सोव्हिएत संघ

सोव्हिएत संघ हा एक भूतपूर्व देश आहे.

सोव्हिएत संघाची स्थापना ३० डिसेंबर १९२२ रोजी झाली व २६ डिसेंबर १९९१ रोजी त्याचे १५ देशांमध्ये विघटन झाले. सोव्हिएत संघ हा जगातील सर्वात विशाल देश होता. या देशाने आशिया खंडाचा १/३ भाग आणि युरोप खंडाचा १/२ भाग व्यापला होता. या देशाच्या सीमा पूर्वेला पॅसिफिक महासागरापर्यंत, पश्चिमेला पोलंड आणि बाल्टिक समुद्रापर्यंत, उत्तरेला आर्क्टिक महासागरापर्यंत आणि दक्षिणेला काळा समुद्र, इराण, अफगाणिस्तान, भारत आणि चीन या देशांच्या उत्तर सीमांपर्यंत होत्या. हा देश पूर्व-पश्चिम सुमारे ६,२१५ मैल आणि उत्तर-दक्षिण सुमारे ३,११० मैल पसरलेला होता. पृथ्वीवरील भूपृष्ठाच्या १/६ भागात सोवियेत संघ पसरलेला होता.

सोव्हिएत साम्यवादी गणराज्यांचा संघ
Союз Советских Социалистических Республик
Union of Soviet Socialist Republics

१९२२१९९१
सोव्हिएत संघध्वज सोव्हिएत संघचिन्ह
सोव्हिएत संघ
राजधानी मॉस्को
अधिकृत भाषा रशियन
इतर भाषा अनेक
राष्ट्रीय चलन सोव्हिएत रुबल
क्षेत्रफळ २,२४,०२,२०० चौरस किमी
लोकसंख्या २९,३०,४७,५७१

भूरचना आणि वनस्प्तीच्या दृष्टीने सोवियेत संघाचे चार भाग पडत. अती उत्तरेच्या फिनलंडच्या सीमेपासून आर्क्टिक समुद्राच्या किनाऱ्याने बेरिंग समुद्रापर्यंत पसरलेला टुंड्राचा बर्फाच्छादित प्रदेश ज्यात मुख्यत्वे पाणथळ भाग, दलदलीचा प्रदेश, शेवाळे आणि खुरटी झुडपे यांचे साम्राज्य होते. या भागात मनुष्य वसाहत कमी होती. टुंड्रा प्रदेशाच्या दक्षिणेला तैगाचा अणकुचीदार वृक्षांचा, जंगलाचा प्रदेश होता. हा प्रदेश जगातील सगळ्यात मोठा, सलग अरण्यमय म्हणून ओळखला जात असे. सोवियेत संघातील महत्त्वाची शहरे मॉस्को (उच्चार मस्क्वा), क्यीव (उच्चार कीएव) या भागात होते.

तैगाच्या दक्षिणेस एल्म, ओक या झाडांसह लाकडाची विपुल संपत्तीचा, सुपीक जमिनीचा प्रदेश होता. जगातील सगळ्यात मोठा, सलग, लागवडीखालचा प्रदेश अशी याची ओळख. विविध प्रकारचे कारखने, उद्योग धंदे या भागात होते. या सुपीक भागाच्या दक्षिणेला कोरड्या हवामानाचा, वाळवंटी प्रदेश होता. या भागात अनेक्दा अवर्षण, दुष्काळ असे. येथील प्रमुख पीके तंबाखू, चहा, ऊस, अंजीर, अक्रोड, बांबू, लवंग, निलगीरी ही होती. सोवियेत संघ खूप मोठा देश होता तरी एकूण उपलब्ध क्षेत्राच्या केवळ १/३ जागा लागवडी योग्य होती.

