तुळजाभवानी मंदिर

श्री तुळजाभवानी अंबाबाई मंदिर हे महाराष्ट्रातील तुळजापूर येथील एक हिंदू मंदिर आहे.

तुळजाभवानी देवी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते. छत्रपती शिवाजी महाराज या मंदिरात नेहमी येत असत.

तुळजाभवानी मंदिर
शहाजीराजे महाद्वार, तुळजाभवानी मंदिर, तुळजापूर
तुळजाभवानी मंदिर

नाव: श्री‌ तुळजाभवानी अंबाबाई मंदिर
निर्माता: महामंडलेश्वर माराडदेव कदंब (कदम)
जीर्णोद्धारक: छत्रपती शिवाजी महाराज
देवता: आदिशक्ती पार्वती देवी
वास्तुकला: हेमाडपंथी
स्थान: तुळजापूर, धाराशिव, महाराष्ट्र

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. ही देवी भगवती (भवानी) म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र क्षात्रतेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणाशक्ती व स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती यांची आराध्यदेवता, अशी ही तुळजापूरची भवानीदेवी महाराष्ट्राची कुलस्वामीनी आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देउन हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद दिला, असा दावा केला जातो.

इतिहास

हे शहर बालाघाटच्या एका कड्यावर वसले आहे. मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंती आहे. इतिहास व पुरातत्त्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकुट अथवा यादवकालीन मानले जाते. तुळजाभवानी संबंधित सर्वांत जुना शिलालेख तुळजापूर तालुक्यातील ‘काटी’ येथे इ.स. १३९७ सालच्या शिलालेखात पहावयास मिळतो. मंदिराचे धार्मिक पूजेचे व्यवस्थापन व पुरोहिताचे अधिकार १५३ पाळीकर भोपे कुळाकडे आहेत.

वैशिष्ट्ये

श्री तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन मोठी प्रवेशद्वारे आहेत. एका प्रवेशद्वारास राजे शहाजी महाद्वार तर दुसऱ्या दरवाजाला राजामाता जिजाऊ महाद्वार असे नाव देण्यात आले आहे. देवीच्या मंदिरात जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत.पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर गोमुख तीर्थ येथे दर्शनाला जाण्यापूर्वी भाविक येथे स्नान करतात तसेच हातपायही धुतात. समोरच कल्लोळ तीर्थ आहे. देवीच्या स्नानासाठी तीन तीर्थ एकत्र आली असे कल्लोळ तीर्थाच्या बाबतीत सांगितले जाते. मंदिराच्या मुख्य द्वारापाशी उजव्या सोंडेचा सिद्धीविनायक आहे. येथेच आदीशक्ती आदिमाया व अन्नपूर्णा देवीचे मंदिरही त्याच बरोबर आदिमाया आदिशक्ती पाठिमाघे मातंगी देवीचे मंदिर असून श्री दत्त मंदिर येमाई देवी जेजुरी खंडोबा मंदिर ही मंदिरात लक्ष वेधून घेतात.

पुढे गेल्यावर मंदिराचे आवार दर्शनी पडते. या प्रशस्त आवारात भाविकांना बसण्याची सोय करण्यात आली आहे. येथूनच श्री तुळजाभवानी देवी मंदिराचे दर्शन होते. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याचा दरवाजा चांदीच्या पत्र्याने मढविला असून, त्यावर सुरेख असे नक्षीकाम करण्यात आले आहे. येथेच श्री तुळजाभवानीची प्रसन्न आणि तेजस्वी काळा पाषाणाची मूर्ती दिसून येते. तीन फुट उंचीची ही मूर्ती स्वयंभू आहे. अष्टभुजा महिषासूरमर्दिनी सिंहासनावर उभी असून मस्तकाच्या मुकुटातून केसांच्या बटा बाहेर आलेल्या आहेत. आईया आठ हातात त्रिशूळ, बिचवा, बाण, चक्र, शंख, धनुष्य, पानपात्र आणि राक्षसाची शेंडी आहे. पाठीवर बाणाचा भाता असून देवीच्या मुख्याच्या उजव्या व डाव्या अंगाला चंद्र व सूर्य आहेत. तुळजाभवानीचा उजवा पाय महिषासून राक्षसावर तर डावा पाय जमिनीवर दिसून येतो. दोन पायांच्यामध्ये महिषासूर राक्षसाचे मस्तक आहे.

श्री तुळजाभवानी देवीची मुर्ती चल मुर्ती आहे. येथे उत्सव मूर्तीची मिरवणूक न काढता प्रत्यक्ष श्री तुळजाभवानी देवीच्या मुर्तीची पालखीत बसवून मंदिराभोवती मिरवणूक काढली जाते. वर्षातून एकूण तीन वेळा मुर्ती सिंहासनावरून हलवून गाभाऱ्याबाहेर असलेल्या पलंगावर ठेवली जाते. नंतर विजयादशमीच्या दिवशी सिमोल्लंघनाच्या वेळी आईची पालखीतून मिरवणूक काढली जाते. देवीच्या पालखीसोबत श्रीयंत्र, खंडोबा आणि महादेवाची मिरवणूकही निघते.

