इंदूर

इंदूर हे भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे.

इंदूर हे मध्य प्रदेशाच्या भोपाळ ह्या राजधानीच्या शहरापासून २०० किमी पश्चिमेला आहे. हे शहर इंदूर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण/मुख्यालय आहे. या शहराची लोकसंख्या मध्य प्रदेशात सर्वात जास्त आहे. या शहराला मध्यप्रदेशाची वाणिज्य राजधानी समजतात. मध्यप्रदेश राज्यातीलच नाही तर संपूर्ण देशातील बरेच लोक शिक्षणासाठी चांगला पर्याय म्हणून इंदूरला येतात. इंदूर हे शहर बरेच पुरातन आहे. पहिल्या बाजीरावांसोबत मराठी सरदार जेव्हा उत्तर दिग्विजय करत होते तेव्हा माळवा या प्रांतातील इंदूर या शहराची जहागिरी त्यांनी मल्हारराव होळकर यांना दिली. त्यानंतर उत्तरोत्तर या शहराचा विकास होत गेला. मल्हारराव यांचा मुलगा खंडेराव हे युद्धात वीरगती प्राप्त झाल्यावर त्यांच्या सुनेने - महाराणी अहिल्यादेवी होळकर यांनी राज्यकारभार सांभाळला. त्या एक उत्तम राज्यकर्त्या म्हणून प्रसिद्ध झाल्या. अहिल्यादेेवींचा महेश्वरचा राजवाडा अतिशय प्रेक्षणीय आहे. आजही सुस्थितीत असलेल्या मोजक्या राजवाड्यांत त्याची गणना होते.

इंदूर
भारतामधील शहर

इंदूर
होळकर राजवाडा
इंदूर is located in मध्य प्रदेश
इंदूर
इंदूर
इंदूरचे मध्य प्रदेशमधील स्थान
इंदूर is located in भारत
इंदूर
इंदूर
इंदूरचे भारतमधील स्थान

गुणक: 22°43′0″N 75°50′50″E / 22.71667°N 75.84722°E / 22.71667; 75.84722

देश भारत ध्वज भारत
राज्य मध्य प्रदेश
जिल्हा इंदूर जिल्हा
क्षेत्रफळ ३८९.८ चौ. किमी (१५०.५ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १,८१४ फूट (५५३ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर २१,६०,६३१
  - घनता ८४१ /चौ. किमी (२,१८० /चौ. मैल)
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ


होळकरांचा राजवाडा इंदूरच्या मध्यात उभा आहे. इंदूर शहराचे हवामान अतिशय उष्ण व कोरडे आहे, आणि तापमान विषम आहे, म्हणजे हिवाळा अतिशय थंड असतो व उन्हाळा खूप गरम. इंदूर एक औद्योगिक क्षेत्र आहे व भारतातील ३ मोठ्या स्टाॅक एक्सचेंजपैकी एक असलेले स्टाॅक एक्सचेंज येथे आहे. शहरात ५००० छोटे मोठे उद्योग आहेत. मध्यप्रदेशामधील सर्वात जास्त वित्त या शहरातून मिळते.

वैशिष्ट्ये

इंदूर शहर तसे फार पसरलेले आहे. पण वाहतूक व्यवस्था फार स्वस्त आहे. शहर जुने आणि नवे अशा दोन भागांत आहे. जुने गाव म्हणजे राजवाड्याच्या मागे. येथील कापड बाजार माहेश्वरी व चंदेरी साड्यांसाठी फार प्रसिद्ध आहे. तसेच खजराना नावाच्या भागात पुस्तकांचा बाजार आहे. या भागाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे भरणारा चाट बाजार (ऊर्फ सराफा). येथे संध्याकाळी सराफ बाजार बंद झाल्यावर त्यासमोरच खाद्य पदार्थांची दुकाने लागतात. छप्पन्न भोग नावाच्या एका भागात मिठायांची दुकाने आहेत.

संस्कृती

यशवन्त क्लब (इन्दूरचे कै. महाराजा यशवन्तराव द्वितीय होळकर यांच्या नावावर) आणि सयाजी क्लब / हॉटेल (स्व. महाराजा सयाजीराव (तिसरा) गायकवाड यांचे नाव बडोद्याचे गायकवाड) हे कला आणि संगीतासाठी मोठे प्रायोजक आहेत आणि जगभरातील प्रतिभांना आमंत्रित करतात. देवळालीकर कला विठिका, रविन्द्र नाट्य ग्रह (आरएनजी), माई मंगेशकर सभा गृृह, आनन्द मोहन माथुर सभागृह, डीएव्हीव्ही सभागृह आणि ब्रिलिएंट कन्व्हेन्शन सेंटर इन्दूरमधील प्रमुख कला केन्द्र आहेत.

