसे, शिरीष सहस्रबुद्धे)

ठाकरेंची ग्रंथ संपदा

  • महाराष्ट्र देशा
  • पहावा विठ्ठल

हे दोन्ही छायाचित्र संग्रह आहेत. महाराष्ट्र देशामध्ये उद्धव ठाकरे यांनी शिवाजी महाराजांचे गड किल्ले आणि त्यांच्याही शेकडो वर्षे आधीच्या किल्ल्यांची एरियल फोटोग्राफी केली आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी हे फोटो घेतले असून या दरम्यान एकदा त्यांचा सेफ्टी बेल्टही निसटला होता मात्र सुरक्षितपने त्यांनी फोटोग्राफी केली. पहावा विठ्ठल मध्ये महाराष्ट्राची सर्व धर्म जातींना एकत्र घेऊन जाणारी, सर्वांना समतेचे तत्त्वज्ञान शिववणारी भागवत धर्माची सांस्कृतिक परंपरा असलेली विठ्ठलाच्या वारीचे छायाचित्रण आहे. यामध्येही ठाकरे यांनी एरियल फोटोग्राफीला प्राधान्य दिले आहे. पुणे जिल्ह्यात दिवाघाटात जगतगुरू तुकोबा महाराज यांच्या पालखी सोबतच्या लाखो भाविकांचे छायाचित्र घेताना भारताच्या नकाशाची आठवण होईल असे छायाचित्र घेतले आहे.[ संदर्भ हवा ]

बाह्य दुवे

  • "संग्रहित प्रत" (इंग्रजी व मराठी भाषेत). Archived from the original on 2012-04-28. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)

Tags:

उद्धव ठाकरे जन्म आणि सुरुवातीचे जीवनउद्धव ठाकरे राजकीय कारकीर्दउद्धव ठाकरे कौटुंबिकउद्धव ठाकरे छायाचित्रणउद्धव ठाकरे पुस्तकेउद्धव ठाकरे बाह्य दुवेउद्धव ठाकरेबाळासाहेब ठाकरेमहाराष्ट्र विधान परिषदमहाराष्ट्राचे मुख्यमंत्रीमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीराज ठाकरेशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेमावळ लोकसभा मतदारसंघकाकडीविंचूअतिसारमहाराष्ट्रातील आरक्षणएकनाथविजयादशमीराष्ट्रवादसुधीर मुनगंटीवारतानाजी मालुसरेसर्वनामडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनक्रमपरभणी जिल्हाछावा (कादंबरी)चैत्रगौरीपुष्यमित्र शुंगगडचिरोली जिल्हाप्रकाश आंबेडकरतरसरोहित शर्माजगदीश खेबुडकरचोखामेळाभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेकेंद्रशासित प्रदेशरणजित नाईक-निंबाळकरवर्णइ-बँकिंगमहिलांसाठीचे कायदेनातीबारामती लोकसभा मतदारसंघमानवी विकास निर्देशांकताज महालउच्च रक्तदाबसिंधुदुर्गमुखपृष्ठप्रेरणापुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरमहाराष्ट्रातील पर्यटनराजू शेट्टीपृथ्वीच्या अंतरंगाची रचना२०२४ लोकसभा निवडणुकाहिंदू कोड बिलविजयसिंह मोहिते-पाटीलकोल्हापूरराजाराम भोसलेदिंडोरी लोकसभा मतदारसंघकर्करोगश्रीकांत शिंदेरामटेक लोकसभा मतदारसंघभारतातील शासकीय योजनांची यादीमुख्यमंत्रीगोवामहाड सत्याग्रहमराठी व्याकरणवाल्मिकी ऋषीरक्षा खडसेसाहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांची यादी (मराठी)कुषाण साम्राज्यसूर्यमालासिंधुताई सपकाळभारताची अर्थव्यवस्थासप्तशृंगी देवीभीम जन्मभूमीताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पग्रीसकायदान्यायालयीन सक्रियताराज ठाकरेराम गणेश गडकरीसूर्यनमस्कारहिंदू विवाह कायदापक्षांतरबंदी कायदा (भारत)गूगलविधिमंडळवर्णमालाइतिहासाच्या अभ्यासाची साधनेमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादी🡆 More