कडुलिंब

निम्ब , लिंब (किंवा कडुलिंब, बाळंतलिंब; शास्त्रीय नाव: Azadirachta indica; कूळ : Meliaceae) हा भारतीय उपखंडातील पाकिस्तान, भारत, नेपाळ व बांगलादेश या देशात आढळणारा एक वृक्ष आहे.

या वृक्षाची पाने कडू असल्याने त्याला कडुनिंब म्हटले जाते. या झाडामुळे प्रदूषण होत नाही.

कडुलिंब
कडुलिंब
कडुलिंब
निंबोळ्या

वर्णन

कडुलिंब हा मोठा, ३०-६० फूट उंच वाढणारा छायादार वृक्ष आहे. याला साधारणत: ९ ते १५ इंच लांब देठ व त्यास सम अंतरावर, हिरव्या रंगाची २-३ सेंटिमीटर लांबीची, टोकदार, करवतीसारखे दाते असणारी ९ ते १५ पाने येतात . पानांच्या दोन्ही बाजू वेगवेगळ्या (oblique leaf ) सुरू होतात. कडुलिंबाची फुले पांढरी, लहान व सुगंधित असतात. तर फळे आधी हिरवी व पिकल्यावर पिवळी होतात. जवळपास ३-४ मिलिमीटर लांब असलेल्या या फळांत प्रत्येकी एक बी असते.त्या बियांना निंबोळी किंवा लिंबोणी असे म्हणतात. कडुलिंबाच्या लाकडाचा वापर इमारतीत व पेट्या वगैरे बनविण्यासाठी होतो.

कडुनिंब हे संपूर्ण भारतात आढळणारे, नैसर्गिकरीत्या उगवणारे, एक बहूपयोगी झाड आहे. याला लिंबाच्या रंगाची छोटी छोटी कडू चवीची फळे लागतात, म्हणून याचे नाव कडूलिंब. या झाडाची पाने, फळे, बिया, साल, मुळे सर्चव कडू असतात. याच्या अनेक उपयोगांमुळे हे सर्वांचे आवडते झाड आहे. कडू असल्यामुळे 'जंतुघ्न'हा याचा गुणधर्म पशु-पक्षी, पीक, मानव या सर्वांसाठी वापरला जातो. गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी याची कोवळी पाने, फुले, लहान कोवळी फळे, जिरे, मिरे,सैन्धव मीठ, ओवा, गूळ, हिंग, चिंच हे सर्व एकत्र वाटून त्याची गोळी करून खातात.कडुलिंबाचे झाड मोठे म्हणजे सर्वसाधारणपणे आठ ते दहा मीटर उंच वाढते. याचे खोड सरळ वाढते; नंतर याला फांद्या फुटतात.या झाडाची साल काळी व खडबडीत असते. याची पाने हिरवी,मध्यम आकाराची व लांबट असतात. पानाच्या कडेने नक्षी असते. एका काडीला दहा ते बारा पाने येतात. पानाचा देठ बारीक असतो. चव कडू असते. कडुलिंबाच्या झाडाची सावली(छाया) थंड असते. या कडुलिंब झाडाच्या सावलीतील (छायेतील) घर उन्हाळ्यात थंड राहते.

आपल्या आजूबाजूच्या परिसरात आढळणारा वृक्ष म्हणजे कडुलिंब होय. हा वृक्षसुद्धा हिंदू धर्मात महत्त्वाचा मानला जातो.

वर्णन

कडुलिंबचे झाड मोठे असते. हे झाड सर्वसाधारणपणे आठ ते दहा मीटर उंच वाढते. याचे टखोड सरळ वाढते; नंतर याला फांद्या फुटतात. या झाडाची साल काळी व खडबडीत असते. याची पाने हिरवी,मध्यम आकाराची व लांबट असतात.पानाच्या कडेने नक्षी असते. एका काडीला दहा ते बारा पाने येतात. पानाचा देठ बारीक असतो. चव कडवट असते. या झाडाची फुले लहान,पांढरया रंगाची तसेच सुगंधी असतात. या झाडाची फळे कच्ची असताना हिरवी व पिकल्यावर पिवळ्या रंगाची दिसतात. त्या फळाचा आकार लहान असतो. त्यात बी असते. त्याला लीबोळी असे म्हणतात.

