राजरत्न आंबेडकर

डॉ.राजरत्न अशोक आंबेडकर (जन्म: ८ डिसेंबर १९८२) हे एक भारतीय सामाजिक व धार्मिक कार्यकर्ता, आणि राजकारणी आहेत.

ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चुलत पणतू आहेत. ते सध्या भारतीय बौद्ध महासभा या संघटनेचे अध्यक्ष आहेत, आणि या माध्यमातून ते बौद्ध धर्माच्या प्रचाराचे व प्रसाराचे काम करतात.

राजरत्न आंबेडकर
जन्म: ८ डिसेंबर १९८२
शिक्षण: मुंबई विद्यापीठ
देहरादून विद्यापीठ
आयसीएफएआय विद्यापीठ
अवगत भाषा: मराठी, हिंदी, इंग्रजी व अन्य
कार्यक्षेत्र: राजकारण, समाजकारण, धर्मप्रचार
धर्म: बौद्ध धर्म
वडील: अशोक आंबेडकर

वैयक्तिक जीवन

राजरत्न आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाऊ आनंदराव यांचे पणतू, मुकुंदराव आंबेडकर (बाबासाहेबांचे पुतणे) यांचे नातू तर अशोक आंबेडकर यांचे पुत्र होत.

शिक्षण

राजरत्न हे उच्चविद्याविभूषित आहेत. सन २००३ मध्ये मुंबई विद्यापीठातून ते बी.कॉम. झाले, सन २००८ इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड ॲंन्ड फायनन्शल अकाउंटंडंट ऑफ इंडिया - देहरादून विद्यापीठातून ते डी.बी.एम. झाले, आयसीएफएआय विद्यापीठातून सन २००८ मध्ये एडीएम व सन २०१० मध्ये एमबीए झाले. व्यवस्थापनात ॲडव्हान्स्ड पदविका, एमबीएपर्यंत शिकलेले आहेत. त्यांनी कंपनी सेक्रेटरी म्हणून एका कंपनीत उच्च पदावर काम केलेले आहे. नोकरीत असताना त्यांचे मन रमत नव्हते. अखेर त्यांनी धम्माला शरण जाण्याचा निर्णय घेतला.

धार्मिक कारकीर्द

भारतीय बौद्ध महासभा किंवा बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ही ४ मे १९५५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सुरू केलेली एक भारतातील राष्ट्रीय स्तरावरील बौद्ध संघटना आहे. याचे मुख्यालय मुंबई मध्ये असून सध्या या संघटनेचे चौथे व सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राजरत्न आंबेडकर कार्य करत आहेत. ही संघटना आंतरष्ट्रीय बौद्ध संघटना वर्ल्ड फिलोशिप ऑफ बुद्धिस्ट्सची सदस्य आहे.

२३ सप्टेंबर २०१५ रोजी, राजरत्न आंबेडकर यांनी नागपूर येथील इंदोरा बुद्धविहारात भदन्त आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्याद्वारे श्रामणेर दीक्षा ग्रहन केली होती. त्यानंतर त्यांचे "धम्म आंबेडकर" असे नामकरण करण्यात आले होते. राजरत्न यांनी यासाठी २३ सप्टेंबर या दिवसाची निवड केली होती कारण या तारखेलाच बाबासाहेबांना गुजरात (संकल्प भूमी) येथे अस्पृश्यतेबद्दल फार त्रास सहन करावा लागला होता. भारताला बौद्धमय करण्याचे स्वप्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बघितले होते. ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करण्याचा निर्णय घेतला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'बौद्ध' म्हणून बौद्ध धम्माची दीक्षा घेत जातींच्या दलदलीतून समाजाला बाहेर काढले. त्यामुळे बौद्धांनी परत स्वतःसाठी 'दलित' व 'नवबौद्ध' यासारखे शब्दप्रयोग करू नये, असे राजरत्न आंबेडकरांचे मत आहे. यापूर्वी असे मत यशवंत आंबेडकर यांनीही मांडले होते.

