अळीव

अळीव (पर्यायी नाव:हळीव, अहाळीव) (गार्डन क्रेस सीड्‌स - garden cress seeds) - Lepidium sativum, हे एक अत्यंत पौष्टिक असे तेल-बी आहे.

१०० ग्रॅम हळिवांत तब्बल १०० मिलिग्रॅम आयर्न आहे. लोह, कॅल्शियम, फॉलेट, बेटाकेरोटीन, क जीवनसत्त्व व टोकोफेरॉक हे पोषक घटक हळिवांत आहेत. हळीव हे रजःस्राव नियमित करण्यात मदत करते, तसेच त्यातील ॲंटिऑक्‍सिडंट्‌स व रक्‍तशुद्धी करणाऱ्या घटकांमुळे हळीव हे तरुणींसाठी उपयुक्‍त ठरते. बाळंतिणीचे दूध वाढवण्यासाठी हळिवाचे लाडू किंवा खीर देण्याची पूर्वापार पद्धत आपल्याकडे आहे. अंगकाठी भरायला मदत होते. अंकुरलेले हळीव सलाडमध्ये घालून घेतल्यास ते डोळ्यांसाठी हितकर आहेत. हळिवांतील चिकट गुणधर्मामुळे मलाविरोधाची तक्रार कमी करण्यासाठी यांचा वापर करता येतो. हळिवाच्या गॉयट्रोजेनिक गुणधर्मामुळे हायपोथायरॉईडचा त्रास असणाऱ्यांनी या बियांचे पदार्थ खाऊ नयेत.

अळीव किंवा हळीव म्हणून ओळखिली जाणारी तेलबिया देणारी ही भारतात उगवणारी, मूळ्ची इथियोपियातली एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. बाळंतिणीस अंगावर दूध येण्यास हळिवाची खीर देतात. अळिवाचे लाडूही करतात.

हळिवाला हिंदीत हलीम म्हणतात.या नवनस्पतीला भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते.

  • संस्कृत :चंद्रशूर
  • हिंदी :हालिम, चंसुर, चनसूर, चमसूर
  • बंगाली :हालिम
  • गुजराती :अशेळियो
  • कानडी :अल्लीबीज, कुरूतिगे
  • मल्याळम :
  • तामिळ : आलि विदै
  • तेलुगू : अमोल
  • इंग्रजी :Garden Cress
  • फार्सी- :लमतुख्मतरातेजक
  • शास्त्रीय नाव : Lepidium sativum

वर्णन

अहाळीव ही क्रुसिफेरी कुलातील वनस्पती आहे. तिचे शास्त्रीय नाव लेपिडियम सॅटिव्हम आहे. ही १४-१५ सेंमी. उंचीची, लहान व गुळगुळीत वर्षायू औषधी वनस्पती आहे. भारतामध्ये तिची विविध उपयोगांसाठी सर्वत्र लागवड केली जाते.

अहाळिवाची पाने साधी, विविध, पूर्णतः किंवा अंशतः अखंड किंवा पूर्णपणे विभागलेली असतात. मुळापासून निघाली आहेत अशी वाटणारी पाने लांब देठाची, तर खोडापासून निघालेली पाने बिनदेठाची रेषाकृती असतात. फुले लहान व पांढरी असून लांबट मंजिरीवर येतात. फळे गोलाकार, अंडाकृती व टोकास खाचदार असतात. फळात लहान कप्पे असून प्रत्येक कप्प्यात दोन बिया असतात. बिया लांबट, टोकाला निमुळत्या व रंगाने लाल असतात.

ही वनस्पती सर्वकाळी व सर्वत्र पिकविली जाते. सखल भागात सप्टेंबर ते फेब्रुवारीत व उंच प्रदेशात मार्च ते सप्टेंबरमध्ये बी पेरतात. त्यानंतर थोड्याच दिवसांत पाने कोशिंबिरीत किंवा कढीत घालण्यास खुडून घेतात. बियांच्या वाढीसाठी ४-६ आठवडे लागतात. पाला घोडयांना व उंटांना चारा म्हणून घालतात. दिवाळीत लहान मुले किल्ल्यावर हिरवळ करण्यासाठी अहाळीवाचा वापर करतात.