धार्मिक महत्त्व

मराठी महिन्याची सुरुवात चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडव्याला होते. त्या दिवशी गुढी उभी करताना कडूलिंबाच्या झाडाची डहाळी वापरतात. तसेच त्या झाडाच्या फुलांची मिरपूड,मीठ,गुळ घालून केलेली चटणी खावी,अशी प्रथा आहे.

औषधी महत्त्व

कडुलिंबाचा वृक्ष सगळ्या दृष्टीने औषधी आहे.याची पाने,काड्या वाटून,त्याचा रस उन्हाळात प्रशान केल्याने उन्हाचा त्रास होत नाही. बुद्धी तल्लख होते. कडुलिंबाच्या काडीने दात घासल्याने दात किडत नाहीत. दाताना बळकटी येते. तसेच मुल्व्याधी पोटातील कृमीवरउपाय म्हणून काम करते, कडूलिंबाची पाने धान्यात घातल्याने धान्याला कीड किंवा अळी लागत नाही. साबण, सौंदर्य प्रसाधने यात तसेच दंतमंजन,पेस्ट यामध्ये पण कडूलिंबाचा वापर करतात.

इतर माहिती

कडूलिंबाची झाडे जिथे जास्त प्रमाणात असतात तेथील हवा शुद्ध राहते. या झाडाच्या फळांचा रस काढून, त्याचा वापर तेल काढण्यासाठी केला जातो. त्या तेलाचा उपयोग सांधेदुखी कमी होण्यासाठी करतात.

गुणधर्म

  • उन्हाळ्यामुळे गोवर, कांजिण्या, ह्या सारखे रोग उद्भवतात, अश्यावेळी रोग्याला कडुनिंबाच्या पानांच्या अंथरुणावर झोपवून मंत्र म्हणत असत.
  • पूर्वी स्त्रियांना प्रसूतीनंतर तीन दिवस जेवणाच्या आधी कडुलिंबाच्या पानांचा रस देत असत. त्यामुळे मातेला दूधही जास्त येत असे. व्यालेल्या गाईलाही कडुनिंबाचा पाला खाण्यास देत असत.
  • कडुलिंबामध्ये आयुर्वेदिक गुणधर्मही असतात व ते कडू, विपाकी, शीतवीर्य, लघु, मंदाग्निकर-खोकला, ज्वर, अरुची, कृमी, कफ, कुष्ठ नाशक म्हणून वापरले जाते. हा जणू कल्पवृक्षच आहे.

धार्मिक महत्त्व

मराठी वर्षाची सुरुवात चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुडीपाडवा या दिवशी होते. त्या दिवशी गुढी उभी करताना कडूलिंबाच्या झाडाची डहाळी वापरतात. तसेच त्या झाडाच्या फुलांची मिरपूड, मीठ, गूळ घालून केलेली चटणी खावी, अशी प्रथा आहे. हिंदूंचे नवीन शालिवाहन वर्ष गुढीपाडव्यापासून सुरू होते. चैत्र महिन्यात झाडांना नवी पालवी फुटते आणि उन्हाचा कडाका जाणवू लागतो. उन्हामुळे शरीरातील उष्णता वाढून नाना प्रकारचे आजार होतात. अशा आजारांचे प्रमाण कमी व्हावे आणि आपली प्रतिकारशक्ती वाढावी, आपले नवीन वर्ष आरोग्यपूर्ण जावे म्हणून आपल्या पूर्वजांनी पाडव्याला कडुनिंबाचे सेवन सांगितले आहे.

मराठी महिन्याची सुरुवात चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुडीपाडव्याला होते.त्या दिवशी गुडी उभी करताना कडूलिंबाच्या झाडाची डहाळी वापरतात. तसेच त्या झाडाच्य फुलांची मिरपूड, मीठ, गुळ घालून केलेली चटणी खावी अशी प्रथा आहे.

औषधी महत्त्व

कडुलिंबाचा वृक्ष सगळ्या दृष्टीने औषधी आहे.याची पाने, काड्या वाटून, त्याचा रस उन्हाळात प्रशान केल्याने उन्हाचा त्रास होत नाही. काही लोक हा पेलाभर रस रोज पितात. त्यामुळे लठ्ठपणा कमी होतो; सडसडीत माणसे सडसडीतच राहतात. कडुलिंबाच्या काडीने दात घासल्याने दात किडत नाहीत. दाताना बळकटी येते. तसेच मुळव्याध व पोटातील कृमींवर उपयोगी आहे. कडुलिंबाची वाळलेली पाने धान्यात घातल्याने धान्याला कीड किंवा अळी लागत नाही. साबण, सौंदर्य प्रसाधने यात तसेच दंतमंजन, पेस्ट यामध्ये पण कडुलिंबाचा वापर करतात.

