ग्रीस: दक्षिण युरोपातील एक देश

ग्रीस हा दक्षिण युरोपातील भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावरील एक देश आहे.

बाह्यजगात याचे नाव ग्रीस असले तरी ग्रीसमध्ये त्या देशाला हेलास अथवा हेलेनिक रिपब्लिक असे म्हणतात. (Ελληνική Δημοκρατία, Ellīnikī́ Dīmokratía, [e̞liniˈkʲi ðimo̞kɾaˈtia]),. तसेच ग्रीसला यूनान व यवन (संस्कृत मध्ये) या नावाने पण ओळखल्या जाते. प्राचीन इतिहास लाभलेला हा देश, लोकशाही, ऑलिंपिक खेळ, पाश्चिमात्य नाट्यकला व तत्त्वज्ञान यांची जन्मभूमी तसेच ख्रिश्चन धर्माचे व संस्कृतीचे प्रेरणास्थान म्हणून ओळखला जातो. यासोबतच तेथील गणितज्ञ, इतिहासकार, महान योद्धे,, ऐतिहासिक लढाया यासाठीही हा देश प्रसिद्ध आहे.

हेलास
Ελληνική Δημοκρατία
हेलेनिक प्रजासत्ताक
हेलासचा ध्वज हेलासचे चिन्ह
[[हेलासचा ध्वज|ध्वज]] [[हेलासचे चिन्ह|चिन्ह]]
ब्रीद वाक्य: "एलेफ्थेरिआ इ थानातोस" (अर्थ: स्वातंत्र्य किंवा मरण)
राष्ट्रगीत: इम्नोस इस तिन एलेफ्थेरिआन (अर्थ: स्वातंत्र्याचे गीत)
हेलासचे स्थान
हेलासचे स्थान
हेलासचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
अथेन्स
अधिकृत भाषा ग्रीक
 - राष्ट्रप्रमुख कारोलोस पापुलियास
 - पंतप्रधान अलेक्सिस त्सिप्रास
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस (ऑटोमन साम्राज्यापासून)
मार्च २५, १८२१(घोषित)
१८२९ (मान्यता) 
क्षेत्रफळ
 - एकूण १,३१,९५७ किमी (९७वा क्रमांक)
 - पाणी (%) ०.८६६९
लोकसंख्या
 -एकूण १,०८,१६,२८६ (७७वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ८२/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण २४५.८८ अब्ज अमेरिकन डॉलर (३७वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न २२,८०० अमेरिकन डॉलर (३०वा क्रमांक)
राष्ट्रीय चलन युरो (EUR)
आंतरराष्ट्रीय कालविभाग पूर्व युरोपीय प्रमाणवेळ (EET) (यूटीसी+०२:००)
आय.एस.ओ. ३१६६-१ GR
आंतरजाल प्रत्यय .gr
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +३०
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

ग्रीस हा विकसित देश असून १९८१ पासून युरोपीय महासंघांचा प्रमुख सभासद आहे. याचे चलन युरो असून, पश्चिम युरोपीय देशांच्या तुलनेत अर्थव्यवस्था मध्यम स्वरूपाची आहे. ग्रीसची एकूण लोकसंख्या १ कोटी असून अथेन्स ही त्याची राजधानी आहे.स्पार्टा, सालोनिकी, पेत्रास ही इतर महत्त्वाची शहरे आहेत.

इतिहास

नावाची व्युत्पत्ती

ग्रीसचे स्थानिक नाव वर नमूद केल्याप्रमाणे हेलास आहे. ज्याचा अर्थ ग्रीक भाषेत सूर्याची कृपा असलेला आहे. युरोपातील इतर देशांशी तुलना करता ग्रीसमध्ये सूर्यप्रकाशाचे प्रमाण जास्त आहे, म्हणून हेलास हे नाव पडले.

