वेद: हिंदू धर्मातील प्राचीन ग्रंथ

जे जगात नाही ते वेदांत आहे असे म्हणतात.

वेद हे भारतीय धर्माचे व संस्कृतीचे मूलाधार ग्रंथ.'मन्त्रब्राह्मणयोर्वेदनामधेयम्' अशी वेदाची व्याख्या करता येईल. जगातील पहिले साहित्य वेद. वेद हे मानवसृष्टीच्या आधी परमेश्वराने मानवाच्या कल्याणासाठी निर्माण केले आणि म्हणूनच ते अनादी आहेत अशी वैदिकांची धारणा आहे. ऋग्वेद,यजुर्वेद,सामवेद आणि अथर्ववेद यांना वेद अथवा संहिता असे म्हटले जाते.या वेदांचे संहिता, आरण्यके, ब्राह्मणे आणि उपनिषदे असे चार उपविभाग आहेत. यापैकी उपनिषदे ही वेदांच्या शेवटी येतात म्हणून त्यांना 'वेदान्त' असे म्हटले जाते. वेद वाड्.मयावर आधारलेले संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती होय वेद हे आपले सर्वाधिक प्राचीन साहित्य मानले जाते वेदांची निर्मिती अनेक ऋषींनी केली वेदांमधील काही सूक्त स्त्रियांनी रचलेली आहेत वैदिक भाषा संस्कृत ही होती वैदिक साहित्य अत्यंत समृद्ध आहे ऋग्वेदात यातील मूळ ग्रंथ मानला जातो तो काव्यरूप आहे ऋग्वेदा सह यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद असे चार वेद आहेत. या चार वेदांच्या ग्रंथांना संहिता असे म्हणतात विद म्हणजे जाणणे त्यापासून वेद ही संज्ञा तयार झाली त्याचा अर्थ ज्ञान असा होतो मौखिक पठनाच्या आधारे वेदांचे जतन केले गेले वेदांना श्रुती असे म्हणतात. अनेक ॠचा ज्यात आहेत तो ऋग्वेद होय. ऋचा म्हणजे स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य अनेक ऋचा एकत्र गुंफून एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला सूक्त असे म्हणतात ऋग्वेद संहितेमध्ये विविध देवतांची स्तुती करणारी सूक्त आहेत यजुर्वेद संहितेमध्ये यज्ञात म्हटले जाणारे मंत्र आहेत यज्ञविधी मध्ये कोणत्या मंत्राचे पठण केव्हा आणि कसे करावे याचे मार्गदर्शन या संहितेमध्ये केलेले आहे त्यात असणारी मंत्र आणि गद्यात दिलेले त्याचे स्पष्टीकरण अशी या समितीची रचना आहे तर साम वेदामध्ये यज्ञ विधीच्या वेळी तालासुरात मंत्र गायन केले जात असे ते गायन कसे करावे याचे मार्गदर्शन यामुळेच संहितेमध्ये केलेला आहे भारतीय संहितेच्या निर्मितीमध्ये सामवेद याचा मोठा वाटा आहे तर अथर्ववेदाच्या संहितेला अथर्व ऋषींचे नाव देण्यात आले अथर्व वेदांमध्ये दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींना महत्त्व दिलेले आढळते आयुष्यात येणाऱ्या संकटावर तसेच दुःखांवर कशा पद्धतीने उपाय करायचे हे त्यामध्ये सांगितले आहेत तसेच अनेक औषधी वनस्पतींची माहिती त्यात दिलेली आहे राजाने राज्य कसे करावे याचेही मार्गदर्शन त्यामध्ये केलेले आहे त्यांच्या नंतर ब्राह्मणग्रंथ उपनिषदे याची रचना केली गेली त्यांचाही समावेश यामध्ये केला जातो यज्ञविधी मध्ये वेदांचा वापर कसा करावा हे सांगणाऱ्या ग्रंथांना ब्राह्मण्य ग्रंथ म्हणतात प्रत्येक वेदाचे स्वतंत्र ब्राह्मणग्रंथ आहेत तर आरण्यक हे अरण्यात जाऊन एकाग्रचित्ताने केलेली चिंतन आरण्यक ग्रंथामध्ये मांडलेले आहे यज्ञ विधी पार पाडत असताना कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये याची खबरदारी घेतलेली दिसते तर उपनिषद म्हणजे गुरूजवळ बसून मिळवलेले ज्ञान होय. जन्म-मृत्यू सारख्या घटनांबद्दल अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये येत असतात त्या प्रश्नांची उत्तरे सहज मिळत नाहीत अशा गहन प्रश्नांवर उपनिषदांमध्ये चर्चा केलेली आहे चार वेद ब्राह्मण ग्रंथ आरण्यके आणि उपनिषदे रचण्यास सुमारे पंधराशे वर्षांचा कालावधी लागला त्या कालावधीत वेदकालीन संस्कृतीत अनेक बदल होत गेले त्या बदलांचा आणि वेदकालीन लोकजीवनाचा अभ्यास करण्यासाठी वैदिक वांग्मय हे महत्त्वाचे साधन आहे

