लोकसंख्या

'लोकसंख्या'म्हणजे एखाद्या भौगोलिक प्रदेशात राहणाऱ्या व्यक्तींची संख्या होय.

लोकसंख्या मोजण्याला जनगणना किंवा खानेसुमारी म्हणतात. प्रत्येक [देश] आपल्या लोकसंख्येची ठरावीक कालखंडानंतर गणना करतो. हा कालखंड बहुतेक १० वर्षे एवढा असतो व दरवर्षी वाढीव संख्येचा [अंदाज अपना अपना|अंदाज] प्रकाशित केला जातो.

राष्ट्रीय लोकसंख्या धोरण इ.स. १९७६

घोषणा १६ एप्रिल १९७६ रोजी केंद्रीय स्वास्थ्य व कुटुंबराज्य मंत्री डॉ. करणसिंग यांनी मांडले.

उद्दिष्टे व उपाययोजना

  1. योग्य कायदा करून लग्नाचे किमान वय मुलींसाठी १८ वष्रे व मुलांसाठी २१ वर्षांपर्यंत वाढवणे.
  2. निर्बीजीकरण प्रोत्साहनासाठी दिल्या जाणाऱ्या राशीत वाढ करणे, दोन मुलांनंतर कुटुंब नियोजन केल्यास १५० रुपये, तीन मुलांनंतर केल्यास १०० रुपये, चार मुलांनंतर केल्यास ७० रुपये.
  3. राज्य शासनांना अनिवार्य निर्बीजीकरणासाठी कायदे करण्याची अनुमती द्यावी.
  4. २००१ वर्षांपर्यंत लोकसभा व राज्य विधानसभा यामधील प्रतिनिधित्व १९७१च्या जनगणनेनुसार निश्चित करावे.
  5. केंद्रीय व राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लहान कुटुंब संकल्पना स्वीकारण्यासाठी प्रोत्साहनपर लाभ द्यावेत.
  6. राज्यांना त्यांच्या कुटुंबनियोजन कार्यक्रमासाठी केंद्राकडून निधी मिळावा.

फलित

१९७६ चे लोकसंख्या धोरण हे जास्त काळ टिकले नाही. १९७७ साली निवडणुका झाल्या व ११ मे २००० रोजी भारताची लोकसंख्या १०० कोटी झाली. जगातील क्षेत्रफळाच्या २.४ % क्षेत्रफळ असलेल्या या देशात जगातील १६ % लोकसंख्या राजसत्तेत आलेल्या सरकारने २९ जून १९७७ रोजी वरील धोरणातील, कुटुंबनियोजन कार्यक्रमात जी सक्ती करण्यात आली होती, ती रद्द केली.१९७५ मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सरकारने आणीबाणी जाहीर केली व या काळात १९७६च्या लोकसंख्या धोरणाला संसदेत मान्यता देण्यात आली. संजय गांधी यांच्यामुळे या धोरणात सक्तीच्या कुटुंबनियोजनाचा समावेश करण्यात आला. या काळात मोठय़ा प्रमाणावर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करण्यात आल्या

लोकसंख्या धोरण इ.स. २०००

लोकसंख्या वाढीचा दर आटोक्यात आणण्यासाठी दुसरे लोकसंख्याविषयक धोरण जाहीर करण्यात आले.

पार्श्वभूमी

इ.स.१९९३ साली एम. एस. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. या समितीने आपला अहवाल १९९४मध्ये सादर केला व त्यानुसार पुढे २००० सालचे लोकसंख्या धोरण ठरविण्यात आले.

