सामवेद

सामवेद हा प्राचीन हिंदू संस्कृतीतील चार वेदांपैकी तिसऱ्या क्रमांकाचा वेद आहे.

साम म्हणजे 'गायन' आणि वेद म्हणजे 'ज्ञान' होय. हा वेद ब्रह्मदेवाने लिहिला आहे, असे मानले जाते.

हिंदू धर्मग्रंथावरील लेखमालेचा भाग
aum symbol
वेद
ऋग्वेद · यजुर्वेद
सामवेद · अथर्ववेद
वेद-विभाग
संहिता · ब्राह्मणे
आरण्यके  · उपनिषदे
उपनिषदे
ऐतरेय  · बृहदारण्यक
ईश  · तैत्तरिय · छांदोग्य
केन  · मुंडक
मांडुक्य  ·प्रश्न
श्वेतश्वतर  ·नारायण
कठ
वेदांग
शिक्षा · छंद
व्याकरण · निरुक्त
ज्योतिष · कल्प
महाकाव्य
रामायण · महाभारत
इतर ग्रंथ
स्मृती · पुराणे
भगवद्गीता · ज्ञानेश्वरी · गीताई
पंचतंत्र · तंत्र
स्तोत्रे ·सूक्ते
मनाचे श्लोक · रामचरितमानस
शिक्षापत्री · वचनामृत


सामवेद

निर्माण

ब्रह्मदेव निद्रेत असताना त्यांच्या तोंडातून तीन वेद निघाले, त्यांच्यापैकी एक म्हणजे सामवेद.

साम शब्दाचा अर्थ

साम शब्दाचा पहिला अर्थ प्रिय किंवा प्रियकर वचन असा आहे. कुठे कुठे गान या अर्थानेही तो प्रयुक्त आहे. प्रचलित सामवेदाला हाच अर्थ लागू पडतो. साच अमश्चेति तत् साम्न: सामत्वम्‌। (बृहदारण्यक उपनिषद १.३.२२) सा म्हणजे ऋचा आणि अम् म्हणजे गांधारादी स्वर होत. दोन्ही मिळून साम होते.

स्वरूप

सामवेदात ॠग्वेदातील ॠचांचे गायन कसे करावे याचे विवेचन आहे. सामवेदाला भारतीय संगीताचा पाया म्हटले जाते. यातील ७५ ऋचा ऋग्वेदाच्या शाकल शाखेतून घेतल्या, तर इतर ७५ या बाष्कल शाखेमध्ये मोडतात. या ऋचांचे गायन-सामगान हे सुचवलेल्या विशिष्ट सुरांमध्ये गायले जाते. सामगान गाऊन विशिष्ट विधी करतांना विविध देवतांना प्रसाद पेयार्पण म्हणून दूध व इतर पदार्थाबरोबर सोम वनस्पतीचा रस अर्पिला जाई.

सामवेदातील काही ऋचा या इ.स.पू. १७०० च्या आधी (ऋग्वेदाच्या कालखंडात) रचल्या असल्या पाहिजेत असे मानले जाते. भगवद्गीतेत श्रीकृष्णाने वेदानां अहम् सामवेदोस्मि असे म्हटले आहे, हा सामवेदाचा गौरवच आहे. कौथुम आणि राणायनीय, जैमिनीय या सामवेदाच्या शाखा मानल्या जातात. ताण्ड्य/पञ्चविंश, षड्विंश, साम विधान, आर्षेय, देवताध्याय, उपनिषद् आणि वंश ही सामवेदाची ब्राह्मणे आहेत.

गंधर्ववेद

गंधर्ववेद हा सामवेदाचा उपवेद आहे.

