कबीर: भारतीय संत

कबीर हे उत्तर भारतातील एक सुप्रसिद्ध संत म्हणून प्रसिद्ध आहेत.

संत कबीर यांचा जन्म ज्येष्ठ शुक्ल पूर्णिमा इ.स. ११४९ साली झाला असे काहीजण मानतात तर, कुणी ते १३९९ मध्ये जन्माला आले असे म्हणतात. महान संत कबीर म्हणजे काळाच्या पुढे असलेले कवी संत समाज सुधारक होते. संत कबीर भारतीय भूमी मध्ये जन्म घेतलेल्या श्रेष्ठ संत यापैकी एक गुरू होत. धार्मिक थोतांडावर कडक आसूड ओढणारे आणि हजारो ग्रंथांचे पांडित्य खुजे करणाऱ्या प्रेमाच्या अडीच अक्षराचा मंत्र सांगणारे पुरोगामी संत म्हणजे कबीर. त्यांनी तत्कालीन प्रचलित असणाऱ्या धर्मातील अंधश्रद्धा व अनिष्ट प्रथा यावर दोह्याच्या माध्यमातून टीका केली. त्यांच्या लिखाणामुळे तत्कालीन अनिष्ट प्रथा आणि अंधश्रद्धा पसरवणारे भोंदू बाबा व बुवा सनातनी यांचे धाबे दणाणले होते. संत कबीर यांनी लिहिलेले बहुतांश दोहे यावर विज्ञानवादी बुद्ध धम्माचा प्रभाव दिसतो. संत कबीर हे सत्य, विज्ञान व कर्मसिद्धान्त यांवर लिहीत. त्यांचा लिखाणामुळे संत कबीर संपूर्ण जगाममध्ये प्रसिद्ध झाले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संत कबीर यांना गुरू मानले. एवढ्या शतकानंतरही महान संत कबीर यांनी लिहिलेले दोहे आजही समर्पक वाटतात. असे हे 'कबीर के दोहे' युगानुयुगे विज्ञानवादी शिकवण देऊन सतत जगाला प्रेरणा देत राहतील, असे वाटते.

कबीर: जीवन परिचय, कबीरांविषयी मराठीतील पुस्तके, संत कबीर संबंधित निवडक पीएच. डी प्रबंध [७]
कबीर

जीवन परिचय

खेमराज श्रीकृष्णदास यांनी प्रकाशित केलेल्या हस्तलिखित "कबीर सागर" ग्रंथातील मजकूर :-

ज्येष्ठ पौर्णिमेस काशीमधील लहरतारा नावाच्या सरोवरात एक प्रखर तेजस्वी प्रकाशामध्ये कबीर साहेब एका कमळाच्या फुलावर प्रकट झाले. हा सर्व प्रसंग तेथे असलेल्या अष्टानंदऋषींनी पाहिला होता. कर्मधर्म संयोगाने काशीतले एक मुस्लिम जोडपे त्यांचे नाव निरू व नीमा होते तेथून जात असताना नीमा पाणी पिण्यासाठी त्या सरोवरकडे गेली. तेव्हा तिची नजर त्या तेजस्वी बालकावर पडली, आणि ते जोडपे त्या बालकाला आपल्या सोबत घेऊन गेले. त्या मुलाचे नाम ठेवण्यासाठी निरूने मौलवीना बोलवले, तेव्हा ज्या ज्या वेळेस कुराण शरीफ उघडू पहिले त्या त्या वेळेस कुराण शरीफ मध्ये सर्वत्र फक्त कबीर कबीर नावच वाचण्यास मिळाले. कबीरचा अर्थ होतो सर्वज्ञ/सबसे बडा. पण हे नाव ठेवण्याची मौलवीची मुळीच इच्छा नव्हती. पण इच्छा नसतांनाही त्यांचे नाव कबीर ठेवण्यात आले, आणि पुढे ते बालक महान कवी व संत कबीर नावाने प्रसिद्ध झाले

कबीर जरी मुस्लिम कुटुंबात रहात होते तरी ते आदिरामाचे उपासक होते. संत कबीर यांनी विवाह केलेला नव्हता. कमाल नावाचा मुलगा आणि कमाली नावाची मुलगी त्यांची मानलेली मुले होती. कबीर हे काशीत विणकर म्हणून काम करत होते. ते आयुष्यभर काशीमध्येच राहिले पण मगहर येथून ते सशरीर हा मृ्त्युलोक सोडून निजधामाला गेले

"सकल जनम शिवपुरी गंवाया।

मरती बार मगहर उठि आया।"


त्यांचा मृत्यू इ.स. १५९८ साली झाला असे मानले जाते.

हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ पौर्णिमेला कबीर जयंती असते.

भारत सरकारने १९५२ साली कबीर यांच्यावर पोस्टाचे तिकीट काढले होते.