साम्यवाद
सोव्हिएत संघ

मॅनिफेस्टो
मार्क्स · लेनिन

कम्युनिस्ट पक्ष
भाकप · माकप

देशात
सोवियत संघ
चीन
क्युबा
व्हियेतनाम
उत्तर कोरिया
लाओस

सोवियेत संघातल्या लहान मोठ्या सर्व नद्या धरून त्यांची एकूण संख्या एक लाखाच्यावर होती. जगातील सर्वात मोठ्या ९ नद्यांपैकी ओब, येनिसी, लेनाअमूर या ४ मोठ्या नद्या सोवियेत संघात होत्या. मस्क्वा नदीवर वसलेल्या मॉस्कोच्या परिसरातील नद्या ५ समुद्रांशी जोडल्या होत्या. पश्चिमेकडील द्विना नदीद्वारे बाल्टिक समुद्र, द्नीपरडॉन या नद्यांद्वारे काळा समुद्र आणि अझोव समुद्र, वोल्गा नदीने कास्पियन समुद्र तर उत्तरेकडील नद्यांद्वारे श्वेत समुद्र जोडला गेल्याने दळणवळण अतिशय सुलभ झाले होते.

आर्क्टिक समुद्राचा सुमारे ४,००० मैलांचा समुद्र किनारा सोवियेत संघाला लाभला होता. वर्षातील बहुतेक वेळ हा समुद्र बर्फाच्छादित राहत असल्याने नौकानयनास तो फारसा उपयोगी नव्हता. सुमारे एक लाख पन्नास हजार चौरस मैल क्षेत्रफळ असलेला व चारही बाजुने भूमीने वेढलेला कास्पियन समुद्राला तर जगातील सर्वात मोठे सरोवर म्हणता येईल. सैबेरियातील बैकाल सरोवर जगातील सर्वात खोल सरोवर ठरते.

विशाल आणि विस्तृत पर्वतरांगाही सोवियेत संघाला लाभल्या होत्या. देशाच्या नैऋत्येला कार्पेशियन पर्वतरांगा, पूर्व सैबेरियातील व्हर्कोयान्स्क आणि स्तानवोईच्या पर्वतरांगा, दक्षिणेला कॉकेशस पर्वतरांगा, अफगाणिस्तान, भारत आणि चीन या देशांच्या सीमांना लागूनच पामीर, तिआनशान आणि अलताई पर्वतरांगा तर युरोपीय आणि आशियाई सोवियेत संघाचे विभाजन करणाऱ्या उरल पर्वतरांगा अशा समृद्ध पर्वतरांगा सोवियेत संघास लाभल्या होत्या.

१५ घटक गणराज्ये, २० स्वायत्त गणराज्ये, ८ स्वायत्त प्रदेश व काही छोटे राष्ट्रीय गट मिळून सोवियेत संघ हा देश ओळखला जात होता. त्यातील रशिया राज्य सगळ्यात मोठे होते, सोवियेत संघाच्या सुमारे ७४ % भूभाग रशियाने व्यापला होता. सोवियेत संघात सुमारे १८० राष्ट्रीय गटाचे व सुमारे १२५ भाषा व बोली भाषा बोलणारे लोक होते. देशाचा मुख्य धर्म ऑर्थोडोक्स ख्रिश्चन हा होता. तीन गटात मोडणारे स्लाव वंशाचे लोक (१) ग्रेट रशियन्स - रशियात राहणारे, (२) लिटल रशियन्स - युक्रेन मध्ये राहणारे, (३) व्हाईट रशियन्स - बेलोरशियात राहणारे असे प्रमुख लोक राहत.

गणराज्ये

सोव्हिएत संघामध्ये एकूण १५ संघीय गणराज्ये होती. १९९१ साली सोव्हिएत संघाचे विघटन झाल्यानंतर ह्या १५ गणराज्यांचे रूपांतर १५ स्वतंत्र देशांमध्ये झाले.

सोव्हिएत साम्यवादी गणराज्य संघात
प्रवेश
लोकसंख्या
(१९८९)
संघाच्या
टक्के (%)
क्षेत्रफळ
(किमी)
(१९९१)
संघाच्या
टक्के (%)
राजधानी

स्वतंत्र देश
क्र.