शहरात चांगली वाढणारी रॉक / मेटल संगीत संस्कृती आहे. शहराच्या प्रारंभीच्या आणि प्रख्यात बॅंडपैकी एक असलेल्या निकोटीन, मध्य भारतात धातू संगीताचे प्रणेते म्हणून प्रसिद्ध आहे.

इंदूरमधील प्रेक्षणीय स्थळे

  • अटलबिहारी वाजपेयी पार्क - हे पिप्लयापाला पार्क किंवा इंदूर क्षेत्रीय पार्कच्या नावाने ओळखले जाते. हे इंदूर विकास प्राधिकरणाने विकसित केले आहे. संगीतमय कारंजा, जेट फवारे, धुक्याचे फवारे, फास्ट फूड झोन उद्यान, जैवविविधता उद्यान, नौका विहार इत्यादी आकर्षणांचे केंद्र आहे.
  • अन्नपूर्णा मंदिर - येथे प्रशस्त वेदपाठशाळा (वेदविद्यापीठ) वेदमंदिर सभागृह आहे. येथे मूर्तिरूप वेद आहेत. येथील अन्नपूर्णा देवीची यात्रा त्र्यंबकेश्वर येथे जाते.
  • अहिल्येश्वर मंदिर - कातळात उत्तम नक्षीकाम असलेली अनेक भित्तिशिल्पे हे ह्या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. मंदिरातून नर्मदा नदीत उतरणारा घाट आहे.
  • इंदूरचे महाराष्ट्र मंडळ व त्यांचे ग्रंथालय
  • कमला नेहरु प्राणी संग्रहालय- याला इंदूरमध्ये 'चिडियाघर' या नावाने ओळखले जाते. ४००० चौरस मीटरमध्ये पसरलेले हे संग्रहालय मध्य प्रदेशातील सर्वात जुने प्राणी संग्रहालयांतील एक आहे.
  • काच मंदिर - हे एक जैन मंदिर आहे. ते आतून काचेने सजवले आहे.
  • खजराना मंदिर - येथे गणपतीचे सुंदर मंदिर आहे हे विजयनगरच्या जवळच आहे. याला अहिल्याबाई होळकरांनी दक्षिणी शैलीत बनवून घेतले. हे इंदूरकरांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. येथे गणपतीबरोबरच दुर्गादेवी, लक्ष्मीदेवी, साईबाबा इत्यादी देवांची मन्दिरे आहेत.
  • गोमतगिरी - हे जैन तीर्थक्षेत्र आहे. हे स्थान स्वच्छ, सुबक आणि सुंदर आहे. येथील भव्य फरसबंद आवारात बाहुबलीची विशाल मूर्ती आहे.
  • जुना राजवाडा - हा वाडा होळकर घराण्याचा असून सात मजली आहे.
  • श्री दत्त मंदिर हरसिद्धी क्षेत्र - येथे वासुदेवानंद सरस्वती महाराज यांचे गंडाबंधन झाले होते.
  • नखराली ढाणी - इंदूर ते महू रस्त्यावर राऊमध्ये १९९५ पासून वसलेले, हे एक संस्कृती-ग्राम-निकेतन आहे. येथे प्रवेश करण्यासाठी शुल्क आहे. मात्र त्यात जेवणही समाविष्ट आहे. येथे राहण्याचीही व्यवस्था आहे.
  • नागर शहा वली दरगाह - नागर शहा वली दरगाहही जुन्या काळापासून अस्तित्वात आहे. हा दरगा हजरत सैय्यद गाजीबुद्दीन इराकी रहमत तुल्लाह यांचा आहे. ते इराकहून येथे आले होते. सध्या हा दरगा वक्फ बोर्डाच्या अधिपत्याखाली आहे.
  • पाताळपाणी
  • बाणेश्वर
  • मल्हारी मार्तंड मंदिर - शिवलिंग, मध्यभागी गणेशमूर्ती व नटराजमूर्ती येथे विराजमान आहेत. येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती आहे. होळकरांच्या राजघराण्याचे तपशील असलेले फलक येथे आहेत.
  • महेश्वर - सहस्रधारा धबधब्यासाठी प्रसिद्ध
  • मेघदूत गार्डन - हे शहरातील विजयनगर या भागात आहे. येथे कारंजा आहेत.
  • राजवाडा - गावात मध्यभागी आहे.
  • लालबाग महाल
  • सहस्रार्जुन मंदिर - सहस्रार्जुन महिष्मती नगरीचा प्राचीन सम्राट होता.
  • सिद्धकाली मंदिर

उद्योग

  • पीथमपूर- याच्या जवळपास १५०० लहान मोठे औद्योगिक सेट अप आहेत. येथे अनेक औषध उत्पादन कंपन्या आहेत. त्यांत इप्का लेबोरेटरीज, सिप्ला, ल्युपिन लिमिटेड यांचा समावेश होतो.
  • लक्ष्मीबाई औद्योगिक क्षेत्र राऊ
  • सांवेर - सातवा औद्योगिक बेल्ट. हा १००० एकरांत पसरलेला आहे.