उत्पत्तिस्थान

इथियोपिया, भारत.

उपयोग

आयुर्वेदानुसार दमा, कफ व रक्ती मूळव्याध इ. व्याधींवर ही वनस्पती गुणकारी आहे. पाने उत्तेजक, मूत्रल व यकृताच्या विकारावर चांगली आहेत. बिया दुग्धवर्धक, रेचक, शक्तिवर्धक व मूत्रल आहेत. मुडपणे, दुखापत इत्यादींवर त्यांचे पोटीस बांधतात.

हळीव हे पौष्टिक असे तेल-बी आहे. १०० ग्रॅम हळिवात तब्बल १०० मिलिग्रॅम आयर्न असते. लोह, कॅल्शियम, फॉलेट, बीटाकॅरोटिन, क जीवनसत्त्व व टोकोफेरॉक हे पोषक घटक हळिवांत आहेत. हळीव हे रजःस्राव नियमित करण्यात मदत करते, तसेच त्यातील ॲंटिऑक्‍सिडंट्‌स व रक्‍तशुद्धी करणाऱ्या घटकांमुळे हळीव हे तरुणींसाठी उपयुक्‍त ठरते. बाळंतिणीचे दूध वाढवण्यासाठी हळिवाचे लाडू किंवा खीर देण्याची पूर्वापार पद्धत आपल्याकडे आहे. अंगकाठी भरायला मदत होते. अंकुरलेले हळीव सलाडमध्ये घालून घेतल्यास ते डोळ्यांसाठी हितकर आहेत. हळिवांतील चिकट गुणधर्मामुळे मलाविरोधाची तक्रार कमी करण्यासाठी यांचा वापर करता येतो. हळिवाच्या गॉयट्रोजेनिक गुणधर्मामुळे हायपोथायरॉईडचा त्रास असणाऱ्यांनी या बियांचे पदार्थ खाऊ नयेत.

हे सुद्धा पहा

संदर्भ

Tags:

अळीव वर्णनअळीव उपयोगअळीव हे सुद्धा पहाअळीव संदर्भअळीव

🔥 Trending searches on Wiki मराठी:

देहूभाषालंकारज्योतिर्लिंगधर्मो रक्षति रक्षितःमुंजशेतीपूरक व्यवसायपु.ल. देशपांडेमराठा आरक्षणचिमणीनैसर्गिक पर्यावरणसिंहगडएकनाथ शिंदेशिवाजी महाराजांची राजमुद्राहिंदू धर्मक्रिकेटचे नियमआनंदीबाई गोपाळराव जोशीचंद्रकांत भाऊराव खैरेऑलिंपिक खेळात भारतकृष्णआंबेडकर कुटुंबराम सातपुतेमधुमेहलोकसंख्याउच्च रक्तदाबनांदेड लोकसभा मतदारसंघदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरीगजानन दिगंबर माडगूळकरघोणसपानिपतची पहिली लढाईरामटेक लोकसभा मतदारसंघद्राक्षआर्थिक विकासविराट कोहलीमुख्यमंत्रीशिव जयंतीमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीभारतीय राष्ट्रीय काँग्रेससाडेतीन शुभ मुहूर्तवंचित बहुजन आघाडीमहाभारतधूलिवंदनमहाराष्ट्रातील वीजनिर्मिती प्रकल्पतुळसलोहगडअडुळसागोपाळ कृष्ण गोखलेरोहित (पक्षी)विषुववृत्तवृषणविनायक दामोदर सावरकरवर्धा लोकसभा मतदारसंघमाहिती तंत्रज्ञानपुणे लोकसभा मतदारसंघऔरंगजेबभारतीय निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहितामहाराष्ट्राचे राज्यपालकृष्णा नदीपंढरपूरसफरचंदअमेरिकेची संयुक्त संस्थानेरायगड जिल्हासोळा संस्कारसम्राट हर्षवर्धनयोगासनसंयुक्त राष्ट्रेडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनभारतीय अंतराळ संशोधन संस्थाधनगरगोपाळ गणेश आगरकरजागतिक व्यापार संघटना१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धपूर्व दिशारामजी सकपाळलोकसभा सदस्यढोलभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची🡆 More