तुळजाभवानी मातेच्या मंदिर मधील रंगपंचमी

श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिर मधील रंगपंचमी ,श्री देवीच्या मंदिर मध्ये पारंपारिक पद्धतीने रंगपंचमी हा उत्सव साजरा होतो.


काळभैरव भेंडोळी उत्सव

काळभैरव भेंडोळी उत्सव हा जर वर्षी दिवाळीच्या नरकचतुर्दशी या वेळी स्थितीनुसार असतो , हा उत्सव पाहण्यासाठी हजोरो भाविक श्री तुळजाभवानी मंदिर मध्ये येतात.


दसरा उत्सव

श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिर मधील एक अदभूत असा दसरा उत्सव आहे. श्री तुळजाभवानी मातेची मुर्ती ही मंदिर परिसर मधील पिंपळाच्या पारावर आणून पालखी मध्ये ठेवून मंदिर प्रद्क्षना करण्यात येते. भाविक हळदी कुंकू यांची उधळण श्री देवीच्या पालखीवर करतात हा उत्सवा मध्ये लाखो भाविक सहभागी होतात.

ग्रहण कालावधी

श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिर मध्ये ग्रहण काळात श्री देवीस सोवळ्यात आणि पांढऱ्याशुभ्र वस्त्रा मध्ये ठेवण्यात येते आणि साज शृंगार नसतो आणि ग्रहण कालवधी संपल्यावर श्री देवीस स्नान घातले जाते आणि पूजा करण्यात येते.

पूजारी

महाराष्ट्रातील इतर मंदिरातील ब्राह्मण किंवा गुरव पुजाऱ्यांप्रमाणे, भवानी मंदिराचे मुख्य पुजारी हे मराठा पाळीकर भोपे कुळातील आहेत. १५३ मुख्य पाळीकर भोपे पुजारी आहेत जे यात्रेकरूंना सेवा देतात, व्यतिरिक्त सोळा सहायक पुजारी आहेत. यात्रेकरूंचे सहसा एका विशिष्ट पुजारी कुटुंबाशी जुने नाते असते. यात्रेकरू साड्या, साडी ब्लाउज पीस (मराठी भाषेत खन), बांगड्या, नारळ, सिंदूर, हळद, यांसह पूजा ओटी देवीच्या पूजेला आलेल्या भक्तांना निवास, भोजन, विधी अर्पण करून यात्रेकरूंसाठी यजमान म्हणून काम करणाऱ्या विशिष्ट पुजारी कुटुंबाशी सामान्यतः दीर्घकाळचे नाते असते. कुलधर्म कुलाचार पूजा, पूजेचे साहित्य, फुलांच्या माळा आणि नैवेद्य प्रसाद (देवतेसाठी विधी अन्न).प्रसाद शाकाहारी असू शकतो किंवा काही वेळा बळी दिलेल्या बकऱ्याचे मांस असू शकते. याच मंदिर संकुलातील मातंगी आणि आदिमाया या इतर दोन मंदिरांचे पुजारी महार समाजाचे आहेत.

नवरात्र

नवरात्रीच्या काळात भक्त राज्यभरातून ठिकठिकाणांहून पायी पालख्या घेऊन येतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानी चरणी अर्पण केलेली सोन्याच्या पुतळ्याची माळ आजही देवीच्या मुख्य अलंकारांपैकी एक आहे. श्री तुळजाभवानी ही आदिशक्ती म्हणून सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे.

शारदीय नवरात्र उत्सव

श्री तुळजाभवानी मातेच्या नवरात्र उत्सव हा मोठ्या प्रमणे साजरा केला जातो या नवरात्र काळात नऊदिवस पुजा , घटस्थापना करण्यात येते ,छबिना , श्री देवीस विविध प्रकारच्या अलंकार पुजा करण्यात येतात असे अनेक कार्यक्रम साजरे होतात . या उत्सवाला लाखोच्या संख्येने भाविक-भक्त तुळजापूरला येतात.www.tuljabhavanimandir.org


श्री तुळजाभवानी मातेचा छबिनाबद्दल माहिती

छबिना म्हणजे श्री तुळजाभवानी मातेची उत्सव मुर्ती एका चांदीच्या मेघडंबरी मध्ये व श्री देवीच्या अनेक वाहनापैकी एका वाहनावर श्री देवीची चांदीची मुर्ती व पादुका ठेवुन मंदिरा भोवती एक प्रदिक्षणा पूर्ण करतात याला छबिना म्हणतात.