प्राचीन इतिहास

ग्रीस: इतिहास, भूगोल, हवामान 
अथेन्स मधील अक्रोपोलिस टेकडीवरील पार्थेनॉन

ग्रीस हा देश जगातील प्राचीन देशात गणला जातो.ग्रीक संस्कृती ही तुलनात्मकदृष्ट्या प्राचीन भारत, चीन, इराण, इजिप्त,इटली(रोमन संस्कृती), कोरिया, जपान या संस्कृतींइतकीच जुनी आहे. जिथे मानवी सभ्य संस्कृतीची सुरुवात झाली, असा ग्रीस हा युरोपमधील पहिला देश आहे. असे म्हणतात की, जेव्हा युरोपमधील लोक नुसते बेरी खाऊन जगत होते त्यावेळेस ग्रीकांना कोलेस्ट्रालचा त्रास सुरू झाला होता.[ संदर्भ हवा ] ग्रीक संस्कृतीची मुळे क्रेटा परिसरात सापडतात. इसवी सन पूर्व ६व्या ते ७ व्या शतकात ग्रीक संस्कृती ही अनेक स्वायत्त शहरात विभागली होती. प्रत्येक शहर हे एका देशाप्रमाणे असे. अशी अनेक शहरे एजियन समुद्रापासून ते इटलीपर्यंत होती. अथेन्स,स्पार्टा, थेस्पीया ही त्यातील काही प्रमुख शहरे होती. या शहरांमध्ये परस्पर मैत्रिभााव तसेच शत्रुत्व असे. ही शहरे एकमेकांत अनेकदा युद्धे देखील करत. इसवी सनपूर्व ४थ्या ते ५व्या शतकात ग्रीक संस्कृती या शहरांमध्ये भरभराटीस आली. हा काळ प्राचीन ग्रीसचा सुवर्ण काळ मानला जातो. या काळात असे मानतात की प्राचीन जगातील अनेक आश्चर्ये ग्रीसमध्ये होती जी कालाओघात नष्ट झाली. यातील खुणा अजूनही अथेन्समधील प्राचीन मंदिरांमध्ये दिसून येतात. होमरने इलियड,ओडिसीसारखी महाकाव्ये या काळात रचली गेली. कला, वाणिज्य, तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र यांचा ग्रीसमध्ये उदय झाला व भरभराटीस पावले. ऑलिंपिकसारख्या खेळा-महोत्सवांचा उदय झाला. ग्रीसवर या काळात पर्शियाची मोठी आक्रमणे झाली जी परतवून लावण्यात स्पार्टा व अथेन्सने हिरिरीने सहभाग घेतला. पहिल्या युद्धात अथेन्सने मॅराथॉन येथे पर्शियाचा पराभव केला ज्याच्या स्मरणार्थ आज मॅरॅथॉन धावण्याची स्पर्धा आयोजित होते. दुसऱ्या युद्धात थर्मिस्टीकलीस या सेनापतीने नौदलीय युद्धात पर्शियाचा पराभव केल. फिलिप्स या मॅसेडोनियाच्या राजाने सर्व ग्रीक राज्ये जिंकून ग्रीस एका छत्राखाली आणली. याच्याच मुलगा जो महान अलेक्झांडर द ग्रेट(सिकंदर) म्हणून ओळखला जातो, हा आजवरचा सर्वांत महान सेनापती मानतात. त्याने ग्रीकांचे साम्राज्य भारतापर्यंत वाढवले. नंतरच्या ग्रीक राज्यकर्त्यांनी अशियातील मोठ्या भागावर राज्य केले. इसवी सन पूर्व १४६ मध्ये ग्रीस हे रोमन साम्राज्यात विलीन झाले व कालांतराने त्या साम्राज्याचा महत्त्वाचा भाग बनले. तिसऱ्या शतकात रोमन सम्राट कॉनस्टंस्टाईन याने रोमन साम्राज्याची राजधानी रोमहून कॉनस्टंस्टाईन येथे हलवली व स्वतः ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला.

मध्ययुगीन इतिहास

ग्रीसचा मध्ययुगीन इतिहास हा बायझेंटाईन साम्राज्याचा इतिहास मानला जातो. सम्राट कॉनस्टांईनने रोमन साम्राज्याची राजधानी रोमवरून कॉनस्टंस्टाईन येथे हलवल्यानंतर ग्रीस हे रोमन साम्राज्याचे केंद्र झाले. पुढे रोमन साम्राज्याचे विघटन झाल्यानंतर पूर्व रोमन साम्राज्य हे बायझंटाईन साम्राज्य म्हणून ओळखू जाऊ लागले याची राजभाषा ग्रीक होती. याच काळात बायबलची रचना झाली व ख्रिस्ती धर्म हा बायझेंटाईन साम्राज्याचा अधिकृत धर्म बनला.ब ायझेंटाईन राज्य हे अफ्रिका, मध्य युरोप, पर्शियापर्यंत पसरले होते. अनेक प्रांत या साम्राज्यात असले तरी या साम्राज्याची ख्रिस्ती धर्म म्हणून ओळख होती. बेलारियस व लिओ तिसरा यांसारख्या महान सेनांनीनी हे साम्राज्य सांभाळले व वाढवले.

