महाराष्ट्र दिन

महाराष्ट्र दिन हा दिवस महाराष्ट्राची राज्य सुट्टी आहे.

हा दिवस महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी झालेल्या मुंबई राज्याच्या विभाजनापासून महाराष्ट्र दिन हा सामान्यतः परेड आणि राजकीय भाषणे तसेच समारंभांशी संबंधित आहे. तसेच इतर विविध सार्वजनिक आणि खाजगी कार्यक्रमांबरोबरच महाराष्ट्राचा इतिहास आणि परंपरा या दिवशी साजरे करतात. महाराष्ट्राच्या मराठी भाषिक राज्याच्या निर्मितीच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.

महाराष्ट्र दिन

पार्श्वभूमी

राज्य पुनर्रचना कायदा, १९५६ नुसार भाषांच्या आधारे भारतातील राज्यांसाठी सीमा परिभाषित केल्या गेल्या. या कायद्याचा परिणाम म्हणून जे मुंबई राज्य निर्माण झाले, ते मात्र वेगवेगळ्या मराठी, गुजराती, कच्छी आणि कोकणी भाषा बोलल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रांचे मिळून बनले होते. संयुक्त महाराष्ट्र समिती मुंबई राज्याचे दोन राज्यात विभाजन करण्याच्या चळवळीत आघाडीवर होती; एक भाग जेथे लोक प्रामुख्याने गुजराती आणि कच्छी बोलतात आणि दुसरा भाग जेथे लोक प्रामुख्याने मराठी आणि कोकणी बोलतात.

२५ एप्रिल १९६० रोजी भारतीय संसदेने लागू केलेल्या बॉम्बे पुनर्रचना कायदा, १९६० नुसार या चळवळीचा परिणाम म्हणून महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांची निर्मिती झाली. हा कायदा १ मे १९६० रोजी अंमलात आला.

इतिहास

२१ नोव्हेंबर इ.स.१९५६ दिवशी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले त्यामुळे मराठी माणसे चिडली होती. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता. या संगठनामुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येण्याचे नियोजन झाले.

त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत, फ्लोरा फाउंटनकडे जमला. मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. मात्र अढळ सत्याग्रहीं मुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले आणि पोलिसांना गोळीबाराचा आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला. गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०६ आंदोलक हुतात्मे झाले.

या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन १ मे, इ.स. १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. त्यानंतर इ.स. १९६५मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली.