1956-1991 दरम्यान गणराज्यांचा नकाशा
सोव्हिएत संघ 
सोव्हिएत संघ  रशियाचे सोव्हिएत साम्यवादी संघीय गणराज्य १९२२ &0000000147386000.000000१४,७३,८६,००० &0000000000000051.400000५१.४० &0000000017075200.000000१,७०,७५,२०० &0000000000000076.620000७६.६२ मॉस्को सोव्हिएत संघ  रशिया 1
सोव्हिएत संघ  युक्रेनियन सोव्हिएत साम्यवादी गणराज्य १९२२ &0000000051706746.000000५,१७,०६,७४६ &0000000000000018.030000१८.०३ &0000000000603700.000000६,०३,७०० &0000000000000002.710000२.७१ क्यीव
(१९३४ पूर्वी
खार्कीव्ह)
सोव्हिएत संघ  युक्रेन 2
सोव्हिएत संघ  उझबेक सोव्हिएत साम्यवादी गणराज्य १९२४ &0000000019906000.000000१,९९,०६,००० &0000000000000006.940000६.९४ &0000000000447400.000000४,४७,४०० &0000000000000002.010000२.०१ ताश्केंत
(१९३० पूर्वी
(समरकंद)
सोव्हिएत संघ  उझबेकिस्तान 4
सोव्हिएत संघ  कझाक सोव्हिएत साम्यवादी गणराज्य १९३६ &0000000016711900.000000१,६७,११,९०० &0000000000000005.830000५.८३ &0000000002727300.000000२७,२७,३०० &0000000000000012.240000१२.२४ अल्माटी सोव्हिएत संघ  कझाकस्तान 5
सोव्हिएत संघ  बेलारूशियन सोव्हिएत साम्यवादी गणराज्य १९२२ &0000000010151806.000000१,०१,५१,८०६ &0000000000000003.540000३.५४ &0000000000207600.000000२,०७,६०० &0000000000000000.930000०.९३ मिन्स्क सोव्हिएत संघ  बेलारूस 3
सोव्हिएत संघ  अझरबैजान सोव्हिएत साम्यवादी गणराज्य १९३६ &0000000007037900.000000७०,३७,९०० &0000000000000002.450000२.४५ &0000000000086600.000000८६,६०० &0000000000000000.390000०.३९ बाकू सोव्हिएत संघ  अझरबैजान 7
सोव्हिएत संघ  जॉर्जियन सोव्हिएत साम्यवादी गणराज्य १९३६ &0000000005400841.000000५४,००,८४१ &0000000000000001.880000१.८८ &0000000000069700.000000६९,७०० &0000000000000000.310000०.३१ त्बिलिसी सोव्हिएत संघ  जॉर्जिया 6
सोव्हिएत संघ  ताजिक सोव्हिएत साम्यवादी गणराज्य १९२९ &0000000005112000.000000५१,१२,००० &0000000000000001.780000१.७८ &0000000000143100.000000१,४३,१०० &0000000000000000.640000०.६४ दुशान्बे सोव्हिएत संघ  ताजिकिस्तान 12
सोव्हिएत संघ  मोल्दोव्हियन सोव्हिएत साम्यवादी गणराज्य १९४० &0000000004337600.000000४३,३७,६०० &0000000000000001.510000१.५१ &0000000000033843.000000३३,८४३ &0000000000000000.150000०.१५ चिशिनाउ सोव्हिएत संघ  मोल्दोव्हा 9
सोव्हिएत संघ  किर्गिझ सोव्हिएत साम्यवादी गणराज्य १९३६ &0000000004257800.000000४२,५७,८०० &0000000000000001.480000१.४८ &0000000000198500.000000१,९८,५०० &0000000000000000.890000०.८९ बिश्केक सोव्हिएत संघ  किर्गिझस्तान 11
सोव्हिएत संघ  लिथुएनियन सोव्हिएत साम्यवादी गणराज्य १९४० &0000000003689779.000000३६,८९,७७९ &0000000000000001.290000१.२९ &0000000000065200.000000६५,२०० &0000000000000000.290000०.२९ व्हिल्नियस सोव्हिएत संघ  लिथुएनिया 8
सोव्हिएत संघ  तुर्कमेन सोव्हिएत साम्यवादी गणराज्य १९२४ &0000000003522700.000000३५,२२,७०० &0000000000000001.230000१.२३ &0000000000488100.000000४,८८,१०० &0000000000000002.190000२.१९ अश्गाबाद सोव्हिएत संघ  तुर्कमेनिस्तान 14
सोव्हिएत संघ  आर्मेनियन सोव्हिएत साम्यवादी गणराज्य १९३६ &0000000003287700.000000३२,८७,७०० &0000000000000001.150000१.१५ &0000000000029800.000000२९,८०० &0000000000000000.130000०.१३ येरेव्हान सोव्हिएत संघ  आर्मेनिया 13
सोव्हिएत संघ  लात्व्हियन सोव्हिएत साम्यवादी गणराज्य १९४० &0000000002666567.000000२६,६६,५६७ &0000000000000000.930000०.९३ &0000000000064589.000000६४,५८९ &0000000000000000.290000०.२९ रिगा सोव्हिएत संघ  लात्व्हिया 10
सोव्हिएत संघ  एस्टोनियन सोव्हिएत साम्यवादी गणराज्य १९४० &0000000001565662.000000१५,६५,६६२ &0000000000000000.550000०.५५ &0000000000045226.000000४५,२२६ &0000000000000000.200000०.२० तालिन सोव्हिएत संघ  एस्टोनिया 15