महत्त्वाची उद्दिष्टे

  1. अल्पकालीन उद्दिष्ट - संततीनियमनासाठी आवश्यक साधनांचा पुरवठा करणे. आरोग्याच्या पायाभूत सुविधा एकात्मिक सेवा पुरविणे
  2. मध्यकालीन उद्दिष्ट - प्रत्येक जोडप्याला दोन मुले यासाठी प्रोत्साहन देणे
  3. दीर्घकालीन उद्दिष्ट - लोकसंख्येचे २०४५ पर्यंत स्थिरीकरण करणे

शिफारशी

  1. १४ वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींना प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करावे.
  2. शाळेतील गळतीचे प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील प्रमाण २० टक्क्य़ांपेक्षा कमी आणावे.
  3. जननदर नियंत्रणासाठी व संतती नियमनासाठी याबाबत सामान्य लोकांना माहिती देण्यासाठी विशेष व्यवस्था निर्माण करावी.
  4. फक्त दोन मुले असलेल्या व निर्बीजीकरण करून घेतलेल्या दारिद्य्ररेषेखालील दाम्पत्यांच्या नावे ५००० रुपयांची विमा पॉलिसी उघडावी.
  5. १८ वर्षांपेक्षा उशिरा विवाह करणाऱ्या मुलींना बक्षीस देणे तसेच २१ वर्षांनंतर मातृत्व स्वीकारणाऱ्या मुलींना बक्षीस देणे.
  6. माता मृत्युदराचे प्रमाण दर एक लाख जिवंत जन्मामागे १०० पेक्षा कमी आणावे.
  7. ८०% प्रसूती संस्थात्मक पद्धतीने व १०० टक्के प्रसूती या प्रशिक्षित व्यक्तींच्या उपस्थितीत व्हाव्यात.
  8. जन्म, मृत्यू, विवाह, गर्भधारणा यांचे १०० टक्के नोंदणीचे लक्ष साध्य करावे.
  9. ग्रामीण भागात रुग्णवाहिका सेवा पुरविण्यासाठी विशेष फंड व कमी व्याजदराचे कर्ज उपलब्ध करून द्यावे.
  10. पंचायत समिती व जिल्हा परिषदांना लहान कुटुंब धोरण राबविण्यासाठी बक्षिसे द्यावीत.
  11. आई वडिलांनी आपल्या पाल्यावर वैयक्तिक लक्ष द्यावे

Tags:

लोकसंख्या राष्ट्रीय धोरण इ.स. १९७६लोकसंख्या धोरण इ.स. २०००लोकसंख्या

🔥 Trending searches on Wiki मराठी:

एकपात्री नाटक३३ कोटी देवबहावालता मंगेशकरकुटुंबबीड विधानसभा मतदारसंघस्वादुपिंडतेजस ठाकरेटरबूज२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकातुळजापूरमहाराष्ट्रातील स्थानिक शासनमतदानमहाराष्ट्र विधान परिषदअंकिती बोसरामटेक लोकसभा मतदारसंघगोदावरी नदीगुरू ग्रहलिंगभावक्रियापदसाहित्याचे प्रयोजनपेशवेभारतीय जनता पक्षबहिणाबाई चौधरीमहाड सत्याग्रहभारतातील सण व उत्सवअन्नप्राशनबाबासाहेब आंबेडकरमहानुभाव पंथहातकणंगले लोकसभा मतदारसंघगणपतीहोमरुल चळवळहिंदू धर्मातील अंतिम विधीलोणार सरोवरमहारमुखपृष्ठवि.स. खांडेकरकोल्हापूरउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघरामपूर्व दिशाआंबेडकर जयंतीजन गण मनराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (हैदराबाद)रमाबाई आंबेडकरभरती व ओहोटीयूट्यूबमराठवाडाअजित पवारमेष राससोलापूरपारू (मालिका)भूतमराठी संतनांदेड जिल्हामहाराष्ट्रातील पर्यटनविष्णुसहस्रनामबडनेरा विधानसभा मतदारसंघनीती आयोगमानसशास्त्रतापमानज्वारीज्ञानेश्वरीसोनारह्या गोजिरवाण्या घरातहिंगोली लोकसभा मतदारसंघपन्हाळाखो-खोजीवनसत्त्वमराठी व्याकरणरामायणताम्हणहोमी भाभाचलनवाढकासारछत्रपती संभाजीनगर जिल्हासदा सर्वदा योग तुझा घडावामृत्युंजय (कादंबरी)🡆 More