हुतात्म्यांची नावे

२१ नोव्हेंबर इ. स. १९५६ चे हुतात्मे

  1. सिताराम बनाजी पवार
  2. जोसेफ डेव्हिड पेजारकर
  3. चिमणलाल डी. शेठ
  4. भास्कर नारायण कामतेकर
  5. रामचंद्र सेवाराम
  6. शंकर खोटे
  7. धर्माजी गंगाराम नागवेकर
  8. रामचंद्र लक्ष्मण जाधव
  9. के. जे. झेवियर
  10. पी. एस. जॉन
  11. शरद जी. वाणी
  12. वेदीसिंग
  13. रामचंद्र भाटीया
  14. गंगाराम गुणाजी
  15. गजानन ऊर्फ बंडू गोखले
  16. निवृत्ती विठोबा मोरे
  17. आत्माराम पुरुषोत्तम पानवलकर
  18. बालप्पा मुतण्णा कामाठी
  19. धोंडू लक्ष्मण पारडूले
  20. भाऊ सखाराम कदम
  21. यशवंत बाबाजी भगत
  22. गोविंद बाबूराव जोगल
  23. पांडूरंग धोंडू धाडवे
  24. गोपाळ चिमाजी कोरडे
  25. पांडूरंग बाबाजी जाधव
  26. बाबू हरी दाते
  27. अनुप माहावीर
  28. विनायक पांचाळ
  29. सिताराम गणपत म्हादे
  30. सुभाष भिवा बोरकर
  31. गणपत रामा तानकर
  32. सिताराम गयादीन
  33. गोरखनाथ रावजी जगताप
  34. महमद अली
  35. तुळशीराम पुंजाजी बेलसरे
  36. देवाजी सखाराम पाटील
  37. शामलाल जेठानंद
  38. सदाशिव महादेव भोसले
  39. भिकाजी पांडूरंग रंगाटे
  40. वासुदेव सुर्याजी मांजरेकर
  41. भिकाजी बाबू बांबरकर
  42. सखाराम श्रीपत ढमाले
  43. नरेंद्र नारायण प्रधान
  44. शंकर गोपाल कुष्टे
  45. दत्ताराम कृष्णा सावंत
  46. बबन बापू भरगुडे
  47. विष्णू सखाराम बने
  48. सिताराम धोंडू राडये
  49. तुकाराम धोंडू शिंदे
  50. विठ्ठल गंगाराम मोरे
  51. रामा लखन विंदा
  52. एडवीन आमब्रोझ साळवी
  53. बाबा महादू सावंत
  54. वसंत द्वारकानाथ कन्याळकर
  55. विठ्ठल दौलत साळुंखे
  56. रामनाथ पांडूरंग अमृते
  57. परशुराम अंबाजी देसाई
  58. घनश्याम बाबू कोलार
  59. धोंडू रामकृष्ण सुतार
  60. मुनीमजी बलदेव पांडे
  61. मारुती विठोबा म्हस्के
  62. भाऊ कोंडीबा भास्कर
  63. धोंडो राघो पुजारी
  64. ह्रुदयसिंग दारजेसिंग
  65. पांडू माहादू अवरीरकर
  66. शंकर विठोबा राणे
  67. विजयकुमार सदाशिव भडेकर
  68. कृष्णाजी गणू शिंदे
  69. रामचंद्र विठ्ठल चौगुले
  70. धोंडू भागू जाधव
  71. रघुनाथ सखाराम बीनगुडे
  72. काशीनाथ गोविंद चिंदरकर
  73. करपैया किरमल देवेंद्र
  74. चुलाराम मुंबराज
  75. बालमोहन
  76. अनंता
  77. गंगाराम विष्णू गुरव
  78. रत्नु गोंदिवरे
  79. सय्यद कासम
  80. भिकाजी दाजी
  81. अनंत गोलतकर
  82. किसन वीरकर
  83. सुखलाल रामलाल बंसकर
  84. पांडूरंग विष्णू वाळके
  85. फुलवरी मगरु
  86. गुलाब कृष्णा खवळे
  87. बाबूराव देवदास पाटील
  88. लक्ष्मण नरहरी थोरात
  89. ठमाबाई विठ्ठल सूर्यभान
  90. गणपत रामा भुते
  91. मुनशी वझीऱअली
  92. दौलतराम मथुरादास
  93. विठ्ठल नारायण चव्हाण
  94. देवजी शिवन राठोड
  95. रावजीभाई डोसाभाई पटेल
  96. होरमसजी करसेटजी
  97. गिरधर हेमचंद लोहार
  98. सत्तू खंडू वाईकर
  99. गणपत श्रीधर जोशी
  100. माधव राजाराम तुरे(बेलदार)
  101. मारुती बेन्नाळकर
  102. मधूकर बापू बांदेकर
  103. लक्ष्मण गोविंद गावडे
  104. महादेव बारीगडी
  105. कमलाबाई मोहिते
  106. सीताराम दुलाजी घाडीगावकर
  107. शंकरराव तोरस्कर

बाह्य दुवे

Tags:

महाराष्ट्र दिन पार्श्वभूमीमहाराष्ट्र दिन इतिहासमहाराष्ट्र दिन बाह्य दुवेमहाराष्ट्र दिनबॉम्बे संस्थानमहाराष्ट्र

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पानिपतची तिसरी लढाईभुजंगप्रयात (वृत्त)दिंडोरी लोकसभा मतदारसंघभारतातील जिल्ह्यांची यादीपुरंदर किल्लाहनुमान चालीसाबीबी का मकबरागाडगे महाराजगुप्त साम्राज्यक्रिकेटरक्तभारतातील जागतिक वारसा स्थानेमहाराष्ट्र शासनभारतीय रेल्वेविराट कोहलीनाशिक जिल्हाकेंद्रशासित प्रदेशन्यायमहात्मा गांधीअळीवव्हॉट्सॲपअणुऊर्जाकरमध्यपूर्वजागतिक व्यापार संघटनाविनायक दामोदर सावरकरलोकशाहीपाऊसगणेश दामोदर सावरकरकविताऋतूमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीसर्वनामसेंद्रिय शेतीआळंदीसुजात आंबेडकरलोहगडमराठी रंगभूमीनिसर्गरोहित शर्माइतर मागास वर्गमहाराष्ट्र भूषण पुरस्कारलातूर लोकसभा मतदारसंघजवबातमीमराठी साहित्यजवाहरलाल नेहरूमराठी व्याकरणजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)ज्योतिबा मंदिरऊसऔरंगजेबहंबीरराव मोहितेअकोला जिल्हाअश्वगंधागर्भाशयगोवासहकारी संस्थाप्राण्यांचे आवाजराक्षसभुवनवर्गमूळशिरूर लोकसभा मतदारसंघसात बाराचा उतारागोदावरी नदीलोकसभा सदस्यभारूडवाघगजानन महाराजगणपतीबटाटाग्रंथालयजागतिक रंगभूमी दिनशिक्षणगुजरातखासदारपसायदानदुष्काळन्यायालयीन सक्रियता🡆 More