सायबर गुन्हा

सायबर गुन्हा भाग १ : - सायबर गुन्हेगारीही नवनवीन तंत्रज्ञानाच्या शोधाचा एक प्रमुख दुष्परिणाम आहे' जागतिक समस्या आहे.

अशा गुन्ह्यांत मोठ्या संख्येने महिला बळी पडतात. त्यांच्या पूर्ण संरक्षितेलाचाे धोका आहे. मात्र अशा प्रकारच्या सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी कठोर कायदे करणाऱ्या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे. आयटी ॲक्ट 2000 (माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000) हा कायदा आपल्याकडे आहे. हॅकिंग, इंटरनेटवर अश्लील गोष्टी व मजकुराचे प्रकाशन या गोष्टी गुन्हा मानण्यात आल्या आहेत. मात्र एकूणच महिलांच्या सुरक्षेला असलेला धोका लक्षात घेता हा कायदा परिपूर्ण नाही, असेच म्हणावे लागेल. लहान मुलांना यापासून वाचविण्यासाठी सेफ्टीवेब (सुरक्षित इंटरनेट जाळे) हे पालकांना सहाय्यकारी ठरत असते. सायबर गुन्ह्याविषयी माहिती :

सायबर गुन्हा
सायबर गुन्हा

महिलांना सामना करावा लागत असलेले सायबर गुन्हे

एकूण सायबर गुन्ह्यांपैकी मोठ्या संख्येने गुन्हे हे केवळ महिलांच्याच बाबतीत घडत असतात. ते पुढीलप्रमाणे :

  • ई-मेलद्वारे होणारा छळ
  • सायबर स्टॉकिंग (Stalking) (सायबर विश्वातून होणारा पाठलाग)
  • सायबर पॉर्नोग्राफी (सायबर विश्वातून पसरविली जात असलेली अश्लिलता)
  • सायबर डीफमेशन (बदनामी)
  • मॉर्फिंग (संगणकाच्या माध्यमातून इंटरनेटवरील मजकूरामध्ये किंवा छायाचित्रांमध्ये फेरफार करणे)
  • ई-मेल स्फुफींग (ईमेलद्वारे होणारे विडंबन/टवाळी)

ई-मेलद्वारे होणारा छळ

पत्रांद्वारे दिल्या जाणाऱ्या त्रासाची ही पुढची पायरी म्हणावी लागेल. ब्लॅकमेल करणे, धमकावणे, दंडेली करणे किंवा फसवणूक करणे इत्यादी प्रकारांचा या पद्धतीच्या छळवणुकीत समावेश होतो. पत्रांद्वारे एखाद्याचा छळ करण्याप्रमाणेच हे आहे. मात्र बहुतेकवेळा बनावट खात्यांवरूनच असे ईमेल पाठविले जात असल्याने ते अधिक त्रासदायक असते.

सायबर स्टॉकिंग (Stalking) (सायबर विश्वातून होणारा पाठलाग)

आधुनिक काळातील हा सर्वाधिक चर्चित सायबर गुन्हा म्हणावा लागेल. यामध्ये सातत्याने एखाद्यावर लक्ष ठेवले जाते किंवा त्याचा पाठलाग केला जातो. एखाद्या व्यक्तीला सातत्याने मेसेजेस पाठविणे, ईमेल्स पाठविणे किंवा तो वापरत असलेल्या चॅटरुममध्ये प्रवेश करणे इत्यादी प्रकारांनी त्या व्यक्तीच्या इंटरनेटवरील सर्व हालचालींवर पाळत ठेवली जाते. यापैकी काही मेसेज धमकीचेही असतात. महिलांना पुरुषांकडून तर लहान मुलांना लैंगिक अत्याचाराची प्रवृत्ती असलेल्यांकडून अशा प्रकारच्या स्टॉकिंगला सामोरे जावे लागते. बहुतेकदा इंटरनेटच्या दुनियेत नवीन असलेल्या आणि इंटरनेट सुरक्षिततेची माहिती नसलेल्यांना याचा सामना करावा लागतो.

बहुतेक प्रकरणात महिला, मुले किंवा भावनिकदृष्ट्या कमजोर गुन्हेगारांचे बळी ठरतात. पण त्यातही 75 टक्क्यांपेक्षा जास्त महिलाच बळी ठरत असल्याचे मानले जाते. हे गुन्हे करण्यामागे चार प्रकारची कारणे किंवा मानसिकता असल्याचे दिसून येते. ज्यामध्ये लैंगिक छळ करण्याचा उद्देश, प्रेमात पछाडलेले असणे, बदल्याची किंवा द्वेषाची भावना आणि इगो यांचा समावेश आहे.वेबसाईटस, चॅट रुम्स, इंटरनेटवर असलेली चर्चा घडविणारी व्यासपीठे, ब्लॉग इत्यादी प्रकार आणि ईमेल या माध्यमांद्वारे गुन्हेगार आपल्या बळींना लक्ष्य करतात. मोफत उपलब्ध असलेले ई मेल्स तसेच चॅट रुम्स किंवा इतर व्यासपीठांवर उपलब्ध असलेले अनामिकत्व (जेथे तुम्ही तुमची खरी ओळख लपवून ठेवू शकता) यामुळे या गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली दिसते.