इस्लामचा उदय झाल्यानंतर इस्लामी फौजांचे पहिले आक्रमण बायझेंटाईन साम्राज्यावर झाले. त्यात त्यांना अफ्रिका व मध्यपूर्वेकडचा भाग गमवावा लागला. परंतु पुढील अनेक युरोपकडेची बाजू बायझंटाईन साम्राज्याने टिकवून ठेवली ती तुर्कींचे आक्रमण होईपर्यंत. दररम्यान दहाव्या शतकात बायझंटाईन ख्रिस्ती धर्माधिकाऱ्यांचे व रोमच्या ख्रिस्ती धर्माधिकाऱ्यांचे मतभेद टोकाला गेले, रोम व ग्रीसमध्ये पुन्हा एकदा दरी निर्माण झाली. ग्रीसचे ख्रिस्ती लोक स्वतःला पारंपारिक ख्रिस्ती म्हणू लागले. बायझंटाईन साम्राज्याचा प्रभाव ग्रीस व सभोवतालच्या देशांवर ११०० वर्षांपर्यंत राहिला. बायझंटाईन साम्राज्याने इस्लामी आक्रमणे अनेक शतकांपर्यंत थोपवून धरली होती. परंतु सरतेशेवटी ऑटोमन साम्राज्याने कॉनस्टंटिनोपलचा पाडाव केला व ११०० वर्षाची एकछत्री सत्ता संपुष्टात आणली.

ऑटोमन राज्यकाल

कॉंन्स्टिनोपलचा पाडाव होण्यापूर्वीच ऑटोमन साम्राज्याने ग्रीसचा बराचसा भाग आपल्या अधिपत्याखाली आणला होता. ग्रीसवर तुर्की लोकांचे राज्य चालू झाले. तुर्की राज्य ग्रीसवर ४०० वर्षांपर्यंत चालले. ऑटोमन साम्राज्यात अनेक प्रातांवर इस्लामची सक्ती करण्यात आली परंतु ग्रीसची ख्रिती धर्माची पाळेमुळे खोल होती त्यामुळे ग्रीसच्या इस्लामीकरणाला प्रखर विरोध झाला. परिणामी ग्रीस हे ख्रिस्ती राहिले. ४०० वर्षात अनेक वेळा ग्रीसचे स्वातंत्र्य मिळवण्याचे प्रयत्न झाले सरतेशेवटी १८२१मध्ये ग्रीसच्या स्वातंत्र्याची घोषणा करण्यात आली व पुढील ८ वर्षात सातत्याचा लढा पश्चिम युरोपातील अनेक देशांच्या मदतीने लढून, १८२९ मध्ये तुर्कांपासून पूर्ण स्वातंत्र्य मिळाले. यानंतर ग्रीक राज्याची स्थापना करण्यात आली त्यात प्रशियाचा सम्राट ग्रीसचा पहिला राजा बनला. या काळात तुर्की राज्यामुळे ग्रीस हे इतर युरोपीय देशांमध्ये झालेल्या सामाजिक परिवर्तानाला मुकले.

पहिले व दुसरे महायुद्ध

महायुद्ध ते आजवर

भूगोल

ग्रीस: इतिहास, भूगोल, हवामान 
ऑलिंपस पर्वत हा ग्रीस मधील् सर्वोच्च शिखर आहे

भौगोलिक दृष्ट्या ग्रीस हा बाल्कन द्वीपकल्पाचा दक्षिण टोकाचा भाग आहे. एजियन समुद्रातील अनेक बेटांचे समूहांमुळे ग्रीसचे बेटे व मुख्य भूमी असे वर्गीकरण करता येईल. ग्रीसची मुख्य भूमी दोन भागात विभागली आहे उत्तर भाग दक्षिण भागाला कोरिंथ उपसागर वेगळा करतो. मुख्य भूमीच्या दक्षिण भागाला पिलेपोनिजचे द्वीपकल्प असे म्हणतात. ग्रीसमध्ये अनेक बेटे असून एकूण १४०० बेटे ग्रीसच्या अखत्यारीत येतात त्यापैकी २२७ बेटांवर मनुष्यवस्ती आहे. ग्रीसला अतिशय लांब असा समुद्र किनारा, एकूण १४,८८० किमी समुद्रकिनारपट्टी लाभली आहे.

