प्रतापगड: महाराष्ट्रातील एक किल्ला

प्रतापगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

प्रतापगड
प्रतापगडचे ठिकाण दाखविणारा नकाशा
प्रतापगडचे ठिकाण दाखविणारा नकाशा
प्रतापगड
नाव प्रतापगड
उंची ३५५६ फूट
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी सोपी
ठिकाण सातारा, महाराष्ट्र
जवळचे गाव महाबळेश्वर, आंबेनळी घाट
डोंगररांग सातारा
सध्याची अवस्था व्यवस्थित
स्थापना {{{स्थापना}}}


प्रतापगड: इतिहास, कसे जावे?, छायाचित्रे
प्रतापगड

वाहनतळावरून गडाच्या दक्षिणेच्या टेहळणी बुरुजाखालून सरळ जाणाऱ्या पायवाटेने आपण थोड्या वेळातच तटबंदीत लपविलेल्या पश्चिमाभिमुख महादरवाज्यात येऊन पोहोचतो. वैशिष्ट्य म्हणजे शिवकालीन रितीप्रमाणे आजही हा दरवाजा सूर्यास्तानंतर बंद ठेवला जातो व सूर्योदयापूर्वी उघडला जातो. महादरवाज्यातून आत गेले की उजव्या हातालाच चिलखती बांधणीचा बुरूज दिसतो. हा बुरूज पाहून परत पायऱ्यांच्या मार्गाने भवानी मंदिराकडे जाता येते. मंदिरात भवानीमातेची सालंकृत प्रसन्न मूर्ती आहे. ही मूर्ती महराजांनी नेपाळमधील गंडकी नदीतून शाळिग्राम शिळा आणून त्यातून घडवून घेतली. या मूर्तीशेजारीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नित्य पूजेतील स्फटिकाचे शिवलिंग व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार आहे.

ह्या मंदिरासमोरून बालेकिल्ल्याकडे चालू लागल्यास उजव्या हाताला समर्थस्थापित हनुमानाची मूर्ती दिसते; पुढे बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार ओलांडल्यानंतर आपण केदारेश्वर महादेवाच्या मंदिराजवळ येऊन पोहोचतो. मंदिरात भव्य शिवलिंग आहे. या मंदिराशेजारीच प्रशस्त सदर आहे. किल्ल्याच्या बुरुजावरून आजूबाजूला पहिले असता मोठमोठे पर्वत दिसतात. या प्रत्येक पर्वताचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे.

केदारेश्वर मंदिराच्या मागील बाजूस राजमाता जिजाबाईंच्या वाड्याचे अवशेष आहेत. येथे उजवीकडे बगीचाच्या मधोमध शिवाजीचा महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे.या पुतळ्याच्या जागीच पूर्वी राजांचा राहता वाडा होता. या पुतळ्याशेजारीच शासकीय विश्रामधाम असून येथील बागेतून उजव्या बाजूच्या वाटेने तटावर जाऊन तटबंदीवरून फेरफटका मारताना जावळी खोऱ्याचे विहंगम दृश्य दिसते. किल्ल्याला महादरवाज्याखेरीज घोरपडीचे चित्र असणारा राजपहाऱ्याचा दिंडी दरवाजा आहे. त्याच्या जवळ रेडका बुरूज, पुढे यशवंत बुरूज, तर त्याच्यापुढे सूर्य बुरूज हे बुरूज आहेत.

अफझलखानाने दगा केल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला मारले. त्यानंतर संभाजी कावजी या मर्दानी गड्याने अफझलखानाचे शिर या बुरुजात पुरले, असे इतिहास सांगतो. भवानीच्या नगरखान्याची खिडकी उघडून पाहिल्यानंतर देवीचा चेहरा दिसतो. या देवीचीही एक कथा सांगितली जाते. शिवाजी महाराजांनी या देवीसाठी रोज सनई चौघडा वाजविण्याची प्रथा सुरू केली होती. 'हडप' आडनावाचा पुजारी तिला पंचामृतासह नैवेद्य दाखवीत असे. या भवानी मंदिरात सभामंडप व नगारखाना आहे. मंदिरापासून शे-दोनशे पावले चढल्यावर एक छोटेखानी दरवाजा लागतो आणि तेथूनच किल्ल्यात प्रवेश होतो. त्याच्यापुढे एक पडीक चौथरा आहे. विमानातून प्रतापगड पाहिला तर त्याचा आकार फुलपाखरासारखा दिसतो. १४०० फूट लांबी व ४०० फूट रुंदी एवढा त्याचा विस्तार आहे. इतर गडांपेक्षा या गडाला विशेष चांगली तटबंदी आहे. वायव्येकडे तटबंदी ८०० फुटांहून अधिक उंच आहे. बालेकिल्ल्याच्या ईशान्येला किल्ल्यातल्या दोन तळी आहेत. तेथून कोयनेचे खोरे सुंदर दिसते व येथेच ही किल्ल्याची फेरी पूर्ण होते.

इतिहास

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार मोरोपंत त्र्यंबक पिंगळे यांच्या देखरेखीखाली प्रतापगडाचे बांधकाम इ.स.१६५६ पार पडलेे.