कबीर: जीवन परिचय, कबीरांविषयी मराठीतील पुस्तके, संत कबीर संबंधित निवडक पीएच. डी प्रबंध [७] 
पोस्ट तिकीट

कबीरांविषयी मराठीतील पुस्तके

  • आदि श्री गुरुग्रंथसाहेबातील कबीर (संजय एस. बर्वे)
  • कबीर (कबीराच्या दोह्यांचा अनुवाद, मंगेश पाडगावकर)
  • कबीर उपदेश (गजानन बुक डेपो प्रकाशन)
  • संत कबीर रामदास : एक तुलनात्मक अभ्यास (डॉ. ज्योत्स्ना खळदकर) (प्रकाशन दिनांक ११-६-२०१७)
  • कबीरवाणी (संत कबीरांच्या ५०० दोह्यांचा अर्थ, प्रा. रतनलाल सोनग्रा)
  • कबीरवाणी (संत कबीरांच्या दोह्यांचा अर्थ, डॉ. नलिनी हर्षे)
  • कबीर ज्ञानामृत : संत कबीरांचे १००८ दोहे ( स.ह. जोशी; गजानन बुक डेपो प्रकाशन)
  • कबीरायन (कादंबरी, डॉ. भारती सुदामे)
  • कहत कबीर (डॉ. मोहन विष्णू खडसे)
  • कहत कबीर (डॉ. ज्योत्स्ना खळदकर) (प्रकाशन दिनांक २-११-२०१५)
  • कहै कबीर दीवाना (ओशो)
  • कहै कबीर मैं पूरा पाया (ओशो)
  • भक्त कबीराच्या गोष्टी (शंकर पां. गुणाजी)
  • भक्तीत भिजला कबीर (मूळ लेखक - ओशो, मराठी अनुवाद - भारती पांडे)
  • भारतीय परंपरा आणि कबीर (पद्मजाराजे पटवर्धन)
  • भारतीय साहित्याचे निर्माते - कबीर (प्रभाकर माचवे)
  • माझे माझ्यापाशी काही नाही (मूळ लेखक - ओशो, मराठी अनुवाद - भारती पांडे)
  • मृत्यु अमृताचे द्वार (मूळ लेखक - ओशो, मराठी अनुवाद - मीना टाकळकर)
  • म्हणे कबीर दिवाणा (मूळ लेखक - ओशो, मराठी अनुवाद - भारती पांडे)
  • संत कबीर (मूळ लेखक प्रेमचंद ‘महेश’, मराठी अनुवाद - विद्याधर सदावर्ते)
  • संत कबीर - एक दृष्टा समाजसुधारक (डाॅ. मानसी विजय लाटकर)
  • संत कबीर यांची अमृतवाणी (गजानन बुक डेपो प्रकाशन)

संत कबीर संबंधित निवडक पीएच. डी प्रबंध

·        संत कबीर : आधुनिक संदर्भ

·       संत तुकाराम आणि संत कबीर यांच्या साहित्यातील समाजप्रबोधनात्मक जाणिवांचा तुलनात्मक अभ्यास

·         संत कबीरांच्या दोह्यामधून प्रतिबिंबित होणाऱ्या मुल्याधिष्ठित अनोचारिक शिक्षणाचा अभ्यास

संदर्भ

८.दोहे, हिंदी गीत, कुंडलियाँ ,रचनाएँ, बालगीत, ग़ज़ल, हायकू, मुक्तक-RAJPAL SINGH GULIA Archived 2021-10-26 at the Wayback Machine.

https://www.rajpalsinghgulia.com/?m=1 Archived 2021-10-26 at the Wayback Machine.

७. संत कबीर यांच्याशी संबंधित इंटरनेटवरील निवडक : ग्रंथ, पीएच. डी प्रबंध, विडीओज, माहिती स्रोत


Tags:

कबीर जीवन परिचयकबीर ांविषयी मराठीतील पुस्तकेकबीर संत संबंधित निवडक पीएच. डी प्रबंध [७]कबीर संदर्भकबीरअंधश्रद्धागौतम बुद्धबाबासाहेब आंबेडकरसंत

🔥 Trending searches on Wiki मराठी:

राष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांबाबतचा लढान्यूझ१८ लोकमतसेंद्रिय शेतीकोल्हापूरअभिनयअशोक चव्हाणरायगड लोकसभा मतदारसंघदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघसावता माळीऔरंगजेबनफाकृष्णहोळीमुळाक्षरसंग्रहालयमहाराष्ट्राचे राज्यपालमुख्यमंत्रीहातकणंगले विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीमहाराष्ट्रातील स्थानिक शासनविनयभंगपंचशीलराजाराम भोसलेराजरत्न आंबेडकरकर्नाटककुलदैवतकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्र भूषण पुरस्कारधर्मो रक्षति रक्षितःओशोस्थानिक स्वराज्य संस्थाराजा राममोहन रॉयलातूरमानसशास्त्रसचिन तेंडुलकरप्राजक्ता माळीभारतीय नियोजन आयोगदीपक सखाराम कुलकर्णीचाफाबुलढाणा लोकसभा मतदारसंघवाचननांदेड लोकसभा मतदारसंघलिंगभावहॉकीपृथ्वीचे वातावरणवनस्पतीकेरळगोविंद विनायक करंदीकरडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारवर्धमान महावीरगूगलद प्रॉब्लम ऑफ द रूपीमाढा लोकसभा मतदारसंघराष्ट्रवादऋग्वेदमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभीमा नदीताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पसमुपदेशनअंकिती बोसरशियन राज्यक्रांतीची कारणेराज्यपालभारतीय आडनावेपोलीस पाटीलतलाठीप्राणायामजागतिक बँकभारत सरकार कायदा १९१९हवामानसंयुक्त महाराष्ट्र चळवळआळंदीमहासागरईशान्य दिशानाशिक लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीअध्यक्षसभासद बखरअर्जुन पुरस्कार🡆 More