ग्रीसच्या बहुतांशी भाग हा डोंगराळ असून देशाचा ८० टक्के भूभाग डोंगराळ प्रदेशाने व्यापला आहे. माउंट ऑलिंपस हे देशातील सर्वोच्च शिखर असून त्याची २,९१७ मीटर ( ९५७० फूट) इतकी उंची आहे. माउंट ऑलिंपस हे प्राचीन ग्रीसमध्ये अतिशय पवित्र मानले जाते, प्राचीन कालीन ग्रीस मधील सर्व देवतांचे वास्तव्य या पर्वतावर होते असे मानतात. पश्चिम ग्रीसमध्ये अनेक तळी असून, पिंड्स पर्वत रांग आहे. पिंड्स पर्वतातील सर्वोच्च शिखर माउंट स्मोकिलाज २,६३७ मी. इतके उंच असून आल्प्स पर्वताच्या उपरांगांमधील एक आहे.

ग्रीस: इतिहास, भूगोल, हवामान 
मेटेऑरा येथील दगडी शिळा

पिंड्स पर्वताची रांग पिलेपोनिजच्या द्वीपकल्पात पुढे जात रहाते व पुढे समुद्राखालून जाउन क्रेटा या बेटावर संपते. या रेषेत येणारी सर्व बेटे ही या पर्वतरांगेचा भाग आहे. पिंड्स पर्वतात अनेक प्रेक्षणीय स्थळे असून मेटेऑरा हे एक प्रसिद्ध स्थळ आहे.

विविधरंगी बेटे हे ग्रीसचे वैशिठ्य आहे. ग्रीसच्या बेटांमधील भौगोलिक विविधता खूप आहे तरीही बहुतांशी बेटे ही ज्वालामूुीपासून तयार झालेली आहे. सॅंटोरिनी ह्या बेटावर इस पूर्व १६०० साली जबरदस्त ज्वालामुखी फुटला होता त्यामुळे या बेटाची भौगोलिक रचनाच बदलून गेली. आज हे बेट ग्रीसचे सर्वांत प्रसिद्ध बेट आहे. क्रेटा हे सर्वांत मोठे बेट असून एकूण १४०० लहानमोठी बेटे ग्रीसच्या अख्यारीत आहेत. ग्रीसचा एगियन समुद्र हा त्याच्या पाण्याच्या रंगासाठी प्रसिद्ध आहे. एजियन समुद्राचे पाणी अतिशय गडद निळ्या रंगाचे दिसते, जे एका प्रकारचे भौगोलिक आश्चर्य आहे.

चतुःसीमा

राजकीय विभाग

मोठी शहरे

  • अथेन्स - अथेन्स हे राजधानीचे शहर असून ग्रीसमधील सर्वांत मोठे शहर आहे. शहराची लोकसंख्या ५० लाखापेक्षा जास्त असून देशाच्या जवळपास अर्धी जनता अथेन्समध्ये रहाते.
  • सालोनिकी - सालोनिकी हे दुसरे मोठे शहर ग्रीसच्या मॅसेडोनिया प्रांतातील हे मुख्य शहर असून याची लोकसंख्या १० लाखाच्या आसपास आहे.
  • पात्रास
  • इराक्लिओ- हे क्रेटा बेटावरील सर्वांत मोठे गाव असून १ लाख लोकवस्तीचे गाव आहे.

हवामान

ग्रीसचे हवामान मुख्यत्वे भूमध्य हवामान प्रकारात गणण्यात येते. त्यामुळे अतिशय कोरडा उन्हाळा व ओला हिवाळा हे येथील वैशिट्य आहे. वर्षातील मुख्य पाउस हिवाळ्याच्या महिन्यात पडतो. पिंडस पर्वत हा देशाचे हवामान ठरवण्यात मुख्य भूमिका बजावतो. पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे पिंडस पर्वताच्या पश्चिमेकडे जास्त पाउस पडतो. त्यामुळे ग्रीसची पूर्व किनारपट्टी ही खूपच कोरडी असते. अथेन्सच्या परिसरात फिरताना हा कोरडेपणा चांगलाच जाणवतो. ग्रीसच्या पर्वतीय क्षेत्रात मात्र चांगला पाऊस पडतो व हिवाळ्यात बर्फ पडतो उत्तरेकडील डोंगराळ भागात अल्पाईन जंगले आहेत. ग्रीसची एजियन समुद्रातील बेटांवर खूपच कोरडे हवामान आहे. त्यामुळे बहुतांशी बेटे रुक्ष आहेत.

