कमळ

नेलुंबो नुसिफेरा म्हणजे भारतीय कमळ ही एक जलवनस्पती निलंबियासी कुलातील असून तिला 'लक्ष्मी कमळ' किंवा 'पवित्र कमळ' असे देखील म्हणतात.

या वनस्पतीची जातकुळी नेलुंबो आहे.

भारतीय कमळ
नेलुंबो नुसिफेरा
नेलुंबो नुसिफेरा
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: सपुष्प वनस्पती
गण: प्रोटिआलिस
कुळ: निलंबियासी
जातकुळी: नेलुंबो
ॲडान्स
जीव: नुसिफेरा

कमळाचे रोप कमी ऑक्सिजन असणाऱ्या दलदलीत चांगले वाढते. कमळाचे पान, फूल हे पाण्याच्या वर किमान दोन ते तीन फूट उंच वाढते. फुलांचा मोसम हा मार्च ते सप्टेंबर असून, परागीभवन झाल्यानंतर त्यावर प्रथम हिरव्या रंगाच्या बिया येतात. पूर्ण परिपक्व बियांचा आकार साधारणतः टपोऱ्या शेंगदाण्या एवढा असून रंग काळपट होतो. कमळाच्या बियांना कमळगठ्ठा किंवा 'कमळगठ्ठ्याचे मणी' असे म्हणतात. हे कमळगठ्ठ्याचे मणी हिंदू धर्मात जपाच्या माळेसाठी वापरले जातात. प्राचीन काळापासून लक्ष्मीचे प्रतीक म्हणून या मण्यांना मान्यता आहे. कमळाचे सर्व भाग खाण्यायोग्य असून त्यांचा आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी वापर होतो.

कमळ हे भारत आणि व्हिएतनामचे राष्ट्रीय फुल आहे. ही प्रजाती मुख्यतः भारतात हिमालय ते खाली श्रीलंका येथपर्यंत उगवते. या प्रजातीचे फुल गुलाबी असून, इंग्रजीत त्याला इंडियन लोटस किंवा सेक्रेड लोटस म्हणतात.

कमळ आणि कुमुदिनी यातील फरक

'कमळ (Nelumbo)' आणि 'कुमुदिनी उर्फ वॉटर लिली' मूलतः या दोन्ही जलीय वनस्पती असून दिसायला सुंदर आणि सामान्य माणसाला सहजासहजी भेद न करता येणाऱ्या वेगवेगळ्या वनस्पती आहेत. या दोन्हीत पुढील प्रमाणे वेगळेपणा दिसून येतो -

  1. कमळाची पाने अखंड गोलाकार असतात. याउलट कुमुदूनीच्या पानावर, पानाच्या काठापासून ते मध्यभागी देठापर्यंत एकच वैशिष्ट्यपूर्ण खाच आहे.
  2. कमळाचे फूल आणि बहुतेक पाने ही पाण्याच्या पृष्ठभागावर दोन ते तीन फूट उंच हवेत वाढतात. याउलट कुमुदिनीची पाने ही पाण्याच्या पृष्ठभागावर

तरंगतात.

  1. कमळाचे बीज, ज्याला कमळ गठ्ठा असे म्हणतात, हे शेंगदाण्याच्या आकाराचे जाड आणि लंबगोल असतात. तर कुमुदिनीचे बीज हे खसखस इतके बारीक असून काही मोजक्याच प्रजातीत ते उगवतात.

चित्रदालन

संदर्भ

Tags:

कमळ (नेलुंबो)

🔥 Trending searches on Wiki मराठी:

राजाराम भोसलेगर्भाशयम्युच्युअल फंडशेतकरी कामगार पक्षशिर्डी लोकसभा मतदारसंघयोगकोरेगावची लढाईदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघसोलापूर जिल्हायूट्यूबजेजुरीजागतिक लोकसंख्याज्योतिर्लिंगरमा बिपिन मेधावीग्रामपंचायतगोपाळ कृष्ण गोखलेआईसंगीत नाटकअर्जुन पुरस्कारभारतीय संविधानाचे कलम ३७०हंपीमहाराष्ट्रपुन्हा कर्तव्य आहेबडनेरा विधानसभा मतदारसंघकेंद्रीय लोकसेवा आयोगघाटगेमहाराष्ट्र विधान परिषदजहाल मतवादी चळवळभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेआंब्यांच्या जातींची यादीमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगबिबट्यालातूर लोकसभा मतदारसंघमुलाखतन्यूझ१८ लोकमतमीन रासपद्मसिंह बाजीराव पाटीलचोखामेळागौतम बुद्धलता मंगेशकरयोनीमहाराष्ट्र विधानसभावसुंधरा दिनमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीसुजात आंबेडकरमराठा घराणी व राज्येतुळजापूरकविताअतिसारबहुराष्ट्रीय कंपनीनाशिकएकनाथ शिंदेअक्षय्य तृतीयाभाषातेजस ठाकरेवसंतराव दादा पाटीलशिवाजी महाराजांचा जीवनक्रममहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीलेस्बियनशाळातुलसीदाससंख्याविनोबा भावेअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीशिखर शिंगणापूरपौर्णिमापु.ल. देशपांडेजागतिक कामगार दिनयशवंत आंबेडकरभारतीय संविधानाची उद्देशिकादीपक सखाराम कुलकर्णीक्रांतिकारकलोकसभाबीड जिल्हाराणी लक्ष्मीबाईअहमदनगर लोकसभा मतदारसंघतमाशावातावरण🡆 More