आपल्या देशातील सायबर स्टॉकिंगबाबतची वास्तविकता जाणून घेणाऱ्या काही प्रातिनिधिक घटना

सायबर गुन्हे - भाग 2

  1. महिलांना सामना करावा लागत असलेले सायबर गुन्हे
  2. ई-मेलद्वारे होणारा छळ
  3. सायबर स्टॉकिंग (Stalking) (सायबर विश्वातून होणारा पाठलाग)
  4. आपल्या देशातील सायबर स्टॉकिंगबाबतची वास्तविकता जाणून घेणाऱ्या काही प्रातिनिधिक घटना
  5. सायबर पोर्नोग्राफी (सायबर विश्वातून पसरविली जात असलेली अश्लिलता)
  6. सायबर डीफमेशन (बदनामी)
  7. मॉर्फिंग (संगणकाच्या माध्यमातून इंटरनेटवरील मजकूरामध्ये किंवा छायाचित्रांमध्ये फेरफार करणे)
  8. ई-मेल स्फुफिंग (ईमेलद्वारे होणारे विडंबन/टवाळी)

सायबरगुन्हा' किंवा संगणकीय गुन्हा ही संज्ञा संगणकइंटरनेटाशी संबंधित असणाऱ्या व प्रत्यक्ष गुन्ह्यात संगणकाचा प्रामुख्याने वापर असणाऱ्या गुन्ह्याला उद्देशून योजली जाते. सायबर गुन्हे विशेषकरून हॅकिंग, प्रताधिकारभंग, बाल लैंगिक चित्रण इत्यादी स्वरूपात घडताना दिसतात. याशिवाय खासगी किंवा गोपनीय माहिती चोरणे, फोडणे आदी प्रकारदेखील सायबर गुन्ह्यांमध्ये मोडतात. माहिती तंत्रज्ञानाच्या प्रसाराबरोबर सायबर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ होताना आढळत आहे.


बाह्य दुवे


Tags:

सायबर गुन्हा महिलांना सामना करावा लागत असलेले सायबर गुन्हेसायबर गुन्हा ई-मेलद्वारे होणारा छळसायबर गुन्हा सायबर स्टॉकिंग (Stalking) (सायबर विश्वातून होणारा पाठलाग)सायबर गुन्हा आपल्या देशातील सायबर स्टॉकिंगबाबतची वास्तविकता जाणून घेणाऱ्या काही प्रातिनिधिक घटनासायबर गुन्हा बाह्य दुवेसायबर गुन्हा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अजिंठा-वेरुळची लेणीप्रणिती शिंदेवृत्तपत्रगौतमीपुत्र सातकर्णीहोमरुल चळवळभारतभारतीय आडनावेहनुमान चालीसाशुद्धलेखनाचे नियमभारताची अर्थव्यवस्थाभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्यामराठी भाषेमधील वृत्तपत्रेविठ्ठलबालविवाहनिवडणूकसॅम पित्रोदामुळाक्षरकराड दक्षिण विधानसभा मतदारसंघश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीठाणे लोकसभा मतदारसंघशहाजीराजे भोसलेभाषालंकारभाऊराव पाटीलमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीमहाराष्ट्रातील खासदारांची यादीमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४चिपको आंदोलनमहाभारतज्योतिबा मंदिरमहात्मा गांधीमहानुभाव पंथसुजात आंबेडकरभारतातील शासकीय योजनांची यादीकाळाराम मंदिर सत्याग्रहसमाजवादसुभाषचंद्र बोसमहालक्ष्मीसाम्यवादपृथ्वीमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागरावेर लोकसभा मतदारसंघबडनेरा विधानसभा मतदारसंघअभिव्यक्तीमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीवंजारीमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)गंगा नदीभारतीय पंचवार्षिक योजनाकोरफडमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीक्रिकेटचे नियममोबाईल फोनफेसबुक१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धसूर्यमालारशियन क्रांतीजिजाबाई शहाजी भोसलेरवींद्रनाथ टागोरतणाववातावरणराष्ट्रवादभारताचा ध्वजमहाराष्ट्र टाइम्सबुद्धिबळसंवादयूट्यूबकळसूबाई शिखरअध्यक्षसविता आंबेडकरजैन धर्मभोवळनिलेश साबळेअक्षय्य तृतीयाहनुमान जयंतीपोवाडामहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळअहिल्याबाई होळकरसातारा🡆 More