समाजव्यवस्था

वस्तीविभागणी

धर्म

ग्रीस: इतिहास, भूगोल, हवामान 
Stavronikita monastery, a Greek Orthodox monastery in Athos peninsula, northern Greece.

ग्रीसचा जो प्राचीन कालीन धर्म होता ज्यात १२ देवतांना पुजले जाई. अपोलो, झेउस, व्हिनस, तीतीका अश्या काही देवता होत्या. ख्रिस्ती धर्माच्या आगमनानंतर हा प्राचीन धर्म लुप्त पावला. कॉन्स्टंटाईन या रोमन सम्राटाने ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यानंतर ख्रिस्ती धर्म हा ग्रीक लोकांनी अंगीकारला. १० व्या शतकापर्यंत पोपशी संबध ताणल्यानंतर ग्रीक व बायझंटाईन नागरिक स्वतःला पारंपारिक ख्रिस्ती म्हणू लागले, तुर्की काळात ग्रीसमध्ये इस्लामी करणात प्रखर विरोध झाला व तुर्की सम्राटांनीही धार्मिक भावना न दुखावता राज्य करावयाचे ठरवले त्यामुळे ग्रीसची ख्रिस्ती परंपरा अबाधित राहिली. संविधानाप्रमाणे पारंपारिक ख्रिस्ती धर्म हा ग्रीसचा अधिकृत धर्म आहे. ग्रीस संविधानाप्रमाणे सर्व नागरिकांना आपपला धर्म निवडण्याचे स्वातंत्र्य आहे.. ग्रीस मध्ये कोणत्याही प्रकारची धार्मिक बंधने घालण्यात येत नाहीत तसेच सरकारकडे कोणत्याही प्रकारची धार्मिक आकडेवारीही उपलब्ध नाही आहे. साधारणपणे ९७ टक्के नागरिक हे पारंपारिक ख्रिस्ती धर्माशी बांधील आहेत. युरोस्टॅट्सच्या अंदाजानुसार ८१% ग्रीक नागरिक हे आस्तिक असून देव असण्यावर त्यांचा विश्वास आ. हे प्रमाण युरोपमधील इतर कोणत्याही देशापेक्षा ( माल्टा व सायप्रस सोडून) जास्त आहे.. ग्रीस मध्ये ख्रिस्ती धर्माची अनेक पवित्र स्थळे आहेत. पॅटमोस ह्या बेटावर संत जॉन यांच्याकडून पवित्र ग्रंथ द रेव्हेलेशन लिहिला गेला. तसेच बायझंटाईन सम्राटांकडून पहिल्या बायबलची रचनासुद्धा ग्रीक भाषेत करण्यात आली होती.

इस्लाम हा दुसरा सर्वांत मोठा धर्म आहे. अंदाजानुसार १,००,००० ते १,४०,००० इस्लाम धर्माचे लोक ग्रीसमध्ये रहातात. ग्रीसमध्ये स्थायिक झालेले अल्बेनियन व पाकिस्तानी लोक हे मुख्यत्वे इस्लाम धर्मीय आहेत. लुझानच्या तहानंतर ग्रीस व तुर्कस्तानमध्ये झालेल्या समझोत्यानंतर ५ लाख लोकांची हकालपट्टी करण्यात आली. यात मुख्यत्वे तुर्की वंशीय लोकांचा समावेश होता. यहुदी धर्म हा सध्या अस्तित्वात असलेला सर्वांत प्राचीन धर्म आहे. २० व्या शतकाच्या सुरुवातीला १ लाखाहून जास्त यहुदी धर्मीय ग्रीसमध्ये वास्तव्यास होते. परंतु कालांतराने त्यांची संख्या रोडावली आहे. एका अंदाजानुसार ग्रीसमध्ये सध्या ५ ते ६ हजार यहुदी नागरिक असावेत

शिक्षण

ग्रीस मध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे सक्तीचे आहे (Δημοτικό Σχολείο, Dimotikó Scholeio) तसेच आता ४ वर्षांपेक्षा मोठ्या शिशूंना बालवाडीचे शिक्षण सक्तीचे करण्यात आले आहे. प्राथमिक शिक्षण ६ व्या वर्षापासून ते १२ व्या वर्षापर्यंत चालते. माध्यमिक शिक्षण दोन प्रकारचे असते एक साध्या प्रकारचे जे विद्यालयात घेता येते तर दुसरे तांत्रिक विद्यालयात प्राप्त करता येते. पुढील शिक्षणाची प्रक्रिया थोडी गुंतागुंतीची आहे.

