भीमाशंकर

भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे.भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.

या ज्योतिर्लिंगामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते.

भीमाशंकर
भीमाशंकर मंदिराचा कळस

भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे. १९८४ साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली. जंगलात रानडुक्कर, सांबर, भेकर, रानमांजर, रानससा, उदमांजर, बिबट्या असे विविध प्रकारचे प्राणी आणि अनेक पक्षी आढळतात. येथील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे शेकरू. म्हणजे उडणारी खार. येथील शेकरू तांबूस रंगाची असून ती फक्त याच जंगलातच आढळते. बिबट्याच्या संवर्धनासाठी येथे वनविभागाने विविध योजना अवलंबल्या आहेत.

अतिशय घनदाट जंगल व तीर्थक्षेत्रामुळे हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे. येथील इतर प्रेक्षणीय स्थळे.

भीमाशंकर
  • गुप्त भीमाशंकर -भीमानदीचे मूळ उगम ज्योतिर्लिंगात आहे, परंतु ती तिथून गुप्त होते आणि मंदिरापासून जंगलात साधारणपणे १.५ किमी पूर्वेला पुन्हा प्रकटते असे मानले जाते. ही जागा गुप्त भीमाशंकर म्हणून ओळखली जाते.
  • कोकण कडा-भीमाशंकर मंदिराजवळच पश्चिमेला हा कडा असून त्याची उंची साधारणपणे ११०० मीटर इतकी आहे. येथून अतिशय विहंगम असे दृश्य दिसते. अतिशय स्वच्छ वातावरणात पश्चिमेकडचा अरबीसमुद्रही दिसू शकतो.
  • सीतारामबाबा आश्रम- कोकणकड्यापासून एक रस्ता या आश्रमाकडे जातो. घनदाट जंगलात हे ठिकाण आहे. गाडीने या ठिकाणी पोहोचता येते
  • नागफणी - आश्रमापासून नागफणीला जायला पायवाट आहे. हे ठिकाण अभयारण्यातील सर्वात उंच ठिकाण असून त्याची उंची समुद्रसपाटीपासून १२३० मीटर इतकी आहे. कोकण व परिसराचे अतिशय विहंगम दृश्य दिसते. कोकणातून हे शिखर नागाच्या फण्याप्रमाणे दिसते म्हणून नागफणी असे नाव पडले आहे.
भिमाशंकर हे खुप सुंदर ठिकाण आहे.भीमाशंकर येथील भीमा नदीचा उगम पाहणे खरोखरच एक अविस्मरणीय आनंद आहे. 

भारतातील बारा ज्योर्तिलिंगापैकी सहावे ज्योर्तिलिंग म्हणजे भीमाशंकर. भगवान शंकराचे हे धार्मिक स्थळ प्रसिद्ध आहे. निर्सगाने मुक्त हस्ताने उधळून करून या परिसराला सजवले आहे. सह्याद्रीच्या पश्चिकडील पसरलेल्या एका रांगेवरील उंच डोंगरावर भीमाशंकर आहे. प्रचंड गर्द झाडी, जंगल व उंच डोंगराच्या कुशीत भीमाशंकराचे मंदिर वसलेले आहे.

हेमाडपंथी पद्धतीचे हे मंदिर सुमारे १२०० ते १४०० वर्षांपूवीचे आहे. मंदिराच्या छतावर, खांबावर सुंदर नक्षीकाम आढळते. मंदिरावर दशावताराच्या कोरलेल्या मूर्ती रेखीव व सुंदर आहेत. सभामंडपाबाहेर सुमारे पाच मण वजनाची असलेली लोखंडी घंटा आहे. चिमाजी अप्पांनी ही घंटा भेट दिल्याचे सांगण्यात येते. या घंटेवर १७२९ असे इंग्रजीत नोंद आहे. हेमाडपंती पद्धतीचे बांधकाम असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार व नवे बांधकाम केल्यामुळे मूळ मंदिर बघण्यास मिळत नाही. मंदिराचा भव्य सभामंडप, उंच कळस, डोंगर उतरल्याशिवाय दिसत नाही.

शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज येथे भीमाशंकराच्या दर्शनास येत असत, पेशवे बाळाजी विश्वनाथ हे देखील येथे दर्शनासाठी आल्याच्या नोंदी आहेत. नाना फडणवीसांनी शिखरासह या मंदिराचा जिर्णोद्धार केला होता. सभामंडपाशेजारी दर्शनासाठी लोखंडी रांगा तयार केलेल्या आहेत. आधुनिक कॅमेरे लावून परिसरावर लक्ष ठेवण्यात येते. तसेच मोठा टिव्हीवर थेट गाभा-यातील शिवशंकराचे दर्शन घडते. गर्दी नसल्याने मनसोक्त शंकराचे दर्शन घडले.

भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे.

बाह्यदुवे

Tags:

खेडपुणेभीमा नदी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

ज्वारीचिपको आंदोलनउंबरव्यापार चक्रवंचित बहुजन आघाडीएकनाथ शिंदेधर्मो रक्षति रक्षितःगणपती स्तोत्रेआंबेडकर जयंतीवस्तू व सेवा कर (भारत)हवामानशास्त्रहार्दिक पंड्यामुंबईताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पभारताचे पंतप्रधानॐ नमः शिवायभारतीय प्रजासत्ताक दिनदालचिनीचंद्रशेखर वेंकट रामनशिक्षणऔरंगजेबकांजिण्यापृथ्वीच्या अंतरंगाची रचनासिंधुदुर्ग जिल्हारायगड लोकसभा मतदारसंघमण्यारभाऊराव पाटीलकुटुंबमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीकादंबरीमाहिती अधिकारमहालक्ष्मीहिंदू विवाह कायदाडॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तकेजागतिक तापमानवाढकासारमराठा साम्राज्यमराठी भाषा गौरव दिनगुरू ग्रहमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीसातारा लोकसभा मतदारसंघखडकजन गण मनसूर्यमराठीतील बोलीभाषाभारतातील जातिव्यवस्थायकृतसंख्यावृद्धावस्थालहुजी राघोजी साळवेपुणे जिल्हाकेळशिवाजी महाराजमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीविनायक दामोदर सावरकरडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनयेसूबाई भोसलेआर्थिक विकासभारत सरकार कायदा १९१९जालना जिल्हाजिजाबाई शहाजी भोसलेमाढा लोकसभा मतदारसंघशिवछत्रपती पुरस्कारअचलपूर विधानसभा मतदारसंघयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठलीळाचरित्रउच्च रक्तदाबजागतिकीकरणदुसरे महायुद्धध्वनिप्रदूषणमहाराष्ट्रातील लोककलामहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)महाराष्ट्रातील खासदारांची यादीआरोग्यप्राणायामभारतीय तंत्रज्ञान संस्था🡆 More