कॅस्पियन समुद्र

कॅस्पियन समुद्र (अझरबैजानी: Xəzər dənizi, फारसी: دریای خزر or دریای مازندران, रशियन: Каспийское море, कझाक: Каспий теңізі, चेचन: Paama Xord, तुर्कमेन: Hazar deňzi) हा पृथ्वीवरील जमिनीने वेढलेला सर्वात मोठा पाण्याचा साठा आहे (पृष्ठभागच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने).

कॅस्पियन समुद्राचे जगातील सर्वात मोठे सरोवर किंवा एक वेगळा समुद्र ह्या दोन्ही प्रकारांनी वर्गीकरण केले जाते. ३,७१,००० चौ. किमी (१,४३,२०० चौ. मैल) इतके पृष्ठभागाचे क्षेत्रफळ व ७८,२०० किमी (१८,८०० घन मैल) इतके पाण्याचे घनफळ असलेल्या कॅस्पियन समुद्राच्या उत्तरेला रशिया, दक्षिणेला इराण, पश्चिमेला अझरबैजान तर पूर्वेला तुर्कमेनिस्तान व कझाकस्तान हे देश आहेत. कॅस्पियन समुद्राच्या पश्चिम किनाऱ्यापाशी कॉकासस पर्वतरांगेची सुरुवात होते. बाकू हे कॅस्पियन समुद्रकिनाऱ्यावरील सर्वात मोठे शहर आहे.

कॅस्पियन समुद्र  
कॅस्पियन समुद्र - उपग्रह चित्र
कॅस्पियन समुद्र - उपग्रह चित्र
उपग्रह चित्र
स्थान मध्य आशिया, युरोप
गुणक: 40°N 51°E / 40°N 51°E / 40; 51
प्रमुख अंतर्वाह वोल्गा नदी, उरल नदी, कुरा नदी
प्रमुख बहिर्वाह बाष्पीभवन
भोवतालचे देश अझरबैजान ध्वज अझरबैजान
इराण ध्वज इराण
कझाकस्तान ध्वज कझाकस्तान
रशिया ध्वज रशिया
तुर्कमेनिस्तान ध्वज तुर्कमेनिस्तान
कमाल लांबी १,०३० किमी (६४० मैल)
कमाल रुंदी ४३५ किमी (२७० मैल)
पृष्ठभागाचे क्षेत्रफळ ३,७१,००० चौ. किमी (१,४३,२०० चौ. मैल)
सरासरी खोली १८७ मी (६१० फूट)
कमाल खोली १,०२५ मी (३,३६० फूट)
पाण्याचे घनफळ ६९,४०० किमी (१६,६०० घन मैल)
किनार्‍याची लांबी ७,००० किमी (४,३०० मैल)
भोवतालची शहरे बाकू (अझरबैजान), मखच्कला (रशिया), रश्त (इराण)

वोल्गा नदी, उरल नदी व कुरा नदी ह्या कॅस्पियन समुद्राला मिळणाऱ्या सर्वात मोठ्या नद्या आहेत. कॅस्पियन समुद्रामधून पाण्याचा बहिर्वाह केवळ बाष्पीभवनाद्वारे होतो. येथील पाण्याचा खारटपणा १.२ टक्के आहे. कॅस्पियन हे नाव मुळात कॅस्पियन ह्या लोकांपासून मिळाले आहे. जुन्या काळात ग्रीक आणि पर्शियन लोकं कॅस्पियन समुद्राला हैरकॅनीयन समुद्र म्हणून उल्लेखित असत. आजच्या काळात पर्शियात माझानदरान सागर असे हे उल्लेखले जाते.

कॅस्पियन समुद्र
कॅस्पियन समुद्राचा नकाशा
कॅस्पियन समुद्र
Stenka Razin (Vasily Surikov)

Tags:

अझरबैजानअझरबैजानी भाषाइराणकझाक भाषाकझाकस्तानकॉकासस पर्वतरांगचेचन भाषातुर्कमेन भाषातुर्कमेनिस्तानपृथ्वीफारसी भाषाबाकूरशियन भाषारशियासमुद्रसरोवर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

रावेर लोकसभा मतदारसंघभीमाबाई सकपाळविमावाघभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेरमाबाई आंबेडकरऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघवासुदेव बळवंत फडकेसम्राट अशोकइतर मागास वर्गमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेभारतातील जिल्ह्यांची यादीपांडुरंग सदाशिव सानेचोखामेळाअकोला लोकसभा मतदारसंघभारताचा ध्वजसेंद्रिय शेतीजाहिरातगहूभारताचा स्वातंत्र्यलढाज्योतिर्लिंगलोकसंख्या घनताशुभेच्छासांगली लोकसभा मतदारसंघश्रीकांत शिंदेबाराखडीभारताचे संविधानवनस्पतीजालना जिल्हागोपाळ गणेश आगरकरस्वस्तिकनाशिक लोकसभा मतदारसंघगगनगिरी महाराजडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनक्रमकावीळमराठी लिपीतील वर्णमालावाचनसूत्रसंचालनमहाराष्ट्र पोलीससंयुक्त महाराष्ट्र समितीभरती व ओहोटीमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीगोंदवलेकर महाराजअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीक्षय रोगसिंधुताई सपकाळयकृतभारतातील मूलभूत हक्कवायू प्रदूषण२०२४ लोकसभा निवडणुकारशियाभाषास्थानिक स्वराज्य संस्थाभीम जन्मभूमीविधानसभाज्वारीमहाबळेश्वर२०१४ लोकसभा निवडणुकासुभाषचंद्र बोसज्ञानपीठ पुरस्कारसर्पगंधासप्तशृंगी देवीराज्यपालशब्द सिद्धीमहाराष्ट्र शासनमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थाभारताची अर्थव्यवस्थाअश्वत्थामाजवरामजिल्हाधिकारीनिबंधजागतिकीकरणउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघहोमी भाभानांदेड लोकसभा मतदारसंघभारतीय संविधानाची उद्देशिकासातवाहन साम्राज्यसोने🡆 More