सरपंच: ग्रामपंचायतीचा प्रमुख

ग्रामपंचायतीच्या प्रमुखाला सरपंच म्हणतात.

सरपंच हा ग्रामपंचायतीचा अध्यक्ष किंवा सभापती म्हणून कारभार पहात असतो. त्याच्या मदतीला ग्रामपंचायतीचा सेवक किंवा शिपाई व ग्रामसेवक. ह्या प्रकारची व्यवस्था भारतामध्ये ऐतिहासिकदृष्ट्या दीर्घकाळापासून अस्तित्वात आहे.

कार्यकाल

सरपंचाचा कार्यकाल सामान्यतः ५ वर्षाचा असला, तरी गैरवर्तवणुकीच्या कारणावरून त्याला पदावरून पदच्युत करता येते.

व्यवस्था

पंचायतराज व्यवस्थेच्या सबलीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने १८ जून १९८४ रोजी प्राचार्य पी.बी. पाटील यांची समिती स्थापन केली. ‘पंचायतराज’चे पुनर्विलोकन करणाऱ्या या समितीची कार्यकक्षा व्यापक होती. जून १९८६मध्ये समितीने तिच्या शिफारशी राज्य सरकारला सादर केल्या. त्यांत ग्रामपंचायतीचा प्रमुख असलेल्या सरपंचांची निवड थेट जनतेतून गुप्त मतदानाने करावी, तसेच विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी पंचायतराज व्यवस्थेकडे सोपवावी, महिला व बालकल्याण समिती स्थापन करावी, अश्या अनेक क्रांतिकारी शिफारशी होत्या. ७३ वी घटनादुरुस्ती होण्यापूर्वीच या समितीने या क्रांतिकारी शिफारशी केल्या होत्या, परंतु राज्यकर्त्यांनी त्यांकडे दुर्लक्ष केले. सरतेशेवटी, ७३ व्या घटनादुरुस्तीनंतर महाराष्ट्र राज्य सरकारने पंचायतराज व्यवस्थेच्या बळकटीकरणाबाबत पावले उचलली. सरकारने पाटील समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी तब्बल ३१ वर्षांनंतर केली.

महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांच्या शिफारशीनुसार १ मे १९६२ पासून ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद अशी त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्था सुरू झाली. त्या अन्वये गावातील प्रशासकीय अधिकार सरपंचाकडे आले.

बिहार राज्यामधील सर्व पंचायतींना मात्र, न्यायिक अधिकारही देण्यात आले आहेत.

संदर्भ

Tags:

ग्रामपंचायतग्रामसेवक

🔥 Trending searches on Wiki मराठी:

किरवंतनामदेवकोळसानेट (परीक्षा)भारतीय रिझर्व बँकदीपक सखाराम कुलकर्णीदिशास्वादुपिंडयशवंतराव चव्हाणअशोक चव्हाणठाणे लोकसभा मतदारसंघविनोबा भावेअजित पवारभारतीय संविधानाची ४४वी घटनादुरुस्तीबुलढाणा लोकसभा मतदारसंघदालचिनीराष्ट्रीय सेवा योजनारतन टाटाटोपणनावानुसार मराठी लेखकपौर्णिमाकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघअष्टांगिक मार्गसत्यनारायण पूजावसुंधरा दिनतुळजाभवानी मंदिरसोनेपरभणी जिल्हाभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेमुख्यमंत्रीघोणसबाराखडीप्राजक्ता माळीश्रीनिवास रामानुजनमांगविधानसभा आणि विधान परिषदकलास्वरवर्धमान महावीरराम सुतार (शिल्पकार)चिपको आंदोलनप्रेरणासेवालाल महाराजमानवी हक्कमराठा घराणी व राज्येहुप्पा हुय्या (मराठी चित्रपट)रायगड (किल्ला)महाराष्ट्र पोलीसकाळभैरवताराबाई शिंदेभीमराव यशवंत आंबेडकरपेशवेसामाजिक समूहसज्जनगडहिंगोली जिल्हाउष्माघातअहमदनगर लोकसभा मतदारसंघरयत शिक्षण संस्थाभारतातील शासकीय योजनांची यादीफुटबॉलपुरंदर किल्लामहाभियोगशिवनेरीराम सातपुतेबौद्ध धर्मवर्णनात्मक भाषाशास्त्रविष्णुभारतीय राष्ट्रीय काँग्रेसपृथ्वीधनगरभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्यानरेंद्र मोदीअभिव्यक्तीमहावीर जयंतीहिंदुस्तानी संगीत घराणीमासिक पाळीश्रीमुघल साम्राज्यबाळशास्त्री जांभेकरमराठी नावे🡆 More