खेळ

  • ऑलिंपिक खेळात ग्रीस

ग्रीस ही ऑलिंपिक खेळांची जननी आहे. आजचे ऑलिंपिक खेळ हे प्राचीन काळी ग्रीसमध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धाप्रमाणेच भरवल्या जातात. १८९६ च्या पहिली ऑलिंपिक स्पर्धा व २००४ मधील ऑलिंपिक स्पर्धा ग्रीसमध्ये भरवली गेली. फुटबॉल व बास्केटबॉल हे ग्रीसमधील आवडीचे खेळ आहेत. ग्रीस फुटबॉल संघाने २००४ मधील युरोपीय स्पर्धेचे विजेतेपद मिळवून सगळ्या जगाला धक्का दिला होता. ग्रीसचा फुटबॉल संघ सध्या फिफाच्या गुणानुक्रमानुसार ११ व्या स्थानावर आहे. सुपर लीग ग्रीस ही ग्रीसमधील सर्वोच्च फुटबॉल लीग असून ऑलिंपीयाकोस व पॅनान्थियाकोस हे सर्वांत प्रसिद्ध संघ आहेत. ए.ई.के. अथेन्स व अरिस त्सालोनिकी हे इतर प्रसिद्ध संघ आहेत. ग्रीसच्या बास्केटबॉल संघाने आजवर अनेक वेळा दैदिप्यमान यश मिळवले आहे. सध्या ग्रीसचा बास्केटबॉल संघ जागतिक क्रमवारीत ४ थ्या स्थानावर आहे. . व अनेक वेळा युरोपीयन विजेतेपद मिळवले आहे. समुद्रकिनाऱ्यावरील मोठ्या पर्यटनामुळे वॉटरपोलो व बीच व्हॉलीबॉल हे खेळ देखील लोकप्रिय आहेत. हॅन्डबॉल व क्रिकेटचीही लोकप्रियता वाढत आहे.

संस्कृती

राजकारण

ग्रीस: इतिहास, भूगोल, हवामान 
ग्रीसची संसद इमारत
ग्रीस: इतिहास, भूगोल, हवामान 
एलेफथेरीउस व्हेनिझेलोस (१८६४-१९३६), ग्रीसच्या आधुनिक राजकारणातील महत्त्वपूर्ण व्यक्ती

ग्रीसमध्ये संसदीय लोकशाही आहे राष्ट्रपती हे अधिकाराने सर्वोच्च पद आहे व त्यांची निवड हेलेनिक संसदेतर्फे केली जाते. निवड झाल्यानंतर साधारणपणे ५ वर्षाचा कार्यकाळ असतो. संसदेतील सध्याच्या रचनेत १९७५ च्या लष्करी बंडानंतर अमूलाग्र बदल झाले.

ग्रीसमध्ये लोकशाहीची पुनरर्चना झाल्यापासून उदारमतवादी उजव्या पक्षांचे प्राबल्य आहे. न्यू डेमोक्रसी व सोशल डेमोक्राॅटिक पक्षाचे वर्चस्व आहे. ग्रीक कम्युनिस्ट पार्टी तसेच इतर डाव्या पक्षांची युती व लाओस या उजव्या विचारसरणीचा पक्ष हे इतर महत्त्वाचे पक्ष आहेत. कोस्तास कारामान्लिस हे सध्याचे पंतप्रधान असून थोडक्या बहुमतातील सरकाराचे प्रतिनिधित्व करतात त्यामुळे ग्रीसमध्ये थोडीफार राजकीय अस्थिरता आहे.

परराष्ट्र धोरण

ग्रीस हा १९८१ पासून युरोपीय संघाचा मुख्य देश आहे. तसेच युरोपीय वित्तीय महासंघाचा २००१ पासून सदस्य आहे. नाटो (१९५२ मध्ये) ओ.ई.सी.डी (१९६१ पासून) सदस्य आहे. ग्रीसच्या परराष्ट्र धोरणात मुख्यत्वे सायप्रस या देशाच्या ताब्यावरून तुर्कस्तानशी विवाद आहेत. तसेच एजियन समुद्रातील सागरी सीमेवरूनदेखील तुर्कस्तानाशी वाद आहेत. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये एकमेकांविषयी भारत-पाक प्रमाणे कटूुा आहे. मॅसेडोनिया या देशाच्या नावावरही ग्रीसने आक्षेप घेतला असून त्याला इतर नावाने ओळखावे असा आग्रह आहे.

