तंबाखू: एक वनस्पती

तंबाखू भारतात उगवणारी एक वनस्पती आहे.

या वनस्पतीला संस्कृतमध्ये ताम्रपर्ण, गुच्छफल, क्षारपत्रा, ताम्रकुट व धुम्रपत्र अशी नावे आहेत . शास्त्रीय नाव निकोटिआना टॅबकम (Nicotiana tabacum) असेेआहे . हिची पाने वाळवून, कुस्करून त्याला चुना मळतात. याचा वापर लोक खाण्यासाठी करतात. त्याच चुन्यापासून गुटखा बनवतात. वाळलेल्या अखंड पानापासून विडी बनवितात. तंबाखू हा पदार्थ नशादायक आहे. विडी, सिगरेट, सिगार, चिरूट, हुक्का, गुटखा, तपकीर, हिरड्यांना लावण्याची मशेरी, चुन्याबरोबर मिसळून, पानात घालून आणि अशा नानाविध स्वरूपात हा पदार्थ वापरला जातो. तंबाखू एक नगदी पीक आहे. तंबाखूच्या वापराने कर्करोग होतो.br

तंबाखू: इतिहास, शास्त्रीय नावे, स्वरूप
तंबाखूचे पीक

इतिहास

युरोपीय

फ्रान्सचा पोर्तुगालमधील राजदूत जॉं निको (Jean Nicot) याने इ.स. १५६० मध्ये एका बेल्जियन व्यापाऱ्याकडून तंबाखू विकत घेतली. हा तंबाखू त्याने फ्रान्सच्या राणीला भेट दिला. वनस्पतींच्या ज्या वंशातून तंबाखू उद्भवतो त्याला, याच जॉं निकोच्या स्मरणार्थ, ‘निकोटिआना’ असे नाव दिले गेले.

नावाचा इतिहास

तंबाखू, तमाकू आणि टोबॅको या नावांचे मूळ कॅरेबियन बेटांवर आहे असे मानले जाते. कोलंबस आणि त्याचे खलाशी इ.स. १४९२ मध्ये कॅरेबिअन बेटांवर उतरले. त्या काळात कॅरेबियन स्थानिक लोक तंबाखू वापरताना त्यांना आढळले. ते विस्तवावर तंबाखूची पाने टाकून, त्यांचा धूर नळीतून ते नाकाने ओढत. या नळीला ते ‘टाबाको’ म्हणत. त्यावरूनच पुढे तंबाखूची सर्व नावे प्रचलित झाली असावीत असे मानले जाते.

शास्त्रीय नावे

  • भारतीय उपखंडात पिकणारा बहुतांश तंबाखू हा त्यापकी ‘निकोटिआना टोबॅकम’ ( Nicotiana tobacum) या जातीचा असतो व त्याचे कुळ- सोलेनेसी[Solanaceae].
  • निकोटिआना रस्टिका या जातीच्या तंबाखूत निकोटीनचे प्रमाण भारतीय तंबाखूपेक्षा जास्त असते.


स्वरूप

अल्कलॉइड या रासायनिक गटात मोडणारे निकोटीन हे द्रव्य तंबाखूच्या रोपट्याच्या मुळांमध्ये तयार होते. हे द्रव्य रोपाच्या पानांमध्ये साठवले जाते. रोपटय़ातील जवळपास ६४% निकोटीन पानांमध्ये असते, असे मानले जाते. यामुळे तंबाखूच्या पानांचा उपयोग केला जातो. निकोटीन हे कीटकनाशक ही आहे. न्यू मेक्सिको स्टेट विद्यापीठात करण्यात आलेल्या संशोधनात निकोटीनचे कीटकनाशक गुणधर्म वैज्ञानिकरीत्या सिद्ध झाले आहेत.