रस काढून, त्याचा वापर तेल काढण्यासाठी केला जातो. त्या तेलाचा उपयोग सांधेदुखी कमी होण्यासाठी करतात. मधुमेह या रोगा मध्ये नीम अतिशय ऊपयुक्त आहे.यक्रुत विकारांमधे नीम त्याच्या कडू रसाने काम करते. रोज अर्धा कप नीम रस प्यायल्याने मधुमेह नियंत्रित करता येतो.

कडुलिंबाचा वृक्ष सगळ्या दृष्टीने औषधी आहे.याची पाने, काड्या वाटून, त्याचा रस उन्हाळात प्रशान केल्याने उन्हाचा त्रास होत नाही. बुद्धी तल्लख होते. कडुलिंबाच्या काडीने दात घासल्याने दात किडत नाहीत. दाताना बळकटी येते. तसेच मुल्व्याधी पोटातील कृमीवर कडूलिंबाची पाने धान्यात घातल्याने धान्याला कीड किंवा अळी लागत नाही. साबण, सौंदर्य प्रसाधने यात तसेच दंतमंजन,पेस्ट यामध्ये पण कडूलिंबाचा वापर करतात.

उपयोग

  • काड्या दांत घासण्यास उपयोगी, लाकूड इमारतीसाठी.
  • आयुर्वेदानुसार - जंतुनाशक, सापाच्या विषावर, गर्मीवर, रक्तदोषहारक, विषमज्वरावर, कृमिनाशक, दाहावर, महारोगावर, बाळंतरोगावर, अफूच्या उतारासाठी, जखमेवर, मुळव्याध, मधुमेह, इ. अनेक रोगांवर[ संदर्भ हवा ]
  • यापासून बनणाऱ्या औषधी - पंचनिंबचूर्ण, अनेक औषधांमधील एक प्रमुख घटक.
  • कडुलिंब या झाडाची पाने खोबरेल तेलात काळी होईपर्यंत उकळायची आणि ते तेल नियमितपणे लावल्याने केसांची वाढ जोमाने होते. केसांच्या अनेक समस्या दूर होतात.
  • पोटात जंत झाले तर पानांचा रस काढून एक चमचा रसात थोडा (अगदी चिंचोक्याएवढाच) गूळ घालून तीन दिवस प्याल्यास जंत बाहेर पडतात.
  • अंगाला खाज सुटत असेल तर पानाचा रस सर्व अंगाला किंवा आंघोळीच्या गरम पाण्यात दहा -बारा कडुलिंबाची पान ठेचून घालावी.
  • ताप आल्यास सकाळ-संध्याकाळ कडुलिंबाच्या सालीच्या काढा घेतात.
  • कडुलिंबाची पान जखमेवर कुटून लावल्यास जखम लवकर बरी होते. निबोण्यांचे तेलही औंषधी आहे.
  • रक्त दूषित झाल्यावर त्वचेवर डाग पडतात, तेव्हा हे तेल लावतात. औषधी गुणधर्म आहेत. या झाडाचे साल, मूळ, पान, बिया सर्वच औषधीं आहेत.
  • सर्वात महत्त्वाचा उपयोग म्हणजे कडुनिंब हे अत्युत्तम जंतुनाशक आहे. ह्याच्या पानांची पूड शेतात पसरल्यास खत म्हणून उपयोगी तर पडतेच पण त्यापेक्षाही रोपांना किडीपासून दूर ठेवते.
  • कडुलिंब वनस्पतीचे गुणधर्म आणि उपयोग : उपचार हा जखम बरे करण्यासाठी

कडूलिंबाने कुरूप डाग न सोडता जखमा बरी करता येतात. तसेच सेप्टिक इन्फेक्शनपासून बचाव करते. कडूलिंब सामान्यत: जंतुनाशक गुणधर्मांमुळे जखमा भरण्यासाठी वापरला जातो. रोज जखमांवर आणि डागांवर कडुनिंबाच तेल थोडीश्या प्रमाणात लावावे. कडुनिंबाच्या तेलात आवश्यक फॅटी ऍसिडस् असतात, जे जखम लवकर बरी होण्यासाठी मदत करतात आणि आपली त्वचा निरोगी बनवते.

