श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे गणेशाला समर्पित असलेले पुण्यातील एक हिंदू मंदिर आहे.

मंदिराला दरवर्षी लाखांहून अधिक भाविक भेट देतात. या मंदिराच्या भक्तांमध्ये अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचा समावेश होतो, जे वार्षिक दहा दिवसांच्या गणेशोत्सवासाठी येथे उपस्थित असतात.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

मंदिराच्या मुख्य गणेश मूर्तीचा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती10 दशलक्ष (US$२,२२,०००) रकमेचा विमा उतरवला गेला आहे. हे मंदिर १३० वर्षे जुने आहे. २०१७ मध्ये या मंदिराने आपल्या गणपतीची १२५ वर्षे साजरी केली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती
मंदिराचे ऑक्टोबर २०१२ मधील छायाचित्र

गणपतीच्या मूर्तीचा इतिहास

    सन १८९३

श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे त्या काळातील एक सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते. श्रीमंत व सत्यशील प्रस्थ होते. पुण्यातील बुधवार पेठेतील दत्त मंदिर म्हणजेच त्यांची रहावयाची इमारत होती. त्याकाळी पुण्यामध्ये आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचे देहावसान झाले. त्या घटनेने ते स्वतः व त्यांच्या पत्नी सौ. लक्ष्मीबाई हे दोघेही दुःखी झाले. दरम्यानच्या काळात त्यांचे गुरू श्री. माधवनाथ महाराजांनी त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर देत सांगितले की, आपण काही काळजी करू नका, आपण एक दत्ताची आणि एक गणपतीची मूर्ती तयार करा व त्यांची रोज पूजा करा. ही दोन दैवते आपल्या मुलाप्रमाणे सांभाळा. भविष्यात जसे आपले अपत्य आपल्या मातापित्यांचे नाव उज्‍ज्वल करते त्याप्रमाणे ही दोन दैवते तुमचे नाव उज्‍ज्वल करतील. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शेटजींनी दत्ताची एक संगमरवरी मूर्ती व गणपतीची मातीची मूर्ती बनवून घेतली. ह्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली होती आणि त्यावेळी परिसरातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई, बाबुराव गोडसे, भाऊसाहेब रंगारी, श्री. मोरप्पाशेठ गाडवे उर्फ काका हलवाई, नारायणराव बाजेवाले उर्फ जाधव, नारायणराव भुजबळ, रामाराव बुटलेर, गणपतराव विठूजी शिंदे, सरदार परांजपे, शिवरामपंत परांजपे, गोपाळराव रायकर, नारायणराव दरोडे यांसह सर्व थरांतील लोकांनी या समारंभाला हजेरी लावली होती. गणपतीची ही पहिली मूर्ती शुक्रवार पेठेतील अकरा मारूती मंदिरात ठेवलेली आहे व तिची नित्य नियमाने पूजा चालू असते.

    सन १८९६

सन १८९४ साली लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. सन १८९६ साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मूर्ती तयार करण्यात आली व तिचा उत्सव होऊ लागला. दरम्यानच्या काळात श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचे निधन झाले. परंतु त्यांनी सुरू केलेली गणेशोत्सवाची परंपरा त्या परिसरातील नागरिकांनी व तत्कालीन कार्यकर्त्यांनी पुढे सुरू ठेवली. त्याकाळी हा गणपती बाहुलीच्या हौदाचा सार्वजनिक गणपती म्हणून ओळखला जात होता. या उत्सवाचे व्यवस्थापन सुवर्णयुग तरुण मंडळ करीत होते. सध्या ही मूर्ती आपल्या कोंढवा येथील बाबुराव गोडसे पिताश्री वृद्धाश्रमातील मंदिरात आहे.