श्री तुळजाभवानी मातेचा छबिना कालावधी प्रत्येक मंगळवार , पौर्णिमेच्या एक दिवस आधी आणि पौर्णिमा या दिवशी आणि त्या नंतर एक दिवस अश्या प्रमाणे करण्यात येतो .अश्विन कोजागिरी पौर्णिमेच्या अगोदरच्या दिवसाचा छबिना हा दिवाळी पाडव्याच्या दिवशी काढण्यात येतो .फाल्गुन पौर्णिमेचा छबिना गुढीपाडव्याच्या दिवशी काढण्यात येतो.. श्री तुळजाभवानी मातेच्या वर्षातील  २१ दिवस निद्राकाळातील छबिना काढला जात नाही.हा छबिना उत्सव पाहण्यासाठी हजरो भाविक येतात.

महत्त्व :- श्री तुळजाभवानी माता हे जागृत देवस्थान असून या छबिना उत्सवा मध्ये ज्या ज्या ठिकाणी छबिना उभा राहतो त्या ठिकाणी तुळजापूर क्षेत्राच्या बाजुतील सर्व गावांच्या शिवा येता या शिवांवर ( हद्द ) उभे राहून सर्व जगताच्या रक्षणासाठी व कल्याणासाठी उभी राहते . येते उभी राहून सारे जग पाहते व जगताचे कल्याण करते म्हणून छबिना उत्सव काढण्यात येतो .या छबीना याचे महत्त्व अधिक आहे  तसेच अनेक भाविक छबिन्याच्या वेळी श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिर मध्ये छबीन्या समोर पोत पाजळून आई तुळजाभवानी मातेचा जयघोष करत असतात . या छबिन्या मध्ये प्रमुख वाद्य हे संभळ असते गोंधळी बांधव हे विशिष्ट प्रकारे वाजवतात आणि त्या वेळी मंदिर परिसर हा मंगलमय वातवरणात हा छबिना उत्सव संपन्न होतो.

प्रशासन

श्री तुळजाभवानी मंदिर प्रशासन देवस्थानची नोंदणी मुंबई सार्वजनिक कायदा १९५० अन्वये पब्लिक ट्रस्ट म्हणून १९६२ साली झाली.

प्रवास

तुळजाभवानी मंदिर सोलापूर – छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर असून सोलापूरहून ४२ कि.मी. तर धाराशिवदहून २२ कि.मी. अंतरावर आहे.

Tags:

तुळजाभवानी मंदिर इतिहासतुळजाभवानी मंदिर नवरात्रतुळजाभवानी मंदिर प्रशासनतुळजाभवानी मंदिर प्रवासतुळजाभवानी मंदिरछत्रपती शिवाजी महाराजतुळजापूरतुळजाभवानी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारतीय संविधानाचे कलम ३७०महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगेभारतीय संस्कृतीपुणे लोकसभा मतदारसंघकरवंदपोक्सो कायदानवविधा भक्तीजगातील देशांच्या राजधान्यांची यादीसाखरपुडाबागलकोटसाहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांची यादी (मराठी)एकनाथबीड लोकसभा मतदारसंघयज्ञप्रदोष व्रतराजरत्न आंबेडकरफकिरामराठा आरक्षणसम्राट अशोक जयंतीछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसभारताचे सर्वोच्च न्यायालयदुष्काळजय जिनेंद्रकुंभ रासभूगोलस्वामी विवेकानंदमहाराष्ट्राची हास्यजत्राजैन धर्मसेंद्रिय शेतीपूर्व आफ्रिकाशिवाजी महाराजांचा जीवनक्रमपुरंदर किल्लामहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीभगवद्‌गीतादहशतवादसंख्यामुंबई इंडियन्सहिंगोली जिल्हाघोडाभारताच्या राष्ट्रपतींची यादीमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीकेंद्रशासित प्रदेशबाबा आमटेमहादेव कोळीकासवभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशबाजी प्रभू देशपांडेविश्वास नांगरे पाटीलहिंदू लग्नमतदानकुटुंबअलिप्ततावादी चळवळभगवानबाबाविधानसभावसंतराव दादा पाटीलकांजिण्याहरीणमहाड सत्याग्रहबाईपण भारी देवावस्तू व सेवा कर (भारत)समर्थ रामदास स्वामीबागलकोट जिल्हाहस्तमैथुनराम मंदिर (अयोध्या)चमारसंत तुकाराममैदान (हिंदी चित्रपट)कोळंबीपानिपतची तिसरी लढाईसंभाजी राजांची राजमुद्रासेवालाल महाराजमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकोरफडगोरा कुंभारआर.डी. शर्मामराठी व्याकरणदुर्योधननिलेश लंकेनितीन गडकरी🡆 More