सामवेद आणि यज्ञसंस्था

वेदा ही यज्ञार्थ अभिप्रवृत्ता:| वेद हे यज्ञासाठीच प्रवृत्त झाले आहेत अशी वैदिकांची धारणा आहे. यज्ञातील वेगवेगळी कर्मे करणारे ऋत्विज वेगवेगळे असतात. त्यांना विशिष्ट नावे असतात. देवतांना संतुष्ट करण्यासाठी ऋचांचे गायन करण्याचे काम सामवेद्यांचे असते. ते करणाऱ्या चार ऋत्विजांचा एक गट असतो.त्यांच्या प्रमुखाला उद्गाता म्हणतात. एखादे साम तयार झाले की त्याच्या गायनाचे पाच अवयव तयार होतात, ते असे :-

१. प्रस्ताव

२. उद्गीथ

३. प्रतिहार

४.उपद्रव

५. निधन

सामगान करताना त्यातील ऋचांची आवृत्ती केली जाते त्याला स्तोम असे म्हणतात. साम हे प्रायः तीन ऋचांवर गायले जाते आणि त्याचे तीन पर्याय म्हणजे तीन आवृत्त्या करतात.

सामगानाचे स्वरूप

सामगानात पदांच्या १ ते ७ अंकांनी संगीताच्या सात स्वरांचा निर्देश केला जातो. प्रायः अधिकांश मंत्रांमध्ये पाचच स्वर लागतात. सहा स्वरांनी गायिली जाणारी सामे थोडी आहेत आणि सात स्वरांची त्याहून थोडी आहेत.

सामतंत्र

यात तेरा प्रपाठक असून, सामगायनाचा विधी, त्याचे संकेत आणि त्याच्या पद्धती यांचे हे वर्णन आहे. हे एका प्रकारचे सामवेदाचे व्याकरणच आहे.

सामवेदावरची मराठी पुस्तके

  • सामवेद (सामवेदाचे शुद्ध बिनचूक मराठी भाषांतर, लेखक - कृ.म. बापटशास्त्री)
  • सामवेद - (मराठी अर्थ व स्पष्टीकरण), लेखक - श्रीपाद दामोदर सातवळेकर
  • सामवेदाचा सुबोध अनुवाद (लेखक - ?)



वेद सामवेद 
ऋग्वेदयजुर्वेदसामवेदअथर्ववेद

Tags:

सामवेद निर्माणसामवेद साम शब्दाचा अर्थसामवेद स्वरूपसामवेद गंधर्ववेदसामवेद आणि यज्ञसंस्थासामवेद सामगानाचे स्वरूपसामवेद सामतंत्रसामवेद ावरची मराठी पुस्तकेसामवेद

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कबड्डीमहादेव गोविंद रानडेहत्तीरोगऔरंगजेबसोलापूरमराठा साम्राज्यमहात्मा गांधीमुरूड-जंजिराभूगोलचित्ताभारद्वाज (पक्षी)भारताचा स्वातंत्र्यलढाहनुमान चालीसाशेतकरी कामगार पक्षभीमाशंकरशाहू महाराजमहाराष्ट्राचा भूगोलमुंबईनिबंधसमाज माध्यमेवनस्पतीकायदाअजय-अतुलपर्यटनमहाराष्ट्राचे राज्यपालराष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बँकआवळाभारतातील मूलभूत हक्ककळंब वृक्षभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळभारताची संविधान सभामोडीसकाळ (वृत्तपत्र)सिंहगडचक्रधरस्वामीजागतिक व्यापार संघटनाविदर्भातील जिल्हेमराठी भाषेमधील वृत्तपत्रेअनागरिक धम्मपालहिंदू धर्मातील अंतिम विधीइंदिरा गांधीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारतातील शेती पद्धतीसंभाजी राजांची राजमुद्राराष्ट्रीय महिला आयोगगोपाळ कृष्ण गोखलेफुटबॉलइडन गार्डन्सभारताचे संविधानदीनबंधू (वृत्तपत्र)मराठीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांची यादीन्यूटनचे गतीचे नियमकुळीथनाशिकश्रीकांत जिचकारमोह (वृक्ष)भारताच्या राष्ट्रपतींची यादीवासुदेव बळवंत फडकेपेशवेगर्भाशयदादाभाई नौरोजीअहवाल लेखनकेंद्रीय लोकसेवा आयोगगायपंचशीलॲलन रिकमनलोकमान्य टिळकमहाड सत्याग्रहईशान्य दिशातापी नदीमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीशेतीभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीपर्यावरणशास्त्रभारतीय रुपयाहनुमानलिंग गुणोत्तरकळसूबाई शिखरगणपती स्तोत्रे🡆 More