    सन १९६८

सन १८९६ साली बनवलेल्या मूर्तीची अवस्था थोडी जीर्ण झाली होती. त्यामुळे सन १९६७ साली आपल्या दगडूशेठ हलवाई गणपतीच्या अमृत महोत्सवानिमित्त सुवर्णयुग तरुण मंडळाच्या प्रताप गोडसे आदींनी गणपतीची नवीन मूर्तीं बनविण्याचा संकल्प केला व त्यासाठी कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार श्री. शिल्पी यांना पाचारण केले. त्यांच्याकडून लहान मातीची मूर्ती नमुना म्हणून करून घेतली. बाळासाहेब परांजपे यांनी कार्यकर्त्यांना ती मूर्ती प्रोजेक्टरवरून मोठ्या पडद्यावर दाखविली व सर्वानुमते ती आधीच्या मूर्तीसारखी असल्याची खात्री पटल्यानंतर मोठया मूर्तींचे काम प्रत्यक्षात सुरू झाले. पूर्ण मूर्ती तयार झाल्यानंतर श्री. शिल्पी यांनी त्याकाळी जे ग्रहण झाले त्या दिवशी संगम घाटावर ग्रहण संपेपर्यंत देवाची आराधना केली,. गणेश यंत्राची पूजा केली व त्यानंतर ज्या ठिकाणी मातीची मूर्ती तयार केली होती, त्याच ठिकाणी येऊन विधिवत धार्मिक गणेश याग केला, व त्यानंतर ते सिद्ध श्रीयंत्र मंगलमूर्तीच्या पोटामध्ये सर्वांसमक्ष ठेवले. शिल्पी यांनी जमलेल्या लोकांना या मंगलमूर्तीची तुम्ही सर्वांनी दररोज नित्य नियमाने पूजा करा व त्याचे शेवटपर्यंत पावित्र्य राखा असे सांगितले. त्याकाळी ही मूर्ती बनविण्याचा खर्च सुमारे ११२५/- इतका आला होता.

हा गणपती लोकमान्य टिळक यांचा काळात बसवला गेला.

ट्रस्ट

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती 
दगडूशेठ हलवाई गणपती गणेशोत्सव २०२२ पुणे,महाराष्ट्र

या गणपतीच्या निमित्ताने श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट स्थापन झाला. हा ट्रस्ट समाजोपयोगी कामांना मदत करण्यात अग्रेसर आहे.

हे सुद्धा पहा

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

प्रसिद्ध गणपती मंदिरे

बाहेरील दुवे

संदर्भ

Tags:

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती गणपतीच्या मूर्तीचा इतिहासश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हे सुद्धा पहाश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती प्रसिद्ध गणपती मंदिरेश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाहेरील दुवेश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संदर्भश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीगणपतीगणेश चतुर्थीपुणेमंदिरमहाराष्ट्राचे मुख्यमंत्रीहिंदू

🔥 Trending searches on Wiki मराठी:

नाथ संप्रदायहोमरुल चळवळगौतम बुद्धमेंदूरस (सौंदर्यशास्त्र)शिल्पकलामहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेमेष राससूर्यमालाज्ञानेश्वरपाणीविठ्ठल मंदिर (पंढरपूर)कादंबरीजेजुरीनकाशागोपाळ गणेश आगरकरआम्ही जातो अमुच्या गावामहाराष्ट्र भूषण पुरस्कारभाषाशिक्षणकेशव महाराजभंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघमूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्याचा हक्क (कलम ३२)वाघज्ञानपीठ पुरस्कारशिवकिरवंतव्हॉट्सॲपसामाजिक कार्यबच्चू कडूमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीजिल्हाधिकारीपांडुरंग सदाशिव सानेरशियाचीनमाद्रीकार्ल मार्क्सताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पमराठी लिपीतील वर्णमालामुलाखतसावित्रीबाई फुलेयकृतअजिंठा-वेरुळची लेणीतुकडोजी महाराजविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीमहाराष्ट्राचे राज्यपालसाहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांची यादी (मराठी)सूर्यनमस्कारविधिमंडळनागपूर लोकसभा मतदारसंघअभंगतरसअग्रलेखकवठलिंगायत धर्मगोवासूत्रसंचालनमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगधुळे लोकसभा मतदारसंघमराठीतील बोलीभाषामहात्मा गांधीआनंदराज आंबेडकरभूकंपदहशतवादकोल्हापूरदौलताबादनातीशहाजीराजे भोसलेकाळाराम मंदिरशिरूर लोकसभा मतदारसंघपरभणी लोकसभा मतदारसंघबाबासाहेब आंबेडकरद्रौपदी मुर्मूकोहळाविहीरभारतीय स्टेट बँकदूधगोरा कुंभार🡆 More