व्यसन

निकोटीन वेगाने रक्तप्रवाह मिसळू शकते. निकोटीन त्वचेतून तर शरीरात चटकन शिरतेच, परंतु धूम्रपानातील धूर किंवा तपकीर यांद्वारे ते श्वसनमार्गात सोडले की लागलीच रक्तात मिसळते रक्तप्रवाहात शिरकाव झाल्यापासून १०-२० सेकंदांत ते संपूर्ण शरीरभर पसरते आणि महत्त्वाचे म्हणजे मेंदूपर्यंत पोहोचून नशा चढल्याचा अनुभव देते. निकोटीन रक्तप्रवाहात मिसळले की आपल्या मनात शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याची तात्पुरती व फसवी भावना निर्माण होते. निकोटीनचा हा परिणाम काही काळाने शुद्ध रक्त पुरवठ्याने कमी होतो. हीच भावना परत मिळविण्यासाठी पुन्हा निकोटीनचे सेवन केले जाते आणि थोड्याच काळात त्याचे व्यसन लागते. निकोटीन व्यसनी व्यक्तींना अल्झायमर्स, स्किझोफ्रेनिया मेंदूशी संबंधित रोग होण्याची शक्यता जास्त असते.

परिणाम

कुठल्याही स्वरूपातील तंबाखूसेवनाने शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात. फुफ्फुसाचा कॅन्सर सिगारेटमुळे होतो. चघळायच्या तंबाखूमुळे तोंडाचा कॅन्सर होतो. दरवर्षी ३१ मे हा दिवस ‘जागतिक बिनतंबाखूचा दिवस’ (World No Tobacco Day) म्हणून साजरा केला जातो.तंबाखूमुळे रक्ताचे स्वरूप बदलतेतसेच त्याच्यातील रक्त पेशीचेस्वरूपही बदलते.

हेही वाचा

संदर्भ

http://epaper.loksatta.com/5132/indian-express/29-05-2011#p=page:n=22:z=2 Archived 2016-03-09 at the Wayback Machine.

Tags:

तंबाखू इतिहासतंबाखू शास्त्रीय नावेतंबाखू स्वरूपतंबाखू व्यसनतंबाखू हेही वाचातंबाखूकर्करोगगुटखाचुनाभारतवनस्पतीहिरडी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

संजू सॅमसनगूगलपन्हाळामाळशिरस विधानसभा मतदारसंघएकनाथअर्थशास्त्रकोळसाशांता शेळकेविधानसभाभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशआर्थिक विकासलिंगभाववृद्धावस्थानास्तिकतासोलापूर लोकसभा मतदारसंघमाती प्रदूषणघुबडबहिणाबाई चौधरीप्रदूषणमहाराणा प्रतापउपभोग (अर्थशास्त्र)जळगावमूळव्याधशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीहिंगोली जिल्हानर्मदा नदीसरपंचमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीमराठवाडागोवरमिठाचा सत्याग्रहभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीराधानगरी वन्यजीव अभयारण्यअमित शाहभारताचे राष्ट्रपतीशिक्षणसांगली विधानसभा मतदारसंघभारताचा स्वातंत्र्यलढामुळाक्षरधनगररामटेक लोकसभा मतदारसंघभारतीय राष्ट्रीय काँग्रेसनाथ संप्रदायमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळस्त्रीवाददत्तात्रेयॲरिस्टॉटलकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघभारताच्या सरन्यायाधीशांची यादीखडकवासला विधानसभा मतदारसंघलोकसभा सदस्यमुंजा (भूत)तुकडोजी महाराजबीड विधानसभा मतदारसंघइंडियन प्रीमियर लीगरत्‍नागिरी जिल्हामानसशास्त्रसंख्याबुद्धिमत्ताजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)करनांदेडपुरंदर किल्लानेतृत्वसकाळ (वृत्तपत्र)गजरामराठी व्याकरणह्या गोजिरवाण्या घरातवर्धा लोकसभा मतदारसंघभगतसिंगपोवाडालॉरेन्स बिश्नोईराजेंद्र प्रसादमावळ लोकसभा मतदारसंघदक्षिण दिशामौर्य साम्राज्यवार्षिक दरडोई उत्पन्नतणाव🡆 More