वेद: शब्दोत्पत्ती, वेदांचा आविष्कार, वेदांचे महत्त्व व प्रामाण्य
वेद

शब्दोत्पत्ती

वेद हा संस्कृत शब्द असून तो 'विद्' या संस्कृत धातूपासून तयार झाला आहे. वेद या शब्दाचा अर्थ 'ज्ञान' असा सुद्धा घेतला जातो. वेदभक्तांच्या दृष्टीने हे ज्ञान पवित्र आणि दैवी ज्ञान आहे. परंतु मूळ रूपामध्ये हा शब्द साहित्य ग्रंथामध्ये एक विशाल राशी-विशेषाचा बोधक आहे. प्राचीन काळी ऋषींना वेद 'दिसले' म्हणून त्यांना वेद असे नाव मिळाले आहे. सत्, चित् आणि आनंद असे ब्रह्माचे स्वरूप असल्याचे वेदांमध्ये म्हटले आहे; म्हणून वेदाला "ब्रह्म" असेही म्हणतात. जो ग्रंथ इप्सित फलाची प्राप्ती आणि अनिष्ट गोष्ट दूर करण्याचा मानवी बुद्धीला अगम्य असा उपाय दाखवून देतो त्याला वेद असे म्हणावे.

वेदांचा आविष्कार

वेद असे निर्माण झाले याविषयी अनेक मते आढळून येतात.परमात्मा किंवा ईश्वर या म्हाभूताचे निःश्वास म्हणजे वेद होत असे बृहदआरण्यक उपनिषदात सांगितले आहे.वेद हे शब्दस्वरूप असल्याने ते आकाशातून उत्पन्न झाले असेही एक मत आहे.वेद आपला धर्म आहे...

वेदांचे महत्त्व व प्रामाण्य

वेद हे आर्यधर्माच्या मूलस्थानी आहेत. 'वेदोऽखिलो धर्ममूलम् |' असे मनुवचन प्रसिद्धच आहे. वेदांवरून तत्कालीन आर्य जनांच्या भौतिक उन्नतीची कल्पना येते. व्यक्ती, समाज आणि राष्ट्र या तीन गोष्टींच्या माध्यमातून आर्यांनी भौतिक उत्कर्ष साधला होता. वेद, स्मृती, सदाचार आणि स्वतःच्या अंतःकरणास जे बरे वाटेल ते, अशी धर्माची चार प्रकारची लक्षणे आहेत. भारतीय आस्तिक दर्शनानी आपापले तत्त्वज्ञान मांडताना वेदांचा आधार घेतला आहे.