अर्थतंत्र

ग्रीस हा युरोपियन संघातील मुख्य देश असला तरी ग्रीसची अर्थव्यवस्था ही पश्चिम युरोपीय देशांच्या तुलनेत कमकुवत आहे. मोठ्या उद्योगांचा अभाव हे मागे पडण्याचे मुख्य कारण आहे. तरी देखील ग्रीसचा जी.डी.पी हा इतर युरोपीय देशांच्या तुलनेत जास्त आहे. सेवा क्षेत्राचा अर्थ व्यवस्थेत सर्वांत मोठा वाटा आहे तर पर्यटन हे परकीय चलन मिळवून देणारे साधन आहे. ग्रीसला अतिशय लांब समुद्र किनाऱ्याचा वारसा व प्राचीन परंपरेने आलेली जहाज बांधणीची कला यामुळे ग्रीसचा सर्वांत प्रसिद्ध उद्योग लहान व मध्यम जहाजांची बांधणी व सागरी माल वाहतूक हे आहेत. सागरी माल वाहतुकीतील सर्वांत जास्त जहाजे ग्रीस नागरिकांच्या मालकीची आहेत. तसेच ग्रीसचे सर्वांत श्रीमंत नागरिक याच उद्योगामध्ये असल्याने ग्रीस अर्थव्यवस्था, राजकारण व एकूणच अर्थकारणावर या उद्योगाचा व उद्योजकांचा मोठा प्रभाव आहे.

संदर्भ आणि नोंदी

ग्रीस: इतिहास, भूगोल, हवामान 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

ग्रीस इतिहासग्रीस भूगोलग्रीस हवामानग्रीस समाजव्यवस्थाग्रीस शिक्षणग्रीस खेळग्रीस राजकारणग्रीस परराष्ट्र धोरणग्रीस अर्थतंत्रग्रीस संदर्भ आणि नोंदीग्रीसइतिहासकारऑलिंपिकख्रिश्चनगणितज्ञदक्षिण युरोपदेशनाट्यकलाभूमध्य समुद्र

🔥 Trending searches on Wiki मराठी:

जळगाव जिल्हाक्रिकेटचा इतिहासप्रथमोपचाररामटेक लोकसभा मतदारसंघनर्मदा नदीमराठी भाषेमधील वृत्तपत्रेयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघचित्ताकल्याण लोकसभा मतदारसंघवृत्तपत्रमहाराष्ट्रातील पर्यटननाशिक जिल्हामराठा आरक्षणगडचिरोली जिल्हाकबीरस्वादुपिंडबातमीआपत्ती व्यवस्थापन चक्रअळीवखडकराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)जगातील देशांच्या राजधान्यांची यादीकॅरमगोवरमराठा साम्राज्यधाराशिव जिल्हाक्रांतिकारकसरपंचजंगलतोड आणि जागतिक तापमान वाढअंगणवाडीसफरचंदअमरावती लोकसभा मतदारसंघविनायक दामोदर सावरकरनारायण मेघाजी लोखंडेएबीपी माझाहेमंत गोडसेभारतीय मोरतिथीराजाराम भोसलेवायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघकबूतरक्रियापदगोविंद विनायक करंदीकरमृत्युंजय (कादंबरी)ज्वालामुखीहत्तीरोगगणेश दामोदर सावरकरमहाभारतसेंद्रिय शेतीरविदासज्योतिर्लिंगआम्ही जातो अमुच्या गावाकमळछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसअर्थसंकल्पऔरंगजेबसंत जनाबाईमुंबई इंडियन्सतणावशिवम दुबेमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीअजिंक्यताराजागतिक तापमानवाढपुणे लोकसभा मतदारसंघभेंडीमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागनदीआचारसंहितालिंग गुणोत्तररायगड (किल्ला)कडधान्यजाहिरातजन गण मनचेन्नई सुपर किंग्सभारतीय संविधानाचे कलम ३७०सयाजीराव गायकवाड तृतीयआंतरजाल न्याहाळक🡆 More