उदयपूर

उदयपूर हे भारत देशाच्या राजस्थान राज्यामधील उदयपूर जिल्ह्याचे मुख्यालय व एक ऐतिहासिक शहर आहे.

सरोवरांचे शहर ह्या टोपणनावाने प्रसिद्ध असलेले उदयपूर राजस्थानच्या मेवाड प्रांताच्या राजधानीचे शहर होते. उदयपूरची स्थापना महाराणा दुसरे उदय सिंह ह्यांनी १५५९ साली केली व मेवाडची राजधानी चित्तोडगढहून उदयपूरला हलवली. १८१८ पर्यंत मेवाडची राजधानी राहिलेले उदयपूर ब्रिटीश राजवटीमध्ये राजपुताना एजन्सीचा भाग होते. उदयपूर जयपूरच्या ४०३ किमी नैऋत्येस तर अहमदाबादच्या २५० किमी ईशान्येस स्थित आहे.

उदयपूर
भारतामधील शहर

उदयपूर
सिटी पॅलेस व शहराचे दृष्य
उदयपूर is located in राजस्थान
उदयपूर
उदयपूर
उदयपूरचे राजस्थानमधील स्थान

गुणक: 24°35′N 73°41′E / 24.583°N 73.683°E / 24.583; 73.683

देश भारत ध्वज भारत
राज्य राजस्थान
जिल्हा उदयपूर जिल्हा
स्थापना वर्ष इ.स. १५५९
क्षेत्रफळ ६४ चौ. किमी (२५ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २,००० फूट (६१० मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ५,९८,,६८५
  - घनता २४२ /चौ. किमी (६३० /चौ. मैल)
  - महानगर १०,६४,२२२
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ

उदयपूर हे राजस्थानमधील एक अत्यंत लोकप्रिय पर्यटनस्थळ असून पर्यटनावर येथील अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. येथील पिछोला सरोवरावर बांधण्यात आलेले सिटी पॅलेस, सरोवरातील अनेक कृत्रीम बेटे (लेक पॅलेस) इत्यादींसाठी येथे जगभरातून पर्यटक येतात.

मुंबईदिल्लीदरम्यान धावणारा राष्ट्रीय महामार्ग ८ उदयपूरमधूनच जातो. उदयपूर विमानतळ शहराच्या २२ किमी पूर्वेस स्थित आहे. उदयपूर सिटी रेल्वे स्थानक येथील प्रमुख रेल्वे स्थानक असून येथून दिल्ली, कोलकाता, मुंबई इत्यादी प्रमुख शहरांसाठी थेट गाड्या सुटतात.

प्रेक्षणीय स्थळे

१) सिटी पॅलेस - उदयपूरच्या राजघराण्याचा पिचोला तलावाशेजारी असणारा राजवाडा. या राजवाड्यात अनेक शैलीमध्ये झालेले बांधकाम आहे. उदयपूरच्या गादीवरील अनेक राजांनी आपापल्या काळात काही बांधकाम केले त्यामुळे विविध शैलीमध्ये झालेले बांधकाम इथे दिसते. मोर चौक (काचेचा वापर करून बनवलेले मोर ), पाळणा महाल (राजघराण्यातील वापरले गेलेले सुरेख पाळणे), जनाना महाल, वस्तू संग्रहालय अशी काही उल्लेखनीय दालने या महालात आहेत. माणशी तिकीट साधारण २५० रुपये. मार्गदर्शकाची सोय (अधिक शुल्क भरून ).

२) जुन्या मोटारगाड्यांचा संग्रह - जयपूरच्या सत्ताधीशांनी वापरलेल्या जुन्या गाड्यांचा संग्रह पाहण्यासारखा आहे. तिकीट २५० रुपये. हा संग्रह उदयपूर शहरात वेगळ्या ठिकाणी आहे (राजवाड्याचा भाग नव्हे).

३) सहेलीयोन्की बाडी - महाराजा संग्रामसिंह यांनी १७१० ते १७३४ या कालावधीत आपल्या राणीसाठी आणि तिच्या माहेरून आलेल्या ४८ मैत्रिणीसाठी या बागेची निर्मिती केली. विविध प्रकारचे कारंजे उदा. आवाजावर चालणारे कारंजे, श्रावणातील कोसळत्या पावसाप्रमाणे आवाज करणारे कारंजे इथे दिसतात. अतिशय शांत आणि रमणीय ठिकाण.

४) राणा प्रताप ज्युबिली बाग - राणा प्रताप याचा सुरेख पुतळा आणि त्याच बरोबर त्यांच्या इतर सहकार्यांचे भव्य पुतळे या बागेत आहेत. एका संग्रहालयात चितोड गढ आणि कुंभाल गढची प्रतिकृती आहे.

५) लेक पॅलेस - पिचोला तलावात बांधलेला हा राजवाडा आज, ताज ग्रुप ने चालवलेले, एक हॉटेल बनला आहे.

६) रज्जू मार्ग - उदयपुर मधली एका टेकडीवर असणर्या करणी माता मंदिराला जाण्यासाठी रज्जू मार्ग बनवला गेला आहे. पर्यटकांना येथून उदयपूरचे विहंगम दृश्य दिसू शकते

बाह्य दुवे

उदयपूर 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:


चित्रदीर्घा

Tags:

अहमदाबादउदयपूर जिल्हाचित्तोडगढजयपूरब्रिटीश राजभारतमेवाडराजपुताना एजन्सीराजस्थान

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भोपाळ वायुदुर्घटनाअकोला लोकसभा मतदारसंघवेदपोवाडासिन्नर विधानसभा मतदारसंघअलिप्ततावादी चळवळदुष्काळइतर मागास वर्गउंबरवाक्यनिबंधनरसोबाची वाडीसोयाबीनसह्याद्रीनागपूरभारतातील समाजसुधारकनर्मदा नदीनदीरवींद्रनाथ टागोरनाथ संप्रदायक्लिओपात्राविवाहशिवाजी अढळराव पाटीलमाती प्रदूषणकापूसउत्पादन (अर्थशास्त्र)प्रज्ञा विवर्धन स्तोत्रसिंहगडदेवेंद्र फडणवीसमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीगुप्त साम्राज्यकथकस्त्री सक्षमीकरणमध्यपूर्वमाहिती तंत्रज्ञानवर्धमान महावीरतुकाराम बीजलावणीअर्थव्यवस्थासमाज माध्यमेफणससापेक्ष दारिद्र्य व निरपेक्ष दारिद्र्य फरकइतिहासपक्ष्यांचे स्थलांतरढेमसेजागतिक रंगभूमी दिनअकबरसंगीतातील रागए.पी.जे. अब्दुल कलामघोणसगजानन महाराजफळस्थानिक स्वराज्य संस्थाअकोला जिल्हाकल्याण लोकसभा मतदारसंघमहात्मा फुलेपारिजातकनामवसंतप्रकाश आंबेडकरकृत्रिम बुद्धिमत्तानाणेनाटककार आणि नाट्यकर्मी यांच्या चरित्रांची यादीमुकेश अंबाणीरामायणमोबाईल फोनवाकाटकमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीस्वच्छ भारत अभियानराशीरेडिओजॉकीभगतसिंगऋग्वेदभारत राष्ट्रीय क्रिकेट संघवर्णमालाभारतीय आडनावेसर्वनामविठ्ठल रामजी शिंदे🡆 More