बाह्य दुवे

सोव्हिएत संघ 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

अफगाणिस्तानआशियाइराणचीनपोलंडभारतयुरोप

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भीमराव यशवंत आंबेडकरपेशवेगोपीनाथ मुंडेतेजस ठाकरेभारताच्या सरन्यायाधीशांची यादीमहिलांचा मताधिकार३३ कोटी देवमराठागुढीपाडवाउंबरगजानन महाराजमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीभरती व ओहोटीदख्खनचे पठारराज्य निवडणूक आयोगप्रेमानंद गज्वीहातकणंगले लोकसभा मतदारसंघग्रंथालयरामदास स्वामी स्थापित अकरा मारुतीखिलाफत आंदोलनवसंतराव दादा पाटीलबारामती लोकसभा मतदारसंघदेवेंद्र फडणवीसअभंगहार्दिक पंड्याहळदलाल किल्लागोपाळ हरी देशमुखदौलताबादगालफुगीपुरंदर किल्लाजागतिक बँकउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघगोरा कुंभारलोकसभातिरुपती बालाजीकोल्हापूर लोकसभा मतदारसंघमानवी हक्कजालियनवाला बाग हत्याकांडलोणार सरोवरनाणेअजिंक्य रहाणेखंडोबाउद्योजककर्ण (महाभारत)भिवंडी लोकसभा मतदारसंघहडप्पा संस्कृतीमुळाक्षरआरोग्यमहाराष्ट्रातील राजकारणभारतीय लष्करखो-खोक्रिप्स मिशनरस (सौंदर्यशास्त्र)महाराष्ट्र भूषण पुरस्कारमण्यारमहाराष्ट्रातील पर्यटनकलामुखपृष्ठधोंडो केशव कर्वेफुफ्फुसबहिणाबाई चौधरीनृत्यपिंपळतुळजाभवानी मंदिरसंगीतनाचणीसातवाहन साम्राज्यसायबर गुन्हायोगकेदारनाथ मंदिरनिलेश साबळेबहिणाबाई पाठक (संत)अर्जुन पुरस्कारकाळूबाईभारतीय संसदराष्ट्रवादी काँग्रेस पक्षसर्वनाम🡆 More