आंबेडकर आडनावाचा खरा इतिहास त्यांनी जगासमोर मांडला.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू डॉ.राजरत्न आंबेडकर यांनी संपूर्ण माहितीचा आढावा घेत, सातारा येथील प्रतापसिंह हायस्कूल मध्ये जाऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा दाखला प्राप्त केला.[ संदर्भ हवा ] त्यामध्ये "भिवा रामजी आंबेडकर" अशी नोंद आहे. आणि सोबतच त्यांचे मोठे बंधू आनंदराव आंबेडकर यांचा देखील दाखला प्राप्त केला. त्यांच्या नावाची नोंद "लक्ष्मण रामजी आंबेडकर" अशी नोंद आहे.[ संदर्भ हवा ] त्यांचा प्रवेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाच वर्षे आधी झाला होता. कोकणामधील लोक पूर्वी आपले आडनाव आपल्या गावाच्या नावावरून ठेवत असे, व त्यात शेवटी कर शब्द जोडत असे. आंबडवे गावावरून आंबडवेकर हे आडनाव उच्चारताना त्यांना ते अवघड वाटत होते. म्हणून त्यांचे वडील शुभेदार रामजी आंबेडकर यांनी विचारपूर्वक सुचवून "आंबेडकर" असे आडनाव नोंदविले. ही त्यांची देण आहे याचे संपूर्ण श्रेय "सुभेदार रामजी आंबेडकर" यांना जाते. साताऱ्यातील प्रतापसिंह स्कूल मध्ये कोणत्याही ब्राम्हण आंबेडकर गुरुजींचा उल्लेख नाही.[ संदर्भ हवा ]

राजकीय कारकीर्द

राजरत्न आंबेडकर तीन वेळा निवडणूक लढले आहेत. सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये, नांदेड लोकसभा मतदारसंघात बहुजन मुक्ती पार्टीचे उमेदवार म्हणून राजरत्न आंबेडकर लढले आहेत, मात्र त्यांना तृतीत क्रमांकाची मते मिळाली, व प्रथम स्थानी असलेले अशोक चव्हाण विजयी झाले.

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे

Tags:

राजरत्न आंबेडकर वैयक्तिक जीवनराजरत्न आंबेडकर शिक्षणराजरत्न आंबेडकर धार्मिक कारकीर्दराजरत्न आंबेडकर राजकीय कारकीर्दराजरत्न आंबेडकर हे सुद्धा पहाराजरत्न आंबेडकर संदर्भराजरत्न आंबेडकर बाह्य दुवेराजरत्न आंबेडकरबाबासाहेब आंबेडकरबौद्ध धर्मभारतीय बौद्ध महासभा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पोलीस पाटीलशेतीगोत्रक्रियाविशेषणदहशतवादब्राझीलची राज्येयोनीविष्णुशास्त्री चिपळूणकरशिव जयंतीक्रिकेटचा इतिहासमहाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादीबाबासाहेब आंबेडकरलातूर लोकसभा मतदारसंघपूर्व दिशाजागतिक पुस्तक दिवसभंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेविष्णुहोमरुल चळवळमुंजकुलदैवतसज्जनगडरामजी सकपाळकोल्हापूरअष्टांगिक मार्गमहाराष्ट्रातील लोककलामहात्मा गांधीसीताविजयसिंह मोहिते-पाटीलनामदेवकृष्णदक्षिण दिशास्वामी विवेकानंदआयुर्वेदस्त्री सक्षमीकरणकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघरामदास स्वामी स्थापित अकरा मारुतीदिशासूर्यनमस्कारअसहकार आंदोलनव्यवस्थापनअजिंक्य रहाणेमहाराष्ट्रप्रज्ञा विवर्धन स्तोत्रभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९ज्ञानेश्वरीदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघभारतीय रिझर्व बँकविधानसभास्त्रीशिक्षणकासारप्राण्यांचे आवाजव्हॉट्सॲपआईगुढीपाडवासंविधानपरशुराम२०२४ लोकसभा निवडणुकाजमिनीतील प्रमुख घटक व त्यांची कार्येपांढर्‍या रक्त पेशीजलप्रदूषणयोगकाळूबाईसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाभारतीय संविधानाचे कलम ३७०वसंतराव नाईकचार आर्यसत्यजळगाव लोकसभा मतदारसंघपुणे जिल्हाअमित शाहजहांगीरमराठी भाषाआगरीअनिल देशमुखदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगेभारतीय लष्करबीड विधानसभा मतदारसंघ🡆 More