वेदांचा कालनिर्णय

ख्रिस्ती शतकापूर्वी १००० वर्षांच्या पलीकडच्या काळात वेदरूप काव्ये रचली असावी असे दिसते. काही विद्वानांचे असे मत आहे की छंदांचा काल ख्रिस्ती शकापूर्वी दोन किंवा तीन हजार वर्षापूर्वीचा असावा. लोकमान्य टिळकांनी 'ओरायन'हा ग्रंथ लिहून वेदकाळासंबंधी आपले मत सविस्तरपणे मांडले आहे. वेदकालाचा निर्णय करण्यासाठी वेद वाक्यांचाच आधार घेतला पाहिजे असे त्यांनी नोंदविले आहे. डॉ.भांडारकर ऋग्वेदाचा काल सनपूर्व २५०० मानतात तर अविनाशचंद्र दास यांच्या मते तो सनपूर्व २५००० इतका मागे जातो.

वेदांचे रक्षण व अध्ययन

व्यासांनी वेदांचे प्रवर्तन केले व त्यांच्या शिष्यांनी वेदांचे ग्रहण करून त्यांची परंपरा पुढे चालू ठेवली.हे सर्व शिष्य ज्ञानोपासक होते. वेदांचे अध्ययन करणे, त्यांचे अध्यापन करणे व वेदांचे संरक्षण करणे हे त्यांचे जीवित कार्य होते. मूळच्या वेदमंत्रांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होऊ नये यासाठी प्राचीन ऋषींनी अनेक कॢप्त्या योजल्या आहेत. हे वेदमंत्र सस्वर असे टिकावेत यासाठी आणखी एक युक्ती प्राचीन आर्यांनी योजिली आणि ती म्हणजे वेदांच्या विकृती तयार करणे ही होय...

वेदांचे स्वरूप

वेदांमध्ये अग्नी, इंद्र, वरुण, उषा,मरुत अशा विविध देवतांची स्तुतीपर सूक्ते आहेत. वैदिक ऋषींनी निसर्गातील वेगवेगळ्या शक्तींना उद्देशून रचलेली ही स्तोत्रेच आहेत. वैदिक काळातील कुटुंब व्यवस्था, लोकजीवन, संस्कृती, आश्रम व्यवस्था, शिक्षण पद्धती ,राष्ट्र दर्शन ,तत्त्वज्ञान विषयक संकल्पना अशा विविध मुद्द्यांची माहिती आपल्याला वेदांमध्ये अभ्यासायला मिळते.

आधुनिक काळातही अभ्यासाची गरज

खऱ्या अर्थाने वेदांचे रक्षण करायचे असेल तर वेदांतील ऋचांचाचा उच्चार योग्य माणसाने, योग्य वेळी व योग्य परिस्थितीत केल्याने त्यातील खरा अर्थ प्रकट होतो, असे सांगितले जाते. गुरू शिष्य परंपरेने चालत आलेले हे ज्ञान आजवर सांभाळले गेले आहे.


वेदांशी निगडित असे -

टीका

हिंदू धर्माचे अनेक विश्लेषक असा दावा करतात की हिंदू धर्म सर्व समकालीन धर्मांचे घटक स्वीकारतो आणि हिंदू धर्मातील वैदिक पुराणांसह अनेक धर्मग्रंथांमध्ये बौद्ध, जैन आणि शीख धर्माचे घटक आहेत आणि ग्रीक आणि झोरोस्ट्रियन धर्मातील महत्त्वपूर्ण घटकांनी दत्तक घेतलेले आहे. अवेस्ताः आहूरा ते असुर, देयब ते देवा, अहुरा ते मजदा ते एकेश्वरवाद, वरुण, विष्णू व गरुड, अग्निपूजा, सोम ते होम असे सोम, स्वर्ग ते सुधा, यासना ते योजना किंवा भजन, नरियसंघ ते नरसंघ (ज्याचे बरेच लोक म्हणतात) इस्लामिक प्रेषित मुहम्मद यांचे भविष्यवाणी), इंद्र ते इंद्र पर्यंत, गंडरेवापासून गंधर्व, वज्र, वायु, मंत्र, याम, आहुती, हुमाता ते सुमती इ.