  • कडुलिंब वनस्पतीचे गुणधर्म आणि उपयोग : मुरुमांपासून मुक्तता मिळवण्यासाठी

कडुनिंबामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुण देखील आहे ज्यामुळे मुरुम कमी होते. कडूलिंबाच्या तेलाने त्वचा कोरडेपणा, त्वचेचा खाज सुटणे आणि लालसरपणा दूर होतॊ. कडुनिंब हे लवकर मुरुम करण्यासाठी आणि त्वचेचे सैंदर्य वाढवते. अश्या प्रकारे कडुलिंब याचा वापर केला जातो.

कडुनिंब देखील त्वचेसाठी मॉइश्चरायझरचा उत्कृष्ट स्रोत आहे. कडूलिंबाच्या तेलाचा वापर करून त्यातील फॅटी ऍसिडस् आणि जीवनसत्त्वे आपल्या त्वचेला नमी देतात आणि मऊ करतात, त्यामुळे त्वचा डाग विरहित आणि तरुण बनवते. कडुनिंबाच्या तेलातील व्हिटॅमिन ई खराब झालेल्या त्वचेची दुरुस्ती करते आणि पर्यावरणातील बदलांचा प्रभाव देखील कमी करते ज्यामुळे त्वचेचे होणारे वाईट परिणाम होते.

इतर

हा उत्तराभाद्रपदा नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.

कडूलिंबची झाडे जिथे जास्त प्रमाणात असतात तेथील हवा शुद्ध राहते. या झाडाच्या फळांचा रस काढून, त्याचा वापर तेल काढण्यासाठी केला जातो. त्या तेलाचा उपयोग सांधेदुखी कमी होण्यासाठी करतात.

इतर नावे

कडुलिंबाला भारतीय भाषांमधून वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते.

कडुलिंबाचे झाड सगळ्या दृष्टीने औषधी वनस्पती आहे

बाह्य दुवे

Tags:

कडुलिंब वर्णनकडुलिंब वर्णनकडुलिंब धार्मिक महत्त्वकडुलिंब औषधी महत्त्वकडुलिंब इतर माहितीकडुलिंब गुणधर्मकडुलिंब धार्मिक महत्त्वकडुलिंब औषधी महत्त्वकडुलिंब उपयोगकडुलिंब इतरकडुलिंब इतर नावेकडुलिंब बाह्य दुवेकडुलिंबनेपाळपाकिस्तानबांगलादेशभारतवृक्ष

🔥 Trending searches on Wiki मराठी:

संगीतातील रागव्यंजनपारनेर विधानसभा मतदारसंघचैत्र पौर्णिमाजाहिरातलोकशाहीगुढीपाडवापंढरपूरगहूईशान्य दिशाउद्धव ठाकरेवसुंधरा दिनरोहित शर्माभारतातील जातिव्यवस्थाआदिवासीसमर्थ रामदास स्वामीवेरूळ लेणीसोलापूरमहाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगेवृत्तपत्रवेदवनस्पतीलोकसंख्यायोनीनातीमूळव्याधरेणुकाअर्जुन वृक्षरामायणताम्हणभारतीय संविधानाची ४४वी घटनादुरुस्तीमलेरियाराकेश बापटनागरी सेवामराठी भाषागजानन दिगंबर माडगूळकरकलाज्योतिबासम्राट अशोक जयंतीभारतीय संसदपौर्णिमामुरूड-जंजिराकल्की अवतारकोल्हापूर लोकसभा मतदारसंघदशावतारसत्यशोधक समाजचिन्मय मांडलेकरकल्याण (शहर)विनायक दामोदर सावरकरआर्थिक विकासगौतम बुद्धउपभोग (अर्थशास्त्र)संगीतातील घराणीसरपंचआनंद शिंदेभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीनवनीत राणाउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघकर्करोगराज्यसभावारली चित्रकलाधनादेशओझोनशुभेच्छाफुटबॉलसचिन तेंडुलकरतापमानसूत्रसंचालनइतिहासाच्या अभ्यासाची साधनेनीती आयोगविजयसिंह मोहिते-पाटीलमहिलांसाठीचे कायदेयूट्यूबमहाबलीपुरम लेणीकुंभ रासमानवी शरीरभारतातील राजकीय पक्षजागतिक पुस्तक दिवस🡆 More