मनोरंजन/चित्रपटगृहे

  • आयनाॅक्स सत्यम (सी २१ विजयनगर)
  • आयनाॅक्स (सपना संगीता)
  • आयनाॅक्स (सेंट्रल मॉल रीगल चौक)
  • कार्निव्हल

वाहतूक

देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ इंदूरपासून ८ किमी अंतरावर असून तो मध्यप्रदेशमधील सर्वात वर्दळीचा विमानतळ आहे. येथून दिल्ली, मुम्बई, पुणे, कोलकाता इत्यादी प्रमुख शहरांसाठी थेट विमानसेवा आहे. इंदूर रेल्वे स्थानक पश्चिम रेल्वेवरील वर्दळीचे रेल्वे स्थानक आहे. येथून इंदूर दुरंतो एक्सप्रेस, माळवा एक्सप्रेस, अवंतिका एक्सप्रेस, इत्यादी अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रोज सुटतात.

मुंबई ते आग्र्यादरम्यान असणारा राष्ट्रीय महामार्ग ३, अहमदाबाद ते इंदूरदरम्यान असणारा राष्ट्रीय महामार्ग ५९बैतुल ते इंदूरदरम्यान असणारा राष्ट्रीय महामार्ग ५९ ए हे राष्ट्रीय महामार्ग इंदूरमधून जातात. इंदूरमध्ये चांगल्या पद्धतीने विकसित परिवहन प्रणाली आहे.

हवामान

इंदूरमध्ये पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा असे तीन ऋतू असतात. मार्चच्या मध्यातून उन्हाळा सुरू होतो. कधी कधी तापमान ४८ अंश सेल्सियस पर्यंत जाते. तर पावसाळा जुलै ते सप्टेंबरपर्यंत असतो. जुलै ते सप्टेंबरमध्ये दक्षिण पूर्व मान्सूनमध्ये १८५ ते ३६० मिलीलीटर, ७.३ ते १४.२ इंच एवढा पाऊस असतो. पावसाळा मध्य जून ते मध्य सप्टेंबरपर्यंत असतो.

लोकसंख्या

इंदूर मध्यप्रदेशमधील सर्वात जास्त लोकसंख्याचे शहर आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'स्मार्ट सिटी' मिशनमध्ये ज्या १०० भारतीय शहरांना निवडले आहे, त्यांत इंदूरची निवड झाली आहे.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

Tags:

इंदूर वैशिष्ट्येइंदूर संस्कृतीइंदूर मधील प्रेक्षणीय स्थळेइंदूर उद्योगइंदूर मनोरंजनचित्रपटगृहेइंदूर वाहतूकइंदूर हवामानइंदूर लोकसंख्याइंदूर हे सुद्धा पहाइंदूर बाह्य दुवेइंदूरअहिल्यादेवी होळकरखंडेराव होळकरपहिले बाजीराव पेशवेभोपाळमध्य प्रदेशमल्हारराव होळकरमाळवा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

रामजी सकपाळअपारंपरिक ऊर्जास्रोतमराठी संतनीती आयोगईशान्य दिशालोकसंख्या घनताखंडोबामाहिती अधिकारअध्यक्षनवनीत राणाजेजुरीशिवाजी महाराजांची राजमुद्रावंजारीकोरेगावची लढाईलोकसंख्यायवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघकासारबसवेश्वरतैनाती फौजकरनांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघराज्य निवडणूक आयोगमहाराष्ट्र दिनशिवछत्रपती पुरस्कारइंदुरीकर महाराजरविकांत तुपकरलातूर लोकसभा मतदारसंघविष्णुसहस्रनामअंकिती बोसमहात्मा फुलेभाषा विकासभारतीय रेल्वेविजयसिंह मोहिते-पाटीलसम्राट अशोकअकोला पूर्व विधानसभा मतदारसंघभारतीय लष्करतुळजापूरज्ञानेश्वरीनाटकमाढा लोकसभा मतदारसंघअचलपूर विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीपुणेशनिवार वाडाराजरत्न आंबेडकरहस्तकलाफेसबुकबहावाशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकरावणऑक्सिजन चक्रनेतृत्वकोलकाता नाइट रायडर्स २०२२ संघकळसूबाई शिखरचीनआयुर्वेदत्र्यंबकेश्वरपारनेर विधानसभा मतदारसंघसोलापूर लोकसभा मतदारसंघशेतीशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीजंगलतोड आणि जागतिक तापमान वाढवृषभ रासनाशिक लोकसभा मतदारसंघसातारामहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीकोल्हापूरमराठी लिपीतील वर्णमालाजागतिक कामगार दिनगोलमेज परिषदभारताच्या सरन्यायाधीशांची यादीपृथ्वीचा इतिहासगोविंद विनायक करंदीकररशियन क्रांतीरशियाबेकारीवाक्यचाफामहाराष्ट्र टाइम्स🡆 More