वेदांविषयी मराठी पुस्तके

  • अनोखा परिचय ऋग्वेद आणि उपनिषदांचा (रघुनाथ जोशी)
  • ऋग्वेद शांतिसूक्त (वेदरत्न केशवशास्त्री जोगळेकर)
  • ऋग्वेदसार - अनुवादासह (मूळ हिंदी, ऋग्वेद-सारः (विनोबा भावे, मराठी अनुवाद - अच्युत देशपांडे)
  • ऋग्वेदाची ओळख (गुंडोपंत हरिभक्त)
  • ऋग्वेदाचे प्राचीनत्व (ज्ञानेश्वर कुलकर्णी)
  • ऋग्वेदीय सूक्तानि (सार्थ - संक्षिप्त- सस्वर; स्वामी विपाशानंद)
  • चार वेद (विद्यावाचस्पती शंकर वासुदेव अभ्यंकर)
  • वेदांची ओळख : परंपरा आणि नवा दृष्टिकोन (डॉ. प्रमोद पाठक)
  • वेदामृत (विनोबा भावे)
  • वेद-रहस्य - मूळ लेखक योगी श्रीअरविंद, अनुवाद - ना.स.पाठक, १९९०, श्रीअरविंद आश्रम ट्रस्ट, ISBN 81-7058-178-8
  • वेद-रहस्य - मूळ लेखक योगी श्रीअरविंद, अनुवाद - स्वर्णलता भिशीकर, २०२३, श्रीअरविंद आश्रम

संदर्भ

Tags:

वेद शब्दोत्पत्तीवेद ांचा आविष्कारवेद ांचे महत्त्व व प्रामाण्यवेद ांचा कालनिर्णयवेद ांचे रक्षण व अध्ययनवेद ांचे स्वरूपवेद आधुनिक काळातही अभ्यासाची गरजवेद टीकावेद ांविषयी मराठी पुस्तकेवेद संदर्भवेदअथर्ववेदआरण्यकेउपनिषदेऋग्वेदयजुर्वेदसामवेद

🔥 Trending searches on Wiki मराठी:

शुद्धलेखनाचे नियमजिंतूर विधानसभा मतदारसंघपारंपारिक ऊर्जामहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीपळसभारतीय रेल्वेभारतीय संविधानाचे कलम ३७०गुजरात टायटन्स २०२२ संघमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीभारताचा भूगोलकुटुंबनियोजनशिवसेनासेंद्रिय शेतीमहाराष्ट्रातील लोककलाकोल्हापूर जिल्हावेदगोपीनाथ मुंडेगोदावरी नदीहनुमानभारतीय रिझर्व बँककडुलिंबगुढीपाडवाशुभेच्छाशेतकरीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारदूरदर्शनविठ्ठलपूर्व दिशास्मिता शेवाळेअभिव्यक्तीभाषालंकारसमीक्षाभारतीय प्रजासत्ताक दिनअभिनयआंबेडकर जयंतीनांदेड लोकसभा मतदारसंघगेटवे ऑफ इंडियाइराकऋग्वेदगुंतवणूकभारताची अर्थव्यवस्थाइंदुरीकर महाराजनगर परिषदअलिप्ततावादी चळवळसंदिपान भुमरेमहाराष्ट्रातील राजकारणशिर्डी लोकसभा मतदारसंघउत्तर दिशासायबर गुन्हादक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनाउत्क्रांतीभगतसिंगमराठाशिवाजी महाराजांचा जीवनक्रमलोकमान्य टिळकछत्रपती संभाजीनगरह्या गोजिरवाण्या घरातलोकशाहीभारताच्या राष्ट्रपतींची यादीलाल किल्लामुखपृष्ठबाबा आमटेआज्ञापत्रनांदेडऋतुराज गायकवाडभारत छोडो आंदोलनखिलाफत आंदोलनसुभाषचंद्र बोसमासिक पाळीन्यूझ१८ लोकमतडॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तकेसात बाराचा उतारानिसर्गपुरातत्त्वशास्त्ररवींद्रनाथ टागोरमराठीतील बोलीभाषाहिंदू धर्म🡆 More