छत्रपती राजाराम महाराज गडावर एप्रिल १६८९ ते १० ऑगस्ट १६८९ पर्यंत वास्तव्यास होते. छत्रपती राजाराम महाराज यांची काकरखानासोबत पहिली लढाई याच गडाच्या पायथ्याशी झाली, त्यामध्ये नेत्रदीपक कामगिरी बजावली होती. या लढाईत पायदळ प्रमुख पिलाजी गोळे हे छत्रपतींच्या सोबत चिलखतीप्रमाणे पुढे होते.

इ.स.१६५६ ते इ.स १८१८ काही महिने सोडल्यास हा किल्ला शत्रूपासून अभेद्य राहिला.

१७ फुटाचा कांस्याच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उदघाटन इ.स. १९५७ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले.

कसे जावे?

प्रतापगडाला जाण्यासाठी जवळचे ठिकाण - महाबळेश्वर, जिल्हा सातारा.

सातारा जिल्ह्याच्या उत्तरेकडील जावळी तालुक्यात महाबळेश्वराच्या पश्चिमेस ८ मैलावर प्रतापगडाचा डोंगर आहे. पार आणि किनेश्वर या दोन गावांमधल्या डोपऱ्या नावाच्या एका टेंभावर या किल्ल्याची बांधणी झाली आहे. महाबळेश्वरहून महाडला जाणारी गाडी कुमरोशी गावाजवळ आली, की तेथून अर्ध्या तासाच्या प्रवासात प्रतापगडला जाता येते.

अशा या जावळीच्या प्रांतात पायथ्यापासून प्रतापगड सुरू होतो. त्या गडाच्या खाली डाव्या हाताला एक पायवाट दिसते. दर्गा शरीफ म्हणजे अफजलखानाची कबर. या गडाला एकच महाद्वार आहे. त्याच्या खालच्या बाजूला वरून आलेले पाणी खाली लोटणारा पावसाळी ओढा आहे. थोड्या पायऱ्या चढून गेल्यावर दरवाज्यात उभे राहता येते. दरवाज्याच्या आतल्या बाजूला द्वाररक्षकांची ठिकाणे दिसतात. हा बुरूज सोमसूत्री प्रदक्षिणा करून पाहता येतो. या ठिकाणी इतिहास अभ्यासक, शाळेच्या व महाविद्यालयाच्या सहली जातात. हे एक पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. दरवर्षी या ठिकाणी शिवप्रताप दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. प्रतापगडाचा परिसर पाहत असताना आपणास इतिहासातील अनेक प्रसंग डोळ्यासमोर येतात. शूरता आणि गनिमी कावा व इतिहासातील शिवप्रतापाच्या अनेक गोष्टींची साक्ष आजही प्रतापगडावर गेल्यावर आपणास होते. जावळी खोरे कसे होते व आहे, याचा उलगडा येथे गेल्यावरच होतो.

छायाचित्रे

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे

Tags:

प्रतापगड इतिहासप्रतापगड कसे जावे?प्रतापगड छायाचित्रेप्रतापगड हे सुद्धा पहाप्रतापगड संदर्भप्रतापगड बाह्य दुवेप्रतापगडकिल्लाभारतमहाराष्ट्र

🔥 Trending searches on Wiki मराठी:

उदयभान राठोडसर्वनामग्रंथालयज्ञानपीठ पुरस्कारभूगोलमहाराष्ट्रातील किल्लेविनयभंगपंढरपूरविदर्भातील पर्यटन स्थळेआंब्यांच्या जातींची यादीमहाराष्ट्राची हास्यजत्रारावणमराठा आरक्षणसचिन तेंडुलकरशरद पवारकुषाण साम्राज्यइसबगोलपांडुरंग सदाशिव सानेसूत्रसंचालनसमुपदेशनसम्राट अशोक जयंतीउजनी धरणठाणे जिल्हादेवेंद्र फडणवीसकवठवर्धा लोकसभा मतदारसंघजगातील देशांची यादीवंचित बहुजन आघाडीयवतमाळ जिल्हाग्राहक संरक्षण कायदाधनगरग्रीसमुंजजास्वंदतापी नदीमानवी भूगोलभारतातील शासकीय योजनांची यादीलता मंगेशकरदूधगोपाळ गणेश आगरकरमृत्युंजय (कादंबरी)भारताची अर्थव्यवस्थाज्वारीरक्तगटकालभैरवाष्टकतापमानमानसशास्त्रमहाराष्ट्रातील लोककलालोकमान्य टिळकमानवी विकास निर्देशांकहोमरुल चळवळअमित शाहरक्तउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघयेसूबाई भोसलेबलुतेदाररमाबाई आंबेडकरम्युच्युअल फंडमहाराष्ट्रातील आरक्षणशनिवार वाडाकोकणकायदाहापूस आंबापुरस्कारभीम जन्मभूमीकुटुंबनियोजनजगातील देशांच्या राजधान्यांची यादीमतदानछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसशिर्डीसेंद्रिय शेतीमाढा लोकसभा मतदारसंघकृत्रिम बुद्धिमत्ताकविताभारत छोडो आंदोलनभारतीय संविधानाचे कलम ३७०भारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीरोहित शर्मा🡆 More